पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 3rd, 2014

खुनातील आरोपीला जन्मठेप

दारव्हा -घुई येथील इसमाचा खून करणाºया आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायलयसाचे न्यायाधिश संजय देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपी सोमा लालसिंग आडे असे मृतकाचे नाव आहे.  मृतक परशराम शिवलाल जाधव  व आरोपी सोमा हे एकमेकांचे शेजारी रहात होते. त्यांच्यात नेहमीच वाद होऊन त्याचे रुपांतर भांडण होत होते. अशातच जून्या वादावरून १५ फेब्रुवारी २००६ ला सायंकाळी ५ वाजता भांडण झाले होते. यावेळी आरोपी सोमाने फर्शीने डोक्यावर मारून परशरामचा खून केला. याप्रकरणी लाडखेड पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. तपास अधिकारी संजय डहाके यांनी तपास पुर्ण करून  प्रकरण न्याय प्रविष्ट केले होते. यामध्ये दोषी असल्याचे सिद्घ झाल्याने आरोपी सोमा आडे यांस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील भारती चिपडे यांनी मांडली.

May 03, 2014 in मुख्य पान

पैशाच्या वादातून ‘नाईका’चा खून

आर्णी –लग्नातील पैशावरुन बंजारा समाजाच्या नाईकाचा विळ््याने वार करुन खून केल्याची घटना १ मे रोजी सायंकाळी बोरगाव येथे घडली. यामध्ये नाईकाचा मुलगा जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून १५ जणाविरुद्घ गुन्हे दाखल केले.

भगवान रामलाल राठोड (६५) रा. बोरगाव दाभडी असे मृतक नाईकाचे नाव आहे. किरण भगवान राठोड (३०) असे जखमीचे नाव आहे. १ मे रोजी बाबुसिंग रामचंद्र राठोड याच्या मेव्हण्याच्या मुलीचे लग्न होते. लग्न विधी आटोपल्यानंतर वधु मुलीला माहेरी पाठविताना बंजारा समाजातील रितीरीवाजाप्रमाणे मुलगा व मुलगी यांच्या वडीलाकडून तांटतील नाईकाला पैसे दिले जाते.  यावेळी भगवान राठोड हे तांट्याचे नाईक हे होते. दरम्यान बाबुसिंग राठोड याने पैसे देऊ नये असे मेव्हण्याला सांगितले. त्यावरुन दोन गटामध्ये वाद निर्माण होऊन तुंबड हाणामारी झाली. यावेळी बाबुसिंग राठोड (५०), नितेश बाबुसिंग राठोड (२५), योगेश बाबुसिंग राठोड (२२), शालु बाबु सिंग राठोड (४०) यांनी नाईक   भगवान व त्याचा मुलगा किरण राठोड (३०) याच्यावर विळ््याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र भगवानचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रविंद्र भगवान राठोड (३०) याने दिलेल्या तक्रारीवरुन आर्णी पोलिसांनी गुन्हे दाखल करुन तीन आरोपींना अटक केली. तर बाबुसिंग याने पोलीसात तक्रार दिली असून मृतक भगवान राठोड, किरण राठोड, पिंट्या राठोड, मणिबा राठोड, किशोर राठोड, सविता राठोड, भगवान राठोड, रवि राठोड, वर्षा राठोड, मुरली राठोड, राजेश राठोड, गुंफा राठोड यानी पैसे न दिल्याने लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी अकरा जणाविरुद्घ गंभीर गुन्हे दाखल केले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

May 03, 2014 in विदर्भ

चाकुने कापला पत्नीचा गळा,पतीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

 

महागाव – शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीच्या गळ््यावर चाकुने वार करुन खून केल्याची घटना थरारक घटना दहिवड येथे २ मे रोजी दुपारी घडली. यावेळी घटनास्थळावरून पतीने पळ काढून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे.

