पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 2nd, 2014

राहुल गांधींची बुधवारी प्रचारसभा 0

राहुल गांधींची बुधवारी प्रचारसभा

images
यवतमाळ – लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय  उपाध्यक्ष राहुल गांधी ४ एप्रिल रोजी यवतमाळच्या दौºयावर आहेत.
यवतमाळ-वाशीम, हिंगोली व चंद्रपूर लोकसभेकरीता उभ्या असलेल्या कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील पोस्टल मैदानावर आयोजीत सभेला ते संबोधनार आहे. अशी माहिती आज बुधवारी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष आ़ वामनराव कासावार आदी उपस्थित होते़ ४ एप्रिलला सकाळी १०़४५ वाजता राहुल गांधींच्या सभेला प्रारंभ होणार असल्याचे आ़ कासावार यांनी सांगितले़ या प्रचारसभेच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव मोघे, हिंगोलीचे राजीव सातव व चंद्रपूरचे संजय देवतळे या तिन्ही उमेदवारांची ही संयुक्त प्रचारसभा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ६ एप्रिल रोजी कृषी मंत्री शरद पवार यांची मंगरूळपीर येथे जाहीर प्रचारसभा होत असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. या सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.

April 02, 2014 in विदर्भ
बिबट्याची कातडी जप्त , आंध्रप्रदेशात शिकार 0

बिबट्याची कातडी जप्त , आंध्रप्रदेशात शिकार

02ytl23
पांढरकवडा (यवतमाळ )- आंध्रप्रदेशातून विक्री करण्यासाठी येत असलेली बिबट्याची कातडी अत्यंत शिताफीने वनविभागाने जप्त करून तिघांना अटक केली आहे. ही कारवाई आज पाटणबोरीनजीक करण्यात आली. रामू कुमरे, सुखदेव खडके, प्रमोद मेश्राम (रा. मारेगाव बंडल),असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
आंध्रप्रदेशातील काही शिकारी १० लाख रुपयात बिबट्याची कातडी महाराष्टÑात विकणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या सूत्रांना मिळाली. त्यावरून वनविभागाच्या कर्मचाºयांनी व्यापारी बनून १० लाख रुपयात कातडीचा सौदा केला. दुचाकीने तिघे महाराष्टÑ येत असताना पिंपळखुटी चेक पोस्ट वर रामू कुमरे, सुखदेव खडके, प्रमोद मेश्राम यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ बिबट्याची कातडी असल्याचे आढळून आले. वनविभागाच्या पथकाने यावेळी बिबट्याची कातडी, दुचाकी क्रमांक एम.एच. २९ आर/ ९९२८ वनविभागाने जप्त केली. आरोपी विरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत ९, २९, ४४, ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ महिन्यापूर्वी आंध्रप्रदेशात शिकार केल्याचे प्राथमिक चौकशीत आरोपींनी सांगितले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.डी. नागुलवार, वनपाल दिपेश लोखंडे, वनकर्मचारी कुन्नेनवार, भोयर, मिलमिले, अश्विन राठोड यांनी केली.

April 02, 2014 in विदर्भ
स्कुलबसच्या धडकेत फौजदार ठार 0

स्कुलबसच्या धडकेत फौजदार ठार

apghat-162x100
यवतमाळ – स्कुलबसने दुचाकीला धडक दिल्याने फौजदार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता वरुड येथे घडली. भाऊराव हनुमंत करे (५७) असे मृतकाचे नाव असून ते दिग्रस पोलिस ठाण्यात सहा. पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. आज पुसद येथे न्यायालयात ते साक्ष देण्यासाठी आपल्या दुचाकीने जात होते. अशातच समोरुन आलेल्या स्कुल बसने दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, यामध्ये करे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घडनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी स्कुल बस चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. या घटनेने दिग्रस येथे शोककळा पसरली होती.

April 02, 2014 in विदर्भ
मंदिरात प्रेमीयुगलाला बदडले 0

मंदिरात प्रेमीयुगलाला बदडले

ns032
यवतमाळ – राममंदिरात असभ्य वर्तुणुक करणाºया प्रेमीयुगलाला नागरिकांनी बदडल्याची घटना आज बुधवारी दुपारी ३ वाजता नेर येथे घडली. नागरिकांनी प्रेमीयुगलाला पोलिसांच्या स्वाधिन केले. पिंप्री कलगाव येथील १९ वर्षीय युवकाचे मंगरुळ चव्हाळा येथील २१ वर्षीय युवतीसोबत प्रेमसबंध आहे. अमरावती येथे आयटीआयमध्ये ही युवती शिक्षण घेत असून आज त्या दोघांनीही आज दुपारी नेर येथे भेटण्याचा बेत आखला होता. उन्हाळा असल्याने दुपारी ३ वाजता बसायचे कुठे म्हणून त्यांनी राममंदिराचा सहारा घेतला. यावेळी मंदिरात लहान मुले खेळण्यासाठी आलेल्या मुलांना या प्रेमीयुगलाने हकलुन दिले. या मुलांनी हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितला. त्यावरुन नागरिकांनी मंदिराज जाऊन पाहीले असता ते मंदिरात असभ्य वर्तुणूक करीत होते. या वेळी नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले.त्यामुळे नागरिकांनी त्या दोघांनाही चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणी नेर पोलिसांनी प्रतीबंधात्मक कार्यवाही केली.

