पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May, 2014

राज्यातील ४५ सहाय्यक गटविकास अधिकाºयांना बीडीओपदी पदोन्नती

नागपूर (विशेष प्रतिनिधी) / जिल्हा परिषद व ग्राम पंचायत मधील दूवा असलेल्या पंचायत समितीच्या गट ‘ब’ संवर्गातील सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या ४५ अधिकाºयांना गट ‘अ’ संवर्गात गटकविकास अधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचे ओ.बी.पाटील यांना जिल्ह्यातीलच अंबरनाथ येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर मुरबाडचे बाल विकास प्रकल्प अधिकरी एस. एन. फसाटे यांना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये बढती देण्यात आली आहे. वाडा पंचायत समितीचे व्ही. के. पिंपळे यांना विक्रमगड मध्ये नियुक्त करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूरचे सी.व्ही.आदमने यांना त्याच ठिकाणी बढती देण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगडचे व्ही.एम.चव्हाण यांना तेथेच नियुक्ती देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्ह्याचे अनिल अहिर यांना उमरखेडमध्ये तर घाटंजीचे आर. जी. गेडाम यांना घाटंजीतच बढती देण्यात आली आहे. राळेगावचे व्ही. एल. खेडकर यांना यवतमाळच्या गटविकास अधिकारीपदी तर वणीचे राजेश गायनर यांना पाढंरकवडामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूरचे एम.बी.घसाळकर यांना वाशीम जिल्ह्यातील रिसोडमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ पंचायत समितीचे सी.एल. पवार यांना जिल्ह्यातीलच देवळा येथे बढती देण्यात आली आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील पी.ए.तट्टेना जिल्ह्यातीलच वरूडमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे जी. डी. साखरे यांना रत्नागिरी पंचायत समितीमध्ये बढती देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजच्या श्रीमती एस. टी. चव्हाण यांना सावनेर बीडीओपदी नियुक्त करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण पंचायत समितीचे के. बी. पाटील यांना पेणमध्येच बढती देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत रोहयोतील एस. एस. भालेराव यांची पुणे जिल्ह्यातील इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील बी. जी. कुरळे यांना रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये बढती देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टीचे एच. एस. मेहर यांना चंद्रपूरमधील कोरपणा पंचायत समितीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे रोहयो विभागातील सहाय्यक गटविकास अधिकारी ए.एम.धारस्कर यांना नंदूरबारमधील अक्राणी-धडगाव पंचायत समितीच्या बीडीओपदी बढती देण्यात आली आहे. साताºयाचे जी. व्ही. बैरागी यांना सोलापूरमधील मोहोळमध्ये बढती देण्यात आली आहे. तर कोरेगाव पंचायत समितीचे व्ही.बी.साबळे यांना खंडाळयात नियुक्त करण्यात आले आहे. सांगोल्याचे एस. बी. माळी यांना वर्ध्यातील आर्वीमध्ये बढती देण्यात आली आहे. सांगलीमधील कवठेमहांकाळचे जी. बी. भोसले यांना येथीलच आटापाडी मध्ये बढती देण्यात आली आहे. गोंदियातील तिरोड्याचे सी.डी.मून यांना जिल्ह्यातीलच आमगावच्या बीडीओपदी नियुक्ती देण्यात आली आहे. कोल्हापूरमधिल आजरा पंचायत समितीचे एच. डी. नाईक यांना राधानगरीमध्ये बढती देण्यात आली आहे. परभणीमधील पाथरीचे टी. जी. जाधव यांना सेलूमध्ये बढती देण्यात आली आहे. नांदेडमधील अर्धापूरचे व्ही.एन.घोडके यांना मुदखेडमध्य तर मुदखेडचे जे. डी. गोरे यांना भोकर येथे, तर जालनामधील अंबडचे बी. बी. कुळकर्णी यांना बदनापूरला नियुक्त करण्यात आले आहे. औरंगाबादमधील सोयगावचे ए. बी. चौलवार यांना जालन्यातील जाफराबादमध्ये बढती देण्यात आली आहे. लातूरमधील अंनतपाळचे एन. एस. दाताळ यांना अहमदपूरमध्ये नियूक्त करण्यात आले आहे. नांदेडमधील हिमायतनगरचे व्ही. यू. सुरोशे यांना परभणीमधील जिंतूरला बढती देण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परीषदेचे एम. डी. बारापत्रे यांना चंद्रपूरच्या बीडीओपदी नियूक्ती देण्यात आली आहे. रत्नागीरीतील दापोलीचे आर. बी. गुजर यांना अमरावतीमधील चांदूर रेल्वे येथे बढती देण्यात आली आहे. खेडच्या श्रीमती.व्ही.एस. गमरेंना बीडच्या बीडीओपदी बढती देण्यात आली आहे. भंडारा मोहाडीचे एन. जी. वानखडे यांना नागपूरमधील रामटेकमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. तर सिंधुदूर्गमधील दोडामार्गचे एस.एम.चव्हाण यांना अहमदनगरमधील जामखेड येथे बढती देण्यात आली आहे. वर्ध्याचे बी. एम. मेघावत यांना यवतमाळमधील झरी जामणी येथे नियुक्त करण्यात आले आहे. चंद्रपूरमधील सिंदेवाहीचे बी. बी. गजबे यांना बल्लारपूरमध्ये बढती देण्यात आली आहे. तर लाखणीच्या एन. आर. जमईवार यांना गडचिरोलीमधील वडसा-देसाईगंजमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. भद्रावतीचे आर. डी. बागडे यांना नागपूरला नियुक्त करण्यात आले आहे. रायगडमधील श्रीवर्धनच्या श्रीमती एस. के. भगत यांना भंडारा जिल्ह्यात पवनीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. लातूरचे ए.आर. कुंभार यांना औसामध्ये बढती देण्यात आली आहे. रत्नागिरीचे बी. बी. जाधव यांना नागपूर जिल्ह्यात पारशिवणीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. साताºयातील जावळीचे एस.एस. मारकड यांना बुलडाण्यातील नांदूºयाच्या बीडीओपदी बढती देण्यात आली.

