पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 10th, 2015

शेतीच्या वादातून भावाचा खून 0

शेतीच्या वादातून भावाचा खून

download
यवतमाळ, दि. १० – वडीलो पार्जीत शेतीच्या हिस्सेवाटणीवरून उद्भवलेल्या वादात सळाखीचे घाव घालून मोठ्या भावाचा खून केल्याची घटना काल गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील पोखरी येथे घडली.
नारायण किसन डाखोरे (५५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. तर परशुराम किसन डाखोरे (४५) असे आरोपीचे नाव आहे. डाखोरे बंधूची काळी दौ. येथे वडीलोपार्जीत चार एकर शेती आहे. कुटुंबातील पाच सदस्य या शेतीचे वारस आहेत. दरम्यान यापूर्वी कुटुंबातील एका भावाचा मृत्यू झाला होता. उर्वरीत चार भावंडामध्ये शेतीची हिस्सेवाटणी करण्याची प्रक्रीया सुरू होती. घटनेच्या दिवशी काल रात्री नारायण डाखोरे हे जेवन आटोपून अंगणात खाटेवर झोपले होते. तर त्यांची पत्नी जीजाबाई व मुलगा विनोद बाजुलाच जेवन करीत होते. याच दरम्यान दारुच्या नशेत आरोपी परशुराम डाखोरे हा हातात लोखंडी सळाख घेऊन त्या ठिकाणी धडकला. काही कळायच्या आत अनपेक्षीतपणे त्याने अचानक वडील बंधूच्या नारायणवर सपासप सळाखीने प्रहार केले. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या नारायणला पुढील उपचारासाठी पुसद येथे नेत असतांना वाटेत कासोळा गावाजवळ त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ठाणेदार प्रकार शेळके यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान आरोपीने पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.

 

April 10, 2015 in महाराष्ट्र
 बी. कॉमचा पेपर फुटल्याने औरंगाबादमध्ये खळबळ 0

बी. कॉमचा पेपर फुटल्याने औरंगाबादमध्ये खळबळ

market_SECVPF
औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बी. कॉम. परीक्षेचा पेपर फुटल्याने काल खळबळ माजली. तिसऱ्या वर्षाचा इनडायरेक्ट टॅक्स विषयाचा हा पेपर बाजारात उपलब्ध तर होताच त्याशिवाय व्हॉट्स-अपवरही हा पेपर ‘फिरत’ होता.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावर पेपर रद्द करण्यात आला. त्यानंतर काल उशिरा वेगळा पेपर देऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.पेपर फुटल्याच्या निषेधार्थ मनविसेने विद्यापीठ मुख्य इमारती समोर प्रतिकात्मक काळा पेपर दाखवून आंदोलन केले.दरम्यान विद्यापीठाचे उपकुलगुरू डी.एम. नेटके यांनी पेपर फुटीचा मात्र इन्कार केला. त्यांच्या मते पेपर फुटला नाही, मात्र बाहेर फिरत असलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि प्रत्यक्ष पेपरमध्ये साम्य होते. या पेपरमधील पाच पैकी २-४ प्रश्न सारखे होते. याशिवय तो अंदाजपूर्वक काढण्यात आलेला कागद होता. तो कोणी काढून व्हॉट्सअपवर टाकला याचा शोध घेऊन पोलीस कारवाई येत्या दोन तीन दिवसात करणार आहे.

April 10, 2015 in मुख्य पान
प्रेयसीचा मृतदेह नदीत फेकणारा नराधम प्रियकर जेरबंद 0

प्रेयसीचा मृतदेह नदीत फेकणारा नराधम प्रियकर जेरबंद

friend-murder_SECVPF
भंडारा – बेकायदेशीर गर्भपातादरम्यान मृत्यू झालेल्या प्रेयसीचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकणाऱ्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या ३ जणांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले असून भोंदू डॉक्टर मात्र फरार आहे.
सुमित लंजे (वय २२) असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याला नागपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी, ३१ मार्चपासून सदर मुलगी बेपत्ता झाली होती. पालांदूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वैनगंगा नदीत पोत्यात दगडाला बांधलेला तिचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या नागपूर येथून मुसक्या आवळल्या.

