
यवतमाळ, दि. १३ – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत आपल्या अधिनस्त महिला लिपीका सोबत रंगरलीया करणाºया नायब तहसीलदाराला बेदम चोप दिला. आज सोमवारी सायकांळी ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मंडळ अधिकाºयास नुकतीच नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सदर नायब तहसीलदार महसूल विभागात कार्यरत आहे. त्याच कार्यालयातील महिला लिपीकासोबत तो रंगरलीया करीत होता. म्हणतात ना ‘हवा आली की झाडाचे पान हालते’ या उक्तीप्रमाणे नायब तहसीलदार व महिला लिपीकांच्या कारणाम्याची चर्चा परिसरात रंगू लागली. याबाबतची कुणकुणही महिला लिपीकाच्या पतीला लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीराजाने जिल्हाधिकारी कार्यालयातील पोहचून कानोसा घेतला. त्यावेळी नायब तहसीलदार व महिला लिपीक एकमेकांच्या खर्चीला खुर्ली लावून बसले होते. त्यामुळे संताप अनावर झाल्याने लिपीकाच्या पतीने नायब तहसीलदाराला बेदम चोप दिला. कार्यालयातील सर्व कर्मचाºयासमक्ष हा प्रकार झाला. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती.
Archive for April 13th, 2015
0
रंगरलीया करणाºया नायब तहसीलदाराला चोप
0
आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली – आदर्श गृहनिर्माण सोसाय़टी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आदर्श घोटाळयातील आरोपींच्या यादीतून नाव वगळण्याची त्यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राज्यापालांनी अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाईला परवानगी नाकारल्यानंतर आदर्शमध्ये दाखल झालेल्या आरोपपत्रातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.
त्यानंतर खुद्द अशोक चव्हाण यांनी डिसेंबरमध्ये या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांचीही याचिका फेटाळून लावली.
अशोक चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २४ एप्रिलला सुनावणी होणार आहे. देशाच्या राजकारणात गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळयामुळे अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
0
३७ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – गृह खात्याने एकाचवेळी राज्यातील ३७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करत धक्का दिला आहे. हिमांशू राय यांची ATS प्रमुख पदावरून उचलबांगडी करत विवेक फणसाळकर यांची नियुक्ती केली आहे. तर नागपूरच्या आयुक्तपदी एस.पी. यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये झालेली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरेंची हत्या, सिंचन घोटाळ्याची रखडलेली चौकशी, नागपूर तुरुंगातून फरार झालेले सराईत गुन्हेगार आणि इतर शहरांमधल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे गृह खात्याचे मंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले होते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गृह खात्याच्या कारभावर विरोधकांनी बोट ठेवत हल्ला सरकारवर चढवला होता. त्यामुळे जर्मनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी मंत्र्यामंत्र्यांनी राज्यातील ३७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पण ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर निवडणुकीच्या कामांची जबाबदारी आहे, त्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना लगेचच सूत्र हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयपीएस अधिकारी- सध्याची जबाबदारी – मिळालेली नवी नियुक्ती
१. सतीश चंद्र माथूर (पोलीस आयुक्त पुणे)- महासंचालक, कायदे आणि तंत्रज्ञान, मुंबई (पदोन्नती)
२. एस. पी. यादव (अति. महासंचालक, सीआयडी)- पोलीस आयुक्त, नागपूर
३. के. के. पाठक (पोलीस आयुक्त, नागपूर)- पोलीस आयुक्त, पुणे
४. व्ही. डी. मिश्रा (अति. महासंचालक)- अति. महासंचालक (आस्थापना)
५. डी. कणकरत्नम (अति. महासंचालक, आस्थापना)- अति. महासंचालक (रेल्वे)
६. संजय बर्वे (अति. महासंचालक (रेल्वे)- अति. महासंचालक (लाचलुचपत विभाग)
७. संदीप बिश्नोई (मुख्य दक्षता अधिकारी, एसटी)- अति. महासंचालक, एसआरपीएफ (पदोन्नती)
८. विनित अग्रवाल (विशेष गृहसचिव)- मुख्य दक्षता अधिकारी, एसटी
९. विवेक फणसळकर (सहआयुक्त, प्रशासन)- एटीएस प्रमुख
१०. हिमांशू रॉय (एटीएस प्रमुख)- अति. महासंचालक, पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण
११. बी. के. उपाध्याय (सहआयुक्त, वाहतूक)- विशेष प्रधान गृहसचिव (पदोन्नती)
१२. संजय कुमार (सहआयुक्त, पुणे)- अति. महासंचालक, सीआयडी (पदोन्नती)
१३. राजेंद्र सिंह (पोलीस आयुक्त, औरंगाबाद)- अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय (पदोन्नती)
१४. हेमंत नागराळे (अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय)- अति. महासंचालक, म्हाडा
