पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 10th, 2014

भावना गवळी व आ. संजय राठोड कडून आचारसहितेचा भंग 0

भावना गवळी व आ. संजय राठोड कडून आचारसहितेचा भंग

vdv05
यवतमाळ – रामनवमी रॅलीमध्ये प्रचार केल्याप्रकरणी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी व आ. संजय राठोड यांच्याविरुद्घ पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला.
लोक सभा निवडणूकीच्या प्रचार तोफा ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या होत्या. त्यानंतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रामनवमीनिमित्य सार्वजनिक रॅली काढण्यात आली होती. यावेळी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार भावना गवळी व सेनेचे जिल्हाध्यक्ष आ. संजय राठोड यांनी दत्त चौकात रॅली येताच तेथे मत देण्याचे आवाहन केले. नायब तहसीलदार अरुण भगत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वडगाव रोड पोलिसंनी कलम १७१, १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

April 10, 2014 in मुख्य पान
शेतकºयावर आचारसहिता भंगचा गुन्हा 0

शेतकºयावर आचारसहिता भंगचा गुन्हा

download (1)

यवतमाळ  – गारपिटीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या कंझारा येथील शेतात शेतकºयाने एका पक्षाच्या प्रचारार्थ जंगी पार्टी दिल्याने त्याच्याविरूद्ध लाडखेड पोलिसांनी आचारसहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये बोरी अरब येथील विष्णू गजानन ठाकरे या यांच्या शेतातील पपई बाग उन्मळून पडल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या शेतकºयाच्या शेतात भेट देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चालना मिळण्यासाठी या शेतकºयाच्या शेतात ९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता खास पार्टीचे आयोजन करुन परिसरातील नागरिकांना भोजनासाठी आमंत्रित केले. अनेक नागरिक भोजनावर ताव मारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक भरारी पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने या शेतात धाड टाकून व्हिडीओ चित्रीकरण केले. याप्रकरणी भरारी पथक प्रमुख नायब तहसीलदार व्ही.बी. काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

April 10, 2014 in विदर्भ
काँग्रेसचे अशोक बोबडेंविरुद्घ गुन्हा 0

काँग्रेसचे अशोक बोबडेंविरुद्घ गुन्हा

images (1)

यवतमाळ – परवानगी संपल्यानंतर रॅली काढून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक बोबडे यांच्याविरुद्घ वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय राष्टÑीय काँग्रेस पार्टीचे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या प्रचारार्थ ८ एप्रिल रोजी मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक अमृत बोबडे रा. दर्डा नगर यांनी रितसर परवानगी घेतली होती. मात्र वेळ संपल्यानंतर आयोजकांनी रॅली काढून दुसºयाच मार्गाने फिरविली. यावेळी निवडणूक विभागाच्या पथकाने व्हिडीओ चित्रिकरण केले होते. त्यामध्ये आयोजकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून आले. याप्रकरणी नायब तहसीलदार अरुण भगत यांनी वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी बोबडे यांच्याविरुद्घ कलम १७१, १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

