पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May, 2015

वीज वितरणच्या त्रासाने शेतकºयाचा मृत्यू 0

वीज वितरणच्या त्रासाने शेतकºयाचा मृत्यू

images
यवतमाळ, दि. ४ – वीजेचे देयक भरणाºया शेतकºयावर चक्क अतिरीक्त वीज वापरल्याचे कारण समोर करून चोरीच्या कलमा लावत शेतकºयाचा मानसिक छळ केला आहे. या छळाला कंटाळून एका शेतकºयाचा मृत्यू झाला आहे. असा आरोप मृतक शेतकºयाच्या मुलाने ४ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत केली.
अमरलाल मनिहार (८२) रा. चिमणाबागापूर ता. बाभुळगाव असे मृतकाचे नाव आहे. ते चिमणाबागापूर येथे गेल्या ४० वर्षापासून ओलिताची शेती करीत होते. दरम्यान सप्टेंबरमध्ये शेतातील डीपी बंद पडल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे या विवंचनेत ते सापडले. वीज पुरवठा पुर्ववत सुरू व्हावा म्हणून त्यांचा मुलगा अश्विनकुमारने गावात ठेवलेल्या तक्रार पुस्तिकेत तशी तक्रारही नोंदविली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने २० सप्टेंबरला बाभूळगाव येथील उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे व सहाय्यक अभियंता संजय कांबळे यांच्या विरोधात यवतमाळातील अधिक्षक अभियंत्यानाही निवेदन दिले. त्यांनीही दखल न घेतली नाही असा आरोपही केला आहे. पर्यायाने आपण ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नोटीस देताच वितरणने ट्रान्सफॉर्मर बदलवून दिले. निवाड्यात वितरण कंपनीला सदोष सेवे पोटी दंड थोटावण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याच कारवाईने भडक लेल्या वितरणच्या अधिकाºयांनी थांगपत्ता लागू न देता आमच्या शेतात सदोष मीटर लावले. एवढ्यावरच न थांबता खोटे पंच उभे करून मंजूर विद्यूत मागणीपेक्षा माझ्या शेतातील पंपासाठी जास्त विद्यूत भार घेतल्या जात असल्याचा बनावट अहवालही तयार केला. याच अहवालाच्या आधारे तब्बल एक लाख एक हजार ७२० रुपयांचे वीज देयक देण्यात आले. त्याच बरोबर त्याच पत्रामध्ये वीज चोरी असा उल्लेख करून मानहानी करण्याचा प्रतापही वितरणच्या अधिकाºयांनी केल्याचे अश्विनकुमार यांनी सांगितले. त्यामुळे आमची सत्यता पटविण्यासाठी २० जानेवारीला वितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांकडे जाऊन लावलेला दंड रद्द करावा, असे निवेदन दिले. संबधित अधिकाºयाने तो अर्जही मान्य केला. मात्र ६ एप्रिल २०१५ रोजी फायनल असेसमेंट म्हणून वीज देयक कमी करून पुन्हा ६१ हजार ३८७ रुपये दंडाची मागणी करण्यात आली. त्यामुळे एकट्यावरच सुडबुद्घीने कारवाई झाल्याने व्यथीत झालेल्या माझ्या वडीलांना मोठा मानसिक धक्का बसला. वितरणने वेळीच तक्र ारीची दखल घेत कारवाई केली असती तर माझ्या वडीलाचा जीव वाचला असता, असा आर्तस्वरही शेतकरी पुत्राने यावेळी काढला. यावेळी पत्रपरिषदेला राजु निवल, प्रशांत दर्यापूरकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाºयांची हिवरा(दरणे) रेती घाटावर धाड, १२ ट्रकसह दोन जेसीबी जप्त 0