१५. प्रज्ञा सरवदे (विशेष पो. महानिरीक्षक, दक्षता अधिकारी, सिडको)- अति. महासंचालक, सिडको (पदोन्नती)
१६. विठ्ठल जाधव (प्रशासकीय संचालक)- तुरुंग महानिरीक्षक, नागपूर
१७. शशिकांत शिंदे (तुरुंग महानिरीक्षक, नागपूर)- संचालक, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ
१८. मधूकर पांडे (विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण)- पोलीस आयुक्त, रेल्वे
१९. रविंद्र सिंघल (पोलीस आयुक्त, रेल्वे)- विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण
२०. कुलवंतकुमार सरंगल (नियुक्तीच्या प्रतिक्षेत)- विशेष महानिरीक्षक
२१. प्रभातकुमार (विशेष महानिरीक्षक)- विशेष महानिरीक्षक, कायदा-व्यवस्था
२२. देवेन भारती (विशेष महानिरीक्षक, कायदा आणि सुव्यवस्था)- सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई
२३. धनंजय कमलाकर (सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई)- सहआयुक्त, आर्थिक गुन्हे
२४. राजवर्धन (अति. पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे)- सहआयुक्त, नागपूर (पदोन्नती)
२५. मिलिंद भारंबे (अति. पोलीस आयुक्त)- वाहतूक सहआयुक्त, मुंबई
२६. विश्वास नांगरे-पाटील (उपमहानिरीक्षक, लाचलुचपत)- विशेष महानिरीक्षक (पदोन्नती)
२७. सुरेश मेखला (पोलीस आयुक्त, अमरावती)- विशेष महानिरीक्षक, एसआरपीएफ (पदोन्नती)
२८. अनुपकुमार सिंह (सहआयुक्त, नागपूर)- सहआयुक्त, प्रशासन, मुंबई
२९. सुनील रामानंद (विशेष महानिरीक्षक, एसआरपीएफ)- सहआयुक्त, पुणे
३०. रितेश कुमार (विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर)- विशेष महानिरीक्षक, सीआयडी, पुणे
३१. संजय वर्मा (नियुक्तीच्या प्रतिक्षेत)- विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर
३२. जयजित सिंह (विशेष महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा)- विशेष महानिरीक्षक, नाशिक
३३. प्रवीण साळुंखे (विशेष महानिरीक्षक, नाशिक)- विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
३४. प्रशांत बुरुडे (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा)- विशेष महानिरीक्षक, कोकण
३५. अमिताभ गुप्ता (विशेष महानिरीक्षक, कोकण)- विशेष महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा
३६. बिपीनकुमार सिंह (विशेष महानिरीक्षक, तुरुंग)- विशेष महानिरीक्षक, नांदेड
३७. दीपक पांडे (अति. आयुक्त नागपूर, गुन्हे)- विशेष महानिरीक्षक, मानवाधिकार आयोग
‘लिव्ह-इन’मधील जोडपे पती-पत्नीच!
![]()
दिल्ली- ‘विवाहाशिवाय दीर्घ काळ एकत्र राहणाऱ्या स्त्री-पुरुषाला यापुढं कायद्यानं नवरा-बायकोच समजण्यात येईल. तसेच पुरुष जोडीदाराचा मृत्यू झाल्यास महिला जोडीदाराला त्याच्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा अधिकार असेल,’ असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयामुळं ‘लिव्ह-इन-रिशेनशिप’च्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराला व फसवणुकीच्या प्रकारांना चाप बसणार आहे.
एका संपत्तीच्या वादात न्यायमूर्ती एम. वाय. इक्बाल आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. सरीता कावा (बदललेले नाव) ही महिला गेल्या २० वर्षांपासून नृसिंह खन्ना (बदललेले नाव) यांच्यासोबत राहत होती. औपचारिकरित्या त्यांचा विवाह झाला नव्हता. काही दिवसांपूर्वी अचानक खन्ना यांचा मृत्यू झाला. खन्ना यांच्या मृत्यूनंतर सरीतानं त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगितला होता. मात्र, या महिलेने आमच्या आजोबांसोबत विवाह केला नव्हता. आजोबांनी तिला केवळ ठेवून घेतले होते. त्यामुळं तिला संपत्तीत वाटा मागण्याचा हक्क नाही,’ असा युक्तिवाद खन्ना यांच्या नातवंडांकडून करण्यात आला होता.खन्ना यांच्याशी आपला कायदेशीर विवाह झाल्याचे सरीताला सिद्ध करता आले नाही. मात्र, सरीता ही नृसिंह खन्ना यांच्यासोबत एकाच घरात २० वर्षे राहत होती हे खन्नांच्या नातवंडांनी मान्य केले. याचाच आधार घेत न्यायालयानं सरीता कावा हिला कायदेशीर पत्नीचा दर्जा देत तिच्या बाजूनं निकाल दिला.
0
नक्षली हल्ला, ४ जवान शहीद

रायपूर – छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात चार सुरक्षारक्षक शहीद झाले असून आठ जण जखमी आहेत. गेल्या ७२ तासांत चौथ्या नक्षलवादी हल्ल्यानं राज्य हादरलं आहे.
दंडेवाडा जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर चोलनार इथं सुरक्षारक्षक गस्त घालत होते, तेव्हाच नक्षलींनी भीषण भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की त्यात भू-सुरुंगरोधक वाहनाचाही चक्काचूर झाला. या स्फोटात चार जवान जागीच मृत्युमुखी पडले, तर आठ जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक तातडीनं घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य वेगानं सुरू आहे.
