पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 16th, 2015

हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न 0

हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न

1429090710
पुणे – माहेरहून पाच लाख रुपये आणावे तसेच वडिलांच्या नावावर असलेली जमीन पतीच्या नावावर करण्यासाठी विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुण्यातील सांगवी येथे सदर घटना घडली असून, पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्‍विनी बडे (वय ३१, रा. नवी सांगवी) असे फिर्यादी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवेकानंद विष्णू बडे (वय ३४, रा. समर्थनगर, नवी सांगवी), संदीप विष्णू बडे (वय ३४, रा. समर्थनगर, नवी सांगवी), स्नेहा गौतम वाघचौरे (वय ३०) व इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्‍विनी हीचा विवेकानंद याच्याशी ११ एप्रिल २००८ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी झाल्याने तसेच विवाहात मानपानावरून सासरकडचे तिला त्रास देऊ लागले. अश्‍विनी यांच्या वडिलांच्या नावावर असणारी जमीन आपल्या नावावर करावी व माहेराहून पाच लाख रुपये आणावे यासाठी विवेकानंद याने तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. तसेच मुलीलाही उपाशी ठेवत वारंवार मारहाण करत असे. चहा पावडर व साखरेमध्ये विषारी पावडर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सर्व त्रास असह्य झाल्याने अश्‍विनी यांनी काल सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक डी. जे. जाधव याबाबत अधिक तपास करत आहेत.

April 16, 2015 in मुख्य पान
सानियाच्या घरी हलणार पाळणा 0

सानियाच्या घरी हलणार पाळणा

images
पुणे- टेनिस सुंदरी सानिया मिर्झाच्या घरी पाळणा हलणार आहे. तिचा पती शोएब मलिकनेच ही बातमी दिली आहे. ट्विटरवर शोएबने एका प्रश्नाच्या उत्तरात त्याच्या फॅनला लवकरच तुम्ही काका बनणार असे ट्विट केल्याने याबाबतच्या बातम्यांना उधाण आले आहे. इंटरनेटवर तर या बातमीबाबत चर्चा आणि चर्चित चर्वण सुरू झाले आहे.
सानिया मिर्झाने शोएबशी लग्न केल्यानंतर ती पाकिस्तानची सून झाली मात्र तिने भारतीयत्व सोडले नाही. लग्नानंतर आजपर्यंत झालेल्या सर्वच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सानियाने भारताचेच प्रतिनिधीत्व केले आहे आणि करत आहे. टेनिस सुंदरी म्हणून तिची ख्याती आहे. आता सानिया आई होणार म्हटल्यावर ‘नेटकर मामांचे आणि काकांचे’ त्यावरुन हास्य-विनोद सुरू झाले आहेत.

राहुल गांधी परतले 0

राहुल गांधी परतले

images (1)
नवी दिल्ली, दि. १६ – अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुट्टीवर गेलेले राहुल गांधी गुरुवारी दुपारी दिल्लीत परतले आहे. राहुल गांधी गेेले ५६ दिवस अज्ञातवासात होते. आज दुपारी थाई एअरवेजच्या विमानाने ते दिल्लीत परतले आहेत.
२३ फेब्रुवारीरोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. सुट्टी घेऊन राहुल गांधी नेमके कुठे गेले याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.तसेच सुट्टीचे कारणही उघड झालेले नाही. राहुल गांधींचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होते व यावरुन काही नेत्यांचे राहुल गांधींसोबत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. अशा स्थितीत राहुल गांधी विचारमंथनासाठी सुट्टीवर गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानेच दांडी मारल्याने विरोधकांनी काँग्रेसवर टीका केली होती. तब्बल ५६ दिवस अज्ञातवासात काढल्यावर राहुल गांधी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास दिल्ली विमानतळावर आले. थाई एअरवेजच्या बँकॉक – दिल्ली विमानाने त्यांनी दिल्ली गाठले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राहुल गांधी तुघलक रोड येथील निवासस्थानी पोहोचले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व प्रियंका गांधी या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या. राहुल गांधी परतल्याचे वृत्त समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत फटाके फोडून जल्लोष केला. आज संध्याकाळी काँग्रेसचे काही नेते राहुल गांधींची भेट घेतील अशी शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी दिल्लीत रामलीला मैदानात भूसंपादन कायद्याविरोधात आयोजित मोर्चात राहुल गांधी शेतक-यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे विचारमंथन करुन आल्यावर राहुल गांधी लगेचच राजकारणा सक्रीय होतील असे दिसते.

 

April 16, 2015 in मुख्य पान
आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांना धमकीचा ई-मेल 0

आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांना धमकीचा ई-मेल

RBI Governor Raghuram Rajan announcement of RBI monetary policy
नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांना त्यांच्या खाजगी ई-मेल आयडीवर धमकीचा ईमेल मिळाला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला राजन यांच्या ई-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल मिळाला. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार isis583847@gmail.com. या ई-मेल आयडीवरुन हा मेल पाठवण्यात आला आहे.
‘मला तुम्हाला जीवे मारण्यासाठी पैसे देण्यात आले आहे. जर तुम्ही मला त्याहूनही अधिक रक्कम द्याल तर याबाबत आपण निर्णय घेऊ शकतो असे या मेलमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हो हे खरे आहे. राजन यांना धमकीचा ई-मेल आल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. मेलमध्ये इसिसचे नावही आहे त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे. हे प्रकरण सायबर विभागाडे सोपवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबर गुन्हे तपास विभाग या प्रकरणाचा तपास करत असून सायबर विभागाने अमेरिकास्थित गुगलकडून मदत मागितली आहे.

April 16, 2015 in मुख्य पान
विश्वसुंदरी रोलीन स्टॉस, मिस इंग्लड कॅरिना भारतीय संकृतीच्या प्रेमात 0

विश्वसुंदरी रोलीन स्टॉस, मिस इंग्लड कॅरिना भारतीय संकृतीच्या प्रेमात

201504161200260331_Miss-world-fall-in-love-with-Satpuda_SECVPF
धुळे – जगाला आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणारी २०१४ ची विश्वसुंदरी रोलीन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरिना टायरेल या भारतीय संकृती आणि शिरपूर पॅटर्नच्या प्रेमात पडल्या आहेत.
रोलीन आणि कॅरना यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सातपुड्यातील आदिवासी संकृती आणि जलसंधारणाचा शिरपूर जलसंधारण प्रकल्पाची पाहणी केली. शिरपूरकरांच्या आदरतिथ्याने भारावलेल्या या विश्वसुंदरी भारताच्या आणि विशेष करून शिरपूरच्या प्रेमात पडल्या. या जलसंधारणाच्या कामामुळे स्थानिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाले असल्याचे स्ट्रॉस हिने मान्य केले. टायरेलने तर आपल्या पहिल्या भारतभेटीच्या आठवणी ताज्या करत भारतीय लोकांच्या प्रेमळ स्वभावाचे आणि वैश्विक संकृतीचे तोंड भरून स्तुती केले. यावेळी त्यांना साडी परिधान करण्याचा मोह आवरता आला नाही.

 

April 16, 2015 in मनोरंजन