पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 3rd, 2014

राहुल गांधींची प्रचारसभा बुधवारी 0

राहुल गांधींची प्रचारसभा बुधवारी

4 x 25 MOGHE copy

April 03, 2014 in विदर्भ
मतदानासाठी कामगारांना वेतनी सुट्टी देणे बंधनकारक 0

मतदानासाठी कामगारांना वेतनी सुट्टी देणे बंधनकारक

index.jpeg000
यवतमाळ : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक १० एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या दिवशी खाजगी आस्थापनांवरील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता
यावा म्हणून या आस्थापनांवरील मतदारांना या दिवशी आस्थापना मालकांनी सुट्टी देणे आवश्यक आहे. सुट्टीसाठी कोणतीही कपात किंवा वजाती कामगाराच्या वेतनातून करता येणार मतदानाच्या दिवशी सवर्सामान्य नागरिक तथा विविध खाजगी आस्थापनामधील मतदारांना मतदान करता यावे म्हणून या दिवशी सुट्टी देण्याचे आदेश शासनाने काढले आहे.
त्यानुसार राज्यातील विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी विविध आस्थापनांवर काम करणाºया कामगारांना मतदान करता यावे म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. कामगारांना सुट्टी देतांना ती वेतनी सुट्टी राहणार असून आस्थापना मालकांना कामगारांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही, असे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे. जिल्हाधिकाºयांनी हे आदेश काढले आहे. संबंधित शासकीय कार्यालयांनी आपल्या अधिकारक्षेत्रात असलेल्या खाजगी आस्थापनांना कळवून मतदानासाठी पगारी रजा देण्याबाबत जिल्हाधिकºयांनी आदेशात नमुद केले आहे.

April 03, 2014 in विदर्भ
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू 0

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

voting-machine1000
यवतमाळ : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत जमावास बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाºयांविरुध्द मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३७(१) व ३७ (३)अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे. महावीर जयंती, हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने हे आदेश लागू करण्यात आले आहे.

April 03, 2014 in विदर्भ
दादरवर लोकलच्या डब्ब्याला आग 0

दादरवर लोकलच्या डब्ब्याला आग

index.jpeg112
मुंबई – मुंबई सीएसटीकडे येणाऱ्या फास्ट लोकलच्या डब्ब्याला दादर स्टेशनमध्ये आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी खोळंबली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या मागील शुक्लकाष्ठ कायम असून गुरुवारी संध्याकाळी दादर स्टेशनवर आलेल्या एका लोकलच्या डब्ब्याला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. या वेळात मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर अन्य मार्गांवरील वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली. यामुळे लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आणि घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढत गेली. रेल्वे स्टेशनवर जमलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शेवटची माहिती हाती आली तोपर्यंत मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्वपदावर आले नव्हते.

April 03, 2014 in महाराष्ट्र
बटन दाबलं की मत भाजपलाच 0

बटन दाबलं की मत भाजपलाच

evm
गुवाहाटी – आसाममध्ये मतदान यंत्रातील तांत्रिक चुकीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गुवाहाटीत निवडणुकीपूर्वी मतदानाची चाचणी घेण्यात आली. यावेळी मतदान यंत्राचं कोणतंही बटन दाबल्यावर ते मत भाजपलाच जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे मतदान यंत्रांच्या बिनचुकतेबाबत साशंकता निर्माण करण्यात येत आहे.
आसाममधील जोरहाट लोकसभा मतदारसंघात पाठवलेल्या मतदान यंत्रांमध्ये हा घोळ झाला आहे. ही मतदान यंत्र ( EVMs) हैदराबादमधील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने बनवली आहेत. ‘ जोरहाटमधील मतदान यंत्रांशी छेडछाड झाली आहे. ही मतदान यंत्र राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर उघडल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात ही यंत्र सदोष आढळून आली. आता ही मतदान यंत्र मतदान केंद्रावर पाठवण्यात येणार नाही,’ असं मुख्य निवडणूक अधिकारी विजेंद्र यांनी स्पष्ट केलं. सदोष मतदान यंत्राबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसंच आसाममधील सर्व मतदान यंत्रांची फेरतपासणी करण्याची मागणीही केली आहे.जोरहाट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय बिजॉय कृष्ण हांडीक आणि भाजपचे युवा नेते कामाख्या तासा यांच्यात मुख्य लढत आहे. हांडीक हे सातव्यांदा इथून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात ७ एप्रिलला मतदान होणार आहे.

April 03, 2014 in देश-विदेश
हुक्का पार्टी पोलिसांनी उधळली 0

हुक्का पार्टी पोलिसांनी उधळली

hooka-300x199
पुणे- दारू आणि हुक्क्याच्या नशेत धिंगाणा घालणा-या २० तरुणी आणि २६ तरुणांना लोणावळा शहर पोलिसांनी बुधवारी रात्री साडेबारा वाजता गोल्ड व्हॅली, तुंगार्ली परिसरातून ताब्यात घेतले. पार्टीवर अचानक पोलिसांचा छापा पडल्याने दारूच्या नशेत चूर होऊन अश्लिलपणे नृत्य करत असलेल्या युवक-युवतींची मोठी पळापळ झाली.
लोणावळ्यातील तुंगार्ली भागातील गोल्ड व्हॅली परिसरात एका बंगल्यात काही मुले व मुली डिजेच्या तालावर धांगडिधगा घालत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस, डिटेक्शन ब्रँच पथकाने या बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना तेथे काही मुले आणि चेह-यावर मास्क लावून अतिशय कमी कपडयांमध्ये काही मुली अश्लिल चाळे करीत संगिताच्या तालावर धुंद होऊन नाचत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. हे सर्वजण मुंबईतील एका विधी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.