या भू-सुरुंग स्फोटाआधी, आजच कंकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बीएसएफ पथकाला लक्ष्य केलं. त्यात एक जवान शहीद झाला. कालही कंकेर जिल्ह्यात खाणकाम करणारी १७ वाहनं त्यांनी पेटवून दिली होती. त्यात सुदैवानं कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. परंतु, शनिवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पोलमपल्ली जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत सात जवान शहीद झाले होते.
0
तरुणाचा खून करून मृतदेह टाकला कालव्यात

पुणे : तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने वार करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी स्वारगेट कालव्यामध्ये हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.
संभाजी दादाराव ओहाळ (वय ३५ ते ४०, रा. लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहाळ हे मूळ लातूरचे रहिवासी आहेत. तीन ते चार आठवड्यांपूर्वी ते मुंबईमध्ये गेले होते. तेथून ते पुण्यात आले होते. दांडेकर पूल परिसरात त्यांचे नातेवाईक राहायला आहेत. त्यांच्याकडे ते जाऊन येऊन राहत असत.साधारणपणे दोन दिवसांपूर्वी ते गायब झाले होते. रविवारी सकाळी स्वारगेट जवळील कालव्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
0
सहकार महर्षी विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची नवी वाट तयार करणारे कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक व लोकनेते राजे विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे (वय ६७ रा. नागाळा पार्क कोल्हापूर) यांचे सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने साखर कारखानदारीतील ‘दीपस्तंभ,’ उमदा नेता व दिलदार राजा हरपल्याची भावना व्यक्त झाली. या लाडक्या नेत्याच्या अशा अचानक निधनाने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो जनतेला अश्रू अनावर झाले. बऱ्याच लोकांचा सुरुवातीला या बातमीवर विश्र्वासच बसला नाही. येथील कसबा बावडयातील कागलवाडी परिसरातील राजघराण्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अलोट गर्दी उसळली होती. घाटगे यांच्या मागे पत्नी श्रीमती सुहासिनीदेवी, मुलगा व शाहू दूध संघाचे व्यवस्थापक संचालक समरजितसिंह, कन्या तेजस्विनी भोसले, बहिण बडोद्याच्या हर्षलाराजे गायकवाड, अमरावतीच्या रंजनाराजे देशमुख व जतच्या ज्योत्स्नाराजे डफळे, भाऊ व येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रविणसिंह असा मोठा परिवार आहे. घाटगे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. सहकारातील जाणते नेतृत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. कागल विधानसभा मतदार संघातून ते १९७८ व १९८० अशा दोन वेळा आमदार झाले. पुढे १९९८ ला त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली परंतू त्यात त्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी राजकारणापेक्षा साखर कारखानदारीत अधिक लक्ष केंद्रित केले. त्यांची ओळखही राजकारण्यांपेक्षा सहकाराच्या माध्यमातून रचनात्मक काम करणारा नेता अशीच अधिक ठळक झाली होती. गोरगरिब शेतकऱ्यांचे हित करायचे असेल तर सहकारी साखर कारखानदारीच टिकली पाहिजे असा त्यांचा आग्रह राहिला. व स्वत:चा शाहू साखर कारखाना तितक्याच उत्तमपध्दतीने त्यांनी चालवून दाखविला. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उत्तम चालविलेला कारखाना कोणता म्हणून विचारणा झाल्यावर पहिले नांव पुढे येते ते अर्थातच ‘शाहू’चे. हे सगळे श्रेय घाटगे यांच्या नेतृत्वाचे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी कागलच्या राजकारणात त्यांचा सुमारे पंचवीस वर्षे टोकाचा संघर्ष झाला. मंडलिक यांचे निधन नऊ मार्चला झाले. त्यावेळी ‘आता आमचा नंबर कधी..’ असे मिश्किलपणे म्हणणारे विक्रमसिंह यांचेही निधन लगेच महिन्याभरात व्हावे हा देखील एक दैवदुर्विलासच. घाटगे यांना मधुमेहाचा त्रास होता. कांही वर्षापूर्वी त्यांची अॅन्ज्युोप्लास्टीही झाली होती. प्रकृतीबाबत ते दक्ष होते. रोज सायंकाळी कृषी महाविद्यालयाच्या आवारात फिरायला जात. मांसाहारही पूर्ण बंद केला होता. दोन-तीन दिवसांत धाप लागल्यासारखे वाटू लागल्याने आज सोमवारी त्यांनी डॉ. दिलीप कुलकर्णी यांची वेळ घेतली होती. काल दिवसभरची दिनचर्याही नेहमीचीच राहिली. दुपारी घरीच कार्यकर्त्यांशी बोलले. सायंकाळी फिरून आले. पहाटे सहाच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी पत्नीस सांगितले. म्हणून तातडीने त्यांनी मुलगा समरजित यांना बोलवले. दोघांनी धरून जिन्यावरून खाली आणतानाच ते कोसळले व तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. लगेच त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून घाटगे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.









