पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 20th, 2015

लाचखोर अन्न सुरक्षा अधिकारी एसीबीच्या जाळ््यात 0

लाचखोर अन्न सुरक्षा अधिकारी एसीबीच्या जाळ््यात

images-2......................
यवतमाळ, दि. २० – खाद्य तेलाचे व मिरचीचे सॅम्पल पास करून देण्यासाठी ५१ हजार रुपये लाच स्विकारणाºया अन्न सुरक्षा अधिकाºयास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज सोमवारी दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्ताच्या कार्यालय ही कारवाई केली आहे.
प्रभाकर निवृत्ती काळे (४२) असे लाचखोर कर्मचाºयाचे नाव आहे. येथील अन्न व औषध प्रशासन विभागात ते अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. आर्णी येथील एका बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट मधील खाद्य तेलाचे व मिरचीचे घेतलेले सॅम्पल पास करून देतो. त्यासाठी ५१ हजार रुपये लाचेची मागणी या कर्मचाºयांने तक्रारदाराकडे केली होती. तसेच आर्णीतील इतर सात बार अ‍ॅड रेस्टॉरंट मालक तुझे चांगले परिचयाचे असल्याने त्यांच्याकडून वार्षिक हप्त्याचे पैसे जमा करून घेऊन ये असे फर्मान सोडले होते. नाही तर तुला याचा त्रास होईल अशी तंबीही दिली होती. या प्रकरणी बार अ‍ॅड रेस्टॉरंट मालकाने यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून पथकाने स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात सापळा रचला होता. दरम्यान पंचासमक्ष ५१ हजार रुपये लाच स्विकारताना काळे यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामनकर, गिरी, इंगोले, अमित जोशी, अनिल राजकुमार, खेडकर, ढोणे, महल्ले, शेंडे, मेश्राम, चिरडे, कोकेवार यांनी केली.

April 20, 2015 in मुख्य पान
आगीत आठ दुकाने खाक, २० लाखाचे नुकसान 0

आगीत आठ दुकाने खाक, २० लाखाचे नुकसान

Digras 2
दिग्रस,दि. २० – शहरातील सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये आग लागल्याने आठ दुकान जळुन खाक झाले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यामध्ये २० लाखाचे नुकसान झाले आहे.
येथील सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये टिनाचे दुकाने आहेत. काल रविवारी रात्री दिग्रस पोलीस ठाण्यातील जमादार नारायण लोढे, पोेकॉ गणेश मसरे, साहेबराव चव्हाण हे गस्त ाालत होते. अशातच त्यांना या दुकानातून धुर निघतांना दिसला. त्यांनी लगेच दुकानाच्या फलकावरील लिहुन असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून या बाबत कळविले. नगर परिषद मुख्याधिकाºयांनाही माहीती देऊन अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले. तसेच यवतमाळ व दारव्हा नगर परिषदच्या अग्निशमन दलही तेथे पाहेचले होते. या आगीमध्ये आठ दुकाने जळुन खाक झाली असून २० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये विष्णु जाधव यांची कॅन्टींग व हॉटेलमधील एक लाखाचे साहित्य जळून खाक झाले. विजय दारव्हेकर यांच्या दुकानातील फर्निचर, आलमाºया, टीव्ही संच, खुर्च्या, डायनिंग टेबल, कुलर असा एकुण १ लाख ५० हजाराचा माल जळाला. अशोक चव्हाण याच्या गोडाऊनमधून केबल बंडल, खुर्च्या, कुलर, मोटारी, ड्रेसिंग टेबल जळाले असून ४ लाख ६५ हजाराचे नुकसान झाले. तनवीर शमी पुतलाखान यांचे ५ लाख ६० हजार, म. हारुण खलीफा यांचे ४ लाख रुपये, अरुण डफडे यांचे २ लाख ८० हजार असे एकुण १९ लाख ५६ हजार रुपयाचे नुकसान झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.पी. राऊत, एस.एल. राठोड यांनी बंदोबस्त ठेवला होता.