जिल्हाधिकाºयांची हिवरा(दरणे) रेती घाटावर धाड, १२ ट्रकसह दोन जेसीबी जप्त

IMG-20150504-WA0083

यवतमाळ, दि. ४ – जिल्ह्यात रेती घाटावर जेसीबीने अवैधपने रेतीचे उत्खन्न सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी आज सोमवारी ४ एप्रिल रोजी कळंब तालुक्यातील हिवरा(दरणे) नजीकच्या रेती घाटावर धाड मारली. यावेळी जेसीबीसह १२ ट्रक जप्त केले.
जिल्ह्यातील नदीसह रेती घाटावरून अवैधपने रेती तस्करी सुरू आहे. अनेक माफीयांनी लिलावातील घाटाला हात न लावता इतरत्र घाटातून रेतीचे ओव्हरलोड उत्खनन चालविले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटावर कारवाई केली होती. तसेच आज सोमवारी महिवाल यांना कळंब तालुक्यातील हिवरा (दरणे) या गावा जवळील नदीपात्रातून अवैधपणे रेतीचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी पोलिसांचा ताफा घेत घटनास्थळ गाठले असता, तब्बल १२ ट्रक व दोन जेसीबी जप्त केले. सदर रेती माफीयांवर फौजदारी कारवाई केली जाणार असून, मोठा दंडही वसूल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभाग कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र मोबाईल एसएमएस प्रणीलीचा वापरच केला जात नसून, अवैध उत्खननानेही कळस गाठला आहे. बोटावर मोजण्याइतक्याच कारवाया जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी केल्या आहे. फौजदारीऐवजी दंड वसूल करून माफीयांना सोडण्यात येत आहे. रेती चोरीच्या असंख्य तक्रारीमुळे जिल्हाधिकाºयांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी धाडसत्र सुरू केले असून, आठवड्यात दोन मोठ्या कारवाया झाल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.

May 04, 2015 in मुख्य पान
 प्रत्येकाने बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करावा - मोदी 0

प्रत्येकाने बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करावा – मोदी

2

नवी दिल्ली – सत्ता आणि वैभव सोडणे खूपच कठीण आहे. गौतम बुद्धांनी सत्ता सोडून करुणेचा मार्ग निवडला. समाज जिवनासाठी बुद्धांनी जो मार्ग दाखविला आहे, त्याच मार्गाचा प्रत्येकांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक देशांच्या राजदुतांनी व केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. पुढे बोलताना म्हणाले की, २१ व्या शतकात हे अशियाचे असले तरी ते बुद्धशिवाय नाही. दुसऱ्याच्या कल्याणाशिवाय परलोकी तर सोडाच पण संपूर्ण जागात तुम्हाला सुख मिळणार नाही, असे ते म्हणाले.

May 04, 2015 in मुख्य पान
 बिबट्याचा हल्ला, बालक ठार 0

बिबट्याचा हल्ला, बालक ठार

1
पुणे – जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आणखी एका बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरीता सोमवारी सकाळी नगर-कल्याण महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे या भागात गेल्या महिना-दोन महिन्याच्या कालावधीत बिबट्याने हल्ला केल्याच्या सहा घटना घडल्या आहेत. याकडे वन विभागाचे अधिकारी सोईस्कररित्या कानाडोळा करत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरीता सोमवारी सकाळी जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, खामुंडी गावच्या ग्रामस्थांनी नगर-कल्याण रास्ता रोखून धरला. यामुळे सोमवारी नगर-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन माघारी घेण्याकरीता ओतूर पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अगोदर बोलवा, मगं काय ते बघू अशी भूमिका घेतल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतरच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसामधील ही तिसरी घटना आहे. त्यात २ बालकांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे जुन्नर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साई संतोष मंडलिक असे मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय बालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी मंडलिक कुटुंब अंगणात बसले होते. अचानक आलेल्या बिबट्याने सर्वांसमोर साईला ओढून नेले. सगळ्यांनी आरडाओरड केली. मात्र बिबट्याने बालकाला सोडले नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. मागील महिन्यात जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली होती.

