नागपूर (सुरेश चरडे ) – कॉंग्रेस ओबीसी यात्रा तर काढू शकते. परंतु ओबीसीला पंतप्रधान करू शकत नाही. म्हणूनच भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ओबीसी वर्गातील गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना घोषित केल्यानंतर कॉंग्रेसची पंचाईत झाली आहे. कारण कॉंग्रेस एखाद्या शिखाला पंतप्रधान करू शकेल. एखाद्या मुसलमानाला करू शकेल. परंतु ओबीसीला पंतप्रधान करू शकणार नाही.
कारण आता तर राहुलला पंतप्रधान करायचा आहे. त्यामुळे एका ओबीसीला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याला पर्याय ते देऊ शकत नाही. असे जर करेल तर मग कॉंग्रेसच्या राजकुमाराचा राज्याभिषेक कसा होऊ शकेल? संघ, भाजप हे वर्णवर्चस्ववादी आहेत, त्यांनी ओबीसीला पाताळात गाडले. त्यांचा विकास गोठवला, त्यांना कर्मकांडात गुंतवून ठेवले. त्यामुळे जातीयवादी, धर्मवादी भाजपापासून दूर राहण्याचे आवाहन करीत धर्मनिरपेक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या मतदाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या त्यांच्या आवाहनावरून लोकांचा असा समज होतो की कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नेते किती परिवर्तनवादी किंवा समतावादी आहेत. ब्राम्हणी व्यवस्थेला माणणारे नाहीत. त्यांना पूजेसाठी ब्राम्हण लागत नाही. ते ज्योतिष पाहात नाही. कुंडली पाहात नाहीत. अशाप्रकारचे किती कॉंग्रेसी आहेत? जर नाहीत तर त्यांना मग अशाप्रकारचा कांगावा करण्याची गरज काय आहे? भाजपा वर्णवर्चस्ववादी असली तरी त्यांना आता ओबीसीशिवाय दुसरा पर्याय नाही. कॉंग्रेसमध्ये अशी स्थिती आहे काय? तिथे राजकुमार तयार गुडघ्याला बाशिंग बांधून. तिथे दुसºयाला काय संधी आहे? म्हणून मग त्यांना आता ओबीसी यात्रा काढत आहे. ओबीसींना आपल्याकडे वळवण्यासाठी कॉंग्रेसकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओबीसींची मते घेण्यासाठी यात्रा काढण्याशिवाय दुसरे करणार तरी काय?
———-
मुत्तेमवारांची हातघाई
नागपुरात कॉंग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार पाचव्यांदा नागपुरातून खासदारकीसाठी उभे आहेत. चारवेळा जिंकून आल्यानंतर या खासदाराने नागपूरच्या विकासासाठी काय केले, हा प्रश्न आहे. तरीपण यावेळेसही पाचव्यांदा नागपुरातून ते लोकसभेची लढाई लढत आहे. याआधी ते चिमुरमधून तीनवेळा निवडणूक लढले. एवढे सारे असताना या खासदाराने विदर्भात कोणते
विकास कामे केली हा प्रश्नच आहे. ज्या जनवादच्या भरोश्यावर राजकारणात काही भव्य दिव्य केले नसले तरी टिकून राहिले त्या जनवाद या वृत्तपत्राला हा खासदार चालवू शकला नाही. इतर विकासकामे तर सोडून द्या. असे असतानाही हा व्यक्ती पुन्हा खासदार बनण्याचे स्वप्न पाहात आहे. नागपूरकर त्यांना निवडून देणार का, लवकरच स्पष्ट होणार आहे.
Archive for April 8th, 2014
0
कॉंग्रेसची ओबीसी यात्रा!
0
छत्तीसगढमधील अपघातात १५ ठार, २० जखमी

रायपूर – छत्तीसगढमधील सुरगुजा जिल्ह्यात वाहतूक करणा-या गाडीला झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. अंबिकापूर येथून प्रतापपूरच्या दिशेने जात असलेल्या गाडीत ४० जण प्रवास करत होते. अंबिकापूरमधील लुच्छिघाट येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. जखमींना अंबिकापूर जिल्ह्यातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये तीन लहानग्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
0
विदर्भातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

