वाशीम : प्रसार माध्यमातील दैनिके व नियतकालीकांच्या वार्षिक विवरणीच्या लेखा परिक्षणासाठी रजिस्ट्रॉर ऑङ्ग न्युजपेपर्स कडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली असून हे लेखा परिक्षण ई-ङ्गायलींगच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. एप्रिल ते मार्च या कालावधीतील वार्षिक विवरणी लेखा परिक्षकांच्या तपासणीसह आरएनआय कार्यालयाला ३१ मे पर्यत ई-ङ्गाईलींगच्या माध्यमातुन कसे पाठवावे याबाबतची माहिती अद्यापही अनेक प्रकाशक व संपादकांना नाही. त्यामुळे नियमित कागदपत्रांची पुर्तता न करु शकणार्या यापैकी अनेक वृत्तपत्रांची नोंद आरएनआय कार्यालयाला होत नाही. व याचा ङ्गटका प्रकाशकांना बसतो. त्यासाठी आरएनआय कार्यालयाने ई-ङ्गायलींगच्या माहितीसाठी दि. २० ते ३१ मे २०१४ च्या दरम्यान आरएनआय च्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयामध्ये ई-ङ्गायलींग ङ्गॅसिलिटेशन कॅप (कार्यशाळा) चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वार्षिक विवरणी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कशी भरावी याबाबतची सखोल माहिती देण्यात येणार आहे. तरी दैनिके व नियतकालीकांच्या प्रकाशक व संपादकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून ऑनलाईन ई-ङ्गायलींगची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन रजिस्ट्रॉर ऑङ्ग न्युजपेपर्स ङ्गॉर इंडिया नवी दिल्लीचे सहाय्यक प्रेस रजिस्ट्रॉर एस.डी.सुरेकर यांनी संकेतस्थळावरुन केले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी आरएनआय डॉट एनआयसी डॉट कॉम या संकेतस्थळावर किंवा ०११-२६१०७५०४, २६१०८४३२, २६१६२६३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Archive for May, 2014
0
टाटा मॅजिक इंडीगोची समोरासमोर धडक, १२ जखमी

बाभूळगाव – भरधाव वेगात येणाºया टाटा इंडीगो वाहनाने प्रवाषी घेवुन चाललेल्या टाटा मॅजिक काळीपिवळी गाडीला समोरासमोर धडक दिली. हा अपघात खडकसावंगा ते मिटनापुर दरम्यान आज ११ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला. यात दोन्ही गाड्यामधील १२ जण जखमी झाले. जखमींना प्रथमोपचारासाठी ग्रामिण रूग्णालय बाभुळगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र रूग्णांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले.
यवतमाळ-धामणगाव राज्य मार्गावरील खडकसावंगा फाट्यासमोर देवगावहुन बाभुळगावकडे प्रवाशी घेवुन येणाºया टाटा मॅजिक क्र.एम.एच. २९ टी ८४६० ला विरूद्ध दिषेने येणाºया टाटा इंडिगो क्र.एम.एच.२९/एल ९११ ने समोरासमोर धडक दिली. यात टाटा मॅजिक वाहनात बसलेले प्रवाशांसह १२ जण जखमी झाले. जखमींमध्ये प्रदीप मांढरे (२२) रा. नांदुरा, ज्ञानेश्वर मिलमिले (१८) रा. कोळंबी, गणेश वडते (२५) रा.कळंब, निलेश मेश्राम (२०) नांदुरा, उद्धव खरात (५५) रा.धामणगाव, दुर्गा चामलाटे (१२) रा. कामनापुर(भुसारी), योगिता बावने (२०) रा.शेंदुरजना(खुर्द),ता.चांदुर, निलेश सिरसाठ (18) रा. मेंढा, ता. कारंजा, सुरेश वरठी (३५) रा. हिरपुर, रंजीत बिरे (२८) रा. यवतमाळ, रामचंद्र केवदे (२२) रा.गवंडी, सरोजीनी शेंडे (२०) रा. शेंदुरजना(खुर्द),ता. चांदुर आदिंचा समावेष आहे. सर्व जखमींना प्रथम बाभुळगाव येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांना यवतमाळ शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.