 

April 20, 2015 in मुख्य पान
विद्यार्थ्यांना दिला चुकीचा पेपर 0

विद्यार्थ्यांना दिला चुकीचा पेपर

download (1)
अमरावती – नियोजित प्रश्नपत्रिका न देता ऐनवेळी विद्यार्थ्यांना दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे बीएड परीक्षार्थींचा गोंधळ उडाला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्या शाखेची बीएड परीक्षा सध्या सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ‘उदन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाचा पेपर सकाळी ९ वाजता होणार होता. पश्चिम विदर्भातील सुमारे ३२ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. परंतु या विषयाची प्रश्नपत्रिका न देता गुरुवारी नियोजित ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आली. विद्यापीठाच्या सर्वच केंद्रांवर सारखीच प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याची माहितीही आता समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील में. ए. सो. कला व वाणिज्य महाविद्यालयावरही हाच प्रकर समोर आला. याविषयीची तक्रार केंद्रप्रमुखांकडे करण्यात आली. वितरण विभागाच्या चुकीने हे घडल्याचे सांगण्यात येत आहे.बीएड अभ्यासक्रमाचा पेपर तयार करताना किंवा छपाई करताना चूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत समितीकडून चौकशी केली जाणार आहे, असे प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांनी स्पष्ट केले.

 

April 20, 2015 in मुख्य पान
दारूबंदीविरोधात याचिका 0

दारूबंदीविरोधात याचिका

download
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनसह अन्य दोन संघटनांनी दारूबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनचे सल्लागार दीपक जायस्वाल यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. त्याला स्थगिती देऊन दारू व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय येथेच पूर्ववत करू देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशन, देशी-दारू संघटनेचे सचिव राजीव मारकवार व राजेंद्र दीक्षित यांनी ही याचिका दाखल केली आहे. वर्धा, गडचिरोलीप्रमाणेच चंद्रपुरात अवैध दारूविक्री केली जात असल्याचा आरोप करीत सरकारचा महसूल बुडत असल्याचेही जायस्वाल यांनी म्हटले आहे

 

April 20, 2015 in मुख्य पान
 डॉ. आंबेडकरांमुळेच मी या ठिकाणी - पंतप्रधान मोदी 0

डॉ. आंबेडकरांमुळेच मी या ठिकाणी – पंतप्रधान मोदी

download (2)
नवी दिल्ली, दि. २० – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते तर ते समस्त मानवजातीचे कैवारी होते असे सांगतानाच कृपया बाबासाहेबांना एका जातीमध्ये अडकवून ठेवू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे असे सांगत डॉ. आंबेडकरांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोदगार काढले. दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी लढा दिला असून महिलांना योग्य न्याय मिळावा यासाठी कायदे केले, महिलांना मतदानांचा अधिकार बहाल केला, बाबासाहेबांनी कामगारांसाठी लढा दिला, कामगारांना १२ तासांऐवजी ८ तास काम करता यावे यासाठी कायद्यात तरतूद केली. महत्वाचा शिक्षणाचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून ज्या दिवशी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळेल तो दिवस ख-या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजलीचा दिवस ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते त्यामुळे त्यांना एका जातीत अडकवू नका. निवडणुकांचे महत्व लक्षात घेवून बाबासाहेबांनी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करण्याची संकल्पना मांडली. तसेच स्वतंत्र वित्त आयोग स्थापन करण्याची संकल्पना मांडली असे मोदी म्हणाले.

 

