
यवतमाळ, – देशातील गरीब जनता, शेतकरी आणि महिलांना शाश्वत अधिकार देऊन आम्हाला व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणायचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्टÑीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
यवतमाळ-वाशीमचे उमेदवार शिवाजीराव मोघे, चंद्रपूर-आर्णी संजय देवतळे व हिंगोलीचे राजीव सातव यांच्या प्रचारार्थ पोस्टल मैदानात आयोजीत सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्टÑाचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, उमेदवार शिवाजीराव मोघे, संजय देवतळे राष्टÑवादीचे आ. संदीप बाजोरीया, जोगेंद्र कवाडे आदी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याने ती मिटवायला निघालेलच मिटून जातील.ज्या गुजरात मॉडेलचा उदोउदो केला जात आहे, त्यापेक्षा महाराष्टÑ राज्य सर्वच बाबतीत कितीतरी पटीने आघाडीवर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदींनी भाजपाची सत्ता असलेल्या राज्याचा विकासदर बघावा आणि आत्मपरीक्षण करावे असे ते म्हणाले. देशातील शेतकºयांना ७० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्टÑाला त्यातील चार हजार कोटी नुकतेच मंजूर करण्यात आले. मात्र मोदी ज्या गुजरातची गोष्ट करतात, तेथील शेतकºयांची तब्बल तीन हजार एकर जमीन टाटांच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली. त्याचा मोबदलाही अनेक शेतकºयांना मिळाला नाही. काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यास जाहिरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे नागरिकांना आरोग्याचा अधिकार, पेन्शनचा अधिकार लागू केला जाईल असे ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन्ही राज्यांच्या तुलनात्मक विकासदराबाबतच समोरासमोर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले. प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी देशात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल आणि महाराष्टÑात काँग्रेस आघाडीला किमान ३० ते ३५ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. पिरीपाचे जोगेंद्र कवाडे यांनी नरेंद्र मोंदीवर हल्लाबोल करून, गुजरातमध्ये माणुसकीला काळीमा फासणारे देशात सत्तेत आल्यास भारत उध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त केली. कार्यक्रमाचे निवेदन आ. वसंत पुरके यांनी केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Archive for April 4th, 2014
0
देशवासीयांना अधिकार देऊन परिवर्तन घडवायचे – गांधी
0
तीन आरोपींना फाशी

मुंबई – शक्ती मिलच्या आवारात महिला पत्रकार तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या खटल्यातील तिघा आरोपींना अखेर या गुन्ह्याच्या पुनरावृत्तीसाठी सेशन्स कोर्टाने शक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. तर चौथ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सेशन्स कोर्टाच्या प्रधान न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांनी आयपीसी कायद्यातील नव्या कलम ३७६ (ई) या अंतर्गत विजय जाधव (१९), कासिम बंगाली (२१) व मोहम्मद सलीम अन्सारी (२८) या तिघा आरोपींना दोषी गुरुवारी दोषी ठरविले होते. आज या आरोपींचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. ही त्यांची दुसरी शिक्षा ठरणार असून या अगोदर २१ मार्चला तिघांनाही कोर्टाने टेलिफोन ऑपरेटरवरील बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवून जन्मठेप दिली आहे. तसेच या प्रकरणातील चौथा आरोपी सिराज खान याला जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
0
नऊ महिन्यांच्या बालकावर खुनाचा गुन्हा

इस्लामाबाद – नऊ महिन्यांचा मुलगा आणि खुनाचा आरोपी! आश्चर्य वाटले ना, पण पाकिस्तानात हे घडले आहे. एका नऊ महिन्याच्या चिमुकल्यावर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला आहे.
पाकिस्तानातील लाहोर शहरात ही अजब घटना घडली आहे. ज्या वयात मुलाला धड बसता येत नाही, त्या वयात मुसा नावाच्या एका चिमुकल्यावर पोलीस दलावर हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण इथवरच संपले असे नाही. मुसावर खटलाही दाखल करण्यात आला असून त्याला सुनावणीसाठी एकदा न्यायालयातही हजर करण्यात आले आहे. कळस म्हणजे, जिल्हा न्यायालयाने मुसाचा जबाबही नोंदवला असून १२ एप्रिलपर्यंत जामिनही दिला आहे. मुसा आणि त्याचे वडील अहमद यांना लाहोरच्या मुस्लिम टाऊन भागातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मुसाला पुन्हा एकदा न्यायालयात आणले जाऊ शकते, असे त्याच्या वकिलाने सांगितले. दरम्यान, गैरसमजातून मुसाला आरोपी ठरवण्यात आल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
0
लोकसभा निवडणुकीच्या खर्चात ८४ पट वाढ