 

May 22, 2014 in मुख्य पान

जिल्हा वार्षिक योजनेत तिप्पट वाढ

 

यावर्षी ४१५ कोटींची कामे होणार

यवतमाळ – जिल्हा वार्षिक योजना विकासाला हातभार लावणारी अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत कामांच्या मंजूरीचे अधिकार जिल्ह्याला असल्याने आणि मंजूर कामांना तातडीने निधी उपलब्ध होत असल्याने गेल्याकाही वर्षात सर्वसामान्यांना दिलासा देणारी शेकडो कामे योजनेतून झाली आहे. गेल्या सहावर्षात या योजनेचा विकास आराखडा तिप्पटीने वाढला आहे. योजनेतून गेल्यावर्षी ३५३ कोटींची विकास कामे झाली तर यावर्षी ४१५ कोटींची कामे होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी जिल्हा वार्षिक आराखडा तयार होत असतो. या आराखड्यात सर्वसाधारण आराखडा, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना अशा तीन उपयोजनांचा समावेश असतो. सन २००८-९ मध्ये या तीनही उपयोजनेंतर्गत जिल्ह्याचा वार्षिक आराखडा ११६.६२ कोटी इतका होता.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या भूमिका व आग्रहामुळे हा आराखडा दरवर्षी सातत्याते वाढत गेला. सन २००९-१० मध्ये जिल्ह्यात या योजनेंतर्गत १५७ कोटी रुपयांचा विकास कामांवर खर्च झाला. सन २०१०-११ मध्ये २०६ कोटी, सन २०११-१२ मध्ये २७२ कोटी, सन २०१२-१३ मध्ये ३१४ कोटी तर गेल्यावर्षी सन २०१३-१४ मध्ये ३५२ कोटी ५३ लाख रुपये या योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध विकास कामांवर खर्च झाले.

जिल्हा विकास आराखडा हा जिल्ह्याच्या विकासासाठी असलेला अतिशय महत्वाचा आराखडा आहे. त्यामुळे या आराखड्यात सातत्याने वाढ करण्यावर भर राहीला आहे. या आराखड्यात होणारी वाढ जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी आहे. त्यामुळेच सन २०१४-१५ च्या आराखड्यात वाढ व्हावी म्हणून पालकमंत्री डॉ.नितीन राऊत व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी अमरावती येथे झालेल्या विभागीय नियोजन बैठकीत या आराखड्यांतर्गत अधिक निधी मिळावा म्हणून वित्तमंत्र्यांकडे आग्रह धरल्याने या वषीर्चा जिल्हा वार्षिक आराखडा ४१६ कोटीवर पोहचला आहे.

जिल्ह्याला मंजूर झालेला हा आराखडा विभागात सर्वात मोठा आराखडा ठरला आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात विकास कामांवर भर असल्याने रस्ते, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, पाणी पुरवठ्याच्या सुविधा, अत्यावश्यक बांधकामे, लहान-मोठे तलाव, जलसंधारणांची कामे, शेतकºयांना व्याज सवलत योजना, शेतकºयांना जोडधंदे आदी स्वरुपाचे शेकडो कामे या योजनेत करण्यात आली आहे.