April 03, 2014 in मुख्य पान
शिवसेना-मनसेमध्ये तुंबळ हाणामारी 0

शिवसेना-मनसेमध्ये तुंबळ हाणामारी

SS MNS300
मुंबई – शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये रंगलेल्या शाब्दीक व्दंदाची परिणीती आता रस्त्यावर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीमध्ये झाली आहे.
गुरुवारी मुंबईतील ओल्ड कस्टम हाऊस येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने समोरासमोर आलेले दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर गुरुवारी सकाळी ओल्ड कस्टम हाऊस येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
घोषणाबाजीतून सुरु झालेला खुन्नस हाणामारीमध्ये बदलली. पोलिसांना न जुमानता दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हातातील झेंडे घेऊन परस्परांवर तुटून पडले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेकही झाली. दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते या हाणामारीत जखमी झाले आहेत. ओल्ड कस्टम हाऊसच्या बाहेरच्या परिसराला शिवसेना आणि मनसेने रणमैदान बनवून टाकले होते.दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. शिवसेना-मनसेच्या स्थानिक नेते-कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या हाणामारीतनंतर परिसरात मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही बाजूंनी शक्ती प्रदर्शन केल्याने मोठया संख्येने कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखणे पोलिसांच्या हाताबाहेर गेले. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या प्रश्न-उत्तराचा सिलसिला रंगला आहे. दोन्ही नेते परस्परांवर व्यक्तीगत स्तरावराचे आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यांच्या या आक्रमक भाषणांनी कार्यकर्त्यांमध्ये खुन्नसही वाढू लागला आहे.

April 03, 2014 in महाराष्ट्र
अमेठीचे रहिवासी नसल्याने राहुल यांचा अर्ज रद्द 0

अमेठीचे रहिवासी नसल्याने राहुल यांचा अर्ज रद्द

Rahul-Gandhi-may-visit-Kedarnath-Badrinath
अमेठी- अमेठी मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे राहिलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीचे तात्पुरते रहिवासी नसल्याचा धक्कादायक खुलासा अधिका-यांनी गुरुवारी केला. राहुल गांधी अमेठीचे तात्पुरते रहिवासीही नसल्याचे कारण सांगत त्यांना निवासी दाखला देण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे.
गेल्या दोन निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीमधून निवडणूक लढवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहतो त्याचे त्या विभागात बँकेचे खाते असणे गरजेचे असते. मात्र खाते उघडण्यासाठी रहिवासी पुराव्याची गरज असते. त्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र राहुल गांधी अमेठीचे तात्पुरते रहिवासीही नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्याचबरोबर राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज स्वत:हून जिल्हा उपविभागीय मॅजिस्ट्रेट अधिका-यांक़डे दिला नाही तर वकिलांतर्फे त्यांनी ही कागदपत्रे सादर केली. अर्ज दाखल करताना राहुल गांधींनी स्वत: यायला हवे होते. तसेच अर्जासोबत गरजेचे असलेले ओळखपत्रही त्यांनी सादर केले नाही त्यामुळेच त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. येत्या निवडणुकीत राहुल गांधींच्या विरोधात आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून अमेठीमधून राज्यसभा खासदार स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

April 03, 2014 in देश-विदेश
मुशर्रफ यांच्या हत्येचा कट फसला 0

मुशर्रफ यांच्या हत्येचा कट फसला

Parvez-Musharaf
इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्याचा कट गुरुवारी फसला. मुशर्रफ ज्या मार्गावरुन सुनावणीसाठी न्यायालायात जाणार होते त्या मार्गावर दहशतवाद्यांनी स्फोटके पेरुन ठेवली होती.
मुशर्रफ यांचा वाहनाताफा जाण्याच्या वीस मिनिटे आधी येथे स्फोट झाल्याने मुशर्रफ या हल्ल्यातून बचावले अशी माहिती पोलिस अधिकारी लियाकत नियाझी यांनी दिली. इस्लामाबादच्या बाहेर असलेले लष्करी रुग्णालय सध्या मुशर्रफ यांचे निवासस्थान आहे. जानेवारीपासून मुशर्रफ यांचे तेथे वास्तव्य आहे. मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानात देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी जाताना मुशर्रफ यांची बॉम्बस्फोटामध्ये हत्या करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता.

April 03, 2014 in देश-विदेश
आयपीएल दुसरा टप्पा २ मेपासून भारतात, अंतिम लढत मुंबईत 0

आयपीएल दुसरा टप्पा २ मेपासून भारतात, अंतिम लढत मुंबईत

index
नवी दिल्ली- आयपीएलच्या सातव्या हंगामाची अंतिम लढत मुंबईत एक जूनला वानखेडे स्टेडियमवर रंगेल. आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात होणार असून त्याला दोन मेपासून सुरुवात होईल, असे बीसीसीआयने गुरुवारी जाहीर केले.
मुंबई इंडियन्स गतविजेता असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) अंतिम लढत खेळवण्याचा मान मिळाला. ‘फायनल’बरोबर मुंबई इंडियन्सच्या लढती तसेच ‘क्वालिफायर २’ लढतही (३० मे रोजी ) मुंबईत होईल. मुंबईतील पहिली लढत तीन मे रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगेल. आयपीएलच्या दुस-या टप्प्यात ३६ सामने आणि चार ‘प्ले ऑफ’ लढतींचा समावेश आहे. पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) १६ ते ३० एप्रिलदरम्यान खेळला जाणार आहे. सार्वत्रिक दुसरा टप्पा बांगलादेशात तसेच तिसरा टप्पा भारतात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र यावेळची आयपीएल दोन टप्प्यांतच होईल. तसेच दुसरा टप्पा भारतात होईल, यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले.

April 03, 2014 in क्रीडा