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जशी अधिक रक्कम लागते. तीच बाब लोकसभा निवडणुकीच्या एकूण खर्चालाही लागू होते. देशातील पहिली म्हणजेच १९५२ ते २००९ या १५ निवडणुकींच्या खर्चाचा तपशील पाहिल्यास निवडणूक प्रक्रियेचा खर्च सातत्याने वाढतच चालल्याचे दिसून येते.
देशात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास २००९मध्ये निवडणुका घेण्याच्या खर्चात तब्बल ८४ पट वाढ झाली आहे. १९५२मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आयोगाला दहा कोटी ४५ लाख रुपये खर्च झाला होता. हाच खर्च २००९मध्ये तब्बल ८४६ कोटी ६७ लाखांवर गेला आहे.
विशेष म्हणजे १९५२मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा कोटी ४५ लाख रुपये खर्च झाला होता. त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये मात्र खर्च कमी झाला होता. ५२नंतर झालेल्या ५७सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच कोटी नऊ लाख रुपये खर्च झाला होता. तर १९६२मध्ये म्हणजे सात कोटी ३२ लाख रुपये खर्च आला होता. मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकांच्या खर्चात वाढच झाल्याचे दिसते. १९६७च्या निवडणुकीत दहा कोटी ७९ लाख तर १९७१च्या निवडणुकीत ११ कोटी ६१ लाख रुपये खर्च झाला होता. यानंतर म्हणजेच १९७७पासून प्रत्येक निवडणुकीचा खर्च दुप्पट झाला. ७७च्या लोकसभा निवडणुकीसाठी २३ कोटी चार लाख रुपये खर्च झाले. १९८०मध्ये झालेल्या निवडणुकीत हा खर्च ५४ कोटी ७७ लाखांवर पोहचला. तर ८४मधील निवडणुकीत खर्च ८१ कोटी ५१ लाखांवर गेला. देशाच्या इतिहासात ही शेवटीची निवडणूक होती ज्यात निवडणुकीचा खर्च १०० कोटींच्या आत होता. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत खर्चाने १५४ कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर १९९१मध्ये ३५९ कोटी, १९९६मध्ये ५९७ कोटी आणि १९९८मध्ये ६६६ कोटी रुपयांचा खर्च झाला. १९९९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा खर्च एक हजार कोटींच्या जवळ पोहचला होता. या निवडणुकीसाठी ९४८ कोटींचा खर्च झाला. तर त्यानंतर २००४मध्ये झालेल्या निवडणुकीत एक हजार ११४ कोटींचा खर्च झाला.
0
विभागीय आयुक्तांकडून निवडणूक तयारीचा आढावा

यवतमाळ: येत्या १० एप्रिल रेाजी यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा विभागीय आयुक्त डी.आर.बन्सोड यांनी गार्डन हॉल येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी होणारी निवडणूक मुक्त व नि:पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन केले.
बैठकीला विभागीय आयुक्तांसह अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बिपीन बिहारी, निवडणूक निरिक्षक के.डी.कपाडीया, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, महसूल उपायुक्त श्री.चिमाजी, अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक प्रक्रीयेतील नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यावेळी बन्सोड यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांचा आढावा घेतला. निवडणुकीत काही केंद्र उपद्रवी ठरतात, अशा केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर निवडणूक आयोगाचा जोर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. युवावर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर ठिकठिकाणी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात यावे.प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर अनावश्यक व्यक्तिंचा प्रवेश होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने संबंधितांनी मतदान सुरु होताच अगदी सुरुवातीपासूनच सक्तीचे धोरण अवलंबिने आवश्यक आहे. केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. यासाठी पोलीस विभागाने दक्ष राहीले पाहिजे. अनेक केंद्रांवर मतदारांच्या मतदानासाठी
रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पुरेशा खोल्या उपलब्ध नसल्यास बाहेर शामियाना टाकण्याच्या सूचना बन्सोड यांनी केल्या. बिहारी यांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सुरुवातीस निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून चांगल्या पध्दतीने निवडणूक पार पडेल, असे सांगितले. पोलीस अधीक्षक शर्मा यांनी पोलीस विभागाच्या तयारीची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपआपल्या विधानसभा मतदारसंघातील तयारीची माहिती दिली. शेवटी आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी मानले.