May 21, 2014 in मुख्य पान

दोघा तरुण भावंडांचा मृत्यू

आर्णी – तालुक्यातील केळझरा (कोमटी) येथील दोन सख्ख्या तरूण भावंडांचे मृतदेह आज सकाळी शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. प्रमोद (२४) व प्रवीण उत्तम पवार (२०) अशी मृतकांची नावे असून विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे दोघेही भाऊ २० मेच्या रात्री मक्त्याने केलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. आज २१ मे च्या सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह भूषण भगत यांच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सर्जेराव गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्णी येथे पाठविले.

 

आसाममध्ये अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू 0

आसाममध्ये अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू

mahad-accident

गुवाहाटी – पश्चिम आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील धुपधारा येथे बुधवारी पहाटे कलाकारांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये उदयोन्मुख गायक सुमन महंताचा समावेश आहे.

पहाटेच्या सुमारास धुपधारा येथील रस्त्यावर कलाकारांना घेऊन जाणारे प्रवासी वाहन आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, कलाकारांच्या गाडीतील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

एका जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुस-या जखमीची प्रकृती गंभीर असून, त्यांना गुवहाटीच्या वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून घटनास्थळावरुन पसार झाला होता. पण नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

May 21, 2014 in मुख्य पान
केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी 0

केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

index.jpeg1नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा जातमुचलका न भरल्याने त्यांना २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

या वर्षी ३१ जानेवारी रोजी केजरीवाल यांनी भारतातील ‘सर्वाधिक भ्रष्ट’लोकांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांचेही नाव होते. त्यामुळे गडकरी यांनी केजरीवाल यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. खोट्या, निराधार, कारस्थानी आणि बदनामीकारक दाव्यांमुळे आपली प्रतिमा मलीन झाली असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते.

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, जामीनासाठी केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना कोठडीत जावे लागले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ मे ला होणार आहे. तोपर्यंत केजरीवाल यांना तिहार तुरुंगात रहावे लागणार आहे. कोणताही गुन्हा केला नाही, हे एक राजकीय प्रकरण आहे, असे सांगत केजरीवाल यांनी वैयक्तिक जातमुचलका भरण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच याआधीही अशाप्रकारे न्यायालयात खटले दाखल असून तेथे न्यायालयाने आपल्याला नियमित तारखेला हजर होण्याच्या अटीवर जामीन दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.मात्र आपण एका आप सारख्या जबाबदार पक्षाचे नेतृत्व करता, त्यामुळे आपण आम आदमी प्रमाणे कायदेशीर प्रक्रीया पूर्ण कराव्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र तरीही केजरीवाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

May 21, 2014 in रोजगार
गुगल जगातील सर्वोत्कृष्ट ब्रँड 0

गुगल जगातील सर्वोत्कृष्ट ब्रँड

indexपॅरिस- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलला सर्वोत्कृष्ट ब्रँडचा किताब मिळाला आहे. भांडवलाच्या तुलनेत गुगलने अ‍ॅपलला मागे टाकले.

मिलवर्ड ब्राउन या आघाडीची संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार गुगलची ब्रँड व्हॅल्यू १५८.८४ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूत ४० टक्क्यांची वाढ झाली असून इतर ब्रँडच्या तुलनेत गुगल महागडा ब्रँड ठरला आहे. गेल्या वर्षभरात गुगलने अनेक नावीन्यपूर्ण गॅजेट्स तंत्रज्ञान जगतात आणली. यामध्ये गुगल ग्लास तसेच गुप्तचर सेवांसाठीची मोठी गुंतवणूक आणि नव्या भागीदारी करण्यात कंपनीने भर दिला असल्याचे मिलवर्ड ब्राउनचे प्रमुख बेनॉइट ट्रान्झर यांनी सांगितले.

