पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 11th, 2014

टाटा मॅजिक इंडीगोची समोरासमोर धडक, १२ जखमी 0

टाटा मॅजिक इंडीगोची समोरासमोर धडक, १२ जखमी

1000
बाभूळगाव – भरधाव वेगात येणाºया टाटा इंडीगो वाहनाने प्रवाषी घेवुन चाललेल्या टाटा मॅजिक काळीपिवळी गाडीला समोरासमोर धडक दिली. हा अपघात खडकसावंगा ते मिटनापुर दरम्यान आज ११ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला. यात दोन्ही गाड्यामधील १२ जण जखमी झाले. जखमींना प्रथमोपचारासाठी ग्रामिण रूग्णालय बाभुळगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र रूग्णांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले.
यवतमाळ-धामणगाव राज्य मार्गावरील खडकसावंगा फाट्यासमोर देवगावहुन बाभुळगावकडे प्रवाशी घेवुन येणाºया टाटा मॅजिक क्र.एम.एच. २९ टी ८४६० ला विरूद्ध दिषेने येणाºया टाटा इंडिगो क्र.एम.एच.२९/एल ९११ ने समोरासमोर धडक दिली. यात टाटा मॅजिक वाहनात बसलेले प्रवाशांसह १२ जण जखमी झाले. जखमींमध्ये प्रदीप मांढरे (२२) रा. नांदुरा, ज्ञानेश्वर मिलमिले (१८) रा. कोळंबी, गणेश वडते (२५) रा.कळंब, निलेश मेश्राम (२०) नांदुरा, उद्धव खरात (५५) रा.धामणगाव, दुर्गा चामलाटे (१२) रा. कामनापुर(भुसारी), योगिता बावने (२०) रा.शेंदुरजना(खुर्द),ता.चांदुर, निलेश सिरसाठ (18) रा. मेंढा, ता. कारंजा, सुरेश वरठी (३५) रा. हिरपुर, रंजीत बिरे (२८) रा. यवतमाळ, रामचंद्र केवदे (२२) रा.गवंडी, सरोजीनी शेंडे (२०) रा.  शेंदुरजना(खुर्द),ता. चांदुर आदिंचा समावेष आहे. सर्व जखमींना प्रथम बाभुळगाव येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांना यवतमाळ शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.

May 11, 2014 in मुख्य पान
पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन 0

पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

Infiltration bid foiled in J&K’s Keran sector
जम्मू – पाकिस्तानी सैन्याने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. गेल्या पंधरा दिवसातील ही पाचवी घटना आहे.
काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नांगीतेकरी भागात पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारास भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारादरम्यान कोणीतीही जिवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
याआधी पाच मे ला राजौरी जिल्ह्यातील भिंबेर गली, तीन मे ला पूंछ जिल्ह्यातील मेंढर तर २८ एप्रिलला राजौरीमधील भिंबेर गली भागात पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला होता. २५ एप्रिललाही पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता.

May 11, 2014 in मुख्य पान
गुगलनेही साजरा केला ‘मदर्स डे’ 0

गुगलनेही साजरा केला ‘मदर्स डे’

google-doodle
मुंबई – नेहमीच प्रयोगशील असणा-या गुगलवरही रविवारी मदर्स डे साजरा करण्यात आला. मे महिन्याचा दुसरा रविवार हा संपूर्ण जगभरात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच धर्तीवर असे विशेष दिवस साजरा करणा-या गुगलनेही मदर्स डेसाठी विशेष डूडल बनवले आहे.
गुगलच्या या अनोख्या डूडलमध्ये आई आपल्या मुलांसोबत सायकल चालवण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मदर्स डेसंबधित माहितीची पेजेस आपल्याला दिसतात.
संपूर्ण जगभरातील अमेरिका, भारत, डेन्मार्क, फिनलँड, इटली, तुर्की, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, कॅनडा, चीन, जपान आणि बेल्जियम यांसारख्या देशात मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

May 11, 2014 in मुख्य पान
वाराणसीत भाजप कार्यालयावर छापा 0

वाराणसीत भाजप कार्यालयावर छापा

bjp office raid
वाराणसी- मतदानाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेश पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने रविवारी वाराणसीत भाजपच्या कार्यालयावर छापा घातला. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अजय राय हे येथून निवडणूक लढवित आहेत.
वाराणसीमधील प्रचार शनिवारी सायंकाळी संपलेला असताना रविवारी निवडणूक आयोगाच्या पथकाने भाजपच्या वाराणसीमधील सिग्रा येथील कार्यालयावर छापा घातला. या छाप्यात टी शर्ट, प्रसिद्धी पत्रक, बिल्ले आणि अन्य प्रचारसाहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रचाराची मुदत संपलेली असतानाही हे साहित्य वाटण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असे आयोगाचे म्हणणे आहे. तर हे साहित्य प्रचारासाठी वापरण्यात आले नसून ते प्रचार संपला तेव्हा उरलेले असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

May 11, 2014 in देश-विदेश
अपघातात एकाच कुटूंबातील तीन ठार 0

अपघातात एकाच कुटूंबातील तीन ठार

DSCN4933

10महागाव – तालुक्यातील कासारबेहळ येथून मुळावा येथे लग्नासाठी जाणाºया पाटे कुटुंबीयांच्या दुचाकीला कन्टेनरने धडक दिल्याची घटना आज रविवारी सकाळी येथून दोन किंमी अंतरावरील हनुमान मंदिराजवळ घडली. यामध्ये तिन जण जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. यावेळी या मार्गावरील वाहतूक ३ तास ठप्प झाली होती़
कासारबेहळ येथील शेतकरी दिगांबर रासाजी पाटे (३४), पत्नी सवीता दिगांबर पाटे (२८), मुलगी गायत्री दिगांबर पाटे (१०), मुलगा राहुल दिगांबर पाटे (८) हे आपल्या दुचाकी क्ऱ एमएच २९ एक्स ९१४५ ने मुळावा येथील लग्नाला जात होते़ महागाव पासून २ कि़मी़ अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरा जवळील वळणावर येताच उमरखेड कडून आलेल्या कन्टेनरने (एम.एच. ३४/एम.९४६७) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दिगांबर, त्याची पत्नी सवीता व मुलगी गायत्री पाटे हे जागीच ठार झाले. तर मुलगा राहुल गंभीर जखमी झाला आहे़ अपघातानंतर कंनटेनरने दिड किमी अंतरापर्यंत दुचाकी घासत नेली. यावेळी चालकाने ट्रक सोडून पोबारा केला. दरम्यान याच कनटेनरने वºहाडा घेऊन जाणाºया एक ट्रकलाही धडक देण्याचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविछेदनासाठी ग्रामिण रुग्णालय सवना येथे पाठविले. तर जखमी राहुल याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी राज्य मार्ग क्र. तीनवरील संपूर्ण वाहतुक तीन तास खोळंबली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे यांनी जखमीच्या उपचारासाठी मदत केली. या अपघातामुळे कासारबेळ सह तालुक्यात शोककळा पसरली आहे़या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

May 11, 2014 in मुख्य पान
गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला, सात जवान शहीद 0

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला, सात जवान शहीद

Naxals carried out landmine blast in Gadchiroli
गडचिरोली  (पीटीआय) – गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रविवारी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सात जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाले आहेत.
सकाळी सुमारे पावणेदहाच्या सुमारास हा हल्ला झाला. जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील मुरमुरीजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या सहाय्याने नक्षलवाद विरोधी पथकाच्या पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सात पोलिस जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली.
पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भूसुरुंग स्फोट झाल्यानंतर नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक सुरु आहे.

May 11, 2014 in मुख्य पान