पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 15th, 2014

माझ्या भीमाचा डंका बोलतोया …. 0

माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….

Vaibhav-chaya008-300x336

ट्विटरवर चिवचिव करतोया
फेसबुकची पाने भरतोया
ब्लॉगही आला इन्टरनेटवर
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….

साहेबी थाट अन इंग्लिशवाणी
संगणकावर भीमाची गाणी
हातात स्मार्टफोन व्हाट्सयाप खोले
बोटाबोटावर गुगल खेळतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….

कितीकिती पोरं जयभीम बोलती
एकामताने रे तुटून पडती
असू दे भारी ही दिमाखमारी
त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….

सायबरची पाने जयभीम म्हणे
बुद्धिस्ट फ्रेंड्स संगे धम्मभूमी जाणे
बहुजनांवर रिपब्लिकन फिवर
स्वाभिमानाचा नारा डोलतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….

चळवळीसाठी भीमशक्ती पाठी
फुले शाहूंचा ललकार ओठी
अण्णा लहूजी बिरसा शिवबा
नव्या पिढीला एकसाथ जोडतोया
भीमरायाचा डंका बोलतोया
माझ्या भीमाचा डंका बोलतोया ….

आनंद गायकवाड

April 15, 2014 in मुख्य पान
राज ठाकरे यांचा गोपीनाथ मुंडेंना पाठिंबा 0

राज ठाकरे यांचा गोपीनाथ मुंडेंना पाठिंबा

munde-raj
मुंबई- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी प्रसिद्धपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात बीडमध्ये मतदान होणार आहे. १७ एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या एक दिवस आधी राज यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मुंडे यांनी निवडूण देण्याचे आदेश दिले आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रसने सुरेश धस आणि आम आदमी पक्षाने नंदू माधव यांना उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधीही राज यांनी भाजपशी जवळीक केली होती. प्रथम नितीन गडकरी सोबत एकाच व्यासपीठावर असलेल्या राज ठाकरे यांनी भाजपचे नेत्यांची भेट घेतली होती. इतकच नाही तर राज यांनी राज्यातील भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नाही. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर मनसेचे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील असे अनेक जाहीर सभांमधून सांगितले होते. दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी येथील जाहीर सभेतही राज यांनी मुंडे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले. मुंडे यांनी सकाळी आपल्याला फोन केला होता. त्यांनी केलेल्या विनंतीमुळे आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितले.

April 15, 2014 in महाराष्ट्र
पेट्रोल ७० पैशांनी स्वस्त 0

पेट्रोल ७० पैशांनी स्वस्त

price
नवी दिल्ली- डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाल्याने सर्वाजनिक क्षेत्रातील तेल पुरवठा करणा-या कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ७० पैशांची कपात केली आहे. महिन्याभरातील पेट्रोलच्या किमतीमधील ही दुसरी कपात आहे. नवे दर मंगळवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
या कपातीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर मागे ७१.४१ रुपये, मुंबईतील दर ८० रुपये इतके होणार आहेत. पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली असली तरी डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. केंद्र सरकराने जून २०१०मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील सरकारी नियंत्रण हटवले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक आणि १६ तारखेला पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात. जानेवारी २०१३पासून डिझेरच्या किमतीमध्ये ८.३३ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतरही डिझेलच्या प्रतिलिटर विक्रीमागे ५.४९रुपयांचा तोटा होत असल्याचे इंडियन ऑइलच्या अधिका-याने सांगितले.