गुगल ग्लास या इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या चष्म्यासाठी कंपनीने लुक्सोटिका या रेबॅन नंतरच्या आघाडीच्या कंपनीशी करार केला. तर इतर उत्पादनांसाठीही गुगलने आघाडीच्या कंपन्यांशी करार केला. यातून ग्राहकांमध्ये गुगलबाबत आश्वासक वातावरण निर्माण झाले असल्याचे ट्रान्झर यांनी सांगितले. दरम्यान, सर्वात महागडा ब्रँड म्हणून गेल्या तीन वर्षापासून आघाडीवर असलेल्या अ‍ॅपलच्या ब्रँड व्हॅल्यूत मात्र २० टक्क्यांची घट झाली आहे. अ‍ॅपलचे बाजारमूल्य १४७.८८ अब्ज डॉलपर्यंत खाली आले आहे. जगातील १०० आघाडीच्या ब्रँडमध्ये पहिल्या १० कंपन्या अमेरिकेच्या आहेत. गुगल, अ‍ॅपलनंतर आयबीएम, मायक्रोसॉफ्ट यांची सर्वोत्तम ब्रँड म्हणून निवड झाली. मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली असून कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूत २९ टक्क्यांची वाढ झाली. फास्ट फूडमधील आघाडीचा ब्रँड असलेल्या मॅकडोनाल्डची ब्रँड व्हॅल्यू ८५.७१ अब्ज डॉलर असून त्याखालोखाल कोका कोला ब्रँड आहे. कोका कोलाची ब्रँड व्हॅल्यू ८०.६८ अब्ज डॉलर असल्याचे मिलवर्ड ब्राउनने आपल्या अहवालात म्हटले आहे.

May 21, 2014 in मुख्य पान
माओवादी संघटनेच्या पत्रकाने व्यापाºयात दहशत 0

माओवादी संघटनेच्या पत्रकाने व्यापाºयात दहशत

News4

पाच लाखाची मागणी

फुलसावंगी  (यवतमाळ)-  येथील व्यापाºयांच्या दुकानात माओवादी संघटनेचे पत्रके आढळले असून पाच लाखाची मागणी केली आहे. अन्यथा स्वत:च्या जिवित्वास स्वत: जबाबदारी राहील  असेही पत्रकात नमुद केल्याने व्यापाºयात दहशत पसरली आहे.

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे मोठी बाजारपेठ असून येथील नेहमीप्रमाणे  मंगळवारी  व्यापाºयांनी आपली दुकाने उघडली. तेव्हा बालाजी कृषी केंद्र, पांडे भुसार मार्केट, साई अँग्रो एजन्सी, दत्तकृपा कृषी केंद्र, गौरीशंकर कृषी केंद्र, जयस्वाल भुसार मार्केट या सहा सहा दुकानांमध्ये माओवादी संघटनेच्या नावाने लिहिलेली पत्रके आढळली. या पत्रकात माओवादी संघटना बीट क्र. ३६ चा कमांडर रामक्रिपा बाली याच्या आदेशाने पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. २१ मे रोजी सारकिन्ही येथील बसस्थानकावर पाच लाख रुपये घेऊन येण्याचे या पत्रकात म्हटले आहे. पैसे दिले नाही तर जीवाची जबाबदारी तुमच्यावर राहील, अशी धमकीही दिली असून  ‘जय महाकाल’ असे लिहिलेले आहे. या पत्रकामुळे व्यापाºयात  खळबळ उडाली असून पत्रके नक्षलवाद्यांची आहेत किंवा अज्ञात समाजकंटकाने हा खोडसाळपणा करुन व्यापाºयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला हे गुढ अजूनही कायम आहे. तसेच महागाव तालुक्याच्या सिमेवरील जंगलामध्ये खरच नक्षल सुरु झाली काय अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरु आहे. याप्रकरणी व्यापाºयांनी महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्घ खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

May 21, 2014 in मुख्य पान
सुगंधीत तंबाखूसह १७ लाखाचा ऐवज जप्त 0

सुगंधीत तंबाखूसह १७ लाखाचा ऐवज जप्त

IMG-20140521-WA0005 copyयवतमाळ – यवतमाळातून पांढरकवड्याकडे चोरट्या मार्गाने नेल्या जात असलेल्या  सुगंधीत तंबाखूसह तीन आरोपींना मोहदा येथे सापळा रचून जेरबंद केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. यात सुगंधीत तंबाखूसह १७ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.

राज्यात गुटखाबंदी असून परराज्यातून तंबाखूजन्य पदार्थाची खुलेआम आयात होत आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. मनोहर नाईक यांचा हा गृह जिल्हा आहे. महिनाभरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मंत्र्याच्या जिल्ह्यातच गुटखाबंदीचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होते. यवतमाळ येथून पांढरकवड्याकडे दोन वाहनातून सुगंधीत तंबाखू नेल्या जात असल्याची टिप विशेष पथकाला मिळाली. त्यावरून मोहदा येथे त्यांनी सापळा रचला. बोलेरो व टाटा मॅजिक हे दोन्ही वाहन मोहद्यात पोहोचताच एका वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सुगंधीत तंबाखू आढळून आला. तर एका वाहनाचा पाठलाग करून पांढरकवडा नजीक पकडण्यात आले. दोन्ही वाहनात सुगंधी तंबाखू आढळून आला. या तंबाखूची किंमत ११ लाख १ हजार ७५० रुपये असून १ लाख २५ हजाराची रोकड व दोन वाहनही जप्त केले. एकूण ही कारवाई १६ लाख २६ हजार ७५० एवढी आहे.  ललित जोधवानी रा.सिंधी कॅँम्प, संदीप राठोड रा. वाघापूर, मुनेश्वर वाट रा. मोहदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक राजू वटाने, गजानन डोंगरे, विशाल भगत, भोजराज करपते, गणेश देवतळे यांनी केली.