April 10, 2014 in विदर्भ
विदर्भात ६२.३६ टक्के मतदान 0

विदर्भात ६२.३६ टक्के मतदान

DSC_9201 copy

DSC_9258 copyनागपूर – विदर्भातल्या दहा लोकसभा मतदार संघात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले आहे. मागील निवडणूकीशी तुलना केल्यास विदर्भात मतदानाचा टक्का वाढला असून येथे सरासरी ६२.३६ टक्के मतदान झाले आहे. २००९ मध्ये हेच प्रमाण ५७.७ इतके होते.
सर्वाधिक मतदान हे गडचिरोली, भंडारा, अकोला आणि अमरावती या मतदार संघात झाले आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मोठया प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान विदर्भातील १० लोकसभा मतदार संघात झाले. काही तुरळक घटना वगळता सर्वच मतदार संघात मतदान हे शांततेत झाले. उन्हाचा कडाका लक्षात घेता सुरूवातीच्या मतदानावर त्याचा परिणाम दिसून आला. दुपारपर्यंत मतदान अगदीच संथ गतीने सुरु होते. सरासरी २५ टक्केच मतदानाची नोंद दुपारी तीन वाजेपर्यंत झाली होती. त्यामुळे मतदान मागील वेळे पेक्षा कमी होते की काय अशी शंका सर्वांनाच वाटत होती. मात्र संध्याकाळी मतदानाला वेग आला. विशेष म्हणजे मागील वेळ पेक्षा जास्त मतदान यावेळी विदर्भातील दहाही लोकसभा मतदार संघात झाले आहे. त्यात अकोला, अमरावती, भंडारा आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ६५ टक्के मतदान झाले आहे. तर बुलढाणा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच ५८.६६ टक्के मतदान झाले. तर बीग फाईट असलेल्या नागपूर मतदार संघात ५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त मतदान झालेल्या अमरावती मतदारसंघात दुपापर्यंत केवळ १५ टक्केच मतदान झाले होते. मात्र संध्याकाळी येथील मतदानाचा वेग वाढला होता.
दरम्यान नागपूर मध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी टाऊन हॉल येथे जाऊन मतदान केले. नागपूरात विलास मुत्तेमवार, भंडा-यात प्रफुल्ल पटेल, मुकुल वासनिक, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, अमरावतीत नवनित कौर राणा, शिवाजीराव मोघे, संजय देवतळे, सागर मेघे या प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
विदर्भात झालेल्या मतदानानंतर या प्रमुख उमेदवारांसह जवळपास २०१ उमेदवारांची भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे.

विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघ
मतदानाची टक्केवारी
बुलढाणा ५८.६६
अकोला ६५.००
अमरावती ६५.००
वर्धा ६१.००
रामटेक ६२.००
नागपूर ५९.००
भंडारा ६५.००
गडचिरोली-चिमूर ६५.००
चंद्रपूर ६३.००
यवतमाळ ६०.००
सरासरी- ६२.३६

April 10, 2014 in विदर्भ
तरुणांकडून बलात्काराच्या चुका होतात- मुलायमसिंग 0

तरुणांकडून बलात्काराच्या चुका होतात- मुलायमसिंग

images
मुरादाबाद – ‘लडके है, गलती हो जाती है’, असे तारे तोडत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची कड घेतली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा चुकीची असल्याचेही मुलायम यांनी म्हटले आहे.
मुरादाबाद येथील सभेत बोलताना मुलायम यांनी हे वादग्रस्त विधान केले. शक्ती मिल परीसरात टेलिफोन ऑपरेटर तसेच पत्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणातील तीन मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालाचे देशभरातून स्वागत होत असताना मुलायम यांनी मात्र या तिघा नराधमांची कड घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
‘मुंबई बलात्कार प्रकरणातील तिघा आरोपींना फाशीची शिक्षा देणे मला योग्य वाटत नाही. शेवटी ती मुलंच आहेत. त्यांच्याकडून अशाप्रकारच्या चुका होऊ शकतात. पण, त्यासाठी त्यांना थेट फाशीची शिक्षा देणे चुकीचे आहे’, असे मुलायम म्हणाले. ‘मुला-मुलींमध्ये मैत्री असते तोपर्यंत कोणाचीच काही तक्रार नसते. पण दोघांमध्ये भांडण झालं की सगळं बिघडतं. संबंधित मुलगी तिच्यावर बलात्कार झाल्याचा जबाब पोलिसांकडे देते आणि मग बिचाऱ्या मुलाला त्यामुळे फासावर लटकावे लागते’, असा अजब तर्कही मुलायम यांनी लावला आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये आरोपीला सरकसकट फाशीची शिक्षा देण्यास विरोध करताना मुलायम यांनी यावेळी हुंडाबळी, दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा यासारख्या कायद्यांचा दुरुपयोग थांबवला गेला पाहिजे, असे नमूद केले. कायद्याचा गैरवापर रोखता येईल, अशाप्रकारचे कायदे आम्ही बनवणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, मुलायम यांच्या वादग्रस्त विधानाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला असून भाजप, काँग्रेस आणि बसपाने मुलायम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