0
पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू – पाकिस्तानी सैन्याने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. गेल्या पंधरा दिवसातील ही पाचवी घटना आहे.
काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नांगीतेकरी भागात पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारास भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारादरम्यान कोणीतीही जिवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
याआधी पाच मे ला राजौरी जिल्ह्यातील भिंबेर गली, तीन मे ला पूंछ जिल्ह्यातील मेंढर तर २८ एप्रिलला राजौरीमधील भिंबेर गली भागात पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला होता. २५ एप्रिललाही पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता.
0
गुगलनेही साजरा केला ‘मदर्स डे’

मुंबई – नेहमीच प्रयोगशील असणा-या गुगलवरही रविवारी मदर्स डे साजरा करण्यात आला. मे महिन्याचा दुसरा रविवार हा संपूर्ण जगभरात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच धर्तीवर असे विशेष दिवस साजरा करणा-या गुगलनेही मदर्स डेसाठी विशेष डूडल बनवले आहे.
गुगलच्या या अनोख्या डूडलमध्ये आई आपल्या मुलांसोबत सायकल चालवण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मदर्स डेसंबधित माहितीची पेजेस आपल्याला दिसतात.
संपूर्ण जगभरातील अमेरिका, भारत, डेन्मार्क, फिनलँड, इटली, तुर्की, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, कॅनडा, चीन, जपान आणि बेल्जियम यांसारख्या देशात मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
0
वाराणसीत भाजप कार्यालयावर छापा

वाराणसी- मतदानाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेश पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने रविवारी वाराणसीत भाजपच्या कार्यालयावर छापा घातला. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अजय राय हे येथून निवडणूक लढवित आहेत.
वाराणसीमधील प्रचार शनिवारी सायंकाळी संपलेला असताना रविवारी निवडणूक आयोगाच्या पथकाने भाजपच्या वाराणसीमधील सिग्रा येथील कार्यालयावर छापा घातला. या छाप्यात टी शर्ट, प्रसिद्धी पत्रक, बिल्ले आणि अन्य प्रचारसाहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रचाराची मुदत संपलेली असतानाही हे साहित्य वाटण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असे आयोगाचे म्हणणे आहे. तर हे साहित्य प्रचारासाठी वापरण्यात आले नसून ते प्रचार संपला तेव्हा उरलेले असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.
0
अपघातात एकाच कुटूंबातील तीन ठार
महागाव – तालुक्यातील कासारबेहळ येथून मुळावा येथे लग्नासाठी जाणाºया पाटे कुटुंबीयांच्या दुचाकीला कन्टेनरने धडक दिल्याची घटना आज रविवारी सकाळी येथून दोन किंमी अंतरावरील हनुमान मंदिराजवळ घडली. यामध्ये तिन जण जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. यावेळी या मार्गावरील वाहतूक ३ तास ठप्प झाली होती़
कासारबेहळ येथील शेतकरी दिगांबर रासाजी पाटे (३४), पत्नी सवीता दिगांबर पाटे (२८), मुलगी गायत्री दिगांबर पाटे (१०), मुलगा राहुल दिगांबर पाटे (८) हे आपल्या दुचाकी क्ऱ एमएच २९ एक्स ९१४५ ने मुळावा येथील लग्नाला जात होते़ महागाव पासून २ कि़मी़ अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरा जवळील वळणावर येताच उमरखेड कडून आलेल्या कन्टेनरने (एम.एच. ३४/एम.९४६७) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दिगांबर, त्याची पत्नी सवीता व मुलगी गायत्री पाटे हे जागीच ठार झाले. तर मुलगा राहुल गंभीर जखमी झाला आहे़ अपघातानंतर कंनटेनरने दिड किमी अंतरापर्यंत दुचाकी घासत नेली. यावेळी चालकाने ट्रक सोडून पोबारा केला. दरम्यान याच कनटेनरने वºहाडा घेऊन जाणाºया एक ट्रकलाही धडक देण्याचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविछेदनासाठी ग्रामिण रुग्णालय सवना येथे पाठविले. तर जखमी राहुल याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी राज्य मार्ग क्र. तीनवरील संपूर्ण वाहतुक तीन तास खोळंबली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे यांनी जखमीच्या उपचारासाठी मदत केली. या अपघातामुळे कासारबेळ सह तालुक्यात शोककळा पसरली आहे़या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
0
गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला, सात जवान शहीद

गडचिरोली (पीटीआय) – गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रविवारी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सात जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाले आहेत.