May 21, 2014 in मुख्य पान
  पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून , दोन आरोपींना अटक 0

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून , दोन आरोपींना अटक

images

यवतमाळ – पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना काल रात्री ९ वाजता दरम्यान महात्मा फुले (पाटीपुरा) चौकात घडली.अजय भीमराव बनसोड (२८)रा. सेजल रेसिडेंन्सी, अंबिकानगर यवतमाळ, असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ शोध मोहिम राबवून सचिन डोंगरे (२४), अनिकेत दिनेश वासनिक दोघेही रा. पाटीपुरा यांना अटक केली. तर रितेश बाविस्कर रा. अशोकनगर,  राजा विशाल कोल्हे, नितीन धुळे रा. पाटीपुरा हे आरोपी फरार आहे.

या खूनप्रकरणाचा म्होरक्या रितेश हा पाटीपुºयात बल्ली नावाने प्रसिद्ध आहे. अजय व बल्लीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. तसेच खटके उडत होते. याचा वचपा काढण्यासाठी पाचही आरोपींनी अजयला संपविण्याचा कट रचला. काल मंगळवारी रात्री दरम्यान अजय बनसोड हा बाहेरुन परतत असताना धबा धरुन बसलेल्या पाचही जणांनी धारदार शस्त्राने त्याचावर हल्ला चढविला. लगेच अजयला रक्ताच्या थारोळ््यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठून अजयला कै.वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच मृत घोषित केले. यामुळे पाटीपुरा भागात काहीवेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ज्योती अजय बनसोड (२४) हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात पाचही आरोपींनी कट रचून खून केल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी बल्ली बाविस्कर, राजा कोल्हे, नितीन धुळे,अनिकेत वासनिक, सचिन डोंगरे यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. घटना घडताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस पथकाला सूचना देत आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पथकाने रात्री दरम्यान शोध मोहिम राबवून दोघांना अटक केली. नेमका खून कोणत्या कारणातून करण्यात आला याचा शोध शहर पोलीस घेत आहे.

May 21, 2014 in मुख्य पान
दुकानाला आग, १२ लाखाचे नुकसान 0

दुकानाला आग, १२ लाखाचे नुकसान

DSC09546
उमरखेड – शहरातील मध्यवस्तीत असलेल्या खडकपुरा येथील किराणा दुकानाला आग लागल्याने १२ लाखाचे नुकसान झाल्याी घटना सोमवारी रात्री घडली. ललीत गोविंद तेला याचे खडकपूरा चौकात किराणा स्टोअर्स दुकान आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण दुकानातील साहित्य कवेत घेतले. यामध्ये किराणा माल, वजन काटा, मापे, फर्निचर व महत्वाचे कागदपत्र असा एकुण १२ लाखाचा माल जळून खाक झाला. ही बाब निदर्शनास येताच नगर परिषदच्या अग्निशमन दलाला पाचारण करुन ही आग आटोक्यात आणली. शहरात तीन दिवसापूर्वी धार्मिक स्थळाची विटंबना केल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अनेकांनी जाळपोळ केली होती. याच घटनेचा वचपा काढण्यासाठी सदर दुकानाला आग लावली असा संशय व्यक्त करुन व्यापाºयांनी बाजारपेठ बंद केली होती. मात्र दुकानदाराने ही आग शॉट सर्कीटमुळे लागल्याचे सांगितल्या नंतर व्यापाºयांनी आपले दुकाने सुरु केली. या घटनेची माहिती मिळताच  पोलिस व वीज वितरण कंपनीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