माया बळवंत राठोड (२४) रा. दहिवड असे मृतक महिलेचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी महागाव तालुक्यातील घोनसरा येथील पवन बिलो राठोड (२४) या युवकासोबत तीचा विवाह झाला होता. सुखी संसार सुरु असतानाच पतीसह सासरच्यानी माहेरवरुन एक लाख रुपये आणयाच्याचा तगादा लावला होता. यावेळी तीचा शारीरीक व मानसिक छळ करुन मारहाण करणेही सुरु केले होते. सतत होणाºया त्रासाला कंटाळून सहा महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाला घेऊन दहिवड येथे येऊन वडीलांकडे राहत होती. दरम्यान पेंढी येथील दौलत नाईक यांच्या समक्ष पती पत्नीची बैेठक बोलावुन समेट घडवून आणला. यावेळी मायाला फारकत देऊन मुलगा अभिमन्यु याच्या नावावर आठ दिवसात तीन एकर शेती  करण्याचे ठरले होते. लाखो रुपयाची शेती मुलाच्या नावाने करावे लागणार असल्याने पनव संतप्त झाला होता. त्यामुळे त्याने पत्नी मायाला कायमचे संपविण्याचा निर्णय घेतला. २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एम.एच. २७ / झेड ४६४८ क्रमांकाच्या दुचाकीने तो दहिवड येथे आला. त्यानंतर महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून मायाला तीच्या काकाच्या घरात नेले. यावेळी आतमधून दाराची कडी लावुन सोबत आणलेल्या चाकुने पत्नी मायाच्या गळ््यावर सपासप वार केले. यावेळी किंचाळीत रक्ताच्या थोळ््यात ती खाली पडताच पवनने तेथून काढता पाय घेत मनोहर पवार याच्या दुचाकने फरार झाला. काही वेळानंतर त्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर पुसद येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पवन राठोड याच्याविरुद्घ खूनाचा गुन्हा दाखल केला.

घटनेच्या दिवशी आरोपीचे नातेवाईक बिल्लु राठोड, विमल राठोड, पिंटु राठोड, जयश्री राठोड, सर्वेश राठोड, रंजना राठोड, नारायण पवार, वनिता पवार हे दहिवड येथील दिगांबर बदु चव्हाण याच्या मुलीच्या लग्नाला आले होते. त्याचाही या घटनेत सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्याच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती. अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी प्रती रोष व्यक्त होत आहे.

May 03, 2014 in विदर्भ

यवतमाळात ३२ लाखाचा साखर घोटाळा,जिल्हाधिकाºयाला अहवाल सादर

 

यवतमाळ- सार्वजनिक वितरण प्रणालीत शिधापत्रिकाधारकांना दरमहा  देण्यात येणाºया साखर वाटपात तफावत असल्याचा   प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशीत ३२ लाखाचा घोटाळा झाला असल्याची बाब पुढे आली असून याचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आला आहे. त्यामूळे दोषीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रास्तभाव देकानंदाराना दरमहा साखरेचे नियतन करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तालुकास्तरावर शुगर नॉमिनीची नियुक्ती केली होती. शुगर नॉमिनीकडून दरमहा रास्तभाव दुकानदारांना साखरेचे नियतन होणे गरजेचे असताना २०१० ते २०१२ या कालावधीत यवतमाळ तालुक्यात साखर रास्तभाव दुकानापर्यंत पोहचली नसल्याच्या असंख्य तक्रारी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आल्या होत्या. तक्रारीच्या अंनुषगाने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र चौकशीत दोषीना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप नागरीकांतून होत असताना या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून योग्य चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिलदार अनुप खांडे यांना दिले होते. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचेकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात  ३२ लाखाचा साखर घोटाळा झाल्याचे नमूद असून लवकरच दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

 

May 03, 2014 in विदर्भ

साई अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजला आग; लाखोंचे नुकसान

उमरखेड- शहरपासून जवळच असणाºया महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये असणाºया प्रशांत मुक्कावार यांच्या मालकीचे साई अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये चने कुटार रिकामे करण्यासाठी आलेल्या वाहनामुळे कुटार गंजीला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

आज ३ मे रोजी एमआयडीसी मध्ये व क्र. एम.एच. २६-७८१५ टाटा छोटा ट्रक कुटार खाली करण्यासाठी आला होता. आधीच कुटार असल्यामुळे गाडी पुढे न जाता जागीच फिरत होती. त्यामुळे घर्षण होऊन आग लागली त्यामुळे वाहन जागीच जळून खाक झाले तर कुटार गंजीला आग लागली. दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे व उन्हाच्या तिव्रतेमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी उमरखेड, पुसद, हदगाव व महागाव येथून अग्नीशामक दल बोलावण्यात आले होते. माहिती मिळताच पो. स्टे. चे पी.एस.आय. मनोज मानकर, एपीआय सुरज बोंडे, सचिन ढोके आपल्या ताफ्यासह पोहचून परिस्थिती हाताळत होते. या आधीही दोनदा आग लागली होती. आग विझविण्यासाठी १० ते १५ गाड्या अग्नीशामक दलाची आवश्यकता भासेल, असे असताना वाहन आटोकाट प्रयत्न करत होत्या. परिसरात व कारखान्यात अग्नीशमन व्यवस्था पाहिजे असते ती नव्हती. दोन जेसीबीच्या सहाय्याने भुसा हटवत शर्थीचे उशिरा पर्यंत सुरू होते. एकूण लाखोचे नुकसानाला व्यावसायीकाला समोर लागले.

