
पुणे – घरासमोर खेळत असलेल्या लहान मुलांना हाकलून लावल्याचा राग आल्याने मुलांच्या आईचे व बोलणारी महिला या दोघींमध्ये झालेल्या जोरदार मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात कासेवाडी, भवानी पेठ येथे घडली. खडक पोलिसांनी याप्रकरणी महिलेला अटक केली आहे. रविवारी न्यायालयाने तिला ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुनीता नितीन वायदंडे (वय २४, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर आस्मा लुकमान शेख (वय ४०, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आस्मा यांचा भाऊ जितेंद्र छोटुलाल परदेशी (वय ३८, रा. लक्ष्मी माता मंदिर, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी सुनीता आणि आस्मा या दोघी एकमेकींच्या शेजारी राहात होत्या. आस्मा यांना हार्ट आणि शुगरचा त्रास असल्याने त्या औषध घेऊन घरी आराम करत होत्या. त्यावेळी शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी सुनीता यांची दोन लहान मुले आस्मा यांच्या घरासमोर गोंधळ घालत असल्यामुळे आस्मा यांनी त्यांना हाकलून लावले. ही बाब मुलांनी त्यांची आई व गुन्ह्यातील आरोपी सुनीता हिला सांगितली. आरोपी सुनीता हिला या प्रकाराचा राग आल्याने तिने आस्माला शिवीगाळ केली. यावेळी आस्मा आणि सुनीता या दोघींमध्ये भांडण झाले व दोघींनी एकमेकींचे केस धरून मारहाण सुरू केली. सुनिताने आस्माच्या छाती, पोट व पाठीत मारहाण केल्याने ती बेशुद्ध पडली. तिला प्रथम खासगी व नंतर ससून रुग्णालयात दाखल केले असता डॉकटरांनी तिला मृत घोषित केले.
Archive for April 6th, 2015
0
मुलांच्या खेळण्यावरुन झालेल्या वादात एका महिलेचा खून
0
कैदी पलायन प्रकरणात मदत करणाऱ्या दोन आरोपींना अटक

नागपूर – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या ५ कैद्यांना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कैदी फरार प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.
नवाब तोहिद खान आणि गणेश शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. धंतोली पोलिसांनी ही कारवाई केली. ३१ मार्च रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ५ कैद्यांनी पलायन केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
0
अफू पिकवणाऱ्या पंचवीस शेतकर्यांना दहा वर्षाची कैद

बीड – बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मोहा परिसरात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर अवैध पध्दतीने अफूचे पीक घेतले होते. याप्रकरणी अंबाजोगाई येथील न्यायालयाने पंचवीस आरोपींना दहा वर्ष कैद आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
बीड जिल्ह्यात २०१२ मध्ये पोलिसांनी छापा टाकून शेकडो एकरवर घेतल्या जाणाऱ्या अवैध अफू शेतीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी परळी तालुक्यातील मोहा परिसरातील कान्हापूर, वंजारवाडी, घोरपडदरा तांडा येथील ३८ आरोपी शेतकरी व नांदेड येथील चार व्यापार्यांविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक तीन मध्ये या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायाधीश नवनाथ कोल्हे यांनी त्यापैकी २५ आरोपी शेतकर्यांना दहा वर्ष कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने के. व्ही. गिरवलकर यांनी तर आरोपींच्या बाजूने अण्णासाहेब लोमटे, डी. व्ही. गाढे, डी. डी. लांब आणि हनुमंत राऊत यांनी काम पहिले.
0
मलेशियातून १७ संशयित दहशतवादी ताब्यात

क्वालांलपूर – दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या १७ संशयित दहशतवाद्यांना क्वालांलपूर येथील मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागातून ताब्यात घेण्यात आले.
विशेष पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान या सर्व संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी दोन दहशतवादी हे नुकतेच सिरियातून परतलेले आहेत. दरम्य़ान, या दहशतवाद्यांबद्दल अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. इस्लामिक राज्य असलेल्या इराक आणि सिरियामध्ये जाण्याचे मलेशियन नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.या दहशतवादाविरोधात पंतप्रधान नजीब रझाक यांनी गेल्या दशतवादविरोधी दोन विधेयके आठवड्यात संसदेत सादर केली. या विधेयकात प्रशासनाला संशयित दहशतवाद्याला सुनावणीशिवाय अनिश्चित कालावधीसाठी ताब्यात घेण्याचे अधिकार असावेत असा प्रस्ताव आहे.
0
गोळीबारात तीन पोलीस ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील एका गावात सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलीस ठार झाले.
शोपियन जिल्ह्यातील आशिपोरा गावात गुन्ह्याबाबतच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिका-यांनी सांगितले.
या हल्ल्यात ठार झालेले तीनही पोलीस वर्दीविना होते आणि गावात ते एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तासाभरात पोलिसांवर केलेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी सकाळी बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टाण भागात एका पोलीस अधिका-यावर हल्ला करण्यात आला. उपनिरीक्षक गुलाम मुस्तफा हे या हल्ल्यात जखमी झाले.
0
भिवंडी मनपाचे ३ सहाय्यक आयुक्तांसह लिपिक निलंबित
भिवंडी,(प्रतिनिधी,सतिष राठोड)
भिवंडीत अवैध बांधकाम करणाञांविरुध्द एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई न करता त्यांना संरक्षण दिल्यामुळे भिवंडी मनपाचे ३ सहाय्यक आयुक्तांसह १ वरिष्ठ लिपिक यांना मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी निलंबित केले आहे.तसेच सोनवणेंच्या या करवाईच्या निर्णयामुळे मनपाचे अनेक अधिकारी सतर्क झाले आहेत.याआधी प्रभाग समितीमध्ये अवैध बांधकाम विरुध्द दिलेल्या सुचनेच्या पालनाकडेही दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानीक लोकांनी अवैध बांधकाम विरुध्द तक्रार करुनही निलंबित झालेल्या अधिकाञांनी दुर्लक्ष केले होते.
* निलंबित झालेल्या अधिकार्यांचे नाव *
१) सुनिल भालेराव ( सहय्यक आयुक्त, प्रभाग समिती १)
२) विपिन साप्टे ( सहय्यक आयुक्त, प्रभाग समिती २)
३) अजित गोडांबे ( सहय्यक आयुक्त, प्रभाग समिती ५)
४) अशोक बाने ( वरिष्ठ लिपिक )