April 15, 2014 in देश-विदेश
लोकसभा निवडणूक ही कौटुंबिक समारंभ नव्हे - प्रियंका गांधी 0

लोकसभा निवडणूक ही कौटुंबिक समारंभ नव्हे – प्रियंका गांधी

87244
अमेठी – लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणीदरम्यानची लढाई असून कौटुंबिक समारंभ नाही, या शब्दात प्रियंका गांधी यांनी त्यांचे चुलत भाऊ वरुण गांधी यांना मंगळवारी फटकारले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी त्या अमेठीत आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वरुण गांधी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याचा संदर्भ देत प्रियंका म्हणाल्या की, हा लढा दोन विचारसरणीचा असून माझा मुलगा असा वागला असता तरीही मी त्याला माफ केले नसते. वरुण गांधी हे आपला रस्ता भरकटले आहेत, त्यांना योग्य मार्ग तुम्हीच दाखवा. असे वक्तव्य प्रियंका गांधी यांनी एका प्रचारसभेदरम्यान केले होते. या वक्तव्याचा व्हीडिओ उघड झाल्याबद्दल आपण निराश झालो नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

April 15, 2014 in देश-विदेश
मोदी पंतप्रधान होणार हे केवळ स्वप्न - ममता बॅनर्जी 0

मोदी पंतप्रधान होणार हे केवळ स्वप्न – ममता बॅनर्जी

mamata-main31
कोलकाता- नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे एक स्वप्न असल्याचे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीनंतर देशात तिस-या आघाडीचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी केला.
मोदींचे पंतप्रधानपद ही केवळ एक स्वप्न असल्याने अशा कल्पित प्रश्नांची उत्तरे देण्याची मला गरज वाटत नसल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले. एखाद्या श्रींमत घरात वाढलेल्या आणि विशेष काळजी घेतलेल्या मुलाशी आणि कुपोषित, दुर्लक्षित मुलाची ज्याप्रमाणे तुलना होऊ शकत नाही तसेच पश्चिम बंगाल आणि गुजरात यांची तुलना होऊ शकत नाही असेही त्या म्हणाल्या. लोकसभा निडणुकीच्या प्रचार सभेतही अनेक वेळा ममता बॅनर्जी यांनी मोदींसह गुजरातच्या विकासावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. गुजरातच्या विकासाशी आपल्याला तुलना करायची नाही. मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आधीच गुजरातचा विकास झाला होता. उलट मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर विकास घटल्याचे ममता यांनी सांगितले. मोदींच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना त्यांनी गुजरातच्या जनतेवर आपले प्रेम असल्याचे स्पष्ट केले. लोकसंख्या आणि संधी याचा विचार करता गुजरातककडे १९ बंदरे आहेत. तर पश्चिम बंगालकडे केवळ दोन आहेत. याचा विचार करता पश्चिम बंगालचे मॉडल अधिक चांगले असल्याचे त्या म्हणाल्या.

April 15, 2014 in देश-विदेश
तृतीयपंथीयांना सर्वोच्च न्यायालयाची मान्यता 0

तृतीयपंथीयांना सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

maharashtra-grp-helpline-service-free-turmoil-kinners-upset-station-news-hindi-india-11901
नवी दिल्ली- तृतीयपंथीयांना ‘थर्ड जेंडर’ म्हणून मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
केंद्र व राज्य सरकारला तृतीयपंथीयांचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत समावेश करून घेण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच त्यांना आर्थिक मागास समाज म्हणून विशेष वागणूक द्यावी, असेही सांगितले आहे. यापुढे तृतीयपंथीयांना इतरमागासवर्गीयात समावेश करून त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचे आदेशही दिले आहेत. तृतीयपंथीयांबद्दल समाजात चांगले विचार रुजवण्यासाठी सरकारने जनजागृती करावी, त्यांच्यासाठी विशेष समाज विकास योजना राबवाव्या, असेही सांगितले आहे. त्याचबरोबर तृतीयपंथीयांसाठी प्रत्येक राज्य सरकारने विशेष शौचालये बांधावी आणि त्यांच्या आरोग्यासंबंधी काळजी घेण्यासाठी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही दिले आहेत