 

May 04, 2015 in मुख्य पान
 पुण्यात एकाच रात्री तीन खून 0

पुण्यात एकाच रात्री तीन खून

06_11_2014-crime9
पुणे – रविवारच्या रात्री पुणे शहरात खुनाच्या वेगवेगळ्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली असून पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबिल ओढा वसाहतीत रात्री साडदहा वाजण्याच्या सुमारास नितीन कसबे (वय ३५) याच्यावर कोयता आणि सत्तूरने वार करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत कसबेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्रीच चैता रंडवे, श्रावण कुरुगे, काळ्या रंडवे आणि अन्य चौघांना अटक करण्यात आली.दुसरी घटना दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच राजाराम पुलाजवळ घडली. मोतीराम पवार या ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला व नंतर त्यांचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला. ही हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी याप्रकरणी गणेश होले या इसमाला अटक केली.दरम्यान, कात्रजमध्येही अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून पोलिस ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

May 04, 2015 in मुख्य पान
नागालँडमध्ये दहशतवादी हल्ला, आठ जवान शहीद 0

नागालँडमध्ये दहशतवादी हल्ला, आठ जवान शहीद

TERRORIST
कोहिमा – नागालॅंडच्या मॉन जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे आठ जवान शहीद झाले असून, सह जवान जखमी झाले आहेत. निमलष्करी दलाचे चार जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास आसाम रायफल्सचे १८ जवांन चांगलांगसू गावात पाणी आणण्यासाठी ट्रकमधून चालले असताना आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.
जवानांच्या ट्रकवर त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या जवानांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दहशतवादीही ठार झाले आहेत मात्र त्यांचा आकडा समजू शकलेला नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे.
एनएससीएन (के) या दहशतवादी गटाने हा हल्ला केल्याचा संशय आहे. एनएससीएन(के) ने मागच्या महिन्यात केंद्राबरोबर पंधरावर्षापासून असलेला शस्त्रसंधी करार मोडून सुरक्षापथकांना लक्ष्य केले.
दोन एप्रिलला या संघटनेच्या दहशतवाद्यांनी अरुणाचलप्रदेशच्या तिराप जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर सापळा रचून हल्ला केला होता. यात तीन जवान शहीद झाले होते तर, तीन जवान जखमी झाले होते. मागच्या शनिवारी कामलेंगचिंग गावात झालेल्या चकमकीत लष्कराने एनएससीएन-के च्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते

May 04, 2015 in मुख्य पान
महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजप वेगळे होतील – शरद पवार 0

महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजप वेगळे होतील – शरद पवार

NCP press conference
मुंबई – सरकारमध्ये एकत्र सहभागी असूनही, परस्परांना जागा दाखवण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वेगळे होतील अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे भाकीत त्यांनी वर्तवल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विरोधाबद्दल बोलताना पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका व्यक्तीगत असून, त्याच्याशी आपण सहमत नसल्याच त्यांनी स्पष्ट केल.जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल बाबासाहेब पुरंदरे गप्प ? असा सवाल टि्वटरवरुन विचारत आव्हाड यांनी बाबासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. शिवसेना-भाजपा युतीबद्दल शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताला महत्व आहे. कारण शिवसेनेचे सत्तेत असूनही वर्तन विरोधकांसारखे आहे.भाजपाही शिवसेनेला जागा दाखवून देण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबईमध्ये दोन्ही पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ जवळपास समसमान आहे. मागच्या महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना सर्वाधिक जागा लढवीत होती तर, भाजपाला कमी जागा मिळत होत्या.मात्र आता आमदार संख्या समसमान असल्याने भाजपा यावेळी दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाला स्थानिक स्तरावर विस्तारण्याची जास्त संधी आहे. त्यामुळे शरद पवार यांनी व्यक्त केलेले हे मत महत्वपूर्ण ठरते.

