यवतमाळ, दि. ३१ – राळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक पाणवठ्याच्या विहिरीत गाळ काढणाºया पाच जणांचा विहीरीत गुरमरून मृत्यू झाला. आज ३१ मार्च रोजी ही घटना घडली असून दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे.
गणेश राजेश्वर नंदूरकर (२४), विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), शंकर रमेश जोगी (२८), आशीष उर्फ पिंटू तुकाराम मडावी (२८), भुपेश कवडू कुडमेथे (३२) असे विहिरीत गुदमरून मृत्यू पावलेल्यांची नावे आहे. सार्वजनिक विहिरीत गेल्या कित्येक दिवसांपासून गाळ साचल्याने त्या विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा दाखला प्रयोेगशाळेने ग्रामपंचायतीला दिला होता. त्यामुळे ग्रामसेविका वंजारी यांनी गावातील गणेश नंदूरकर, शंकर जोगी यांना या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गुत्त्याने दिले. आज मंगळवारी या मजुरांनी विहिरीतील गाळ काढण्यासाठी पाणी उपसायला आॅईल इंजीन लावले होते. विहिरीचे अर्धे तोंड आधीच सिमेंटच्या छताने झाकण्यात आले होते. त्यामुळे आतमध्ये प्राणवायू कमी प्रमाणात जात असताना हे मजूर गाळ काढण्या कामी लागलेत. जोमात काम सुरू असतानाच अचानकपणे या खोल विहिरीत इंजीनचा धूर सर्वत्र व्यापल्याने तिथे कार्बनडाय आॅक्साईडने जागा घेतली. परिणामी, या मजुरांना आॅक्सीजन न मिळाल्याने गुदमरून आरडाओरडही केली. त्यांचा आवाज ऐकून वाचविण्यासाठी विजय नंदूरकर, भुपेश कुडमेथे, ग्रा. पं. चपराशी असलेल्या आशीष मडावी याने धाव घेऊ न विहिरीत उतरले. मात्र तिथे निर्माण झालेल्या विषारी वायूने या तिघांचाही बळी घेतला. त्यात सुदैवाने रामू देवराव बावणे (३०) व प्रफुल हिवरकर (२२) या मजुराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचीही प्रकृती अतिशय गंभीर असून उपचारार्थ त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या मजुरांवरील आपत्तीची माहिती मिळताच राळेगावचे तहसीलदार सुरेश कव्हळे, बीडीओ विनोद खेडकर, वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. त्यांनी सर्वतोपरी या मजुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडूनही तिथे मदतकार्यास पथक रवाना करण्यात आले होते.

















