May 20, 2014 in विदर्भ
नरेंद्र मोदींची पंतप्रधापदी नेमणूक, शपथविधी २६ मे रोजी 0

नरेंद्र मोदींची पंतप्रधापदी नेमणूक, शपथविधी २६ मे रोजी

modi-wins-650_122012081331
नवी दिल्ली – भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली असून, येत्या २६ मे रोजी सोमवारी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात संध्याकाळी सहा वाजता होणार शपथविधी होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदींबरोबर ‘रालोअ’चे ३३५  सदस्य खासदारकीची शपथ घेतील.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली.
प्रथम रालोअच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना भेटून नरेंद्र मोदींची रालोअच्या नेतेपदी निवड केल्याची माहिती दिली. रालोअचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींची पंतप्रधानपदी नेमणूक केली. त्याआधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर याच हॉलमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतही नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदीय नेतेपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, सुष्मा स्वराज, अरुण जेटली या सर्व प्रमुख नेत्यांनी अनुमोदन दिले.  त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड झाल्याची घोषणा केली. या बैठकीनंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि तेलगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीला भाजपचे सर्व नवनिर्वाचित खासदार, नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.  लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक २८२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  मोदी प्रथमच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आले होते.

May 20, 2014 in मुख्य पान
उत्तर प्रदेश सरकारमधील ३६ मंत्र्यांना नारळ 0

उत्तर प्रदेश सरकारमधील ३६ मंत्र्यांना नारळ

images.jpeg1
लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातील राज्यमंत्रीपद असलेल्या ३६ मंत्र्यांना नारळ दिला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अखिलेश यादव यांनी या मंत्र्यांवर कारवाई केली असेली तरी त्यांनी स्वतः राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमधील ८० पैकी केवळ पाच जागांवर विजय मिळाला होता. याआधी त्यांनी ३५ जागांवर विजय मिळवला होता. निवडणुकीतील या पराभवानंतर अखिलेश यांनी ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्र्यापाठोपाठ आणखी काही कॅबिनेट मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या या खराब कामगिरीनंतर अखिलेश यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्यांनी राजीनामा देणार नसून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीत राज्यातील ८० पैकी ७१ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर भाजपने आघाडी केलेल्या अपना दल या पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे.

May 20, 2014 in मुख्य पान
बाईक चोरी रोखण्यासाठी ‘स्मार्ट लॉक’ 0

बाईक चोरी रोखण्यासाठी ‘स्मार्ट लॉक’

Skylock
वॉशिंग्टन- अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी बाईक चोरी रोखण्यासाठी एक नविन ‘स्मार्ट लॉक’ शोधून काढले आहे. चावी नसलेले आणि सौर उर्जेवर चालणारे हे उपकरण मोटरसायकलची चोरी झाल्यास मालकाला अलर्टचा संदेश देईल.
सॅन फ्रान्सिस्को येथील वेलो लॅबने या ‘स्मार्ट लॉक’ ची निर्मिती केली आहे. वाहन चोर दुसरी चावी वापरून आपले वाहन चोरून नेतात. आता दुचाकी चोरत असताना तुम्हाला तातडीने माहिती ‘स्मार्टलॉक’ द्वारे दिली जाणार आहे. काहीही संशयास्पद बाब आढळल्यास हे ‘स्मार्ट लॉक’ व्लू ट्रूथद्वारे मालकाच्या मोबाईलवर अलर्ट संदेश पाठवते. हे ‘स्मार्ट लॉक’ २४९ अमेरिकन डॉलरला बाजारात उपलब्ध असून बाईक चोरीला यामुळे आळा बसू शकेल असे इंडस्ट्री लिडर्सच्या मासिकात म्हटले आहे.
हा ‘स्मार्ट लॉक’ रिमोटद्वारे स्मार्टफोनशी जोडलेला आहे. त्यामुळे बाईकची सुरक्षितता आणि बाईकवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. यातील विशेष म्हणजे दुचाकीचा मालक वाहनाच्या बाजूला येत असल्यास हे लॉक आपोआप उघडणार आहे. त्यामुळे दुचाकी चालकाचा मोठा वेळ वाचणार आहे. तसेच या लॉकमध्ये ‘अ‍ॅक्सेलोमीटर’ असणार आहे. याचा उपयोग म्हणजे मालकाचा अपघात झाल्यास त्याची माहिती तातडीने दुस-या फोनवर पाठवता येऊ शकेल. बॅटरी कमी असतानाही वायफायच्या सहाय्याने ही माहिती पाठवता येईल. तसेच ईमरजन्सीच्या वेळेस तातडीची मदत पुरवण्यासही याचा फायदा होऊ शकतो, असे उपकरण निर्मिती करणा-यांनी सांगितले. यासाठी फक्त एक तास सुर्यप्रकाश मिळाला तर ते उपकरण महिनाभर चालते.