सकाळी सुमारे पावणेदहाच्या सुमारास हा हल्ला झाला. जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील मुरमुरीजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या सहाय्याने नक्षलवाद विरोधी पथकाच्या पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सात पोलिस जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली.
पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भूसुरुंग स्फोट झाल्यानंतर नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक सुरु आहे.
0
विधानसभेसाठी तयारीला लागा – पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी आणि १६ मे ला निकाल लागल्यानंतर कशी परिस्थिती असेल याविषयी या बैठकीत चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री या बैठकीला उपस्थित होते. अजित पवारांचे सरकारी निवासस्थान देवगिरीवर ही बैठक झाली. शरद पवारांनी मंत्र्यांना राज्यभर दौरे करण्याचे तसेच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
सोशल मिडियाचा निवडणुकीवर असलेला प्रभाव, मतदानाचा पॅटर्न आणि काँग्रेसचे सहकार्य या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कशी राजकीय स्थिती असेल याविषयी चर्चा झाल्याचे एका मंत्र्याने बैठकीनंतर सांगितले.
0
नाशिकमधील गुंड भीम पगारेची हत्या

नाशिक- नाशिक शहरातील गुंड भीम पगारे यांची अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथील राजीव नगर परिसरात पगारे याच्यावर प्रथम चाकूने हल्ला केला त्यानंतर त्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पगारेवर खुन, खंडणी आणि अन्य गुन्हे दाखल होते. दरम्यान, घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पगारे याच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. शहरातील गंगापूर ते अशोक स्तंभ या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
0
सोळाव्या लोकसभेसाठी प्रचार संपला

नवी दिल्ली – सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. येत्या १२ मे रोजी सोमवारी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात तीन राज्यातील ४१ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
अंतिम टप्प्यात वाराणसीची लढत सर्वात लक्षवेधी लढत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी येथून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर आपचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांचे आव्हान आहे.
विकासाच्या मुद्यावरुन सरु झालेला प्रचार शेवटच्या टप्प्यांमध्ये जाती-पातीच्या पातळीपर्यंत घसरला. भाजप नेते गिरीराज सिंह, अमित शहा, सपाचे नेते मुलायमसिंह यादव, आझम खान आणि अबू आझमी यांनी जाहीरसभांमधुन वादग्रस्त विधाने केली. अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्यातील शाब्दीक व्दंद चांगलेच रंगले. अंतिम टप्प्यात उत्तर प्रदेशातील १८, पश्चिम बंगालमधील १७ आणि बिहारमधील सहा जागांवर मतदान होणार आहे. १६ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदाच्या मतदानाने १९८४ च्या मतदानाचा विक्रम मोडीत काढला आहे. आतापर्यंत झालेल्या आठ टप्प्यांमध्ये ५०२ लोकसभा मतदारसंघात ६६.२७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. २००९ मध्ये संपूर्ण देशात एकूण ५७.९४ टक्के मतदान झाले होते. यावेळी २००९ च्या तुलनेत प्रत्येक टप्प्यामध्ये मतदानात वाढ झाली आहे.
0
‘मुक्ती कोण पथे’ व अमृत महोत्सव २४ मे रोजी

यवतमाळ – धर्मांतराचा कार्यकारणभाव विशद करून कोट्यवधी अस्पृश्यांना उर्जा देणाºया मुंबई ईलाखा परिषदेतील प्रेरणादायी व क्रांतीकारी, ‘मुक्ती कोण पथे’ या प्रबोधन उच्चाराला अमृत महोत्सवाचे आयोजन २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे केले आहे. नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यानिमित्ताने उर्जा दिनाचे कार्यक्रम होणार आहे.