April 15, 2014 in देश-विदेश
सिलिंडरचा स्फोट युवक ठार 0

सिलिंडरचा स्फोट युवक ठार

images
नागपूर – फुग्यात गॅस भरताना सिलिंडरचा ‌स्फोट झाल्याने युवक ठार झाला. हा स्फोट एवढा जोरदार होता की युवकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. सिलिंडर टिन फाडून दुसऱ्या घरात घुसले. यात तीन मुली थोडक्यात बचावल्या. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या या स्फोटाने संपूर्ण टिमकी परिसर हादरला. नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. दुर्गपाल महिपाल चव्हाण (२८, मूळ रा.उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे.
गत काही दिवसांपासून दुर्गपाल व त्याचे तीन साथीदार पाटील यांच्या वाड्यात भाड्याने राहात होते. दुर्गपाल घरासमोर फुग्यात गॅस भरत होता. तर अन्य तिघे घरात होते. गॅस भरत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. दुर्गपालचे अर्धे डोके धडावेगळे झाले. तर सिलिंडर जवळपास ८० फूट वर उडून बाजूला असलेल्या मनोज हटवार यांच्या घराचे टिन छेदून आत पडले. जोरदार आवाज झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. सिलिंडर हवेत उडाल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळू लागले. उडालेले सिलिंडर घरात पडले त्यावेळी मनोज यांच्या दोन मुली आस्था व तपस्या व पुतणी तन्नू घरात खेळत होत्या. त्या थोडक्यात बचावल्या. स्फोटानंतर अन्य तिघांनी पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकजण स्फोटात जखमी झाला आहे.

April 15, 2014 in विदर्भ
महाराष्ट्रदिन काळा दिवस पाळणार, विदर्भाचा झेंडा फडकवणार 0

महाराष्ट्रदिन काळा दिवस पाळणार, विदर्भाचा झेंडा फडकवणार

vidarbha_map
नागपूर – विदर्भ राज्य निर्मितीकरिता स्थापन झालेल्या विदर्भ कनेक्ट या संघटनेने महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी विदर्भ राज्याच्या झेंडा फडकावण्याचे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भात पहिल्यांदाच अकराही जिल्ह्यांत संघटितपणे हे आंदोलन होत असून, ‘विदर्भ कनेक्ट’ने त्यात सुसूत्रता आणली आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे.
विदर्भवादी व ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे आणि विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात अॅक्शन ग्रुप स्थापन करण्यात येत आहे. त्या अॅक्शन ग्रुपच्या माध्यमाने महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ‘मटा’शी बोलताना अॅड. मुकेश समर्थ म्हणाले, ‘विदर्भातील जनतेकरिता महाराष्ट्र दिन हा सदैव काळा दिवस राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय व भेदभाव होत आहे. विदर्भातील विकास ठप्प पडला असून त्यामागे पश्चिम महाराष्ट्र धर्जिणे धोरण कारणीभूत ठरले आहे. महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतरही विदर्भाचा विकास झालेला नाही. त्यामुळेच आता विदर्भ राज्याच्या निर्मितीकरिता विविध संघटना व व्यक्ती एकत्रित येत आहेत. त्या आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणजे महाराष्ट्र दिनी प्रत्येक जिल्ह्यात प्रतीकात्मक विदर्भाचा झेंडा फडकावण्यात येत आहे.’
व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमाने विदर्भवादी व्यक्ती व संघटना एकत्रित आल्या आहेत. आता ‘विदर्भ कनेक्ट’ नावाने स्वतंत्र वेबसाइटदेखील सुरू करण्यात येत आहे. त्यासोबतच कॉलेजमधील युवकांनाही या आंदोलनाशी जोडण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याकरिता चर्चासत्रे व इतर उपक्रमदेखील आयोजित होणार आहेत. महाराष्ट्र दिनी होणारे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने होईल. नागपुरात विष्णूजी की रसोई येथील लॉनवर विदर्भ राज्याचा झेंडा रोवण्यात येणार आहे. त्यासोबतच अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, वाशीम, बुलडाणा, अकोला, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथेही काळा दिन पाळण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघटनांनी विदर्भ कनेक्टच्या माटे चौकातील कार्यालयात संपर्क साधावा अथवा vidarbhaconnect.gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. मुकेश समर्थ यांनी केले आहे.

April 15, 2014 in विदर्भ