April 02, 2014 in विदर्भ
सोनिया गांधी 0

सोनिया गांधी

Sonia Gandhi in Raebareli
रायबरेली येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुजा केली.

April 02, 2014 in देश-विदेश
ताज हॉटेलजवळ १६ जिवंत काडतुसं 0

ताज हॉटेलजवळ १६ जिवंत काडतुसं

gun-150x100
मुंबई- मुंबईतल्या ताज महाल हॉटेलजवळ आज दुपारी १६ जिवंत काडतुसं सापडल्यानं एकच खळबळ उडाली. ही काडतुसं नेमकी कुठून आली, हा घातपाताचा प्रयत्न होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. गेट वे ऑफ इंडिया इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी पेव्हर ब्लॉकच्या खाली दुपारी १२च्या सुमारास १६ जिवंत काडतुसं सापडली. ती ०.३२ बोअरच्या परवानाधारक रिव्हॉल्वरची असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं. या काडतुसांची माहिती एका महिलेनं पोलिसांना दिली. ही काडतुसं कुलाबा पोलिसांनी जप्त केली असून ती कुणाच्या रिव्हॉल्वरची आहेत, याचा शोध सुरू आहे.

April 02, 2014 in महाराष्ट्र
चिलीमध्ये भूकंप, पाच जणांचा मृत्यू 0

चिलीमध्ये भूकंप, पाच जणांचा मृत्यू

index सॅंटिगो – दक्षिण अमेरिकेजवळ असणा-या उत्तर चिलीला मंगळवारी रात्री ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपानंतर चिलीच्या समुद्रात सौम्य स्वरुपाच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्याने पॅसिफिक किनारपट्टीजवळ रहाणा-या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. या भूकंपामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, काही प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला असून, दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. विमानतळाचेही काही प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या भूकंपाचा फायदा घेऊन, लिक्यूक्यू शहरातील तुरुंगातून ३०० महिला कैदी पळून गेल्या. पडझड झालेल्या भागात लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्कराच्या विशेष तुकडया पाठवण्यात आल्या आहेत. पेरु, बोलिव्हीया पर्यंत या भूकंपाचे हादरे जाणवले. येथील अनेक इमारती भूकंपाच्या धक्क्याने हादरल्या. भूकंपानंतर दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. नंतर तो मागे घेण्यात आला. आता फक्त उत्तर चिलीसाठी त्सुनामीचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील कोयना आणि पाटण परिसर सकाळी साडेसातच्या सुमारास सौम्य भूकंपाच्या धक्क्याने हादरला. कोकणात चिपळूण, संगमेश्वर भागातही काही सेकंद भूकंपाने जमीन हादरत असल्याचे जाणवले.

April 02, 2014 in मुख्य पान
नितीश कटारा हत्याकांड, दोषींची जन्मठेप कायम 0

नितीश कटारा हत्याकांड, दोषींची जन्मठेप कायम

images.jpeg 11
नवी दिल्ली – संपूर्ण देशात गाजलेल्या नितीश कटारा हत्याकांड प्रकरणातील तिघा दोषींना सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. ही हॉनर किलिंगमधुन झालेली हत्या असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
विकास यादव, विशाल आणि सुखदेव यादव यांच्या शिक्षेवर २५ एप्रिलला सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रभावशाली नेते डी.पी.यादव यांचा मुलगा विकास यादव, त्याचे भाऊ विशाल, आणि सुखदेव या तिघांनी नितीश कटाराचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती.
नितीश कटाराचे विकास यादवची बहिणी भारती यादव बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. या प्रेमाला यादव कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे १६ फेब्रवारी २००२ च्या रात्री नितीशचे अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. २००८ मध्ये सत्र न्यायालयाने या हत्ये प्रकरणी तिघांना दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेला तिघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नितीश कटाराची आई निलम कटारा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

April 02, 2014 in देश-विदेश
हवाई सफर केवळ एक रुपयात 0

हवाई सफर केवळ एक रुपयात

images

मुंबई- बजेट एअरलाइन्स असलेल्या स्पाइस जेटने हवाई क्षेत्रातील स्पर्धेला नवे वळण दिले आहे. कंपनीने मंगळवारी केवळ एक रुपयाच्या नाममात्र आधार भाडयावर (कर आणि इतर शुल्क वगळता) मर्यादित कालावधीसाठी तिकिटांची घोषणा केली. खास सुट्टीत चालवण्यात येणा-या नव्या मार्गावरील या तिकिटांवर एक जुलैपासून २८ मार्च या दरम्यान प्रवास करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्पाइस जेटच्या या आक्रमक सवलतीने देशांतर्गत विमान कंपन्यांमधील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. ऐन सुट्टीच्या हंगामात स्पाइसकडून अशी आकर्षक सवलत जाहीर केल्याने इतर कंपन्या काय प्रतिसाद देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एक रुपयातील प्रवासाव्यतिरिक्त कंपनीने ७९९ रुपये आणि १४९९ रुपये भाडे असलेल्या दोन योजना आणल्या आहेत. या योजनेंतर्गत गुरुवापर्यंत प्रवाशांना तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे. याआधीच्या दोन सवलत योजनांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या सवलतीतूनही नवीन प्रवाशांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास स्पाइस जेटचे मुख्य परिचालन अधिकारी संजीव कपूर यांनी व्यक्त केला

April 02, 2014 in महाराष्ट्र