May 20, 2014 in मुख्य पान
इच्छा, आकांक्षाची पूर्तता हेच ध्येय – नरेंद्र मोदी 0

इच्छा, आकांक्षाची पूर्तता हेच ध्येय – नरेंद्र मोदी

images
नवी दिल्ली –  भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार गरीबांसाठी, तरुणांसाठी आणि महिलांच्या विकासासाठी कटिबध्द असेल. सत्तेवर येणारे सरकार गरीबांचा आवाज ऐकेल, गरीबांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील असे नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बोलताना सांगितले.
आमचे सरकार येथे पदासाठी नव्हे तर, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आले आहे. ससंदेमध्ये ज्यांनी आपल्याला पाठवले आहे त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षाची पूर्तता करण्याचे आपले स्वप्न असले पाहिजे असे नरेंद्र मोदी म्हणाले. सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना नरेंद्र मोदी काही क्षणासाठी भावुक झाले होते. देश आणि भाजप आपली आई असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याआधीच्या सरकारांनी काही केले नाही असे मी किंवा भाजप कधीही म्हणणार नाही. प्रत्येक सरकार आपल्यापरीने देशाची सेवा करते.मी याआधीच्या सरकारांचे आणि त्यांच्या नेत्यांचे अभिनंदन करतो. आम्ही त्यांचे चांगले काम पुढे नेऊ आणि ते अधिक चांगल्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न करु असे मोदींनी सांगितले. देश पुढे गेला आहे. आपल्याला पुढे जायचे आहे कि, नाही ते आपल्याला ठरवायचे आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.

May 20, 2014 in मुख्य पान
गौतम बुद्घाचे विचार तळागळात पोहविण्याची गरज- आ. राठोड 0

गौतम बुद्घाचे विचार तळागळात पोहविण्याची गरज- आ. राठोड

IMG-20140514-WA0037
नेर –  तथागत भगवान गौतम बुद्घाने ज्या प्रमाणे राजाची गादी सोडून मानव घडविण्यासाठी जिवन खर्ची घातले असून त्यांचे विचार तळागळात पोहचविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. संजय राठोड यांनी  केले.
स्थानिक भिमनगरात बौद्घ पोर्णिमे निमित्य आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्घाच्या प्रतिमेला हारार्पण  करून अभिवादन केले. पुढे बोलताना आ. राठोड  म्हणाले की, गौतम बुद्घाने सांगितल्या प्रमाणे धर्म आणि सत्य यात संघर्ष असेल तर सत्याचे अनुसरण करा असे आवाहन  केले. यावेळी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, संजय दारव्हटकर, नामदेव खोब्रागडे, विनोद जयसिंगपूरे, दिपक मिसळे, अशोक फुलझेले, प्रा. सागर गावंडे, प्रा. नाजुक धांदे, गंगाधन मिसळे, सिद्घरर्थ मिसळे, सुलोचना भोयर, नितीन कराळे उपस्थित होते.

May 14, 2014 in मुख्य पान
डॉ. आंबेडकरांचा जाती निर्मूलनाचा लढा उच्च मूल्यांवर आधारीत- अरुंधती रॉय 0

डॉ. आंबेडकरांचा जाती निर्मूलनाचा लढा उच्च मूल्यांवर आधारीत- अरुंधती रॉय

bfbcimg_114762_758758568_240x180
पांढरकवडा –  उच्च-नीचतेला व असमानतेला धर्माची साथ अथवा मान्यता मिळाल की, शोषक व्यवस्था निर्माण होत  असते. आज दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रीया आणि कामगार अशाच व्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणात बळी होत  आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘जाती निर्मूलन’ हा ग्रंथ आणि त्याला महात्मा गांधी यांनी दिलेले प्रत्यूत्तर वाचल्यानंतर खोलात जावून संशोधन केले. आणि माझ्या हातून ‘डॉक्टर आणि संत’ हे प्रस्तावना पुस्तक लिहील्या गेले. जाती अस्तित्वाचे महात्मा गांधी यांनी समर्थन  केले. उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाच्या लढ्याला उच्च मानवी मुल्यांचे अधिष्ठान दिले, असे विचार आंतरराष्टÑीय ख्यातीच्या व बुकर आणि मॅगसेसेन पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी व्यक्त केले.
येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरिश्चंद्र भेले, डॉ. लिला भेले यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आधुनिक झगमगाटाच्या वातावरणातही लेखकांना लोकांच्या मनात जागा असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन अरुंधती रॉय म्हणाल्या की, द. आॅफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आंदोलना संदर्भात  इतिहास लेखनातून आणि पाठ्यपुस्तकातून चुकीचे सांगितल्या जात आहे. परिणामी अनेक आंदोलना बाबत गांधी-आंबेडकर यांच्यातील खरा वैचारिक संघर्ष पुढे आला नाही. सुरुवातीला प्रा. हरिश्चंद्र भेले यांनी प्रास्ताविक केले.  डॉ. लिला भेले, डॉ. अजित चाहल, प्राचार्य डॉ. रमजान विराणी, अ‍ॅड. पंकज शेटे, अ‍ॅड. माणिक चौधरी, प्रा. झिलपिलवार, प्रा. राहुल दखणे, प्रभुतींनी अरुंधती रॉय यांचे स्वागत केले. पांढरकवडा या आदिवासी बहुल परिसरासाठी हा एैतिहासीक क्षण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी उद्गार काढले. यावेळी सुनिल सरदार, डॉ. ग्रँड उपस्थित होते.

