Archive for April 21st, 2014
0
नीलेश वंजारी यांचा विवाह चिसौका माधुरी हीच्यासोबत २२ एप्रिल रोजी विवाह पार पडणार आहे. त्यानिमित्य मनपूर्वक शुभेच्छा !
0
सावत्रबापाकडून मुलीवर अत्याचार

यवतमाळ – सावत्र बापानेच तब्बल पाच वर्ष मुलीवर अत्याचार केल्याची घटना आज घाटंजी तालुक्यातील तीवसाळा येथे उजेडात आली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापास पोलिसांनी अटक केली.
माणिक मारोती भगत (५५) रा. तीवसाळा असे नराधमाचे नाव आहे. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने गावातीलच एका महिलेसोबत पुर्नविवाह केला. त्याला पहिल्या पत्नीचा मुलगा व तीला पहिल्या पतीची एक मुलगी आहे. काही दिवसाने सुखी संसार सुरु असताना या नराधमाची १६ वर्षीय सावत्रमुलीवरच नजर पडली. घरी कोणी नसताना तो तीच्यासोबत जबरीने अत्याचार करत होता. ही माहिती कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकही तो देत होता. त्यामुळे ही मुलगी बदनामी होईल म्हणून चुप्प राहत होत. २००९ पासून तर फेबु्रवारी २०१४ पर्यंत सतत हा किळसवाणा प्रकार सुरु होता. दरम्यान आज पिडीत मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगुन घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक एम.एम. राऊत करीत आहे.
0
युवतीवर सामूहिक अत्याचार

यवतमाळ – बोरगाव घाटात विवाहितेवर सामूहिक अत्याचाराच्या घटनेला दोन दिवस होत नाही तोच शहरालगतच्या पारवा-भारी येथे तीन युवकांनी एका युवतीवर सामूहीक अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली.
मूळ अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील २१ वर्षीय युवती तीन महिन्यापासून मावस भावाच्या गावी पारवा येथे नोकरीच्या शोधात आली होती. यवतमाळात नोकरी मिळाल्याने काही दिवसापासून ती शहरातील जामनकर नगरमध्ये किरायाने खोली करून राहत आहे. यावेळी तिची ओळख एका मयुर नामक युवकासोबत झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने ते लग्नही करणार होते. मात्र त्या युवकाने विषारी औषध घेतल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्याच भेटीसाठी ती युवती रुग्णालयात गेली होती. यावेळी पारवा येथीलच विक्की व आकाश नावाच्या युवकांनी तिला दुचाकीवर बसवून नेले. रात्री १० वाजताच्या सुमारास पारवा येथील जिल्हा परिषद शाळेत तिच्यावर जबरीने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा भारी येथे शेतात नेऊन त्या दोघांनी व फिरोज नामक युवकाने अत्याचार केला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास तिला जामनकरनगरात आणून सोडले. या प्रकाराने भयभित झालेल्याने पीडितेने आज दुपारी वडगाव रोड ठाणे गाठून आपबीती सांगून तक्रार दिली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित युवतीची वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३७६ (ग) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
डॉ. दाभोलकर हत्याः आरोपींना जामीन

पुणे – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज पुणे कोर्टाने जामीन दिला. आरोपी मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने कोर्टाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.
इचलकरंजीतील अट्टल गुन्हेगार मनिष नागोरी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना शस्त्र पुरविल्याचा संशयाप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती. मनिष नागोरीवर बेकायदेशीर शस्त्रे विकल्याप्रकरणी आणि खून, खंडणीसारख्या अनेक प्रकरणांत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.
या दोघांना जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. ९० दिवसांनंतरही आरोपपत्र दाखल करण्यात पुणे पोलिसांना अपयश आले होते. परिणामी, आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता.
0
अ.भा. ब्राम्हण महासंघातर्फे १ मे रोजी ‘फोटोग्राफी’ स्पर्धा

नागपूर : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त लक्ष्मीनगर, सिस्फा गॅलरी यथे ‘फोटोग्राफी’ स्पर्धा व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अ. भा. ब्राम्हण महासंघाचे शिवानी दाणी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
छायाचित्र स्पर्धा ही सर्वांसाठी खुली असून विदर्भातील अभयारण्य, धार्मिक स्थळ तसेच विदर्भाचे सांस्कृतिक व भौगोलिक दर्शन घडविणार्या छायाचित्रांचा यात समावेश राहील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क १00 रुपये आकारण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ५000 रुपये, द्वितीय पारितोषिक ३000 रुपये, तृतीय पारितोषिक २000 हजार रुपये देण्यात येईल. छायाचित्र प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत प्रेक्षकांकरिता सुरू राहील. छायाचित्र पाठविण्यासाठी शिवानी दाणी-९८६0१३३८६0, मयुरेश जोशी- ८९७४७३७९९१ या भ्रमणध्वनी क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवाणी यांनी केले.










