पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 7th, 2015

सुप्रिया सुळेंना भरसभेत भोवळ 0

सुप्रिया सुळेंना भरसभेत भोवळ

supriya-sule
तासगाव – तासगाव पोटनिवडणुकीच्या प्रचारातील भाषणादरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चक्कर येऊन व्यासपीठावरून कोसळल्यानं कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु, त्या लगेचच शुद्धीवर आल्यानं सगळ्यांचीच काळजी मिटली. सुप्रिया सुळेंच्या डोक्याला किंचित मार लागल्याचं कळतं.
राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात येत्या ११ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज श्रीराम हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं. हे भाषण संपवताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या पोडियमचा आधार घेता-घेता व्यासपीठावरून खालीच कोसळल्या. हा प्रकार पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ताईंना नेमकं काय झालं, हे कुणालाच कळेना. पण सुप्रिया लगेचच शुद्धीवर आल्या. पाणी पिऊन त्यांनीच घाबरलेल्या कार्यकर्त्यांना सावरलं. तोपर्यंत, डॉक्टरांनीही सुप्रिया सुळे यांची प्राथमिक तपासणी केली आणि त्या ठीक असल्याचं सांगितलं, तेव्हा सगळ्यांनीच निःश्वास सोडला.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना चक्कर येण्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, पण उन्हाळ्यामुळे हा प्रकार घडला असावा. आपली तब्येत एकदम ठीक असल्याचं सुप्रियाताईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

April 07, 2015 in मुख्य पान
 उधारीच्या पैशावरून युवकाचा खून 0

उधारीच्या पैशावरून युवकाचा खून

download
यवतमाळ, दि. ७ – खºर्याच्या उधारीवरून चौघांनी संगणमत करून युवकाचा खून केला. ही घटना येथील धामणगाव मार्गावरील अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नितेश उर्फ मिथून सुभाष मादेवार (३०) रा. पिंपळगाव असे मृतकाचे नाव आहे. तर संतोष नामदेव वडतकर (३५) रा. तलावफैल, सुरेंद्र गुबरे (२६) रा. वर्धा, सलमान (४०) रा. तलाव फैल, पन्नालाल जयस्वाल (४०) रा. मंगेश नगर भोसा अशी आरोपींची नावे आहेत. ६ एप्रिल रोजी सायंकाळी मृतक नितेश हा कॉटन मार्केट परिसरातील आरोपी संतोष वडतकर याच्या पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेला होता. यावेळी नितेशने खर्रा घेऊन पैसे न दिल्याने पानठेला चालक संतोषसोबत त्याचा शाब्दीक वाद झाला. दरम्यान रात्री चारही मारेकºयांनी जेवण्यासाठी धाब्यावर जाऊ असे म्हणून मृतकाला काळ््या रंगाच्या शाईन दुचाकीने (एम.एच. २९ / ४४३२) धागणगाव मार्गाने नेले. अशातच अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर दुचाकी थांबवून धारदार शस्त्राने नितेशच्या छाती व पोटावर सपासप वार करून जागीच ठार केले. त्यानंतर मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालया परिसरात फेकुन देऊन तेथून मारेकरी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश रणधिर अन्य कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. समाधान हिरामण काळे (३२) रा. तलाव फैल यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चारही आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत एकाही आरोपीला अटक केली नव्हती. अधिक तपास ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, रवी सुरोशे करीत आहे.

 

April 07, 2015 in मुख्य पान
अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 0

अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

images
मुंबई – अगोदरच दुष्काळ आणि त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी हा फटका सहन न झाल्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात यावी यासाठी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. यावेळी शेतकऱ्यांना अधिवेशन संपेपर्यंत मदत जाहीर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.त्यामुळे सरकार किती रुपयांची मदत जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

April 07, 2015 in मुख्य पान
२० चंदन तस्कर ठार 0

२० चंदन तस्कर ठार

201504071134529825_20-smugglers-killed-in-gunfights-in-Andhra_SECVPF
हैदराबाद – आंधप्रदेशातील चित्तोर जिल्ह्यात चंदन तस्कर आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले. तसेच या चकमकीत काही पोलीस आणि वनअधिकारीही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
चित्तोरमधील चंद्रगिरी मंडळ परिसरातील सेशाचलम जंगलात दोन ठिकाणी या घटना घडल्या. चीकातीकोना येथे ११ तस्कर ठार झाले तर इतागुंटा येथे नऊ जण ठार झाले.
सोमवारपासून पोलिसांच्या विशेष पथकाची चंद्रगिरी मंडल भागातील श्रीनिवासा मंगापुरम, श्रीवरीमेट्टु आणि इतागुंटा यापरिसरात शोध मोहीम सुरु होती. यावेळी पोलीस आणि रक्त चंदनाची तस्करी करणा-यांमध्ये जोरदार चकमक झाली.
पोलिसांनी तस्करांना शरण येण्यास सांगितले. मात्र तस्करांनी पोलिसांवक दगडफेक सुरु केली. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. अनेक तास ही चकमक सुरु होती. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला.

April 07, 2015 in मुख्य पान
२५ वर्षीय तरुणाची मित्राकडून हत्या 0

२५ वर्षीय तरुणाची मित्राकडून हत्या

images..
डोंबिवली – डोंबिवली पूर्व परिसरात पहाटेच्या सुमारास एका २५ वर्षीय तरुणाची रस्त्यावर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.
पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास पांडुरंगवाडी परिसरातील कांचन कुटीबर इमारतीसमोरील रस्त्यावर श्रेयस चारी नामक तरुणाची दारुच्या बाटलीने भोसकून हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतला असून तो संशयित श्रेयसचा मित्र असल्याचे समजते.या मित्रानेच श्रेयसची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. डोंबिवलीत राहणारा श्रेयस ठाण्यातील रेमंड कंपनीत हार्डवेअर इंजीनियर या पदावर कार्यरत होता.

April 07, 2015 in मुख्य पान