
उमरखेड – शहरातील मध्यवस्तीत असलेल्या खडकपुरा येथील किराणा दुकानाला आग लागल्याने १२ लाखाचे नुकसान झाल्याी घटना सोमवारी रात्री घडली. ललीत गोविंद तेला याचे खडकपूरा चौकात किराणा स्टोअर्स दुकान आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण दुकानातील साहित्य कवेत घेतले. यामध्ये किराणा माल, वजन काटा, मापे, फर्निचर व महत्वाचे कागदपत्र असा एकुण १२ लाखाचा माल जळून खाक झाला. ही बाब निदर्शनास येताच नगर परिषदच्या अग्निशमन दलाला पाचारण करुन ही आग आटोक्यात आणली. शहरात तीन दिवसापूर्वी धार्मिक स्थळाची विटंबना केल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अनेकांनी जाळपोळ केली होती. याच घटनेचा वचपा काढण्यासाठी सदर दुकानाला आग लावली असा संशय व्यक्त करुन व्यापाºयांनी बाजारपेठ बंद केली होती. मात्र दुकानदाराने ही आग शॉट सर्कीटमुळे लागल्याचे सांगितल्या नंतर व्यापाºयांनी आपले दुकाने सुरु केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व वीज वितरण कंपनीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
Archive for May 20th, 2014
0
दुकानाला आग, १२ लाखाचे नुकसान
0
नरेंद्र मोदींची पंतप्रधापदी नेमणूक, शपथविधी २६ मे रोजी

नवी दिल्ली – भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली असून, येत्या २६ मे रोजी सोमवारी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात संध्याकाळी सहा वाजता होणार शपथविधी होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदींबरोबर ‘रालोअ’चे ३३५ सदस्य खासदारकीची शपथ घेतील.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली.
प्रथम रालोअच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना भेटून नरेंद्र मोदींची रालोअच्या नेतेपदी निवड केल्याची माहिती दिली. रालोअचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींची पंतप्रधानपदी नेमणूक केली. त्याआधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर याच हॉलमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतही नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदीय नेतेपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, सुष्मा स्वराज, अरुण जेटली या सर्व प्रमुख नेत्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड झाल्याची घोषणा केली. या बैठकीनंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि तेलगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीला भाजपचे सर्व नवनिर्वाचित खासदार, नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक २८२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मोदी प्रथमच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आले होते.
0
उत्तर प्रदेश सरकारमधील ३६ मंत्र्यांना नारळ

लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातील राज्यमंत्रीपद असलेल्या ३६ मंत्र्यांना नारळ दिला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अखिलेश यादव यांनी या मंत्र्यांवर कारवाई केली असेली तरी त्यांनी स्वतः राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमधील ८० पैकी केवळ पाच जागांवर विजय मिळाला होता. याआधी त्यांनी ३५ जागांवर विजय मिळवला होता. निवडणुकीतील या पराभवानंतर अखिलेश यांनी ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्र्यापाठोपाठ आणखी काही कॅबिनेट मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या या खराब कामगिरीनंतर अखिलेश यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्यांनी राजीनामा देणार नसून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत राज्यातील ८० पैकी ७१ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर भाजपने आघाडी केलेल्या अपना दल या पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे.
0
बाईक चोरी रोखण्यासाठी ‘स्मार्ट लॉक’

वॉशिंग्टन- अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी बाईक चोरी रोखण्यासाठी एक नविन ‘स्मार्ट लॉक’ शोधून काढले आहे. चावी नसलेले आणि सौर उर्जेवर चालणारे हे उपकरण मोटरसायकलची चोरी झाल्यास मालकाला अलर्टचा संदेश देईल.
सॅन फ्रान्सिस्को येथील वेलो लॅबने या ‘स्मार्ट लॉक’ ची निर्मिती केली आहे. वाहन चोर दुसरी चावी वापरून आपले वाहन चोरून नेतात. आता दुचाकी चोरत असताना तुम्हाला तातडीने माहिती ‘स्मार्टलॉक’ द्वारे दिली जाणार आहे. काहीही संशयास्पद बाब आढळल्यास हे ‘स्मार्ट लॉक’ व्लू ट्रूथद्वारे मालकाच्या मोबाईलवर अलर्ट संदेश पाठवते. हे ‘स्मार्ट लॉक’ २४९ अमेरिकन डॉलरला बाजारात उपलब्ध असून बाईक चोरीला यामुळे आळा बसू शकेल असे इंडस्ट्री लिडर्सच्या मासिकात म्हटले आहे.
हा ‘स्मार्ट लॉक’ रिमोटद्वारे स्मार्टफोनशी जोडलेला आहे. त्यामुळे बाईकची सुरक्षितता आणि बाईकवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. यातील विशेष म्हणजे दुचाकीचा मालक वाहनाच्या बाजूला येत असल्यास हे लॉक आपोआप उघडणार आहे. त्यामुळे दुचाकी चालकाचा मोठा वेळ वाचणार आहे. तसेच या लॉकमध्ये ‘अॅक्सेलोमीटर’ असणार आहे. याचा उपयोग म्हणजे मालकाचा अपघात झाल्यास त्याची माहिती तातडीने दुस-या फोनवर पाठवता येऊ शकेल. बॅटरी कमी असतानाही वायफायच्या सहाय्याने ही माहिती पाठवता येईल. तसेच ईमरजन्सीच्या वेळेस तातडीची मदत पुरवण्यासही याचा फायदा होऊ शकतो, असे उपकरण निर्मिती करणा-यांनी सांगितले. यासाठी फक्त एक तास सुर्यप्रकाश मिळाला तर ते उपकरण महिनाभर चालते.
0
इच्छा, आकांक्षाची पूर्तता हेच ध्येय – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार गरीबांसाठी, तरुणांसाठी आणि महिलांच्या विकासासाठी कटिबध्द असेल. सत्तेवर येणारे सरकार गरीबांचा आवाज ऐकेल, गरीबांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील असे नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बोलताना सांगितले.
आमचे सरकार येथे पदासाठी नव्हे तर, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आले आहे. ससंदेमध्ये ज्यांनी आपल्याला पाठवले आहे त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षाची पूर्तता करण्याचे आपले स्वप्न असले पाहिजे असे नरेंद्र मोदी म्हणाले. सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना नरेंद्र मोदी काही क्षणासाठी भावुक झाले होते. देश आणि भाजप आपली आई असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याआधीच्या सरकारांनी काही केले नाही असे मी किंवा भाजप कधीही म्हणणार नाही. प्रत्येक सरकार आपल्यापरीने देशाची सेवा करते.मी याआधीच्या सरकारांचे आणि त्यांच्या नेत्यांचे अभिनंदन करतो. आम्ही त्यांचे चांगले काम पुढे नेऊ आणि ते अधिक चांगल्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न करु असे मोदींनी सांगितले. देश पुढे गेला आहे. आपल्याला पुढे जायचे आहे कि, नाही ते आपल्याला ठरवायचे आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.









