पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 9th, 2015

एकाच विद्यार्थ्याला ३ वेगवेगळ्या गुणपत्रिका

पुणे : राज्य शिक्षण मंडळाकडून सोलापूर येथील एका विद्यार्थ्याला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर काही कागदपत्रांसाठी त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केला असता तो दहावीमध्ये नापास असल्याचे कळविण्यात आले.
सोलापूर येथील दीपक बलभीम ढावरे या विद्यार्थ्याने २000 साली इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास गणित विषयात नापास असल्याची गुणपत्रिका मिळाली. परिणामी त्याने अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला नाही. परंतु, दीपककडून दहावीची ही गुणपत्रिका हरवली. त्यामुळे २00३ मध्ये त्याने विभागीय शिक्षण मंडळाकडे डुप्लिकेट गुणपत्रिका मिळण्यासाठी अर्ज केला.
त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास दहावीत उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे दीपकने पुढे शिक्षण सुरू केले. पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले आणि डिसेंबर २0१४ मध्ये त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे बोर्ड सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. परंतु त्यावेळी त्याला दहावीत नापास असल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पास असल्याचे प्रमाणपत्र मिळावे, असा अर्ज त्याने राज्य शिक्षण मंडळाकडे केला आहे. दरम्यान, दीपक ढावरेला चूकून त्याच्या बहिणीचे गुण दिले गेले. परंतु, त्याने तिस-यांदा गुणपत्रकाची मागणी केली. त्या वेळी त्याला नापास असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

April 09, 2015 in मुख्य पान
सत्यम घोटाळा: रामलिंग राजूना ७ वर्षांची शिक्षा 0

सत्यम घोटाळा: रामलिंग राजूना ७ वर्षांची शिक्षा

cap-batton_
हैदराबाद, दि. ९ – देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’ घोटाळाप्रकरणातील दोषी रामलिंग राजू यांना ७ वर्षांचा कारावास आणि पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरूवारी हैदराबादमधील विशेष न्यायालयाने बी. रामलिंग राजूंसह दहा जणांना दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश बीव्हीएल एन. चक्रवर्ती यांनी हा निकाल दिला असून रामलिंग राजू यांना फसवणूक, विश्वासघात, खोटी कागदपत्रे बनविणे आणि ‘क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट‘ या गुन्ह्यांखाली दोषी ठरवले असून त्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सुमारे सहा वर्षे चाललेल्या या खटल्यात तीन हजार कागदपत्र व २२६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. याप्रकरणी राजू यांनी आधीच ३२ महिने (सुमारे अडीच वर्ष) तुरूंगात काढले आहेत.
आर्थिक गैरव्यवहारांसाठीच्या विशेष न्यायालयाने ‘सत्यम’चे माजी अध्यक्ष बी. रामलिंगम राजूंसह त्याचा भाऊ बी. रामा राजू (व्यवस्थापकीय संचालक, सत्यम), वदलमणी श्रीनिवास (माजी मुख्य वित्तीय अधिकारी), जी. रामकृष्ण (माजी उपाध्यक्ष) व अंतर्गत हिशेब तपासणी विभागप्रमुख व्ही.एस. प्रभाकर गुप्ता आदींवर १४ वर्षे भांडवली बाजारात कोणत्याही पद्धतीने सहभागी होण्यास बंदी घातली आहे.
काय आहे ‘सत्यम घोटाळा’
७ जानेवारी २००९ रोजी त्या वेळी देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून नावाजलेल्या सत्यमचा संस्थापक असलेले रामलिंग राजू यांनी सेबीला ई-मेल पाठवून आपण कंपनीच्या जमा खात्यातील रकमेचा आकडा तसेच बँकांमधील ठेवींची रक्कम फुगवून सांगितल्याची कबुली दिली. या फसवणूकीमुळे कंपनीचे १४ हजार १६२ कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर सीबीआयने राजू यांच्यासह कंपनीतील अन्य १० जणांवर गुन्हा दाखल केला होता.

April 09, 2015 in मुख्य पान
सिलेंडरच्या स्फोटाने घर भस्मसात 0

सिलेंडरच्या स्फोटाने घर भस्मसात

aag ...
यवतमाळ, दि़९ – वणी तालुक्यातील झरपट या गावी आज गुरुवार९ एप्रिलला दुपारी १२ वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घरासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही़
झरपट येथील मनोहर दत्तू गौरकार यांचेकडे एचपी या कंपनीचे गॅस आहे़ दुपारी१२ वाजताच्या सुमारास गॅसने अचानक पेट घेतला़ त्यामुळे मनोहर गौरकार हे तात्काळ घराबाहेर धाव घेतली़ पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले आणि सिलेंडरचा स्फोट झाला़ स्फोट एवढा भयानक होता की घराशेजारीच असलेला त्यांचा मुलगा विनोद गौरकार याच्याही घराला आगीने कवेत घेतले़ या आगीत घरातील कपडे, सामान, अन्न-धान्य जळून खाक झाले़ आगीची माहिती कळताच तहसिलदार रणजीत भोसले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली़ व परिवाराला प्रशासनाच्या वतीने अन्न धान्याची मतद करून शासन स्तरावरुन मदत देण्याचे अभिवचन दिले़.

