पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 4th, 2014

  हळद-कुंकू व अंगारा फेकुन महिलेवर मंत्राचा प्रयोग 0

हळद-कुंकू व अंगारा फेकुन महिलेवर मंत्राचा प्रयोग

images
यवतमाळ  –  पोलिसात दिलेली तक्रार मागे घे अन्यथा चेहरा विद्रुप करण्याची धमकी देत एका महिलेवर मंत्राचा प्रयोग करून हळद-कुंकू व अंगारा फेकल्याची घटना शनिवारी दुपारी पळसवाडी कॅम्पमध्ये घडली. महिलेच्या तक्रारीवरुन  शहर पोलिसांनी चार जणाविरुद्घ अंधश्रध्दा व अघोरी कृत्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
प्रिया विनोद गोविंदानी (३२) या महिलेच्या दिराने परिसरातच राहणाºया उदासी कुटुंबातील सदस्याची पोलिसात तक्रार दिली होती. अशातच प्रिया गोविंदानी व सातवर्षीय मुलगी प्रांजली या दोघी दुपारी घरी असताना चार जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी आरोपी प्रताप रादलदास उदासी (४७), संजय रादलदास उदासी (४३), गोलू रामचंद्र उदासी (२१), जया प्रताप उदासी (४०) सर्व रा. पळसावाडी कॅम्प यानी दिराने पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या अन्यथा चेहरा विद्रुप करून टाकू असे धमकावित अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपी जयाने मंत्र पुटपुटून सोबत आणलेले लिंबू, हळदी-कुंकू, तांदळाचे दाने आदी साहित्य प्रियाच्या पायावर फेकले. या प्रकाराने भयभित झाल्याने सदर महिलेने आरडा ओरड केली. यावेळी लगतच्या कारखान्यातील जीवन वाघमारे, सूरज बन, गजानन गिरी यांनी तिच्या घराकडे धाव घेतली असता आरोपींनी तेथून पळ काढला. सदर महिलेने हा प्रकार भ्रमणध्वनीवरून पतीला सांगितल्यानंतर शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चारही आरोपीविरुद्घ भादंवि कलम ४४८, ५०९, ५०६, ३४ व महाराष्टÑ अंधश्रध्दा व अधोरी कृत्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरूआहे. यापूर्वी एका युवकाने अंबिकानगरातील महिलेला तुझ्या पतीचा अपघाती मृत्यू टाळण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले होते. त्यासाठी  ५० हजार रुपये या युवकाने उकळून फसवणूक केली होती. अंधश्रध्देतून शहरात घडलेली ही दुसरी घटना आहे.

May 04, 2014 in विदर्भ
नाईकाच्या खूनातील आरोपीच्या घरावर हल्ला 0

नाईकाच्या खूनातील आरोपीच्या घरावर हल्ला

DSCN8018

तोडफोड करुन नासधूस
आर्णी – तालुक्यातील बोरगाव येथे तांड्याचे नाईक भगवान राठोड याच्या पैशाच्या वादातून खून करण्यात आल्याची घटना १ मार्च रोजी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकाराने संतप्त झालेल्या अनोळखी व्यक्तीने काल रात्री बाबुसिंग राठोड या आरोपीच्या घरातील सामानाची तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला.
भगवान राठोड हा प्रतिष्ठीत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. गावातील तंटे गावात मिटविणे, सर्वांच्या सुख-दु:खात धावून जात होता. त्याच्या शब्दालाही गावात मान होता. तांड्याचा ‘भगवान’ हरपल्याने चाहत्यांना शोक आवरणे कठीण झाले होते. गुरुवारी प्राणघातक हल्ला झाल्याने यातच त्याचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काहींच्या मनात रोष होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली तरी अज्ञात व्यक्तीने बाबुसिंग राठोडच्या घरावर हल्ला चढवित घरासह सामानाची तोडफोड केली.

May 04, 2014 in विदर्भ

पुत्रांना घडविणाºया ‘माय’चा गौरव, माय माउली प्रतिष्ठानचा उपक्रम

यवतमाळ – आईच्या वात्सल्याची सर कुणालाही करता येत नाही. स्वत: उपाशी राहून आपल्या चिल्या पिल्यांच्या तोडात घास भरविणाºया मायच्या कर्तृत्वापुढे आभाळही ठेंगणे पडते. अशाच कष्ट उपसून विपरित परीस्थितीवर मात करून आपल्या पुत्रांना घडविणाºया मायमाउलींचा गौरव १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. माय माउली प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित असून यंदा तिसरे वर्ष आहे. माय माउली पुरस्कारासाठी विरमाता लक्ष्मी कुनगर, रंजना मुळतकर, शांता काळा, अडेला उपेवाड, कलावती पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, साडी, शाळ, श्रीफळ,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
माय माउलींचा गौरव व्यसनमुक्तीसम्राट संत मधुकर खोडे महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आशा देशमुख राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. न.मा.जोशी, डॉ. विजय कावलकर, अशोक कंचलवार, यू.डी.आगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक माय माउलीचा जीवन संघर्ष माहितीपटातून दाखविण्यात येईल. गौरव सोहळ््यानंतर आई विषयावर व्यसनमुक्तीसम्राट खोडे महाराज यांचे संगीतमय प्रवचन होणार आहे. दोन महिन्यापूर्वी ‘माझी माय’ या विषयावर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.  या गौरव सोहळ््याला यवतमाळकर जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन आनंद कसंबे, मिलिंद देशपांडे, प्रवीण कापर्तीवार, प्रकाश आंबिलकर, प्रा. सलिम चव्हाण, मंगेश देशपांडे, नरेश उन्हाळे, ठोकळ, जीवन लाभसेटवार आदींनी केले आहे.
सत्कारमूर्तींचा परिचय
विरमाता लिलाबाई कुनगर नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील रहिवासी असून शहिद किशोर कुनगर यांच्या मातोश्री आहे. रंजना मुळतकर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील आहे. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना घडविले. मुलगा डॉक्टर तर मुलगी इंजिनिअर आहे. शांता काळे ह्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील असून जीवनरुपी अग्निपरीक्षेतून मुलगा ज्ञानेश्वरला सीए केले. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील अडेला उपेवाड येथील रहिवासी असून पतीच्या निधनानंतर वादळाशी झुंज देत मुलाला वाघीनीचे दूध पाजले.   मुलगा गणेश बीएसस्सी अ‍ॅग्री झाला आहे. कलावती पवार या वाशिम जिल्ह्यातील धानोरा भुसे येथील रहिवासी असून या माय माउलीने कष्ट उपसून मुलांना प्राध्यापक, शिक्षक केले आहे.

