
दिग्रस – तालुक्यातील ईसापूर येथील एका इसमाने शाळेची व हिंदू स्मशानभूमीची जागा हडपली. त्या इसमावर गुन्हे दाखल करून शासनाने जमीन ताब्यात घ्यावी, या मागणीसाठी भाजपाच्या तालुका सचिव श्याम गायकवाड यांनी पोलीस ठाण्याच्या टॉवरवर चढून दहा तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
ईसापूर येथील रावसाहेब यशवंत साळुंके यांनी प्राथमिक मराठी शाळेची जमीन व रस्ता असलेली ८.३३ आर व ईक्लासच्या २.८२ हे आर जमिनीवर अतिक्रमण करून नांगरणी केली. गायकवाड याने शाळा, रस्ता व स्मशानभूमीची जागा हडपण्यास साळुंके यांना विरोध केल्याने त्याला तलवारीचा धाक दाखविला. साळुंके यांच्या दहशतीपुढे अधिकारीही हतबल झाल्याने २६ जानेवारीला याबाबतचे निवेदन गायकवाड याने प्रशासनाकडे सादर केले. त्यानंतर कार्यवाही न झाल्याने ४ जुलैला दिग्रस पोलिसात तक्रार दिली. हा विषय महसूल विभागात मोडत असल्याने पोलिसांनी गायकवाडला तहसीलदारांकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर तहसीलदारांकडे तक्रार देऊनही उपयोग झाला नाही. अखेर गायकवाड यांनी ६ जुलैच्या रात्री १ वाजता पोलीस गस्तीवर जाताच ठाण्यातील ८०
फू ट उंच टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. आज सकाळी एक युवक टॉवरवर बसून असल्याचे पोलीस व नागरिकांना दिसले. तो वेडसर आहे का, याची चौकशी पोलिसांनी केली. यावेळी गायकवाड याने मागण्यांचे निवेदन टॉवरवरून खाली फेकले व पक्षाच्या पदाधिकाºयांना
भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर भाजपाचे प्रमोद बनगिनवार, महादेव सुपारे, सुभाष काटेकर, आनंद आडे, अनिल भरारे, अॅड. विवेक बनगिनवार आदी पदाधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस निरीक्षक संजय देशमुख व पदाधिकाºयांनी आंदोलनकर्त्याला समजावून सांगितले. मात्र, तो खाली उतरण्यास तयार नव्हता. जोपर्यंत साळुंके यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही व अतिक्रमण काढणार नाही, तोपर्यंत आंदोलन करू, असा पवित्रा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कारवाई व्हावी, अशी मागणी केली. आंदोलन चिघळत असल्याने तहसीलदार नितीन देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांनी पोलीस ठाण्यात भेट दिली. आंदोलनकर्ता आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे तहसीलदार यांनी आपल्या कर्मचाºयांसह ईसापूर येथील अतिक्रमणाची पाहणी केली. व ईक्लासची २.८२ हे. आर जमिनीवरील अतिक्रमण हटवून साळुंके यांच्यावर कारवाई केली तर शाळेजवळील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने निकाल लागेपर्यंत कारवाई करता येत नसल्याचे सांगितले. कारवाईची माहिती आंदोलकर्त्याला देण्यात आल्यानंतर व आ. संजय राठोड यांनी श्याम गायकवाडला आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यावरही श्याम टॉवरवरून उतरला नाही. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पो.नि. संजय देशमुख, रवींद्र अरगडे, महादेव सुपारे व प्रमोद बनगिनवार यांनी सांगितल्यावर गायकवाड टॉवरवरून खाली उतरला. आंदोलनाबाबत त्याला विचारणा केली असता, आजच्या कारवाईने आपण समाधानी असल्याचे सांगितले.
Archive for July, 2014
भाजप सचिवाची पोलीस ठाण्यातील टॉवरवर वीरुगिरी
0
वैद्यकीय अधिका:यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई
असल्याने तेथेही डॉक्टरांना तैनात करण्यात आले आहे.
0
तामिळनाडूत भिंत कोसळून ११ ठार