May 04, 2015 in मुख्य पान
गौतम बुद्घ यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा  0

गौतम बुद्घ यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

pravin add

May 03, 2015 in मुख्य पान
  विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्घ यांच्या जयंतीनिमित्त सर्व बौद्घ बांधवांना हार्दिक शुभेच्छा  0

विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्घ यांच्या जयंतीनिमित्त सर्व बौद्घ बांधवांना हार्दिक शुभेच्छा

01

May 03, 2015 in मुख्य पान
 मुंबईचा पंजाबवर २३ धावांनी दणदणीत विजय 0

मुंबईचा पंजाबवर २३ धावांनी दणदणीत विजय

IPL 8 IN BENGALURU
मोहाली- आयपीएलच्या आठव्या हंगामात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर २३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी ठेवलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत सात बाद १४९ धावा केल्या.
किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विरेंद्र सेहवाग झटपट बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला ग्लेन मॅक्सवेलही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला जगदीश सुचितने बाद केले. मुरली विजयने डेव्हिड मिलरसोबत मिळून ४८ धावांची भागीदारी रचली. मात्र विजय ३९ धावा करून बाद झाला. त्याला हरभजन सिंगने बाद केले. त्यानंतर मिलर (४३) बाद झाला. तर जॉर्ज बेली (२१) आणि अक्षर पटेल धावबाद होऊन तंबूत परतले.
मुंबईकडून लसिथ मलिंगाने दोन तर हरभजन आणि जगदीश सुचितने प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने सलामीवीर लेंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत तीन बाद १७२ धावा केल्या.
मुंबईच्या सलामीवीरांनी सुरुवात दमदार केली. पटेल आणि सिमेन्स यांनी १११ धावांची सलामी दिली. करणवीर सिंगच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात पार्थिव बाद झाला. त्याने ३६ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने सिमेंन्ससोबत मिळून ४३ धावांची भागीदारी केली. रोहितला मिशेल जॉन्सनने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने २६ धावा केल्या. त्या पाठोपाठ सिमेन्स बाद झाला. सिमेन्सने ५६ चेंडूत ७१ धावांची खेळी केल्याने मुंबईला १७२ धावांपर्यंत पोहचण्यात मोलाची भूमिका बजावली.त्यानंतर फलंदाजीला आलेले केरॉन पोलार्ड (७) आणि अंबाती रायडू (४) हे नाबाद राहिले. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अनुरीत सिंग, मिशेल जॉन्सन, करणवीर सिंग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण 0

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

62nd National Film Award
नवी दिल्ली- दिल्लीत रविवारी झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘कोर्ट’ला सुवर्णकमळाचा बहुमान मिळाला. तर अन्य सहा पुरस्कारांवरही मराठी चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली.
‘कोर्ट’ चित्रपटाला सुवर्णकमळासोबतच चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘किल्ला’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटतर ‘एलिझाबेथ एकादशी’ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्काराने गौरव करण्यात आला.
हिंदीमध्ये ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘मेरी कोम’ या चित्रपटाला लोकप्रिय पुरस्कार दिला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
तर मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांना जुहू येथील निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे.
‘देऊळ’ या मराठी चित्रपटाने २०१२ मध्ये सुवर्णकमळ पटकावले होते. त्यानंतर तीन वर्षांनी हे भाग्य ‘कोर्ट’ या चित्रपटाने पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला मिळवून दिले आहे.