April 20, 2015 in मुख्य पान
शिवरायांची आठ पत्रे सापडली 0

शिवरायांची आठ पत्रे सापडली

images
कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून राजगडावर येण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला. याशिवाय आग्र्याला पोहोचण्यापूर्वी ते मथुरेला गेले होते, या मतप्रवाहला बळकटी देणारी छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रे उपलब्ध झाली आहे. सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने शनिवारी शिवाजी महाराजांची अन्य अप्रकाशित सात पत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. ही पत्रे नक्कल आणि तालिकांच्या स्वरुपात आहेत, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शनिवारी दिली.
सावंत म्हणाले, ‘येथील पुराभिलेखागारातून ही पत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यावर गेली सहा वर्षे संशोधन सुरू होते. ‌१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. त्यानंतर ते २५ दिवसांत राजगडावर पोहचल्याचा मतप्रवाह आहे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार ते चार महिन्यांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी स्वराज्यात पोहोचले. शिवाजी महाराजांच्या ३ ऑक्टोबर १६६६ रोजीच्या पत्रात त्यांनी ‌मथुरेतील जयकृष्ण चोबे याला वर्षासन दिल्याची नोंद आहे. म्हणजे महाराज ३ ऑक्टोबर १६६६ पर्यंत मथुरेतच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आग्र्याहून सुटका झाल्यानंतर ते किमान ४७ दिवस मथुरेतच थांबल्याचे दिसते. सहाजिकच शिवाजी महाराज नोव्हेंबर महिन्यात राजगडावर पोहोचले या प्रवाहाला पत्रातून बळकटी मिळते.’
‘जयकृष्ण आणि जयराम चोबे यांनी वर्षासन आणि संकल्पित दिल्याची सनदही मिळाली आहे’ असे सांगून सावंत म्हणाले, ‘शिवाजी महाराज सप्टेंबर महिन्यात राजगडावर पोहचले अशी खबर औरंगजेबला देणारी मिर्झाराजे जयसिंग यांची पत्रे आहेत. महाराजांनी स्वतः राजगडावर पोहोचलो अशी अफवा पसरवली असावी किंवा दुसऱ्या कोणाला तरी शिवाजी बनवून पाठविले असावे असा एक तर्क करता येतो. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयामागे शहाजी महाराजांचे एक सरदार रघुनाथ पंडित अमात्य हनुमंते यांचे मोठे सहकार्य होते. संशोधकांना सापडलेल्या ३ सप्टेंबर १६७७ रोजीच्या पत्रात हनुमंते यांची ‘वार्षिक नेमणूक करून कर्नाटक देश तुम्हा स्वाधीन केला’ अशी नोंद आहे. त्यांना एक लाख पाच हजार होन ठरवून दिले असेही पत्रात नमूद आहे. याशिवाय विशाळगडाच्या संदर्भातील पत्रात (१६ मार्च १६७१) हवालदार दुधाजी आहीरराऊ यांच्या नावाची नोंद असून १४ एप्रिल १६७१ रोजीचे हे पत्र विशाळगडावरील कदिम तैनातीचे आहे. २६ सप्टेंबर १६७७ रोजीच्या पत्रात त्रिंबकजी काकास कर्नाटकातील वलदाऊर मामले चंदी हे गाव वतन दिल्याचे म्हटले आहे.’ पत्रकार परिषदेला पुराभिलेखागाराचे अभिलेखापाल गणेश खोडके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रा. देविका पाटील, अमित अडसुळे आदी उपस्थित होते.
१६६९ सालातील एक प‌त्र मिळाले असून त्यात मिरासदार, कारकूनांची नावे आहेत. या पत्रात दोघा तृतीयपंथ्यांनी शिवाजी महाराजांकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना उदरनिर्वाह करण्याची परवानगी देण्यात आली होती.- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

April 20, 2015 in मुख्य पान
अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार 0

अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार

accident
सिवान – बिहारमधील सिवान जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी ठार झाले तर दोन जण जखमी झाले.
कोचिंग क्लासला घेऊन जाणा-या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला मिनीबसची धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार झाले तर जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना नजीकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तेथे कोणतेही डॉक्टर उपस्थित नव्हते असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी रुग्णालयाजवळील रुग्णवाहिका जाळल्या.तसेच रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शनेही केली. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

 

