पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 6th, 2014

मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे 0

मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे

 

Copy of 00_1

April 06, 2014 in विदर्भ
राज ठाकरेंची ७ एप्रिलला यवतमाळात सभा 0

राज ठाकरेंची ७ एप्रिलला यवतमाळात सभा

jpg
यवतमाळ – महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे ७ एप्रिल रोजी यवतमाळातील पोस्टल मैदानावर प्रचारसभेचे आयोजन केले आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभेचे मनसे पक्षाचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची यवतमाळात पहिल्यांदाच जाहीर सभा होत असून ते काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे येणार असल्याने मनसे ने त्यांच्या सभेची जय्यत तयारी केली आहे. सायंकाळी ५ वाजता होणाºया या सभेला मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे समर्थक व जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेचे जिल्हाप्रमुख अशोक पुरी, राजू उंबरकर, अभय गडम, अनिल हमदापूरे आदींनी केली आहे.

April 06, 2014 in विदर्भ
देशाला लुटणाºयांना त्यांची जागा दाखवा - उद्घव ठाकरे 0

देशाला लुटणाºयांना त्यांची जागा दाखवा – उद्घव ठाकरे

DSC_6905

DSC_6960यवतमाळ – आजपर्यंत देशाला लुटणाºयांना त्यांची खरी जागा दाखवून देत शेतकºयांच्या गळ््याभोवती फास आवळणाºया काँग्रेसला फासावर लटकवा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी केले. शिवसेना, भाजप, रिपार्इं(आ.) महायुतीच्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.
यवतमाळ-वाशीमच्या उमेदवार भावना गवळी, चंद्रपूरचे हंसराज अहीर यांच्यासह विदर्भातील सर्वच ठिकाणच्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील शेतकरी सुल्तानी संकटात असताना त्यांच्यावर अस्मानी संकटही कोसळले असून पण सरकारने शेतकºयांच्या या परिस्थितीचेही राजकीय भांडवल केले, असा आरोप त्यांनी केला. केंद्रात एनडीएचे सरकार सत्तेत आल्यास शेतकºयांना कर्जमुक्ती देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळींसोबत एकाच व्यासपीठावर आमने-सामने चर्चा करावी, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. शेतकरी जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी आमच्या व्यासपीठावर आल्याचे समाधान आणि आनंद आहे, असे सांगून शेतकºयांनो धीर धरा, आत्महत्या करून कुटुंबाची परवड करू नका, असे आवाहन केले. सत्तेत आल्यानंतर शेतकºयांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही देत जिल्ह्यातील सिंचनाची समस्या, रेल्वे मार्ग, औद्योगीकरण आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. यावेळी यवतमाळ- वाशिम लोकासभेच्या उमेदवार भावना गवळी बोलतांना म्हणाल्या की, पुढील पाच वर्षात रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेवून, टेक्सटाईल पार्क, शेतमलावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना नेते आ. सुभाष देसाई, डॉ. विकास महात्मे, माजी न्या. अशोक खिल्लारे, नामदेव खोब्रागडे, किशोर तिवारी, राजेंद्र डांगे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते माजी आ. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. संजय राठोड, माजी आ. बाळासाहेब मुनगीनवार, विश्वास नांदेकर, मदन येरावार, दिवाकर पांडे, संदीप धुर्वे, प्रवीण पांडे, सोमेश्वर पुसतकर, सुधाकर तायडे, महेंद्र मानकर, सुधीर कंवर, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.

April 06, 2014 in विदर्भ
यवतमाळ - वाशीम लोकसभा क्षेत्राचे बसपाचे उमेदवार बळीराम राठोड   0

