पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 9th, 2014

कुटुंबप्रमुखानं केली आई, पत्नी आणि मुलीची हत्या 0

कुटुंबप्रमुखानं केली आई, पत्नी आणि मुलीची हत्या

02_10_2012-crime9
पुणे – पुण्याच्या वानवडी भागात एका कुटुंबप्रमुखानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली आई, पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. सागर गायकवाड असं या व्यक्तीचं नाव असून त्यानंही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यातून बचावल्यानंतर तो पोलिसांना शरण आला आहे.
सागर गायकवाड (४० वर्षे) हा गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगार होता. त्याच्या डोक्यावर सात लाख रुपयांचं कर्ज होतं. बीपीओ कंपनीत नोकरी असताना त्याचे हप्ते तो भरू शकत होता. परंतु, दोन महिन्यांपासून तो हप्ते देऊ न शकल्यानं कर्जदारांनी त्याच्यामागे तगादा लावला होता. हळूहळू सगळंच हाताबाहेर जाईल, या भीतीनं तो खचून गेला आणि नैराश्याच्या भरातच त्यानं आपलं कुटुंब संपवलं. आई शकुंतला (५८), पत्नी कविता (३६) आणि मुलगी ईशिता (७) या तिघींचा त्यानं काल दुपारी घरातच ओढणीनं गळा दाबून खून केला. त्यानंतर, गळफास घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु, त्यातून तो बचावला. शेवटी, आज सकाळी नऊच्या सुमारास सागरनं वानवडी पोलीस स्टेशनात जाऊन घटनेची माहिती दिली. कर्जबाजारीपणाला कंटाळून आपणच हा प्रकार केल्याचं त्यानं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढचा तपास सुरू केला आहे.

April 09, 2014 in महाराष्ट्र
पाकमध्ये बॉम्बस्फोट, २३ ठार 0

पाकमध्ये बॉम्बस्फोट, २३ ठार

5729167214129485238_Mid
इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी असलेले इस्लामाबाद शहर बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हादरले. शहरातील एका गजबजलेल्या बाजारपेठेत फळे आणि भाज्या विक्री विभागात आज सकाळी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २३ जण ठार झाले आणि ४० ते ५० जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. स्फोटाचे स्वरुप पाहता, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असून बॉम्ब एक्स्पर्टच्या सहकार्याने कोणती स्फोटके वापरण्यात आली याचा तपास सुरू आहे. एका फळांच्या खोक्यात लपवलेला पाच किलो वजनाचा बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. हा बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. येत्या दहा एप्रिलपासून तेहरिक-ई-तालिबान ही दहशतवादी संघटना शस्त्रसंधी करणार आहे. ही शस्त्रसंधी सुरू होण्याआधीच स्फोट झाला आहे. मात्र तेहरिकसह पाकमधील कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

April 09, 2014 in देश-विदेश
फेसबुकवर मैत्री, समलैंगिक संबंधांची ऑफर देऊन लुटले 0

फेसबुकवर मैत्री, समलैंगिक संबंधांची ऑफर देऊन लुटले

mvv01
मुंबई – समलैंगिक संबंधांची चटक लागलेल्या तरुणांना सोशल साइटच्या (फेसबुक) माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवून त्यांना लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वाकोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यातज आला आहे.
वाकोला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल नावाच्या व्यक्तीने वाकोलात राहणाऱ्या एका तरुणाशी फेसबुकवर मैत्री करून त्याला समलैंगिक संबंधासाठी तयार केले. त्यानंतर तो त्याच्या घरी गेला. घरी जाताच त्याच्याशी संबंध करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या सोबतचे तिघेही तिथे पोहचले. त्यांनी त्या तरुणाला धमकावून त्याच्याकडे एक लाखांची मागणी केली. त्यावेळेस चौघेही २० हजार, घरातील लॅपटॉप आणि टॅब घेऊन निघून गेले. पीडित तरुणाने त्यानंतर लागलीच वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिल्लक असलेले ८० हजार घेण्यासाठी आलेल्या चौघांनाही पोलिसांनी रंगेहाथ पकडले. रईस शेख, अवधूत हाटनकर, सलीम उर्फ साहिल अब्दुल शेख आणि अंबादास बुध्दिवंत अशी या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

April 09, 2014 in मुख्य पान