नागपूर – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज म्हणजे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. महाराष्ट्रात विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.
महाराष्ट्रात पहिल्या आणि देशात तिस-या टप्प्याचे मतदान दहा एप्रिल रोजी होणार असून, विदर्भातील दहा जागांसाठी एकूण २०१ उमेदवार रिंगणात आहेत. देशाच्या राजकरणातील प्रमुख नेत्यांचे भवितव्य या निवडणुकीत निश्चित होणार आहे. प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवणारे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार या लढतीकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. ‘आप’च्या अंजली दमानियाही नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल भंडारा-गोदिंयामधून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे नाना पाटोले यांचे आव्हान आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक रामटेकमधून, राज्य सरकारमधील काँग्रेसचे मंत्री शिवाजीराव मोघे यवतमाळ-वाशिममधून, संजय देवतेळ चंद्रपूरमधून रिंगणात आहेत. वर्धा, अकोला, गडचिरोली, अमरावतीमधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत. २०१ उमेदवारांमध्ये ९० अपक्ष उमेदवार असून यामध्ये १५ महिलांचा समावेश आहे. ८० नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. एकूण १ कोटी २१ लाख ७५ हजार ६६२ मतदार या उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. विदर्भातील दहा जागांसाठी काँग्रेसने सात, राष्ट्रवादीने तीन, भाजपने सहा, शिवसेनेने चार, सीपीआयने एक आणि बसपने सर्वच्या सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.नागपूर लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक ३३ आणि अकोल्यातून सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराचा अंतिम टप्पा असल्याने सर्वच पक्षांचे प्रमुख नेते विदर्भात आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत.
देशात दुस-या टप्प्यात म्हणजे दहा एप्रिलला महाराष्ट्र दहा , ओरिसा दहा , उत्तर प्रदेश दहा, अंदमान आणि निकोबार एक, चंदीगड एक, लक्षद्वीप एक, दिल्ली सात जागा, बिहारच्या सहा, छत्तीसगड एक, हरियाणा दहा, जम्मू आणि काश्मीर एक, झारखंड चार, केरळ वीस आणि मध्यप्रदेशच्या नऊ जागांवर मतदान होईल.
0
देशभरातून १९५ कोटी, २६ लाख लिटर मद्य जप्त

नवी दिल्ली – उमेदवारांच्या प्रचार खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या निवडणूक निरिक्षकांच्या वेगवेगळया पथकांनी देशभरातून आतापर्यंत १९५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे.
निवडणूक काळात आंध्रप्रदेशात सर्वाधिक पैशांचे गैरव्यवहार सुरु असून, आंध्रप्रदेशातून आतापर्यंत ११८ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तामिळनाडूतून १८.३१ कोटी, महाराष्ट्रातून १४.४० कोटी, उत्तरप्रदेशातून १०.४६ कोटी, पंजाबमधुन चार कोटी त्याशिवाय अन्य राज्यांमधुन काही लाखांच्या रक्कमा जप्त केल्या आहेत. पैशाबरोबरच मद्यही मोठया प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. देशभरातून २६.५६ लाख लिटर मद्य आणि ७० किलो हेरॉईजन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने वेगवेगळया राज्यांमध्ये ११,४६९ प्राथमिक तक्रारी दाखल केल्या आहेत. निवडणूक काळात काळया पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरिक्षकांची नियुक्ती केली आहे.
0
प.बंगालमधील निवडणुकाच रद्द करु , केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा

नवी दिल्ली- आम्ही दिलेल्या आदेशानुसार जर राज्यातील अधिका-यांच्या बदल्या केल्या नाही तर पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या निवडणुकाच रद्द कराव्या लागतील असा इशारा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाच पोलिस अधिक्षक, एक जिल्हाधिकारी आणि दोनन अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिका-यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र या अधिका-यांच्या बदल करण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. यावर निवडणूक आयोगाने थेट राज्यातील निवडणुकाच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या विरोधात कारवाइ केली जाईल असेही आयोगाने म्हटले आहे. या अधिका-यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात बॅनर्जी यांनी थेट निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. आयोग आपल्या विरोधात असलेल्या काँग्रेस, भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एंजट असल्याची टीका त्यांनी सोमवारी केली होती. तसेच या बदल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगावर असेल असेही बॅनर्जी म्हणाल्या होत्या. दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाला या अधिका-यांच्या बदल्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य सचिवांनी आयोगाला लिहलेल्या पत्रात, अधिका-यांच्या बदल्या राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतरच होऊ शकते असे म्हटले आहे.
0
चकमकीत दोन जवान शहीद