April 20, 2015 in मुख्य पान
पती ‘गे’ असल्याने डॉक्टरने केली आत्महत्या 0

पती ‘गे’ असल्याने डॉक्टरने केली आत्महत्या

priya-vedi-aiims-doctor
नवी दिल्ली – आपला पती समलैंगिक असल्याचे समजल्यानंतर दिल्लीतील पहारगंज येथील एम्सच्या ३० वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या डॉक्टरने फेसबुकवर तसेच चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवले होते.
प्रिया वेदी असे या आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ती अॅनेस्थेशिया विभागाची रेसिडेंट डॉक्टर होती. रविवारी आपल्या पतीशी भांडण झाल्यानतर रात्री साडेबाराच्या सुमारास ती हॉटेलमध्ये आली. त्यानंतर सकाळी हॉटेलमधील कर्मचा-यांना तिचा मृतहेद खोलीत आढळला.
‘पाच वर्षांपूर्वी मी डॉ. कमल वेदी यांच्यासोबत विवाह केला. माझा पती समलैंगिक असल्याने आमचे वैवाहिक जीवन चांगले नव्हते. गेल्या पाच वर्षांपासून पती आणि त्यांचे कुटुंबीय माझा मानसिक छळ करत होते’. असे तिने आपल्या पोस्टवर म्हटले आहे. याप्रकरणी मृत डॉक्टरचा पती कमल वेदी याला पोलिसांनी अटक केली असून याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.

April 20, 2015 in मुख्य पान
क्रिकेटर अंकित केसरी  चा मृत्यू 0

क्रिकेटर अंकित केसरी चा मृत्यू

The-tragic-events-of-cricket-Kolkata-cricketers-face-death-Kesari
कोलकाता – क्रिकेट सामन्यादरम्यान गंभीर जखमी झालेल्या ईस्ट बंगाल क्लब क्रिकेटच्या अंकित केसरी या क्रिकेटपटूचे सोमवारी निधन झाले.
तीन दिवसांपूर्वीच भवानीपूर क्लबच्या संघाविरुद्ध खेळत असताना क्षेत्ररक्षणादरम्यान झेल घेण्याच्या नादात अंकितची आपला सहकारी खेळाडू सौरव मंडलशी जोरदार टक्कर झाली. यामध्ये अंकित गंभीर जखमी झाला.अंकितवर गेल्या तीन दिवसांपासून कोलकाताच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी अंकितला हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
२० वर्षीय अंकितने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ४७ सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत बंगाल अंडर १९, ईस्ट झोन अंडर १९ आणि बंगाल अंडर २३ या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले.काही महिन्यांपूर्वीच सिडनीच्या क्रिकेट मैदानावर बाऊंसर डोक्यावर आदळल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे निधन झाले होते. २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे निधन झाले होते.

April 20, 2015 in मुख्य पान
मुख्यमंत्र्यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट 0

मुख्यमंत्र्यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट

201504201142124950_cm-meet-in-nagpur-jail_SECVPF
नागपूर – कैद्यांकडे मोबाईल फोन अढळून आल्याने चर्चेत आलेल्या नागपूर मध्यवर्ती कारगृहाला आज सकाळी ७.३० वाजात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भेट दिली. या भेटीमुळे कारागृहातील अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
सकाळी ७.३० सुमारास मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे कारागृह प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. ३१ मार्चला नागपूर मधून पाच कैदी पळून गेले होते. त्यानंतर जेलमध्ये कैद्यांकडून शंभरपेक्षा अधिक मोबाईल, तसेच पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले. त्यामुळे नागपूर कारगृहातील भ्रष्ट काराभारच चव्हाट्यावर आला.
मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर कारागृहाला भेट दिली. सुमारे ४० मिनिटांच्या भेटीनंतर मुख्ममंत्र्यांनी जेलच्या सुरक्षे व्यवस्थेतेबाबत अजून सुधारणा करण्याची आवश्यक्ता असल्याचे म्हटले. तसेच कारागृह प्रशासनाच्या संपूर्ण कार्यशैलीतही बदल आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीची माध्यमांसह कोणालाही थांगपत्ता नसल्याने प्रशासनाबरोबर कर्मचाऱ्यांचीही भंबेरी उडाली. नागपूर कारागृह प्रकरणानंतर आतापर्यंत एकूण ११ तुरुंग प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

April 20, 2015 in मुख्य पान