May 04, 2014 in विदर्भ
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 0

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

20130927_163852
पुसद – भरधाव ट्रक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल मध्यरात्री दरम्यान खंडाळा घाटात घडली. शेख मस्तान शेख हबीब (४०)रा. अमृतनगर,खंडाळा, असे मृताचे नाव आहे. सदर व्यक्ती दुचाकी (क्र. एम.एच.२९/एच ८६३२) ने गावाकडे जात असताना विरुध्द दिशेने आलेल्या ट्रक्टरने जबर धडक दिली व लगेच ट्रक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यात शेख मस्तानला जबर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात वनविभागाच्या चौकीजवळच झाल्याने गस्तीवर असलेल्या वनविभाग कर्मचाºयाच्या लक्षात आली. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

May 04, 2014 in विदर्भ
बिबट्याने पाडला म्हशीचा फडशा 0

बिबट्याने पाडला म्हशीचा फडशा

index.jpeg  5
यवतमाळ  –  जंगलात पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहे. पाण्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याने गावानजीकच्या शेतात बांधलेल्या म्हशीचा फडशा पाडला. ही घटना काल मध्यरात्री दरम्यान तालुक्यातील कापरा (हेटी)येथे घडली.
यवतमाळपासून ११ किलोमिटर अंतरावर किटाकापरा जंगल असून जवळच कापरा (हेटी)नावाचे छोटेशे गाव आहे. गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने बहुतांशजणाकडे जनावरे आहे. संतोष वसंतराव झामरे या शेतकºयाने आपली जनावरे गावालगतच्या शेतात बांधली होती. काल रात्री विजांच्या कडकडाट व वारा असल्याने शेतात कुणीही गेले नव्हते. मात्र मध्यरात्री म्हशींचा ओरडण्याचा आवाज आल्याने गावकºयांनी शेताकडे धाव घेतली. त्यांचा आवाज ऐकूण म्हशीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. जंगल परिसरात आतापर्यंत अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र आता थेट गावातच बिबट्याने शिरकाव केल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. मागीलवर्षीही बिबट्याने धनगराच्या जनावराचा फडशा पाडल्याची माहिती आहे.

May 04, 2014 in विदर्भ
यवतमाळ जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ 0

यवतमाळ जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

boarwel
यवतमाळ – गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक आणि संपुर्ण पावसाळाभर सतत पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या भूजलपातळीत सरासरी १.३३ मिटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे. महागाव तालुक्यात ही वाढ दोन मिटरपेक्षा अधिक म्हणजे २.१० मिटर इतकी असून सहा तालुक्यांमध्ये दीड मिटरपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दरवर्षी कमी होत असतांना एकीकडे चिंतेची स्थिती असतांना यावर्षी  अचानक झालेली वाढ दिलासा देणारी ठरणार आहे.
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात सतत पाऊस कोसळला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सरासरी  पर्जन्यमान ९११.३४ इतके असतांना प्रत्यक्षात १२३२.१० मिलीमिटर इतके पर्जन्यमान (पाऊस) झाले. कोसळलेला पाऊस मोठ्या प्रमाणावर भूगर्भात साठवल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून ही वाढ झालेली दृष्टीस पडत आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने मार्च महिण्यात जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यात निरिक्षण विहिरींच्या स्थिर भूजल पातळीचा अभ्यास करण्यात आला. १९१ विहीरींचे त्यासाठी निरिक्षण करण्यात आले. या निरिक्षणात जिल्ह्यात सरासरी १.३३ मिटरने भूगर्भातील पाण्यात वाढ झाली असल्याचे आढळले.  भूगभर्पातळीत तालुकानिहाय झालेली वाढ पुढील प्रमाणे आहे. महागाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २.१० मिटरने वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ उमरखेड १.९९ मिटर, आर्णी १.६७ मिटर, दिग्रस १.६० मिटर, दारव्हा १.५५ मिटर, कळंब १.५२ मिटर, बाभुळगाव १.२६ मिटर, घाटंजी १.४७ मिटर, नेर १.३२ मिटर, पुसद १.४७ मिटर, राळेगाव १.२५ मिटर, यवतमाळ १.४७ मिटर, मारेगाव ०.८९ मिटर, पांढरकवडा ०.९२ मिटर, वणी ०.४३ मिटर तर झरी जामणी तालुक्यात ०.४९ मिटरने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही वाढ जिल्ह्यात सरासरी १.३३ मिटर इतकी आहे. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याने पाण्याचे स्त्रोत बळकट होणार असून पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. भविष्याचा विचार करता ही वाढ जिल्ह्याला मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

May 04, 2014 in विदर्भ