May 03, 2015 in मुख्य पान
   घाटंजीत आयपिएल क्रिकेट सट्ट्यावर धाड 0

घाटंजीत आयपिएल क्रिकेट सट्ट्यावर धाड

IMG-20150503-WA0019

यवतमाळ , दि. ३ – सध्या आयपिएल क्रिकेटची धुम सुरू असून क्रिकेट सट्टाही तेजीत आहे. घाटंजी येथे क्रिकेट स्पर्धेत अनेकांनी सट्टा लावल्याची टिप मिळताच घाटंजी येथील सट्ट्यावर धाड टाकुन दोन आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने शनिवारी रात्री घाटंजी येथील दुर्गा माता वार्डात ही कारवाई केली.
अजय नानाजी अक्कलवार (३८) , जाफर खान ईमान खान पठाण (३३) सर्व रा. दुर्गा माता वार्ड घाटंजी अशी आरोपींची नावे आहे. शुक्रवारी रात्री सरनाईज हैद्राबाद विरूद्घ चन्नई सुपर किंग यांचा दरम्यान क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यावर सट्टा सुरू असल्याची टिप स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने दुर्गा माता वार्ड घाटंजी येथील अक्कलवार यांच्या घरी वरच्या मजल्यावर धाड टाकली. यावेळी अजय अक्कलवार, जाफर खान या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून एलसीडी, सेटअप बॉक्स, १० मोबाईल, रिमोट, अन्य साहित्य व नगदी ३ हजार ७०० रुपये असा एकुण ६१ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हार-जीत जुगार लिहीलेल्या चिठ्याही जप्त केल्या. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपीविरूद्घ ४,५ मुंबई जुगार कायदया अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक जे.बी. डाखोरे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, सहाय्यक फौजदार भिमराव सिरसाट, डोंगरे, पोलीस शिपायी नितीन सलाम, भोजराज करपते, चालक सतीश गजभिये यांनी केली.

 

 वरिष्ठाची हत्या करून पोलिसाची आत्महत्या 0

वरिष्ठाची हत्या करून पोलिसाची आत्महत्या

2015-05-03-rakeshmaria--621x414_ns
मुंबई : वाकोला पोलीस ठाण्याच्या साहाय्यक फौजदाराने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांच्या वायरलेस आॅपरेटर शिपायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. दरम्यान, या गोळीबारात वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांचेही इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले.
ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास पोलीस ठाण्यातच घडली. गोळीबार करणाऱ्या साहाय्यक फौजदाराचे नाव दिलीप शिर्के आहे. स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने त्यांचा मृत्यू व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करून घेण्याआधीच झाला. वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी आणि त्यांचा वायरलेस आॅपरेटर बाळासाहेब अहिरे या दोघांना लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जोशी यांच्या पाठीत शिरलेली गोळी यकृताला छेदत पोटातून बाहेर पडली. त्यामुळे रात्री उशिरा विलास जोशी यांचे निधन झाले. अहिरे यांच्या मांडीत गोळी घुसली आहे. या घटनेने सुन्न झालेल्या वाकोला पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. शिर्के यांनी हे पाऊल का उचलले, त्यांना याआधी वरिष्ठ निरीक्षक जोशी किंवा अन्य वरिष्ठांकडून जाच होता का, याबाबत गुन्हे शाखा तपास करणार आहे. शिर्के यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून (९एमएम) तीन गोळया झाडल्या. हे रिव्हॉल्वर पुढील तपासासाठी हस्तगत करण्यात आले आहे.

 

May 03, 2015 in मुख्य पान
१ ऑगस्टपासून एलबीटी हटविणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही 0

१ ऑगस्टपासून एलबीटी हटविणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

201505031013126645_LBT-closed-from-August-1-Chief-Minister-assured_SECVPF
नागपूर – येत्या १ ऑगस्ट २०१५ ला एलबीटी हटविणार तसेच एलबीटी आंदोलनादरम्यान ज्या व्यापाऱ्यांवर नोव्हेंबर २०१४ पर्यंत दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपुरात नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
फ्रान्स आणि जर्मनीच्या दौऱ्यात तेथील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असल्याचंही फडणवीसांनी सांगितले. त्यांनी याबाबत उत्सुकता दाखवली असून नागपुरात गुंतवणूक करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विदर्भात कृषी आधारित उद्योग सुरू करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या कृषीमालावर उत्पादन करणाऱ्या कंपनीने रशियाच्या कंपनीबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. नागपूर जी. एस. टीचे केंद्र बनेल. विविध प्रकारच्या कंपन्या विदर्भात येणार आहेत. ५ लाख शेतकऱ्यांकडून सरळ माल विकत घेतली. शेतकऱ्यांची ही संख्या २५ लाखांपर्यंत वाढेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

