पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 10th, 2014

विधानसभेसाठी तयारीला लागा – पवार 0

विधानसभेसाठी तयारीला लागा – पवार

index.jpeg4
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी आणि १६ मे ला निकाल लागल्यानंतर कशी परिस्थिती असेल याविषयी या बैठकीत चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री या बैठकीला उपस्थित होते. अजित पवारांचे सरकारी निवासस्थान देवगिरीवर ही बैठक झाली. शरद पवारांनी मंत्र्यांना राज्यभर दौरे करण्याचे तसेच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
सोशल मिडियाचा निवडणुकीवर असलेला प्रभाव, मतदानाचा पॅटर्न आणि काँग्रेसचे सहकार्य या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कशी राजकीय स्थिती असेल याविषयी चर्चा झाल्याचे एका मंत्र्याने बैठकीनंतर सांगितले.

May 10, 2014 in मुख्य पान
नाशिकमधील गुंड भीम पगारेची हत्या 0

नाशिकमधील गुंड भीम पगारेची हत्या

images.jpeg3
नाशिक- नाशिक शहरातील गुंड भीम पगारे यांची अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथील राजीव नगर परिसरात पगारे याच्यावर प्रथम चाकूने हल्ला केला त्यानंतर त्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पगारेवर खुन, खंडणी आणि अन्य गुन्हे दाखल होते. दरम्यान, घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पगारे याच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. शहरातील गंगापूर ते अशोक स्तंभ या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

May 10, 2014 in मुख्य पान
सोळाव्या लोकसभेसाठी प्रचार संपला 0

सोळाव्या लोकसभेसाठी प्रचार संपला

images.jpeg2
नवी दिल्ली – सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. येत्या १२ मे रोजी सोमवारी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात तीन राज्यातील ४१ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
अंतिम टप्प्यात वाराणसीची लढत सर्वात लक्षवेधी लढत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी येथून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर आपचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांचे आव्हान आहे.
विकासाच्या मुद्यावरुन सरु झालेला प्रचार शेवटच्या टप्प्यांमध्ये जाती-पातीच्या पातळीपर्यंत घसरला. भाजप नेते गिरीराज सिंह, अमित शहा, सपाचे नेते मुलायमसिंह यादव, आझम खान आणि अबू आझमी यांनी जाहीरसभांमधुन वादग्रस्त विधाने केली. अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्यातील शाब्दीक व्दंद चांगलेच रंगले. अंतिम टप्प्यात उत्तर प्रदेशातील १८, पश्चिम बंगालमधील १७ आणि बिहारमधील सहा जागांवर मतदान होणार आहे. १६ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदाच्या मतदानाने १९८४ च्या मतदानाचा विक्रम मोडीत काढला आहे. आतापर्यंत झालेल्या आठ टप्प्यांमध्ये ५०२ लोकसभा मतदारसंघात ६६.२७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. २००९ मध्ये संपूर्ण देशात एकूण ५७.९४ टक्के मतदान झाले होते. यावेळी २००९ च्या तुलनेत प्रत्येक टप्प्यामध्ये मतदानात वाढ झाली आहे.