May 14, 2014 in मुख्य पान
नाशिकमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार 0

नाशिकमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार

images
नाशिक  (पीटीआय) – नाशिकच्या मंगलवाडी झोपडपट्टीत एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार करणा-यांमध्ये मुलीचा भाऊ आणि काकाचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
पिडीत मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा उचलून २७ एप्रिल आणि आठ मे ला चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आधी या मुलीला मारहाण करण्यात आली त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पिडित मुलीच्या आईचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. मुलीचे वडिल मजूर असून, ते कामावर गेल्यानंतर या चौघांनी बलात्कार केला.पिडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी मंगळवारी तिघा आरोपींना अटक केली. राजू दारुप्पा (२२), नरेश भंडारी (२२), प्रभाकर हरिजन (२२) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही मगंलवाडी झोपडपट्टीतच रहातात. पोलिस मुलीच्या भावाचा राजु हुनमंता मालाला (२२) शोधत आहेत. पोलिसांनी आयपीसीच्या विविध कलमांखाली चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

May 14, 2014 in मुख्य पान
हैदराबादमध्ये संचारबंदी, दोघांचा मृत्यू 0

हैदराबादमध्ये संचारबंदी, दोघांचा मृत्यू

pic-04
हैदराबाद  (पीटीआय) – दोन गटांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर हैदराबादमधील राजेंद्रनगरमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.
बुधवारी पहाटे धार्मिक झेंडा जाळण्यावरुन या हिंसाचाराला सुरुवात झाली. बहादूरपूरामधील सिख चवानी भागात हा हिंसाचार झाला. झेंडा जाळण्याच्या घटनेसाठी दोन युवकांना जबाबदार धरुन, एका समाजाच्या गटाने या युवकांवर हल्ला केला. त्यानंतर या भागातील तणाव वाढला.
राजेंद्रनगरमध्ये काही घरांवर हल्ले झाले असून, या भागात जाळपोळीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही.आनंद आणि अन्य वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मतमोजणीच्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या पोलिस आणि निमलष्करी दलाच्या सशस्त्र तुकडया या भागात तैनात करण्यात आल्या आहेत. वातावरणात तणाव असला तरी, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

May 14, 2014 in मुख्य पान
तीन दिवस आधीच दाखल होणार मान्सून! 0

तीन दिवस आधीच दाखल होणार मान्सून!

main034
पुणे  (पीटीआय) –  मान्सून आपल्या नियमीत वेळेच्या तीन दिवस आधी म्हणजे १७ मे रोजीच अंदमान बेटावर पोहचण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण मान्सून  २० मे रोजी अंदमान बेटावर दाखल होते. मात्र यावेळी तो आपल्या नियोजीत वेळेच्या तीन दिवस आधी अंदमान बेटावर पोहचण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
जर मान्सूनच्या पुढील प्रवासाला अनुकुल वातावरण मिळाले तर तो नियमीत वेळेत भारतात दाखल होऊ शकतो. सध्या दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनसाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत बंगालच्या दक्षिण पूर्व सागरात दाखल होऊ शकतो असे आयएमडीने म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होते. त्यानतंर १५ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. यावर्षी मान्सूनवर ‘एल निनो’ या घटकाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून सरासरीच्या ९५ टक्केच असण्याची शक्यात हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

May 14, 2014 in मुख्य पान
बुध्द पौर्णिमा 0

बुध्द पौर्णिमा

Buddhist monks praying in Patna

२५५८व्या बुध्द पौर्णिमेनिमित्त पाटणा येथील बुद्ध स्तुपात बुधवारी भिक्खूंनी प्रार्थना केली.

May 14, 2014 in मुख्य पान