May 03, 2015 in मुख्य पान
 'दुरांतो'चे १० डबे घसरले 0

‘दुरांतो’चे १० डबे घसरले

railway-express-derailed
पणजी – एरनाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डबे आज रुळावरून घसरले. बाली रेल्व स्टेशनजवळील बोगद्यात हा अपघात झाला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पणजीच्या दक्षिणेला ४५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. घटनास्थळी रुग्णवाहिकेसह वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली आहे. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटे यांनी ही माहिती दिली आहे.

May 03, 2015 in मुख्य पान
नेपाळमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के 0

नेपाळमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के

AP4_26_2015_000027A
काठमांडू – नेपाळमधील भूकंप काही थांबता थांबेना, आठवड्यापूर्वी ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने नेपाळ उद्धवस्त झाले आहे. त्यात आज पुन्हा नेपाळला भूकंपाने धक्के दिले आहेत.
येथील सिंधुपालचौक जिल्ह्यात आज पहाटे ३.२९ च्या सुमारास भूकंपाने धक्का दिला आहे. या भूकंपाची ४.५ रिश्टर तीव्रतेची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पहाटे ५.५७ वाजता गोरखा आणि धाडिग जिल्ह्याला भूकंपाने ५ रिश्टर तीव्रतेचे धक्के दिले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू धाडिग जिल्ह्यात होता.भूकंपाचे धक्के थांबत नसल्याने नेपाळमधील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. मात्र, अधिक चिंता करू नये, असे हवामान खात्याने आवाहन केले आहे.

May 03, 2015 in मुख्य पान
 अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार 0

अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

images (1)00000
पालघर – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी कारला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद मार्गावरील मेदवान खिंड भागात हा अपघात घडला. अपघातात मृत झालेल्या या व्यक्ती एकाच कुटुंबातील होत्या. पुणे शहरातील ते रहिवासी होते. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती मुंबईतील रहिवासी आहेत.
अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

May 02, 2015 in मुख्य पान
दाऊदला यायचे होते शरण 0

दाऊदला यायचे होते शरण

dawood (1)
नवी दिल्ली – १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला शरण यायचे होते असा खळबळजनक खुलासा सीबीआयचे माजी महानिरीक्षक नीरज कुमार यांनी केला आहे.
जून १९९४ मध्ये माझे दाऊदशी तीनवेळा बोलणे झाले. त्याच्या बोलण्यावरुन त्याला शरण यायचे हे जाणवत होते. मात्र जर भारतात परतलो तर त्याच्याविरोधातील गँगस्टर त्याला मारुन टाकतील अशी भिती दाऊदला होती. त्याची सुरक्षा ही सीबीआयची जबाबदारी असेल असेही मी त्याला सांगितले होते. मात्र सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी आपल्याला रोखले. त्यामुळे दाऊदशी पुढे बोलणे होऊ शकले नाही असे कुमार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले.दाऊदचा निकटवर्तीय मनीष लालाने नीरज कुमार आणि दाऊदचे बोलणे करवून दिले होते. मनीषने मला सांगितले होते की दाऊद स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी शरण येत बोता असे नीरज कुमार म्हणाले. चार वर्षांनंतर छोटा राजनच्या गँगने मनीष लालाची गोळ्या घालून हत्या केली नीरज कुमार आपल्या पोलीस सेवेतील ३७ वर्षाच्या कारकिर्दीतल टॉप १० तपास प्रकरणांबाबतचे पुस्तक सध्या लिहीत आहेत. दाऊदसोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. लवकरच हे पुस्तक प्रदर्शित होणार आहे.मुंबईवर १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास नीरज कुमार करत होते. या बॉम्बस्फोटात २५७ जण ठार झाले तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.