३१ मे १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई इलाखा महार परिषद आयोजित करून आपल्या ओजस्वी व मुलगामी भाषणातून संभ्रमित अस्पृश्यांना नवी दिशा दिली. या परिषदेमुळेच लाखो अस्पृश्य धर्मांतरासाठी कटिबध्द झालेत. त्याचबरोबर १५ मे १९३६ रोजी अॅनहिलेशन आॅफ कास्ट हे लाहोर येथे जातपात तोडक मंडळाच्या कार्यक्रमात ऐनवेळेवर रद्द झालेले भाषण पुस्तक रुपाने बाहेर आले आणि या गं्रथाने समस्त भारतीयांना जाती व जाती निर्मूलनाचे स्वरूप व सिध्दांत समजावून सांगितले. त्या ग्रंथाचाही अमृत महोत्सवी गौरव या निमित्ताने या चिंतनपर कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात हिंगणघाटचे आंबेडकरी विचारवंत अशोक बुरबुरे, बुद्धप्रिय थूल , प्रा. अनिल काळबांडे इत्यादींचा सहभाग असणार आहे. या निमित्ताने धम्मप्रसार करणाºया मान्यवरांचा तसेच अनेकविध महिला व पुरूष मंडळांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. यामध्ये संध्या सराटकर, प्रा. अशोक इंगळे , शेषराव पिराजी धांडे, डॉ. गणेश टाले, अशोककुमार दवणे, बळी खैरे, संदेश ढोले, माधव सरकुंडे, दशरथ मडावी, मन्सुर एजाज जोश, संघमित्रा टेंभूर्णे, सिद्धार्थ भगत यांचा सहभाग असणार आहे. मुक्ती कोण पथे आणि जाती निर्मूलन या दोन उर्जस्वल भाषणाच्या अनुषंगाने चळवळीतील उर्जादायी व्यक्तीमत्वाला ‘भीम उर्जा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे नाग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी कळविले.
0
लुटमारीच्या करणारी टोळी जेरबंद , तलवारीसह शस्त्र जप्त

यवतमाळ – जिल्ह्यात सातत्याने वाटमारीच्या घटना घडत असून शुक्रवारी रात्री ९ वाजता भारी येथील पूलाजवळ लुटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरुन असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तलवारीसह धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.
विशाल गोपाल सोयाम (२५), मनोज रामूजी विश्वकर्मा (२५), विक्रम भाऊराव राऊत (२३), पराग उर्फ चिन्टु देवराव कानडे (२०), अमोल जनार्धन मगळे (१८), दिनेश भास्कर गुरनुले (२२) सर्व रा. माळीपुरा यवतमाळ, हेमंत कचनलाल राय (४४) रा. बालाजी चौक, यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. तर अन्य दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेऊन कारवाई केली. शुक्रवारी ९ मे रोजी रात्री ९ वाजता यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील भारी येथील पूलाजवळ अंधारात शस्त्रासह हे सर्वजण लुटमार करण्यासाठी दबा धरुन बसले होते. या बाबतची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाली होती. त्यावरुन मदने, शहरचे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय आष्टीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय ढोले, जमादार संजय कांबळे, विजय जाधव, प्रमोद मडावी, इकबाल शेख, तुषार नेवारे, संतोष मडावी यांनी घटनास्थळ गाठून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस आल्याचे पाहुन आरोपींनी आपल्या जवळील तलवारींसह धारदार शस्त्र फेकून दिले होते. यावेळी पोलिसांनी सदर शस्त्र जप्त करुन आरोपींविरुद्घ गुन्हे दाखल केले. जिल्ह्यात सतत वाटमारीच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आरोपींना अटक केल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
0
‘धम्मदिक्षा’ नाट्यकृतातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ विचारसुत्र

यवतमाळ – आयुष्याच्या संध्याकाळी आम्हाला सोडून जाऊ नकोस ही मनविभोर करणारी राजा शुध्दोधन महाप्रजापती यांची आर्त हाक, विनवणी आणि दु:खमुक्तीसाठी डोक्यात मी चंद्र जखमी घेऊन मी निघाली’ या ठाम निग्रह या संबोधी क्रिएशन निर्मित धम्मदिक्षा नाटकाच्या पहिल्याच प्रदेशातील गृहत्यागाच्या भाव नाट्यास नाट्यरसिंकांनी भरभरून दाद दिली. ९ मे रोजी समता पर्वात सादर झालेल्या प्रा. शांतरक्षित गावंडे लिखीत व अविश वत्सल बन्सोड दिग्दर्शित धम्मदिक्षा नाट्यकृतीच्या सादरीकरण केले.