यवतमाळ – वाशीम लोकसभा क्षेत्राचे बसपाचे उमेदवार बळीराम राठोड

Copy of BSP

April 06, 2014 in विदर्भ
ना बिकने वाला समाज बनो - गरुड 0

ना बिकने वाला समाज बनो – गरुड

DSC_0484
DSC_0480यवतमाळ – सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने संपूर्ण देशामध्ये वातावरण निर्मिती केली आहे. बसपाने मुस्लिम,ब्राम्हण, मराठा, दलित, आदिवासी, बंजारा आदी समाजाला तिकीट देऊन महाराष्टÑात ४८ लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवार उभे केले असून देशामध्ये पार्टी तिसºया क्रमांकाची ताकत म्हणून उभी झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा नसून सामाजिक असमानता हा प्रमुख मुद्दा आहे. त्याला बगल देऊन काँग्रेस -राकॉ, सेना-भाजपा समस्त बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून समाजाने ‘ ना बिकने वाला समाज बनो’ असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले.
यवतमाळ – वाशीम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार बळीराम राठोड यांच्या प्रचारार्थ पाटीपुरा येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आरक्षणाचा मुद्दा असो अथवा वेगळा विदर्भ राज्याचा मुद्दा असो हे दोन्ही एनडीए, युपीए एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन बहुजनवादी नितीचा विरोध करत असतात. कारण यांना कोलगेट, आदर्श, टेलीकॉम घोटाळ््यातून निवडणूक लढविण्याकरीता पैसा मिळत असतो. तसेच येथील उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन इथल्या दलित शोषित समाजाचे अहित साधण्याचे काम ह्या पाटर्या करीत असतात.बहुजन समाज पार्टी ही समाजाच्या पैशाच्या भरवशावर निवडणूक लढवून सरकार बनविण्यावर इथल्या बहुजन समाजाचेच काम करणार नाही उद्योगपत्यांचे. जाती-जातीत वितुष्ट निर्माण करुन धर्माच्या नावावर मते मगण्याची व हिंदू, मुसलमान यांच्यात भांडणे लावून मुस्लिम काँग्रेस-राकाँकडे व हिंदू भाजप-शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्न केला जातो. तर येथील बहुजन समाजाला विकासाच्या मुद्यापासून विभक्त केल्या जाते. बहुजन समाज पार्टीच्या मायावती ह्या जेव्हा उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री बनल्या तेव्हा त्यांनी हजारो एकर सरकारी जमिनीचे वाटप केले. तसेच ४०० स्क्वेअर फुटाचे घरकुल बांधून दिले. महाराष्टÑामध्ये मात्र शेती तर नाहीच परंतु रमाई घरकुल योजनेअंतर्गत फक्त ६८ हजार ५०० रुपये देऊन येथील दलितांची मतदान घेण्याचे काम काँग्रेस-राकॉ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मायावतींना पंतप्रधान बनविण्याकरीता आपणास बाबासाहेबांच्या हत्तीला संसदेमध्ये पाठवायचे आहे. यवतमाळ-वाशिम क्षेत्रातून उभे असलेले बळीराम राठोड यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बळीराम राठोड यांनी गेल्या ६५ वर्षातील बहुजनावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बंजारा सहित समस्त बहुजन समाजाने मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी खोरिपाचे उमेदवार सुधाकर घायवान, शिलानंद कांबळें यांनी बंजारा समाजासह काँग्रेस,राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश घेतला.

April 06, 2014 in विदर्भ
काँग्रेसला विकास करण्यासाठी ६०० वर्षे लागतील - मोदी 0

काँग्रेसला विकास करण्यासाठी ६०० वर्षे लागतील – मोदी

index
बिजनौर –  ‘देशाच्या विकासाचा नुसता ‘मॅप’ बनवण्यासाठी काँग्रेसच्या शहजाद्यांना ६० वर्षे लागली; आता विकास प्रत्यक्षात आणायसाठी आणखी ६०० वर्षे लागतील,’ अशी घणाघाती टीका एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आज (रविवार) झालेल्या प्रचारसभेत मोदी बोलत होते. ‘काँग्रेस आतापर्यंत फक्त वोट बँकेचे राजकारण करत आली आहे. त्यामुळे देश खिळखिळा बनला आहे. काँग्रेसमधील सर्व नेते एकाच परिवाराचे गुणगान गाण्यात गुंतले आहेत. या परिवाराच्या नादात काँग्रेसचे देशाकडे लक्ष राहिले नाही. एवढेच काय पंतप्रधानांकडेही लक्ष राहिले नाही. काँग्रेसचा कुठलाही नेता पंतप्रधानांना आपला नेता म्हणण्यास तयार नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
‘मोठमोठ्या गप्पा मारण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मी स्वतः चहा विकला आहे. त्यामुळे गरिबी काय असते याची मला जाणीव आहे, असे सांगतानाच, ‘गेल्या अनेक वर्षांपासून देशाला लुटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना देशातील युवक माफ करणार नाहीत,’ असेही ते म्हणाले.

