पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 23rd, 2014

शपथविधीची जोरदार तयारी, सुरक्षेसाठी हवाई दल आणि एनएसजी तैनात 0

शपथविधीची जोरदार तयारी, सुरक्षेसाठी हवाई दल आणि एनएसजी तैनात

Preparations for swearing-in ceremonyनवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी जोरदार सुरु आहे. या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. तर दुसरीकडे मोदींसोबत मंत्रीपदाची शपथ कोण घेणार याची चर्चा सुरु झाली आहे. २६ मे रोजी होणा-या या शपथविधी सोहळ्यातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपचे प्रमुख राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी आणि अरुण जेठली या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीस मोदी देखील उपस्थीत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींसोबत काही जण मंत्रीपदाची शपथ घेतील. त्याआधी दिवसभर अकाली दलचे प्रमुख आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेतील. केंद्रीय मंत्रिमंडळात अकाली दलाला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोदींच्या शपथविधीसाठी राजधानीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनाला सुरक्षा व्यवस्था असते. तशीच सुरक्षा या समारंभासला देण्यात आली आहे. भारताच्या शेजारील देशाचे राष्ट्रप्रमुख आणि तीन हजारूहून अधिक पाहूणे या कार्यक्रमास येणार आहेत. त्यामुळे रायसीना हिल्स परिसरातील सर्व कार्यालये कार्यक्रमाच्या पाच तास आधी बंद करण्यात येणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.या परिसरातील हवाई सुरक्षेची जबाबदारी भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात आली आहे. परिसरातील सर्व उंच इमारतींवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.याशिवाय मोबाइल हिट पथक, अँटी-एअरक्राफ्ट, राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे शार्पशूटर्स, दिल्ली पोलिसांचे विशेष अधिकारी या परिसरात असतील

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे निधन 0

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे निधन

Anand-Modak
पुणे- ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. गुरुवारी संध्याकाळी आनंद मोडक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी दुपारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोथरुड येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
घांशीराम कोतवाल या नाटकाच्या संगीताद्वारे त्यांनी कारकिर्दीचा शुभारंभ केला होता. महानिर्वाण, तीन पैशांचा तमाशा, पडघम या नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीत प्रवास बहरत गेला. एक होता विदूषक, चौकट राजा, हरिशचंद्राची फॅक्टरी, मुक्ता, तू तिथे मी, कळत- नकळत अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार संगीत दिले. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले. नुकताच प्रदर्शित झालेल्या यशवंतराव चव्हाण या चित्रपटालाही मोडक यांनी संगीत दिले आहे.

भारतीय दूतावासावर हल्ला, चार दहशतवादी ठार 0

भारतीय दूतावासावर हल्ला, चार दहशतवादी ठार

AP5_23_2014_000054Aकाबूल- अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर हल्ला करणा-या चारही दहशतवाद्यांना ठार मारल्याचे आयटीबीपीचे प्रमूख सुभाष गोस्वामी यांनी सांगितले.
पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर चार सशस्त्र दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला. या चारही जणांना ठार मारल्याचे इंडो- तिबेटन सीमा दल (आयटीबीपी) प्रमूख सुभाष गोस्वामी यांनी सांगितले. यातील एका दहशतवाद्याला आयटीबीपी आणि तीन दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या जवानांनी ठार मारले.
भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील अधिका-यांनी दिली. तसेच काबूल येथील दूतावास आणि जलालाबाद येथील वकिलातीत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर मझर ए शरीफ आणि खंदहार या भागातही चोख सुरक्षा ठेवण्यात आली असून या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. भारत सरकार अफगाणिस्तानच्या संपर्कात असून, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.

May 23, 2014 in मुख्य पान
शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाचा भरचौकात खून 0

शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाचा भरचौकात खून

IMG-20140523-WA0019

222

यवतमाळ – पूर्ववैमनस्यातून येथील शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांचा भरचौकात निघृण खून केला. आज सायंकाळी उमरसºयातील तीन फोटो जवळ घटलेल्या या हत्याकांडाने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
रामनारायण उर्फ दादु इंद्रजीत मिश्रा (४०) रा. उमरसरा असे मृतकाचे नाव असून ते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते. आज सायंकाळी अज्ञात व्यक्तीने दादुच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उमरसरा येथील तीन फोटो चौकात त्याला बोलावले होते. त्यावरुन तो आपल्या दुचाकीने घटनास्थळी आला होता. यावेळी दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात मारेकºयानी तलवारीने दादुच्या डोक्यावर सपासप घाव मारले. यामध्ये दादु रक्ताच्या थारोळ््यात जमीनीवर कोसळला. काही कळायच्या आतच मारेकरी तेथून पसार झाले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी आॅटोत टाकुन त्याला कै. वसंतराव नाईक महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करुनही दादुचे प्राण वाचविता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच आ. संजय राठोड यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.
दादु मिश्रा यांनी उमरसरा ग्रामपंचात अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची वरिष्ठाकडे तक्रार केली होती. तेव्हापासून त्याना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याची माहिती असून त्यातूनच विठ्ठल नामक व्यक्तीने हा हल्ला केला असावा अशी चर्चा आहे. यावेळी शिवसैनिकांनीही घटनास्थळ व रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच चार्ली कमांडो पथक, वडगाव रोड पोलिस, टोळी विरोधी पथक, उपविभागीय अधिकाºयांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. हा खून कोणी व का केला हे अजुनही उघड झाले नसुन पोलिस मारेकºयांच्या शोधात रवाना झाले आहे.