प्रारंभी जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नाट्यदिग्दर्शक अविश वत्सल बन्सोड यांचे स्मृतीदिन्ह देऊन स्वागत केले. बुध्द आणि त्यांचा धम्म या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथातील बहुजन हिताय बहुजन सुखाय हे विचारसुत्र घेऊन ही नाट्यकृती आकारास आली. सिध्दार्थाचा गृहत्याग, सुजाताचे खरिदान, चांडलिका प्रकृतीची धम्मदिक्षा, अंगुलीमालाचे मत परिवर्तन, दुराचारी लोकात धम्मदिनेने केलेले परिवर्तन, मृत्यू हे अंतीम सत्य आहे. हे किसा गौतमीलात बुध्दांना सांगितलेले जीवनसत्य, हे सर्व प्रसंग रंगमंचावर सरसपणे सादर झाले. रंजन आणि प्रबोधन यांचाही सुरेख समन्वय साधण्यात आला. या नाट्याकृतीत महाप्रजापती, मातंगी, गुरूमाता ह्या व्यक्तीरेखा (चारुलता पावशेकर), प्रकृती किसा गौतमी (कांचन गुजर), सुजाता (स्फुर्ती गोळे, धम्मदिना (भारती कुडमेथे), सखी (प्रशंसा पाटणकर), अचार्व (विजय रंगारी), वाणिक (राजेश (श्रीवास्तव), धनिक (सुरज मोने), माणिक (स्वप्नील मिसळे), तथागत बुध्द (सुनिल आडे), राजा शुध्दोधन (गौतम बोरकर), अंगुलीमाल (संजय माटे), रजपुत्र सिध्दार्थ (ज्ञानेश्वर सोनटक्के), अहिसंक (राहुल गेडाम), बाल सिध्दार्थ (ऋषिकेश चौधरी), देवदत्त (रोशन चौधरी), निवेदक भदंत (अतुल मेश्राम), भदंत (गुलशन पाटील, निखील भगत) या सर्व कलावंतानी आपल्या भुमिका प्रभावीपणे साकारल्या सुबोध वाळके यांच्या पार्श्वसंगित आणि संगित संयोजनाचे अनेक प्रसंगात घनव्याकुळ केले. चेतन बालपांडे यांच्या गायनाने संगित नाट्याची आठवण करून दिली. अशोक कार्लेकर यांची प्रकाश योजना, प्रसंगानुसार व प्रत्ययकारी होती. समारोपीय कार्यक्रमात डॉ.टि.सी. राठोड यांनी मनोगत व्यक्त करतांना ‘धम्मदीक्षा’ही नाट्यकृती अव्वल दर्जाची असल्याचे मत व्यक्त केले. समता पर्वाचे सुत्रधार कुलदिप रामटेके, डॉ. टि.सी. राठोड, समता पर्वाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. सुनंदा वालदे, मंगला दिघाडे, शिक्षधाधिकारी गंगाधर जाधव, धांदे यांच्या हस्ते कलावंताचे स्वागत केले.संचालन सुनील वासनिक, नम्रता खडसे यांनी तर आभार तिजेंद्र ढाणके यांनी मानले.