तरुणाची हत्या, मृतदेह फेकून आरोपी फरार 0

तरुणाची हत्या, मृतदेह फेकून आरोपी फरार

images2
नाशिक – शहरातील सातपूरच्या शिवाजी नगर भागात एका तरुणाची हत्या करण्यात आली. संतोष कसबे (२८) असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह फशीच्या डोंगराजवळ टाकण्यात आला. या घटनेने शहरात एकच खबळब उडाली असून पोलीस यंत्रणा गाढ झोपेत असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी सकाळी ही घटना उगडकीस आला सातपूर परिसरात मागच्या दहा दिवसातील ही दुसरी हत्या झाल्याने सातपूर शिवजीनगर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र, शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घटना घडण्यापुर्वी नाही, तर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे घटना घडल्यानंतर पोलीसांच्या कामाला सुरुवात होते.

April 10, 2015 in महाराष्ट्र
पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार एअर चीफ मार्शल मुळगावकर यांचे निधन 0

पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार एअर चीफ मार्शल मुळगावकर यांचे निधन

Chief-Marshal-Moolgaonkar
पुणे – माजी एअर चीफ मार्शल ह्रषिकेश मुळगावकर यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. पुणे येथील कमांड रुग्णालयात त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते, २९ मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
ह्रषिकेश माळगावकर यांना १९४७ साली स्वतंत्र दिनादिवशी हवाई दलाच्या सलामीचे नेतृत्व करण्याचा सन्मान मिळाला होता. सन १९७६ साली त्यांची मुख्य एअर मार्शलपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १९७८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले असून त्यांनी ३८ वर्षे हवाई दलाची सेवा केली.दरम्यान मुळगावकर हे उत्तम विमानचालक होते. त्यांनी हवाई दलातील ६७ प्रकारची विविध विमाने चालवली होती.

 

April 10, 2015 in मुख्य पान
सरकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ९० दिवसांत प्रस्ताव 0

सरकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ९० दिवसांत प्रस्ताव

download
मुंबई – सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची खुली चौकशी करण्याआधी संबंधित विभागाची परवानगी बंधनकारक असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल केले. सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव व्ही.एम. भट यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर केले.
ऑल इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर, प्रशासकीय विभागाचे प्रमुख, प्रथम वर्गातील अधिकारी व इतर अधिकाऱ्यांविरोधात एसीबीकडे तक्रार आल्यानंतर, त्या तक्रारींची शहानिशा झाल्यावर त्यांची खुली चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. खुल्या चौकशीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर ९० दिवसांत त्या विभागाने निर्णय न दिल्यास एसीबीने यासाठी परवानगी मिळाल्याचे गृहित धरावे, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्राची नोंद करत न्यायालयाने सुनावणी आठ आठवड्यांसाठी तहकूब केली.
या प्रकरणी अंकुर पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. १२ मार्च १९८१ रोजी शासनाने परिपत्रक जारी केले. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या खुल्या चौकशीसाठी परवानगी आवश्यक असल्याचे नमूद केले. मात्र, गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात चौकशी करताना आरोपींमध्ये वर्गीकरण होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचे प्रत्युत्तर सादर करताना शासनाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले.

 

April 10, 2015 in मुख्य पान
औरंगाबादमध्ये एमआयएम आणि अपक्ष कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 0

औरंगाबादमध्ये एमआयएम आणि अपक्ष कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

aimim-party-logo
औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन सुरुवातीपासून एमआयएमच्या पक्षात अंतर्गत असंतोष खदखदत होता. तो शुक्रवारी पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे समोर आला. तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन झालेल्या मतभेदांचे पर्यवसन शुक्रवारी हाणामारीत झाले. १० एप्रिलला निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
यावेळी एमआयएमचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले अमजद खान यांच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे नेते डॉ. गफार कादरी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला केला .खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या कादरी यांच्या समर्थकांनीही अमजद खान यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
याआधी तिकीट वाटपावरुन पक्षांतर्गत मतभेदांमुळे एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी पक्षाच्या तिकीट वाटप समितीचा राजीनामा दिला होता.येत्या २१ एप्रिलला औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. तर मतमोजणी २३ एप्रिलला होणार आहे. एमएमआयने या निवडणुकीसाठी आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

April 10, 2015 in मुख्य पान