May 23, 2014 in रोजगार
मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ््यात 0

मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ््यात

images.jpeg1यवतमाळ – रेती वाहतुक करणाºया वाहनावर कारवाई करण्याची भिती दाखऊन दहा हजार रुपये लाच स्विकारणाºया लोणबेहळ सर्कलच्या मंडळ अधिकाºयास रंगेहात अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी ही कारवाई केली असून लाचखोर अधिकाºयांचे धाबे दणानले आहे.
ज्ञानेश्वर किसन गरकळ असे लाचखोर मंडळ अधिकाºयाचे नाव आहे. आर्णी तालुक्यात असलेल्या रेती घाटामधुन रेती वाहून नेणाºया वाहनावर कारवाई करण्याची भिती मिलन घोरफडे रा. गाजेगाव जि. सातारा याना भिती दाखविली. तसेच रेती वाहतुक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागितली. या बाबतची तक्रार
घोरफडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरुन आज पथकाने आर्णी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. दरम्यान तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपये स्विकारताच गरकळ याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अमित जोशी, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे यांनी केली.

आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास 0

आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास

imagesयवतमाळ – पारवा येथील दोन भावंडावर प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी. बारणे यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला.
हनुमान पांडूरंग पेंदोर रा. पारवा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. १ एप्रिल २०१२ रोजी ढोल ताशे मंडवितांना अविनाश चंद्रभान सोयाम, गजानन चंद्रभान सोयाम या दोन्ही भावंडावर चाकुने वार करुन प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी अे.जी. कोळथळकर यांनी आरोपीला अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये एकुण ९ साक्ष तपासण्यात आल्या. त्यापैकी घटनास्थळ व जप्ती पंचनाम्यावरील साक्षदार फितूर झाला. मात्र जखमी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारीपक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नरेंद्र मेश्राम यांनी युक्तीवाद केला.

May 23, 2014 in मुख्य पान
मुक्ती कोण पथे’ अमृत महोत्सवाचे २४ मे रोजी उद्घाटन 0

मुक्ती कोण पथे’ अमृत महोत्सवाचे २४ मे रोजी उद्घाटन

558
यवतमाळ – नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) च्या वतीने ‘मुक्ती कोण पथे’ अमृत महोत्सवा निमित्त उर्जा दिनाचे उद्घाटन २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आंबेडकरी विचारवंत अशोक बुरबुरे याच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी कवडू नगराळे हे राहणार आहे. स्वागताध्यक्ष नंदकिशोर निमगडे , आ. संदिप बाजोरीया, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, बुद्धप्रिय थूल , प्रा. अनिल काळबांडे, नंदकुमार रामटेके उपस्थित राहणार आहे. धम्म चळवीत योगदान देणारे धम्मभूमिचे संपादक विजय डांगे, महाप्रजापती गौतमी बुद्घ विहार जामनकर नगर, विश्वशांती बुद्घविहार उमरसरा, नालंदा बुद्घ विहार पिंपळगाव, महाप्रजापती गौतमी बुद्घ विहार दलित सोसायटी, धम्मगंध बुद्घविहार गुरुनानगर नगर, गौतमी बुद्घ विहार तलाव फैल, मातोश्री रमाबाई आंबेडकर बुद्घविहार पाटीपूरा, चंद्रमणी बुद्घविहार नेताजी नगर, अशोका बुद्घविहार अशोक नगर, सम्राट अशोक बुद्घविहार पाटीपूरा, शिलाचारा बुद्घविहार पाटीपूरा, लुंबिनी बुद्घविहार लुंबिनी नगर, श्रावस्ती बुद्घविहार गिरीजा नगर, शांतीदूत बुद्घ विहार वडगाव, भीमाई बुद्घ विहार वाघापूर, सिद्घार्थ बुद्घविहार फाळेगाव, नागभूमि बुद्घविहार वडगाव, गौतमी महिला मंडळ लोहारा इत्यादी विहारांच्या धम्मसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सुप्रसिद्घ पुरातत्व संशोधक व धम्मलेखक गोपीचंद कांबळे यांना भीम-उर्जा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तनंतर लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन होणार आहे. यामध्ये संध्या सराटकर, प्रा. अशोक इंगळे , शेषराव पिराजी धांडे, डॉ. गणेश टाले, अशोककुमार दवणे, योगानंद टेभुर्णे, बळी खैरे, संदेश ढोले, माधव सरकुंडे, दशरथ मडावी, मन्सुर एजाज जोश, संघमित्रा टेंभूर्णे, सिद्धार्थ भगत , गित घोष, हेमंतकुमार कांबळे, सुनिल कुमरे, जनार्दन मोहिते, अनिल कोसे, सुनील वासनिक, मनिषा कांबळे, प्रा. महेंद्र हंबर्डे, विजय गाडगे, जगदिश भगत, प्रकश खरतडे, प्रमोद कांबळे, आनंद गायकवाड इत्यादी वकी यात सहभागी होणार आहे. संचालक प्रशांत वंजारे हे करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नाग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी केले आहे.

May 23, 2014 in विदर्भ