May 10, 2014 in मुख्य पान
‘मुक्ती कोण पथे’ व अमृत महोत्सव २४ मे रोजी 0

‘मुक्ती कोण पथे’ व अमृत महोत्सव २४ मे रोजी

images.jpeg1
यवतमाळ – धर्मांतराचा कार्यकारणभाव विशद करून कोट्यवधी अस्पृश्यांना उर्जा देणाºया मुंबई ईलाखा परिषदेतील प्रेरणादायी व क्रांतीकारी, ‘मुक्ती कोण पथे’ या प्रबोधन उच्चाराला अमृत महोत्सवाचे आयोजन २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे केले आहे.  नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यानिमित्ताने उर्जा दिनाचे कार्यक्रम होणार आहे.
३१ मे १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई इलाखा महार परिषद आयोजित करून आपल्या ओजस्वी व मुलगामी भाषणातून संभ्रमित अस्पृश्यांना नवी दिशा दिली. या परिषदेमुळेच लाखो अस्पृश्य धर्मांतरासाठी कटिबध्द झालेत. त्याचबरोबर १५ मे १९३६ रोजी अ‍ॅनहिलेशन आॅफ कास्ट हे लाहोर येथे जातपात तोडक मंडळाच्या कार्यक्रमात ऐनवेळेवर रद्द झालेले भाषण पुस्तक रुपाने बाहेर आले आणि या गं्रथाने समस्त भारतीयांना जाती व जाती निर्मूलनाचे स्वरूप व सिध्दांत समजावून सांगितले. त्या ग्रंथाचाही अमृत महोत्सवी गौरव या निमित्ताने या चिंतनपर कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात हिंगणघाटचे आंबेडकरी विचारवंत अशोक बुरबुरे, बुद्धप्रिय थूल , प्रा. अनिल काळबांडे इत्यादींचा सहभाग असणार आहे. या निमित्ताने धम्मप्रसार करणाºया मान्यवरांचा तसेच अनेकविध महिला व पुरूष मंडळांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. यामध्ये संध्या सराटकर, प्रा. अशोक इंगळे , शेषराव पिराजी धांडे, डॉ. गणेश टाले, अशोककुमार दवणे, बळी खैरे, संदेश ढोले, माधव सरकुंडे, दशरथ मडावी, मन्सुर एजाज जोश, संघमित्रा टेंभूर्णे, सिद्धार्थ भगत यांचा सहभाग असणार आहे. मुक्ती कोण पथे आणि जाती निर्मूलन या दोन उर्जस्वल भाषणाच्या अनुषंगाने चळवळीतील उर्जादायी व्यक्तीमत्वाला ‘भीम उर्जा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे नाग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी कळविले.

May 10, 2014 in विदर्भ
लुटमारीच्या करणारी टोळी जेरबंद , तलवारीसह शस्त्र जप्त 0

लुटमारीच्या करणारी टोळी जेरबंद , तलवारीसह शस्त्र जप्त

IMG-20140510-WA0011
यवतमाळ – जिल्ह्यात सातत्याने वाटमारीच्या घटना घडत असून शुक्रवारी रात्री  ९ वाजता भारी येथील पूलाजवळ लुटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरुन असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तलवारीसह धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.
विशाल गोपाल सोयाम (२५), मनोज रामूजी विश्वकर्मा (२५), विक्रम भाऊराव राऊत (२३), पराग उर्फ चिन्टु देवराव कानडे (२०), अमोल जनार्धन मगळे (१८), दिनेश भास्कर गुरनुले (२२) सर्व रा. माळीपुरा यवतमाळ, हेमंत कचनलाल राय (४४) रा. बालाजी चौक, यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. तर अन्य दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेऊन  कारवाई केली. शुक्रवारी ९ मे रोजी रात्री ९ वाजता यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील भारी येथील पूलाजवळ  अंधारात शस्त्रासह हे सर्वजण लुटमार करण्यासाठी दबा धरुन बसले होते. या बाबतची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाली होती. त्यावरुन मदने, शहरचे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय आष्टीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय ढोले, जमादार संजय कांबळे, विजय जाधव, प्रमोद मडावी, इकबाल शेख, तुषार   नेवारे, संतोष मडावी यांनी घटनास्थळ गाठून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस आल्याचे पाहुन आरोपींनी आपल्या जवळील तलवारींसह धारदार शस्त्र फेकून दिले होते. यावेळी पोलिसांनी सदर शस्त्र जप्त करुन आरोपींविरुद्घ गुन्हे दाखल केले. जिल्ह्यात सतत वाटमारीच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आरोपींना अटक केल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

May 10, 2014 in विदर्भ
‘धम्मदिक्षा’ नाट्यकृतातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ विचारसुत्र 0

‘धम्मदिक्षा’ नाट्यकृतातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ विचारसुत्र