 

May 02, 2015 in मुख्य पान
 शिक्षणक्रांती परिषद ३ मे रोजी 0

शिक्षणक्रांती परिषद ३ मे रोजी

31
यवतमाळ – प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीने ३ मे रोजी बचत भवनात एक दिवसीय शिक्षणक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, विविध विषयातून विचार मंथन होणार आहे. या परिषदेचे उद््घाटन डॉ. यशवंत मनोहर करतील. तर डॉ. अशोक पाळवेकर हे अध्यक्षस्थान भूषवतील. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. रामदास राऊत हे आहेत.
सकाळी १० वाजता होणाºया उद््घाटनीय सत्रात मंचावर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले , डॉ. अनिकेत भडके , महाराष्टÑ राज्य शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार हर्षबोधी ,सं.गा.बा. अमरावती विद्यापिठााचे सिनेट सदस्य डॉ. सुभाष गवई हे मान्यवर उपस्थित असतील. दुपारच्या शैक्षणिक सत्रामध्ये ‘वर्तमान शैक्षणिक धोरणाने समतामुलक, शोषणमुक्त समाज निर्माण शक्य आहे काय’ व ‘शिक्षणक्रांतीसाठी महिलांची भूमिका’ या दोन महत्त्वाच्या विषयावर अशोक बुरबुरे आणि डॉ. लिला भेले भाष्य करतील. अध्यक्ष म्हणून डॉ. सुभाष गवई हे आपली भूमिका मांडतील. समारोपीस सत्रामध्ये डॉ. अशोक पाळवेकर, देविदास घोडेस्वार, अरूणकुमार हर्षबोधी , शिक्षणाधिकारी (माध्य) चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी(प्राथ) डॉ. सुचिता पाटेकर व प्रा. सिध्दार्थ भगत हे मार्गदर्शन करतील. यापरिषदेच्या निमित्ताने चर्चासत्र, नाटिका, विविध क्षेत्रात काम करणाºया मान्यवरांचा सत्कार तसेच ठराव वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉक्स …
काव्य गझल, मुशायºयाची मेजवानी
यवतमाळ प्रजासत्ताकशिक्षक कर्मचारी संघातर्फे ३ मे रोजी म्हणजे बुद्धपौणिर्मेच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहाला मराठी गझल, मुशायºयाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित या मुशायºयामध्ये सुदाम सोनुले, किरणकुमार मडावी, अनंत चांदुरकर, विद्यानंद हाडके, आनंद शेख, अनिल कोसे, प्रमोद संबोधी, शशी थुल, सिध्दार्थ भगत यांची उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थानी उर्दु शायर तथा नाटककार अशोक बुरबुरे राहणार असून या निशुल्क कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षक कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गुजर यांनी केले आहे.