April 06, 2014 in देश-विदेश
 तीन शिक्षिकांचा विनयभंग 0

तीन शिक्षिकांचा विनयभंग

images
नागपूर –  दिघोरी येथील सर्वश्री विद्यालयातील तीन शिक्षिकांचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून संस्थेचा सचिव राजेश काशिनाथ मासूरकर (वय ४६, रा.ओमनगर) याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश नेहमी शिक्षिकांना त्रास देत होता. शुक्रवारी सकाळी राजेशने आपल्यासह तीन शिक्षिकांचा विनयभंग केला. शिक्षिकेने प्रतिकार केला. त्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी राजेशने दिली, असे पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एल. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुन्हा दाखल करून राजेशला अटक केली.

April 06, 2014 in विदर्भ
 तेलगू देसम पुन्हा एनडीएत सामील 0

तेलगू देसम पुन्हा एनडीएत सामील

index.jpeg000
हैदराबाद- आंध्रप्रदेश व तेलंगणमधील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहिर केला. टीडीपीच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आणखी एक घटक पक्ष सहभागी झाला आहे. अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजप आंध्रप्रदेशमध्ये ५ तर तेलंगणमध्ये ८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. १९९९ ते २००५ पर्यंत चंद्राबाबू नायडू एनडीएत होते. मात्र २००५ मध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी भाजपला जबाबदार ठरवत त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. तेलंगणमध्ये ३० एप्रिल तर सीमांध्रमध्ये ७ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे.

April 06, 2014 in देश-विदेश
कसारा घाटात टँकरला अपघात, पाच ठार 0

कसारा घाटात टँकरला अपघात, पाच ठार

kasara_ghat
ठाणे – मुंबई – आग्रा महामार्गावरील कसारा घाटात टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.
संगमनेरहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या दुधाच्या टँकरला कसारा घाटातील वळणावर अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत्यू झालेले पाचही जण गोरेगाव येथील रहिवासी आहेत. जखमींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुभाजकावर आदळून टँकर उलटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

April 06, 2014 in महाराष्ट्र
गुगलचे ‘टी२० वर्ल्डकप’ विशेष डूडल 0

गुगलचे ‘टी२० वर्ल्डकप’ विशेष डूडल

google-doodle
मुंबई – सतत प्रयोगशील असणा-या गुगलने रविवारी रंगणा-या आयसीसी टी२० विश्वचषकानिमित्त खास डूडल बनवले आहे. बांगलादेशमधील मिरपूर येथे भारत आणि श्रीलंका दरम्यानचा अंतिम सामना जोरदार रंगणार आहे.
गुगलच्या या खास डूडलमध्ये जल्लोष करणारे चाहते, फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा खेळाडू दाखवण्यात आले आहे. तसेच बॉलरच्या हातातील बॉल, क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असणारे स्टॅम्प दिसत आहेत.याआधी २००७ मध्ये भारताने आयसीसी टी२० विश्वचषक जिंकला होता. आतापर्यंत तीन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या श्रीलंकेला मात्र अद्यापही विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

April 06, 2014 in मुख्य पान
‘आप’च्या केजरीवाल हटाव मागणी 0

‘आप’च्या केजरीवाल हटाव मागणी

index.jpeg1
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या जागी कुमार विश्वास यांची संयोजकपदी नेमणूक करावी अशी मागणी आपच्या काही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यासाठी रविवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे आपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ७० सदस्य आहेत. आपने त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ७० सदस्यांना पक्षाच्या संयोजकला पदावरुन हटवण्याचा अधिकार आहे. या बैठकीत यासंबधी चर्चा होण्याची शक्यता आहे.मात्र कुमार विश्वास या बैठकीला हजर राहणार नसल्याचे समजते. दरम्यान, केजरीवाल यांना हटवून संयोजकपदी कुमार विश्वास यांच्या नेमणूकीची मागणी करणा-या आपच्या नेता अश्विनी उपाध्याय यांची रविवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकऱणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे

April 06, 2014 in देश-विदेश