चेन्नई – तामिळनाडूमधील तिरुवेल्लर जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि मुलांचा समावेश आहे.
‘शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे ही वीस फूट उंच भिंत कोसळली. यामध्ये ११ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये नऊ आंध्र प्रदेशमधील तर इतर तामिळनाडू येथील रहिवासी आहेत’,अशी माहिती तिरुवेल्लर जिल्हाधिकारी के. वीरा. राघव यांनी दिली. या प्रकरणी ज्या कंपनीसाठी ही भिंत उभारण्यात येत होती त्या कंपनीच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. रामनाथन आणि बाळू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मृत व्यक्तींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.आठवड्याभरापूर्वीच चेन्नईमधील ११ मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
0
मुरुड समुद्रात बुडून सहा जणांचा मृत्यू
अलिबाग- अलिबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांचा रविवारी मुरुड येथील समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहेत.
समुद्रात पोहोयला गेले असताना ही दुर्घटना घडली. या सर्व सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
चेंबूर येथील घाटलागाव परिसरातील १५ जण अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. ते सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील सहाजण बुडाले. यात विनोद झलाई, दिनेश पवार, दिलीप गोले, संजय पांचाळ, शंकर चव्हाण आणि रोहित झाला यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ४० ते ४५ वयोगटातील आहेत.
0
मत्स्य विभागातील साहित्याची तोडफोड

यवतमाळ – येथील जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात असलेल्या साहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात युवकांनी धडक दिली. त्यांनी सोबत आणलेल्या काठीने टेबल, काच आदी साहित्याची तोडफोड करून घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी कार्यालयात साफसफाई करणाºया महिलेव्यतिरिक्त एकही अधिकारी, कर्मचारी हजर नव्हते. तलावाच्या कार्यक्षेत्रात नसलेल्या एका संस्थेला कत्रांट दिल्याच्या कारणावरून ही तोडफोड झाली असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील धरण, तलावात मत्स्य बीज निर्मिती व त्याचे उत्पादन घेण्याकरिता शासनाने मच्छीमार संस्थाना कत्रांट देण्याचे धोरण तयार केले आहे. या पार्श्वभुमीवर दरवर्षी जिल्ह्याभरातील विविध संस्थाना त्यांच्या कार्यक्षेत्रातील धरण व तलावाचा ठेका देणे अधिकाºयांचे कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही वर्षात अधिकारी जिल्ह्यातील तलावांचा शासननियमाप्रमाणे कत्रांट देत नसल्याचे वास्तव आहे. यावर्षी सुध्दा कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला तलावाचा क त्रांट देण्यात आला आहे. तालुक्यातील उबंर्डा तलावाचा ठेका मिळण्यासाठी दोन संस्थानी साहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये एक कार्यक्षेत्रातील तर एका कार्यक्षोत्राबाहेरील संस्थेचा समावेश होता. यामध्ये कार्यक्षेत्राबोहरील संस्थेला ठेका देण्याच्या हालचाली सुरू असताना, उबंर्डा कार्यक्षेत्रात येणाºया संस्थेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याचा निकाल संस्थेच्या बाजूने दिला. शिवाय मत्स्य विभागाचे एआर यांनी सुध्दा कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कत्रांट देण्यास विरोध केला. मात्र अधिकाºयांनी या आदेशाला केराची टोपली दाखवित नियमबाह्यरित्या कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला तलावाचा कत्रांट दिला. काल सांयकाळी अधिकाºयांनी हा ठेका दिल्याने आज संतापलेल्या दोन अज्ञात युवकांनी कार्यालयातील टेबल, काच व इतर साहित्याची तोडफोड केली.
0
नेरच्या महिला बँकेत दरोड्याचा प्रयत्न

यवतमाळ – नेर शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी येथील महिला बँकेत दारोड्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. बँक असलेल्या इमारतीतील दोन भिंती फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. मात्र लोखंडी दरवाजा असलेली तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
सोमवारी मध्यरात्री बसस्थानकासमोर असलेल्या महिला सहकारी बॅकेस चोरट्यांनी निशाणा बनविले. प्रथम दोन भिंती फोडून चोरटे बँकेत शिरले. मात्र तिजोरीच्या खोलीस लोखंडी दरवाजा असल्याने चोरट्यांनी पुन्हा मागील बाजूने येवून तिजोरीची भिंत फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते. या बँकेत घटनेच्या वेळी ४० लाख रुपये तिजोरीत होते. ही बाब चोरट्यांना माहिती कशी झाली, हा संशोधनाचा विषय झाला आहे. बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षांना दिल्यानंतर त्या व व्यवस्थापक दोन तासांनी पोहचल्या. त्यामुळे पोलीस पथकही उशिरा पोहचले. बँकेत दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी मागच्या बाजूस असलेल्या चौकीदारावर चाकू रोखल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, ठाणेदार गणेश भावसार यांनी भेट देऊन पाहणी केली. काही दिवसांपूर्वी शहरात तीन दुकाने फोडून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी ४५७, ५११, ३८० गुन्हे दाखल केले.
0
मध्यान्ह भोजनातून १६० विद्यार्थ्यांना विषबाधा