May 02, 2015 in मुख्य पान
 जिल्ह्यात लवकरच टेक्सटाईल पार्क - संजय राठोड 0

जिल्ह्यात लवकरच टेक्सटाईल पार्क – संजय राठोड

DSC_6285
पोस्टल मैदानावर महाराष्ट्र दिनाचा वर्धापनदिन
यवतमाळ, दि. 1 : यवतमाळ जिल्हा मोठ्या प्रमाणावर कापुस पिकविणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कापसावर आधारीत प्रक्रीया करणारे मोठे उद्योग निर्माण होणे आवश्यक असतांना एकही उद्योग गेल्या काही वर्षात उभा राहिलेला नाही. राज्य शासनाने विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथे प्रक्रीया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदर्भात येत्या काही दिवसांमध्ये चार टेक्सटाईल पार्क उभे राहात असून त्यात यवतमाळचाही समावेश असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 55 व्या वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा येथील पोस्टल मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी शुभेच्छा देतांना ते बोलत होते. कार्यक्रमास यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलिस अधिक्षक जे.बी.डाखोरे यांच्यासह अधिकारी, माजी सैनिक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरूवातीस पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. जिल्हृयाचा पालकमंत्री म्हणून काम करतांना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. गेल्या पाच महिन्यात प्रशासन अधिक लोकाभिमूख करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले. नागरिकांची कामे जलदगतीने व ठराविक कालावधीत व्हावी यासाठी सेवा हक्क कायदा लागू केला. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी 396 कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला. 12 हजार 716 जलसंधारणाची कामे यातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 503 गावांची निवड करण्यात आली असून टप्प्या टप्प्याने टंचाई परिस्थिती असलेली सर्वच गावे या अभियानाने जोडली जाणार आहे. भविष्यात जिल्ह्यातील एकही गाव टंचाईसदृश राहणार नाही.
महसूल राज्यमंत्री म्हणून काम करताना जिल्ह्यासाठी काही नवीन केले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावरील प्रशासकीय इमारती, तलाठी कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन, दर्जा नसलेल्या गावांना महसूली दर्जा, शेतकऱ्यांच्या जमीनींचे तुकडी बंदी आदी विषय प्राधान्याने मी हातात घेतले आहे. लवकरच याचे चांगले परिणाम दृष्टीस पडणार आहे.
रोजगार हमी योजना व धडक सिंचन योजनेतून विहीरींची कामे करत असताना खचलेल्या आणि बुजलेल्या विहीरींनाही दुरूस्तीचा लाभ मिळाला पाहिजे, असा आग्रह मी धरला होता. शासनाने काही दिवसांपूर्वी त्यासंदर्भातला आदेश काढला. शेतकऱ्यांना केवळ विहीरी देऊन उपयोग नाही. विहिरीवर सिंचनासाठी पंप आणि त्याला कनेक्शन नसेल तर उपयोग होणार नाही. प्रत्येकाला वीज कनेक्शन देता यावे म्हणून शासनाने विशेष बाब म्हणून 57 कोटी रूपयाचा निधी जिल्ह्याला नुकताच मंजूर केला. जुन्या प्रलंबित 9 हजार शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. यानंतर मागेल त्याला कनेक्शन, अशी आमची भूमिका यापुढे राहणार आहे.
धामणगाव देव आपल्या जिल्ह्याचे तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी बंजारा समाजाची काशी आहे. धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या या स्थळांचा विकास झाला पाहिजे, या भूमिकेतूनच पाठपुरावा केल्याने शासनाने दोन्ही स्थळांसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 6 कोटींची तरतूद केली आहे. या स्थळांच्या विकासामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.
गावगाड्यातील नागरीकांच्या अजूनही अनेक समस्या आहे. त्या समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या महिन्यापासून समाधान शिबिराच्या माध्यमातून तालुकास्तरावर जनता दरबार घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाची दखल घेतली जाईल. त्यांच्या समस्या आपुलकीने समजून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्यापुढील फार मोठे आव्हान आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणा असला तरी निराश होऊ नका. शासन शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. तुमच्या काही समस्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना किंवा थेट मला भेटा. धीर खचू देऊ नका, कुटूंबाला उघड्यावर पाडू नका, अशी कळकळीची विनंती जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना याप्रसंगी त्यांनी केली.
उद्योगांसाठी अकृषक परवानगी सुधारणा विधेयक नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडण्यात आले. या विधेयकामुळे पूर्वी ज्या कामसाठी मोठा कालावधी लागायचा ते काम केवळ 15 दिवस ते एक महिन्यात पूर्ण होणार आहे. यामुळे राज्यात उद्योगांना चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी याप्रसंगी सांगितले. ध्वजारोहणानंतर पोलिस दलाच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

May 01, 2015 in विदर्भ