0
उमरखेडात दोन चोरीच्या घटना, दोन लाखांवर डल्ला
उमरखेड – शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून एकाच रात्री चोरट्याने विविध घटेनत दोन लाखावर डल्ला मारला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे.
स्थानिक शिवाजी वॉर्डात राहणाºया संगीता गौतम पडघणे यांच्या घरात चोरट्याने आत प्रवेश केला. कपाटातून एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्यामध्ये लाँग गंठन एक तोळा, छोटे गंठन ७ ग्रॅम, कानातले १ ग्रॅम, ३ अंगठया सहा ग्रॅम असा एकूण एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल चोरला. अशातच रात्री दीड वाजताच्या सुमारास कपाटाचा आवाज आल्याने महिला जागी झाली. त्यावेळी एक इसम कपाटातून दागिने चोरत होता व एक जण दारामध्ये उभा दिसला. त्यामुळे महिलेने आरडा ओरड केल्याने चोरट्याने तेथून पोबारा केला. तसेच ताजपुरा वार्डातील शे. सादीक शे. करीम यांच्या मालकीचा एम.एच. २६ बी. ४९४७ क्रमांकाचा ट्रक उभा होता. शहरापासून ७ किलोमीटर संगम चिंचोली पर्यंत ट्रक नेऊन डिस्क सह पाच टायर (किंमत १ लाख १० हजार) काढून चोरुन नेले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरु आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून चोरीच्या घटनांनी नागरिकांसह व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी चोरटयांना अटक करावी व रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0
हळद-कुंकू व अंगारा फेकुन महिलेवर मंत्राचा प्रयोग

यवतमाळ – पोलिसात दिलेली तक्रार मागे घे अन्यथा चेहरा विद्रुप करण्याची धमकी देत एका महिलेवर मंत्राचा प्रयोग करून हळद-कुंकू व अंगारा फेकल्याची घटना शनिवारी दुपारी पळसवाडी कॅम्पमध्ये घडली. महिलेच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी चार जणाविरुद्घ अंधश्रध्दा व अघोरी कृत्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
प्रिया विनोद गोविंदानी (३२) या महिलेच्या दिराने परिसरातच राहणाºया उदासी कुटुंबातील सदस्याची पोलिसात तक्रार दिली होती. अशातच प्रिया गोविंदानी व सातवर्षीय मुलगी प्रांजली या दोघी दुपारी घरी असताना चार जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी आरोपी प्रताप रादलदास उदासी (४७), संजय रादलदास उदासी (४३), गोलू रामचंद्र उदासी (२१), जया प्रताप उदासी (४०) सर्व रा. पळसावाडी कॅम्प यानी दिराने पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्या अन्यथा चेहरा विद्रुप करून टाकू असे धमकावित अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपी जयाने मंत्र पुटपुटून सोबत आणलेले लिंबू, हळदी-कुंकू, तांदळाचे दाने आदी साहित्य प्रियाच्या पायावर फेकले. या प्रकाराने भयभित झाल्याने सदर महिलेने आरडा ओरड केली. यावेळी लगतच्या कारखान्यातील जीवन वाघमारे, सूरज बन, गजानन गिरी यांनी तिच्या घराकडे धाव घेतली असता आरोपींनी तेथून पळ काढला. सदर महिलेने हा प्रकार भ्रमणध्वनीवरून पतीला सांगितल्यानंतर शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चारही आरोपीविरुद्घ भादंवि कलम ४४८, ५०९, ५०६, ३४ व महाराष्टÑ अंधश्रध्दा व अधोरी कृत्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरूआहे. यापूर्वी एका युवकाने अंबिकानगरातील महिलेला तुझ्या पतीचा अपघाती मृत्यू टाळण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले होते. त्यासाठी ५० हजार रुपये या युवकाने उकळून फसवणूक केली होती. अंधश्रध्देतून शहरात घडलेली ही दुसरी घटना आहे.