April 10, 2014 in देश-विदेश
नक्षल्यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांवर हल्ला 0

नक्षल्यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांवर हल्ला

NAXLI-150x150
गडचिरोली- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानाची प्रक्रिया आटोपून परतत असलेल्या पोलिंग पार्टीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. तालुक्यातील जरदेवाडा येथे ही घटना घडली. हल्ल्याचे लक्ष्य ठरलेले निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी तसेच मतपेट्या सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. नक्षली कारवायांमुळे गडचिरोली जिल्हा हा संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या भागात फक्त दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतपेट्या परत नेतांना अधिकाऱ्यांवर हा हल्ला करण्यात आला.

April 10, 2014 in विदर्भ
सत्यपाल सिंगांच्या ताफ्यावर हल्ला 0

सत्यपाल सिंगांच्या ताफ्यावर हल्ला

satyapal
लखनऊ – उत्तरप्रदेश मधील भाजपचे उमेदवार आणि मुबंईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या ताफ्यावर आज हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी बागपत लोकसभा मतदारसंघातील मलकापूर या गावी त्यांचावर हल्ला केला. सत्यापाल यांच्या ताफ्यातील एका कारची काच तोडण्यात आली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. सुदैवाने सत्यपाल सिंग यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. जेव्हा सत्यपाल सिंग हे बोगस मतदान करणाऱ्या आरोपींची चौकशी करण्यासाठी जात होते त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून भाजपचे उमेदवार सुरक्षित स्थळी रवाना झाले आहेत. नागरी उड्डाण मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख अजित सिंग हे तेथील खासदार आहेत. यंदा पुन्हा एकदा तेच निवडणुकिच्या रिंगणात उतरले आहेत. या हल्ल्यामागे नक्की कोणाचा हात आहे याचा अधिक तपास करण्यात येत आहे.

April 10, 2014 in देश-विदेश
मोदींची संपत्ती केवळ दीड कोटी 0

मोदींची संपत्ती केवळ दीड कोटी

download
अहमदाबाद- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची संपत्ती केवळ दीड कोटी रुपये इतकी आहे. वडोदरा आणि वाराणसी अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणा-या मोदी यांच्याकडे स्वतःचे असे एकही वाहन नाही.
मोदी यांनी बुधवारी वडोदरा लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्ती एक कोटी ५१ लाख इतकी संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यातील ५१ लाख ५७ हजार ५८२ कोटी रुपये बँकेतील खात्यात आणि फिक्स डिपॉझिट स्वरुपात आहेत. त्याच्या हातात केवळ २९ हजार ७०० रुपये आहेत. तर एक लाख ३५ हजार रुपयांच्या चार अंगठ्या असल्याचे मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची अशी एकही गाडी नाही. तसेच गेल्या दोन वर्षात त्यांनी कोणतेही दागिने विकत घेतलेले नाही.मोदीचे गांधीनगरमध्ये स्वतःचे घर आहे. त्याची किमत एक कोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय आपल्याकडे अन्य कोणताही मालमत्ता नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. २०१२च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी सादर केलल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती एक कोटी ३३ लाख रुपये इतकी दाखवण्यात आली होती.
गेल्या दोन वर्षात मोदींनी विविध योजनांमध्ये गुंतवलेल्या रक्कमेतून त्यांना १८ लाख रुपये मिळाले आहेत.
मोदींचे उत्पन्न- २०१२-१३: चार लाख ५४ हजार ०९४ – २०११-१२: एक लाख ५० हजार ६३०

April 10, 2014 in देश-विदेश
दुस-या टप्प्यातील ४४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे 0