April 09, 2015 in मुख्य पान
प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस सश्रमकारावास 0

प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस सश्रमकारावास

LAW
यवतमाळ, दि. ९ – क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. आज गुरूवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अरविंद वानखेडे यांनी हा निकाल दिला.
दशरथ गुलाब चव्हाण (५५) रा. बाणगाव ता. नेर असे आरोपीचे नाव आहे. २७ सप्टेंबर २०१० रोजी आरोपीने करणी केल्याच्या वादातून घराशेजारी राहणाºया इंदल गोपीचंद आडे यांच्या पोटावर सुरीने वार करून खुन करण्याचा प्रयत्न केला. जखमी इंलवर ग्रामीण रुग्णालय नेर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले. याप्रकरणी उध्दल गोपीचंद आडे यानी दिलेल्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी आरोपी दशरथ चव्हाण याच्याविरुद्घ भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान अतिरिक्त भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक आर.जी. माहुरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक युवनाते यांनी तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अरविंद वानखेडे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावनी पार पडली. यामध्ये दोन्ही पक्षाची बाजु ऐंकुण १३ साक्षीदार तपासले. त्यामध्ये जखमी इंदल व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी दशरथला दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त शासकीय अभियोक्ता नरेंद्र बी. मेश्राम यांनी युक्तीवाद केला.

April 09, 2015 in मुख्य पान
साधना सरगम यांच्या सुरमयी मैफलीने यवतमाळकर मंत्रमुग्ध 0

साधना सरगम यांच्या सुरमयी मैफलीने यवतमाळकर मंत्रमुग्ध

41
यवतमाळ ,दि. ९ – समता मैदानातील हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्वरसम्राज्ञी साधना सरगम यांच्या ‘म्यूझिक इंडिया’ नाईक ने येथील येथील समता मैदानात सप्तसुरांचा पाऊस पाडला. सायं. ६ वाजता समता मंचावर साधना सरगम यांच्या आगमन होताच, त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोश केला. पार्श्वगायिका साधना सरगम यांनी प्रेक्षकांना हात उंचावून ‘जयभीम, जय ज्योती’चा उद्घोष केला. यावेळी अख्खे समता मैदान आनंदाने भारावून गेले. साधना सरगम यांच्या ‘नमस्कार घ्यावा अहो बुध्द देव, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा’ या समधूर गिताने ‘म्यूझिकल नाईट’ चा प्रारंभ झाला. पुढे त्यांच्या सोबत आलेल्या कलावंतनी, ‘छाती ठोक हे सांगू जगाला’ असा विद्वान होणार नाही’ या भीमगीताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित पार्श्वगायिका प्रभा अत्रे या गायीकेने ‘उमर मे छोटी, भोली भाली भीमराज की बेटी मै तो जयभी वालू हूँ’ हे गीत सादर करताच, समता मैदानात टाळ््यांचा पाऊस पडला. याप्रसंगी साधना सरगम यांचा समना प्रतिष्ठानच्या वतीने सदस्य सत्कार करण्यात आले.
साधना सरगम यांच्या जादुई आवाजाने यवतमाळकरांना भूरळ घातली. दरम्यान पावसाचे वातावरण तयार झाले. क्षणार्धात पावसाच्या सरी कोसळून लागल्या. या स्थितीतही मैदारातील प्रेक्षकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन मैफलीचा आनंद लुटला. पावसाचा जोर वाढल्याने काही काळ कार्यक्रमाला ब्रेक देण्यात आला. मात्र लगेच पाऊस थांबल्या बरोबर परत स्वरसम्राज्ञी साधाना सरगम यांचे मंचावर आगमण झाले. दरम्यान त्यांनी संगितप्रेमी जिल्हाधिकारी राहूल रंजन महिलाव यांना गीत सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. ‘जब काई बात बन जाये’ हे साधनाचे गीत, स्वत: साधना सरगम व जिल्हाधिकारी महिवाल यांनी गायले. रोमॅटीक काही गीते त्यांनी यावेळी प्रस्तूत केली. याप्रसंगी समता मैदानातील वातावरणे काही काळ रोमॅटीक बनून गेले.
पार्श्वगायिला साधना सरगम यांच्या म्यूझिकल इंडीया या कार्यक्रमासाठी पुणे येथील संदीप पंचवटकर यांना खास निमंत्रिक करण्यात आले होते. त्यांच्या संचनाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘जब कोई बात बन जाये’, ‘पहला नशा’, ‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आगयी’, ‘मेरे ख्वाबो मे जो आये’, ‘.. हो जा रंगीलारे’, ‘ढोल बजने लगा’ या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य गाजवले. शेवट ‘मिले सुरू तेरा मेरा तो सुर बने हमारा’ हे भारतीय एकात्मता जागविणारे गीत गावून सरगम यांनी यवतमाळ करांना ही रात्री ‘खुबसुरत’ करण्याबाबत मनापासून धन्यवाद दिले. यवतमाळच्या प्रेमला मी कधीही विसरणार नाही हे सांगतानाच त्यांची ‘बस आज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा’ हे गित प्रस्तूत केले. शेवटी ए.आर. रहमान यांनी सांगित बध्द केलेल्या सुपरहिट ‘जय हो’ गिताने, त्यांनी मैफलीचा विरोध घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता पर्व प्रतिष्अीनच्या अध्यक्षा मंगला दिघाडे, राखी भगत, उज्वला इंगोले, अर्चना खरतडे, रविता भोवते, एकता वाणी, अंजली मेश्राम, स्मिता उके, अनिल आडे, मधुकर भैसारे, प्रज्ञा फुलझेले, जया मनवर, जयश्री भगत, प्रिया वाकडे, लोपमृदा पाटील, माया गोबरे, सुनिता काळे, किशोर भगत, दिपक नगराळे, विनोद बुरबूरे, नारायण थूल, अंकूश वाकडे, धीरज वाणी आदींनी परिश्रम घेतले.

April 09, 2015 in मुख्य पान