यवतमाळ – विद्यार्थ्यांच्या शारीरीक व बौद्घीक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेच्या आहारातून इयत्ता पहिले ते आठवीत शिकणाºया तब्बल १६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी उमरखेड तालुक्यातील मुरली या गावी घडली. विषबाधेच्या या गंभीर प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळेतील नियोजनशुन्य कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
उन्हाळी सुट्टया संपल्यानंतर २६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका पडताच जिल्ह्यातील शाळा चिमुकल्यांच्या किलबीलाटाने दणाणून गेल्या. शाळेचे सत्र नियमित सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजन देणेही सुरु झाले. त्याचप्रकारे आज मंगळवारी मुरली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १९० पैकी १६० विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार देण्यात आला. काही वेळाने आहार सेवन करणाºया मुलांना डोळेदुखी, मळमळ व उलट्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले. आज आहारात विद्यार्थ्यांना मटकी द्यायची असल्याने तीला मोड यावी म्हणून पाण्यात भिजवुन ठेवण्यात आले होते. त्यात पाल सदृश प्राणी पडून ही विषबाधा झाल्याचे पालकांमध्ये बोलल्या जात आहे. मुलांना वाढता त्रास पाहून काही पालकांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहीका बोलविण्यात आली. सद्यास्थितीत विद्यार्थ्यांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
टॅव्हल्स अपघातात ४ जण गंभीर
यवतमाळ – चंद्रपूरला जाणारी ट्रव्हल्स पलटी झाल्याने घडलेल्या अपघात १५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले तर ४ जण गंभीर जखमी झाले. ही घटना काल रात्री दरम्यान यरद-शरदनजीक असलेल्या मामाभांजे पुलाजवळ घडली. सुनील संघपाल, प्रमोद गौरकार, गणेश श्यामराव क्षीरसागर, हनुमंत दळवे रा. चंद्रपूर अशी गंभीर जखमीची नावे आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल्स ही पुणे येथून चंद्रपूरकडे जात होती. दरम्यान मामा भांजेपुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच जखमींना उपचारासाठी कै. वसंतराव नाईक वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सुनील संघपाल व प्रमोद गौरकार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. या अपघातात सोहम खान, तवसीद सय्यद अहमद, सय्यद कौसीम, हनुमंत डवले, संभाजी सिसोदीया, सुनील संगमापूरे, मोहम्मद खान, सय्यद अहमद, प्रशांत साखरकर, आशीष मडावी, कमलाकर शेटे आदी प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
0
सहा चार्ली कमांडो निलंबित

यवतमाळ – महाविद्यालयीन युवकांना मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सहा चार्ली कमांडोला तडकाफडकी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम बावणे, राजू कुडमेथे यांच्यासह अन्य चार चार्ली कमांडोचा यात समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.
परराज्यातून शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेवून फिर्याद मागितली होती. त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत काल रात्री तडकाफडकी संबंधीत चार्ली कमांडोच्या निलंबनाचे आदेश काढले. रविवारी चार्ली कमांडोचे पथक रात्रगस्तीवर असताना त्यांना रात्री दरम्यान विद्यार्थी फिरताना दिसले. याबाबत सुरूवातीला चार्ली कमांडोनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चार्ली पथकातील कर्मचाºयांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. याप्रकरणाची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी नकार दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी तडकाफडकी निर्णय घेत सहा चार्ली कमांडोना निलंबित केले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
0
ठाणेदाराच्या रायटरची आत्महत्या
यवतमाळ – जिल्ह्यातील वणी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाºयाने आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी १ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुरली बोडखे असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाºयांचे नाव असून ते वणी पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदाराचे रायटर म्हणून काम पाहत होते. त्यांची पत्नी व मुले हे यवतमाळ येथे वास्तव्यास असून बोडखे हे वणी येथे एकटेच शासकीय निवासस्थानी राहत होते. अशातच १ जुलै रोजी रोजी पहाटे १.३० वातजाच्या सुमारास त्यांनी विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. सकाळी हा प्रकार उजेडात येताच पोलिस वर्तुळात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या अन्य पोलिस कर्मचाºयांनी भेट दिली. मी माझ्या जीवनाला कंटाळून आत्हत्या केल्याची चिठ्ठी बोडखे यांनी लिहुन ठेवली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.