श्रीनगर – कुपवाडा जिल्ह्यातील पंचगाम येथे भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून दोघा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात जवानांना यश आले आहे. या भागात अजूनही दोन्ही बाजूने अधून-मधून गोळीबार सुरू आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून जवळच ही चकमक झडली. गेल्या १२ तासांपासून गोळीबार सुरू आहे. त्यात एक निरीक्षक तसेच एक जवान शहीद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास ही चकमक सुरू झाली. पंचगाम गावात काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या भागाला घेरले होते. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला आणि जोरदार चकमक झडली. गोळीबारात पाच पोलीस जखमी झाले असून दोन पोलीस बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघा पोलिसांचे अतिरेक्यांकडून अपहरण करण्यात आले असावे, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
0
मुझफ्फरनगर दंगल; आरोपीचा मृत्यू
मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशामधील मुझफ्फरनगरच्या दंगल प्रकरणातील आरोपी प्रवीण कुमार यांचा आज (मंगळवार) येथील जिल्हा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.
गेल्या वर्षी मुझफ्फरनगरमधील शामली येथे भडकलेल्या दंगलीत कुमार याने एका व्यक्तीची गोळी घालून हत्या केल्याचा आरोप त्याच्याविरोधात ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर अनेकांना जखमी केल्याचा ठपकाही कुमारवर होता. हृदयविकाराचा झटका येताच कुमार याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
0
रिक्षावाल्याने केजरीवाल यांना मारले

नवी दिल्ली – आम आदमीच्या कल्याणासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आज (मंगळवार) पुन्हा आम आदमीच्या संतापाचे लक्ष्य ठरले. दिल्लीच्या सुलतानपूर भागात रोड शो करणाऱ्या केजरींना एका सामान्य रिक्षावाल्याने कानफाटात हाणली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीआधी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या रागातून रिक्षावाल्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
उत्तर-पश्चिम दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवार राखी बिडलान यांचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल दुपारी सुलतानपूर येथे गेले होते. रोड शोच्या माध्यमातून वाजतगाजत त्यांचा प्रचार सुरू होता. त्याचवेळी गर्दीतील एक व्यक्ती हार घालण्याच्या निमित्ताने केजरीवालांच्या जवळ आला आणि त्याने केजरींच्या गालात जोरदार थप्पड हाणली. यामुळे केजरींच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. हा प्रकार लक्षात येताच ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केजरींवर हात उगारणाऱ्या व्यक्तीला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यक्तीचे नाव लाली असून तो दिल्लीतील अमन विहार परिसरात राहतो. लाली हा रिक्षाचालक आहे. दिल्लीकरांना मोठमोठी आश्वासने देऊन केजरीवाल यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत २८ जागा जिंकल्या होत्या. योगायोगाने, काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीत केजरीवालांचे सरकारही स्थापन झाले. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्लीकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, जनलोकपालचे निमित्त करत अवघ्या ४९ दिवसांत केजरींनी सत्ता सोडली. त्यामुळे दिल्लीकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या नाराजीला तोंड फुटू लागल्याचे बोलले जात आहे.याआधी वाराणसी येथे प्रचार करताना केजरीवाल यांच्यावर ‘शाईहल्ला’ झाला होता. त्यानंतर दिल्लीतील दक्षिणपुरी भागात गाडीवर चढून एकाने केजरींना ठोसा लगावला होता. आज याचीच पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे, याआधी केजरींवर हल्ला करणारे दोघेही ‘आप’चे कार्यकर्ते होते.
0
वाराणसीत कॉंग्रेसचे अजय राय देणार मोदींना टक्कर

नवी दिल्ली – वाराणसी मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी मिळून एकच उमेदवार जाहीर करावा अशी चर्चा सुरु होती. परंतु सर्व पक्षांमध्ये एकमत न झाल्याने अखेर कॉंग्रेसने आज, मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला.
मोदींविरुद्ध कॉंग्रेसकडून गेले काही दिवस अजय राय यांच्या नावाची चर्चा सुरु होती. राय हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. पूर्व भाजप नेते असलेले राय यांना २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेले होते. परिणामी त्यांनी सपाच्या तिकीटवर निवडणूक लढवून मुरली मनोहर जोशी आणि मुख्तार अंसारी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. पूर्व उत्तरप्रदेशातील वजनदार नेता मानले जाणारे राय यांची वाराणसी मतदारसंघातील भूमिहार आणि ब्राम्हण मतदारांवर चांगली पकड असल्याचे सांगण्यात येते.भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वय अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे अजय राय आणि कौमी एकता दल पक्षाचे मुख्तार अंसारी हे प्रमुख उमेदवारी रिंगणात आहेत.