दुस-या टप्प्यातील ४४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

Sushilkumar Shinde
मुंबई- स्वच्छ प्रतिमेचा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावेत अशी सामान्य मतदारांची आपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात विविध राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची लोकांना उमेदवारी दिली जाते.
१७ एप्रिल रोजी राज्यात दुस-या टप्यात १९ लोकसभा मतदानसंघात मतदान होणार आहे. या १९ जागांवर ३४६ उमेदवार उभे आहेत. यापैकी ४४ जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकूण उमेदवारांमध्ये हे प्रमाण १३ टक्के असल्याचे दिसून येते. तर ७१ जणांवर म्हणजेच २१ टक्के उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दुस-या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचे महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेने म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे उस्मानाबादमधील उमेदवार पद्मसिंह पाटील, हातकणंगलेमधील स्वाभीमान शेतकरी संघटनेचे उमेदवारी राजू शेट्टी आणि संदीप मोजर या उमेदवारांवर खुनाचे गुन्हे आहेत. शिरुरमधील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयराजे भोसले यांच्यावर देखील खुन आणि अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
विशेष म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवारांना उमेदवारी देऊ असे सांगणा-या ‘आप’च्या पाच उमेदवारांवर देखील गुन्हे असल्याचे समोर आले आहे. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील मारुती भापकर यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत.

April 10, 2014 in महाराष्ट्र
छत्तीसगडमध्ये दहा मतदान केंद्रावर गोळीबार 0

छत्तीसगडमध्ये दहा मतदान केंद्रावर गोळीबार

maoist
रायपूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील बस्तर भागात गुरुवारी दहा मतदान केंद्रावरील सुरक्षा रक्षकांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. बस्तर मतदारसंघात दुपारपर्यंत ३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
बस्तरमधील दहा मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हवेत गोळीबार केला. मात्र या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. दरम्यान, याआधी सुरक्षा रक्षकांनी विविध ठिकाणांहून तीन बॉम्ब आणि १५ आयईडी स्फोटके हस्तगत केली.सुकुमा जिल्ह्यातील कोरा आणि आमिरगढ, दंतेवाडा येथील सामोली आणि थानिकारा, नारायणपूर जिल्ह्यातील नेडनार आणि कोंडागाव जिल्ह्यातील पाडेली आणि रायगाबो़डी या मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर काही वेळासाठी मतदान थांबवण्यात आले होते. बस्तर मतदारसंघातून दोन महिलासह आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

April 10, 2014 in देश-विदेश
आंबेडकर जयंती निमित्त देशभर सुट्टी 0

आंबेडकर जयंती निमित्त देशभर सुट्टी

img1100412042_1_1
नवी दिल्ली- घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, केंद सरकारने १४ एप्रिल रोजी देशभर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. यामुळे देशभरातील व्यापारी आणि औद्योगिक कारखान्यांसह केंद्र सरकारच्या ५० लाख सरकारी कर्मचा-यांना सोमवारी सुट्टी मिळणार आहे.
केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारने यापूर्वीच आज मतदान करण्यासाठी सुट्टी जाहीर केली. तर पुढच्या आठवड्यात या कर्मचा-यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. शुक्रवार १८ एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’ निमित्त सुट्टी आहे.

पाकिस्तानात बॉम्बस्फोट, २३ ठार 0

पाकिस्तानात बॉम्बस्फोट, २३ ठार

1
इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बुधवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. इस्लामाबादमधील फळ-भाज्यांच्या बाजारपेठेत हा बॉम्बस्फोट झाला. या शक्तीशाली स्फोटात २३ नागरिक ठार झाले असून, ४० जण जखमी झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
मृतांना आणि जखमींना जवळच असलेल्या पाकिस्तानी इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळच्या वेळी ग्राहक बाजारात खरेदी करत असताना हा स्फोट झाला.
फळ-भाज्यांच्या खोक्यांमध्ये लपवून हा बॉम्ब आणला असावा अशी शक्यता आहे. स्फोट होताच फळ-भाज्यांच्या टोपल्या उंच हवेत उडाल्या. चित्रफीतीमध्ये सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. टोप्या, चप्पला विखरुन पडलेल्या होत्या. सुरक्षापथकांनी घटनास्थळाला घेराव घातला असून, बॉम्ब तज्ञ परिसरात शोध घेत आहेत.

April 10, 2014 in देश-विदेश