42
यवतमाळ – आयुष्याच्या संध्याकाळी आम्हाला सोडून जाऊ नकोस ही मनविभोर करणारी राजा शुध्दोधन महाप्रजापती यांची आर्त हाक, विनवणी आणि दु:खमुक्तीसाठी डोक्यात मी चंद्र जखमी घेऊन मी निघाली’ या ठाम निग्रह या संबोधी क्रिएशन निर्मित धम्मदिक्षा नाटकाच्या पहिल्याच प्रदेशातील गृहत्यागाच्या भाव नाट्यास नाट्यरसिंकांनी भरभरून दाद दिली. ९ मे रोजी समता पर्वात सादर झालेल्या प्रा. शांतरक्षित गावंडे लिखीत व अविश वत्सल बन्सोड दिग्दर्शित धम्मदिक्षा नाट्यकृतीच्या सादरीकरण केले.
प्रारंभी जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नाट्यदिग्दर्शक अविश वत्सल बन्सोड यांचे स्मृतीदिन्ह देऊन स्वागत केले. बुध्द आणि त्यांचा धम्म या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथातील बहुजन हिताय बहुजन सुखाय हे विचारसुत्र घेऊन ही नाट्यकृती आकारास आली. सिध्दार्थाचा गृहत्याग, सुजाताचे खरिदान, चांडलिका प्रकृतीची धम्मदिक्षा, अंगुलीमालाचे मत परिवर्तन, दुराचारी लोकात धम्मदिनेने केलेले परिवर्तन, मृत्यू हे अंतीम सत्य आहे. हे किसा गौतमीलात बुध्दांना सांगितलेले जीवनसत्य, हे सर्व प्रसंग रंगमंचावर सरसपणे सादर झाले. रंजन आणि प्रबोधन यांचाही सुरेख समन्वय साधण्यात आला. या नाट्याकृतीत महाप्रजापती, मातंगी, गुरूमाता ह्या व्यक्तीरेखा (चारुलता पावशेकर), प्रकृती किसा गौतमी (कांचन गुजर), सुजाता (स्फुर्ती गोळे, धम्मदिना (भारती कुडमेथे), सखी (प्रशंसा पाटणकर), अचार्व (विजय रंगारी), वाणिक (राजेश (श्रीवास्तव), धनिक (सुरज मोने), माणिक (स्वप्नील मिसळे), तथागत बुध्द (सुनिल आडे), राजा शुध्दोधन (गौतम बोरकर), अंगुलीमाल (संजय माटे), रजपुत्र सिध्दार्थ (ज्ञानेश्वर सोनटक्के), अहिसंक (राहुल गेडाम), बाल सिध्दार्थ (ऋषिकेश चौधरी), देवदत्त (रोशन चौधरी), निवेदक भदंत (अतुल मेश्राम), भदंत (गुलशन पाटील, निखील भगत) या सर्व कलावंतानी आपल्या भुमिका प्रभावीपणे साकारल्या सुबोध वाळके यांच्या पार्श्वसंगित आणि संगित संयोजनाचे अनेक प्रसंगात घनव्याकुळ केले. चेतन बालपांडे यांच्या गायनाने संगित नाट्याची आठवण करून दिली. अशोक कार्लेकर यांची प्रकाश योजना, प्रसंगानुसार व प्रत्ययकारी होती. समारोपीय कार्यक्रमात डॉ.टि.सी. राठोड यांनी मनोगत व्यक्त करतांना ‘धम्मदीक्षा’ही नाट्यकृती अव्वल दर्जाची असल्याचे मत व्यक्त केले. समता पर्वाचे सुत्रधार कुलदिप रामटेके, डॉ. टि.सी. राठोड, समता पर्वाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. सुनंदा वालदे, मंगला दिघाडे, शिक्षधाधिकारी गंगाधर जाधव, धांदे यांच्या हस्ते कलावंताचे स्वागत केले.संचालन सुनील वासनिक, नम्रता खडसे यांनी तर आभार तिजेंद्र ढाणके यांनी मानले.

May 10, 2014 in विदर्भ
  उमरखेडात दोन चोरीच्या घटना, दोन लाखांवर डल्ला 0

उमरखेडात दोन चोरीच्या घटना, दोन लाखांवर डल्ला

images

उमरखेड  – शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून  एकाच रात्री चोरट्याने विविध घटेनत दोन लाखावर डल्ला मारला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे.
स्थानिक शिवाजी वॉर्डात राहणाºया संगीता गौतम पडघणे यांच्या घरात चोरट्याने आत प्रवेश केला. कपाटातून एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्यामध्ये लाँग गंठन एक तोळा, छोटे गंठन ७ ग्रॅम, कानातले १ ग्रॅम, ३ अंगठया सहा ग्रॅम असा एकूण एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल चोरला. अशातच रात्री दीड वाजताच्या सुमारास कपाटाचा आवाज आल्याने महिला जागी झाली. त्यावेळी  एक इसम कपाटातून दागिने चोरत होता व एक जण दारामध्ये उभा दिसला. त्यामुळे महिलेने आरडा ओरड केल्याने चोरट्याने तेथून पोबारा केला. तसेच ताजपुरा वार्डातील  शे. सादीक शे. करीम यांच्या मालकीचा एम.एच. २६ बी. ४९४७ क्रमांकाचा ट्रक उभा होता. शहरापासून ७ किलोमीटर संगम चिंचोली पर्यंत ट्रक नेऊन डिस्क सह पाच टायर (किंमत १ लाख १० हजार) काढून चोरुन नेले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरु आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून चोरीच्या घटनांनी नागरिकांसह व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी चोरटयांना अटक करावी व  रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

May 10, 2014 in मुख्य पान