पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 8th, 2015

धोनीला ठोठावला दंड 0

धोनीला ठोठावला दंड

2015-04-08~dhonibike_ns
रांची, दि. ८ – भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बाईकप्रेम तर सर्वांनाचा माहीत आहे, मात्र रांचीच्या रस्त्यावरून केलेली बुलेटराईड त्याला महागात पडली आहे. बाईकवर चुकीच्या ठिकाणी नंबर प्लेट लावल्याने ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला आहे.
चार महिन्यांचा परदेश दौरा, विश्वचषक स्पर्धा या सर्वानंतर धोनी ब-याच काळाने घरी परतला. त्यानंतर तो रांची शहरात त्याच्या हिरव्या रंगाच्या बुलेटवरून फिरत होता, त्याचे फोटो मीडियातही प्रसिद्ध झाले. मात्र त्याच्या बुलेटच्या पुढील बाजूला नंबर प्लेट नव्हती. बाईकचा नंबर मडगार्डवर लिहीण्यात आला होता. हे लक्षात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलयाचे सांगत पोलिसांनी त्याला ४५० रुपयांचा ठोठावला. दंडाची पावती घरी पाठवून दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका- शरद पवार 0

दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका- शरद पवार

sharad-pawar
मुंबई – ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या की शिवसेना-भाजप युती सत्तेत राहणार नाही. त्यामुळं दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका होतील,’ असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वर्तवले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पवार यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपवर तोफ डागली. ‘नारायण राणे दिसायला लहान आहेत पण कर्तृत्वाने महान आहेत. युतीच्या राजवटीत बाळासाहेबांनी मनोहरपंत जोशींना बाजूला करून, नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. जे बाळासाहेबांना कळलं ते आताच्या पिढीला कळते की नाही ते माहीत नाही, असा टोलाही पवार यांनी हाणला.
‘बाळासाहेबांची सेना ही मर्दांची सेना होती,’ असेही पवार म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्राबरोबरच राज्यातील राज्यकर्त्यांनाही लक्ष्य केले. ‘खूप अपेक्षा होत्या देशवासीयांच्या; पण सुरुवात चांगली झालेली नाही. राज्य ज्यांच्या हातात दिले ते कसे, कोणासाठी चालवत आहेत तेही तुमच्यासमोर आहेच,’ असं सांगतानाच, वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक ही बदलांची सुरुवात आहे,’ असं पवार म्हणाले. ‘काँग्रेसशी आमचेही कधी कधी मतभेद झाले असतील तरीही देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस घडवली आहे. त्यामुळे मोदी यांची देश काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा सत्तेचा माज दर्शविते’, असे पवार म्हणाले.
‘महाराष्ट्रात गायीच्या हत्येवर बंदी होती. गायीचा आपण सन्मानच करतो, पण बैल थकले, म्हणूनच शेतकरी त्यांना विकतो. तुम्ही शेतकऱ्यांना या बैलांना सांभाळण्याचा भत्ता द्या,’ अशी सूचना पवार यांनी केली. यूपीएच्या राजवटीततील भूसंपादन कायद्यात जमीन संपादनासाठी ७० टक्के शेतकऱ्यांची अनुमती​ आवश्यक होती. पाच वर्षे संपादित केलेली जमीन त्याच कारणासाठी वापरली नाही तर मूळ शेतकऱ्याला पुन्हा देण्याची तरतूद होती. त्याला भाजपची संमती होती. मग आता बदल का? असा सवाल त्यांनी केला.

April 08, 2015 in मुख्य पान