 

May 03, 2014 in विदर्भ

बोहल्यावर चढण्यापुर्वीच नवरदेव बेपत्ता

यवतमाळ – लग्न पाच दिवसावर येउन ठेपले असताना बोहल्यावर चढण्यापुर्वीच नवरदेव तीन दिवसापुर्वी रहस्यमय बेपत्ता झाल्याची घटना शहरालगत असलेल्या पिंपळगाव ग्रा. पं. क्षेत्रात घडली असून गणेश नारायण दिवटे (३०) असे बेपत्ता झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू असून या प्रकरणी वडगावरोड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

शहरात मसाल्याची एजन्सी चालविणाºया गणेशचे नेर तालुक्यातील पाथ्रड गोळे येथिल एका मुलीशी लग्न जुळले होते. येत्या ५ मे ला त्याचा विवाह होणार होता. घरी लग्नाची धामधुम सुरू असताना २९ तारखेला त्याला अचाानक दुपारी फोन आला. फोनवर बोलल्या नंतर गणेश घराबाहेर पडला. त्यानंतर मात्र तो घरी परतलाच नाही. त्यामूळे त्याच्या कुटुंबीयानी त्याला शोधण्यासाठी धावपळ सुरू केली. परंतू गणेशचा पत्ताच लागत नसल्याने काल शुक्रवारी वडगावरोड पोलिसात याप्रकरणाची तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसानी त्याचा शोध सुरू केला आहे. गणेश बेपत्ता झाला त्या दिवशी त्याची मोठी बहिण लग्नासाठी यवतमाळ बसस्थानकावर उतरल्यानंतर बसस्थानकावर घेण्यासाठी तीने गणेशला फोन लावला होता. गणेशने मी कामात असल्याचे सांगून अ‍ॅटोने जाण्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र गणेशचा मोबाईल स्विचआॅफच होता. त्याची हिरोहोंडा दुचाकी काल बसस्थानकात पोलिसाना मिळाली  असून आर्णीकडे तो आज दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक आर्णीला त्याचा शोध घण्यासाठी गेले होते. वृत्त लिहेपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

May 03, 2014 in विदर्भ

पुसदमध्ये गारपीट

पुसद – वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा आज शनिवारी पुसद तालुक्याला बसला. लिंबाच्या आकाराच्या झालेल्या गारपीटीने बराच वेळ नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते.

हवामानातील बदलामुळे सातत्याने गारपीटीचा सामना तालुक्याला करावा लागत असून आज शनिवारी  दुपारी अचानकपणेच आकाशात ढग दाटून आले. काही वेळातच सोसाट्याचा वारा सुटून गारपीटीला प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाल्याने ग्रामीण भागात उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने अनेक घरांवरील छपरांचीही हानी झाली. वृत्त लिहेपर्यंत कुठल्याही प्रकारची मोठी हानी झाल्याचे समजले नाही.

डेहणीला तडाखा – दिग्रस तालुक्यातील डेहणी शिवारातही दुपारी ४ वाजताच्या दरम्यान वादळी वाºयासह गारपीट झाली. या परिसरात शेतकºयांनी घेतलेल्या उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वादळामुळे झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. साधारणत: बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याने शेतात कामानिमित्त गेलेल्या मजुरांनाही सुरक्षीत स्थळाचा आसरा घ्यावा लागला.

May 03, 2014 in विदर्भ

प्रतिष्ठीत व्यक्तीत्याच्या मुलाची आत्महत्या

 

पुसद – शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती संजय देशमुख यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ओंकार संजय देशमुख (२०) असे मृतक युवकाचे नाव आहे. स्वत:च्या घरीच पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. दरम्यान आज शनिवारी जांब बाजार येथील शेतात त्याच्या पार्थीवावर अत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांच्या एककुलत्या एक मुलाने आत्महत्या का केली याचे कारण अजुनही समजु शकले नाही.

May 03, 2014 in विदर्भ