0
नाईकाच्या खूनातील आरोपीच्या घरावर हल्ला
तोडफोड करुन नासधूस
आर्णी – तालुक्यातील बोरगाव येथे तांड्याचे नाईक भगवान राठोड याच्या पैशाच्या वादातून खून करण्यात आल्याची घटना १ मार्च रोजी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकाराने संतप्त झालेल्या अनोळखी व्यक्तीने काल रात्री बाबुसिंग राठोड या आरोपीच्या घरातील सामानाची तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला.
भगवान राठोड हा प्रतिष्ठीत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. गावातील तंटे गावात मिटविणे, सर्वांच्या सुख-दु:खात धावून जात होता. त्याच्या शब्दालाही गावात मान होता. तांड्याचा ‘भगवान’ हरपल्याने चाहत्यांना शोक आवरणे कठीण झाले होते. गुरुवारी प्राणघातक हल्ला झाल्याने यातच त्याचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काहींच्या मनात रोष होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली तरी अज्ञात व्यक्तीने बाबुसिंग राठोडच्या घरावर हल्ला चढवित घरासह सामानाची तोडफोड केली.
पुत्रांना घडविणाºया ‘माय’चा गौरव, माय माउली प्रतिष्ठानचा उपक्रम
यवतमाळ – आईच्या वात्सल्याची सर कुणालाही करता येत नाही. स्वत: उपाशी राहून आपल्या चिल्या पिल्यांच्या तोडात घास भरविणाºया मायच्या कर्तृत्वापुढे आभाळही ठेंगणे पडते. अशाच कष्ट उपसून विपरित परीस्थितीवर मात करून आपल्या पुत्रांना घडविणाºया मायमाउलींचा गौरव १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. माय माउली प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित असून यंदा तिसरे वर्ष आहे. माय माउली पुरस्कारासाठी विरमाता लक्ष्मी कुनगर, रंजना मुळतकर, शांता काळा, अडेला उपेवाड, कलावती पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, साडी, शाळ, श्रीफळ,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
माय माउलींचा गौरव व्यसनमुक्तीसम्राट संत मधुकर खोडे महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आशा देशमुख राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. न.मा.जोशी, डॉ. विजय कावलकर, अशोक कंचलवार, यू.डी.आगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक माय माउलीचा जीवन संघर्ष माहितीपटातून दाखविण्यात येईल. गौरव सोहळ््यानंतर आई विषयावर व्यसनमुक्तीसम्राट खोडे महाराज यांचे संगीतमय प्रवचन होणार आहे. दोन महिन्यापूर्वी ‘माझी माय’ या विषयावर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या गौरव सोहळ््याला यवतमाळकर जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन आनंद कसंबे, मिलिंद देशपांडे, प्रवीण कापर्तीवार, प्रकाश आंबिलकर, प्रा. सलिम चव्हाण, मंगेश देशपांडे, नरेश उन्हाळे, ठोकळ, जीवन लाभसेटवार आदींनी केले आहे.
सत्कारमूर्तींचा परिचय
विरमाता लिलाबाई कुनगर नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील रहिवासी असून शहिद किशोर कुनगर यांच्या मातोश्री आहे. रंजना मुळतकर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील आहे. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना घडविले. मुलगा डॉक्टर तर मुलगी इंजिनिअर आहे. शांता काळे ह्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील असून जीवनरुपी अग्निपरीक्षेतून मुलगा ज्ञानेश्वरला सीए केले. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील अडेला उपेवाड येथील रहिवासी असून पतीच्या निधनानंतर वादळाशी झुंज देत मुलाला वाघीनीचे दूध पाजले. मुलगा गणेश बीएसस्सी अॅग्री झाला आहे. कलावती पवार या वाशिम जिल्ह्यातील धानोरा भुसे येथील रहिवासी असून या माय माउलीने कष्ट उपसून मुलांना प्राध्यापक, शिक्षक केले आहे.
0
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुसद – भरधाव ट्रक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल मध्यरात्री दरम्यान खंडाळा घाटात घडली. शेख मस्तान शेख हबीब (४०)रा. अमृतनगर,खंडाळा, असे मृताचे नाव आहे. सदर व्यक्ती दुचाकी (क्र. एम.एच.२९/एच ८६३२) ने गावाकडे जात असताना विरुध्द दिशेने आलेल्या ट्रक्टरने जबर धडक दिली व लगेच ट्रक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यात शेख मस्तानला जबर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात वनविभागाच्या चौकीजवळच झाल्याने गस्तीवर असलेल्या वनविभाग कर्मचाºयाच्या लक्षात आली. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
बिबट्याने पाडला म्हशीचा फडशा

यवतमाळ – जंगलात पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहे. पाण्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याने गावानजीकच्या शेतात बांधलेल्या म्हशीचा फडशा पाडला. ही घटना काल मध्यरात्री दरम्यान तालुक्यातील कापरा (हेटी)येथे घडली.
यवतमाळपासून ११ किलोमिटर अंतरावर किटाकापरा जंगल असून जवळच कापरा (हेटी)नावाचे छोटेशे गाव आहे. गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने बहुतांशजणाकडे जनावरे आहे. संतोष वसंतराव झामरे या शेतकºयाने आपली जनावरे गावालगतच्या शेतात बांधली होती. काल रात्री विजांच्या कडकडाट व वारा असल्याने शेतात कुणीही गेले नव्हते. मात्र मध्यरात्री म्हशींचा ओरडण्याचा आवाज आल्याने गावकºयांनी शेताकडे धाव घेतली. त्यांचा आवाज ऐकूण म्हशीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. जंगल परिसरात आतापर्यंत अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र आता थेट गावातच बिबट्याने शिरकाव केल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. मागीलवर्षीही बिबट्याने धनगराच्या जनावराचा फडशा पाडल्याची माहिती आहे.
0
यवतमाळ जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

यवतमाळ – गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक आणि संपुर्ण पावसाळाभर सतत पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या भूजलपातळीत सरासरी १.३३ मिटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे. महागाव तालुक्यात ही वाढ दोन मिटरपेक्षा अधिक म्हणजे २.१० मिटर इतकी असून सहा तालुक्यांमध्ये दीड मिटरपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दरवर्षी कमी होत असतांना एकीकडे चिंतेची स्थिती असतांना यावर्षी अचानक झालेली वाढ दिलासा देणारी ठरणार आहे.
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात सतत पाऊस कोसळला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९११.३४ इतके असतांना प्रत्यक्षात १२३२.१० मिलीमिटर इतके पर्जन्यमान (पाऊस) झाले. कोसळलेला पाऊस मोठ्या प्रमाणावर भूगर्भात साठवल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून ही वाढ झालेली दृष्टीस पडत आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने मार्च महिण्यात जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यात निरिक्षण विहिरींच्या स्थिर भूजल पातळीचा अभ्यास करण्यात आला. १९१ विहीरींचे त्यासाठी निरिक्षण करण्यात आले. या निरिक्षणात जिल्ह्यात सरासरी १.३३ मिटरने भूगर्भातील पाण्यात वाढ झाली असल्याचे आढळले. भूगभर्पातळीत तालुकानिहाय झालेली वाढ पुढील प्रमाणे आहे. महागाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २.१० मिटरने वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ उमरखेड १.९९ मिटर, आर्णी १.६७ मिटर, दिग्रस १.६० मिटर, दारव्हा १.५५ मिटर, कळंब १.५२ मिटर, बाभुळगाव १.२६ मिटर, घाटंजी १.४७ मिटर, नेर १.३२ मिटर, पुसद १.४७ मिटर, राळेगाव १.२५ मिटर, यवतमाळ १.४७ मिटर, मारेगाव ०.८९ मिटर, पांढरकवडा ०.९२ मिटर, वणी ०.४३ मिटर तर झरी जामणी तालुक्यात ०.४९ मिटरने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही वाढ जिल्ह्यात सरासरी १.३३ मिटर इतकी आहे. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याने पाण्याचे स्त्रोत बळकट होणार असून पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. भविष्याचा विचार करता ही वाढ जिल्ह्याला मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.












