
चेन्नई, दि. १२ – हिंदू संस्कृतीत मंगळसूत्राला विशेष असं स्थान असताना महिलांनी मंगळसूत्र घालायला हवं का? असा प्रश्न उपस्थित करीत या विषयी एका न्यूज चॅनेलने चर्चा (डिबेट )केल्यानं न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर एका हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे.
चेन्नईतील तमीळ भाषेतील ‘पुथीया थालाईमरई’ असे न्यूज चॅनेलचे नाव असून या चॅनेलने जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिलांनी मंगळसूत्र घालावं का? याविषयी चर्चाचे आयोजन केले होते. मंगळसूत्र घालण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने संतापलेल्या आयगनार सेनेच्या चार कार्यकर्त्यांनी बुधवारी मोटारसायकलवर येवून टिफिन बॉक्सच्या साहाय्याने गावठी बॉम्बद्वारे ऑफिसवर हल्ला केला. या हल्याची जबाबदारी या कार्यकर्त्यांनी स्वीकारली असून त्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपणही केले आहे. पुथीया थालाईमरई या चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीयू शाम कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, साधारणत: ३.१५ वाजता दोन मोटारसायकलवर अज्ञात चार जण आले व त्यांनी बॉक्सेसमधून कार्यालयावर गावठी बॉम्ब फेकले. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. आमच्या टिव्हीवर ‘थाली’ आणि ‘मंगळसूत्र’ या दोन अशा चांगल्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. परंतू या विषयाला आक्षेप घेत काही हिंदूवादी संघटनांनी कार्यालयावर हल्ला चढवला. या हल्याची तीवृता कमी असली तरी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध नोंदवित असल्याचे शाम कुमार यांनी म्हटले आहे.
Archive for March 12th, 2015
0
टिव्ही कार्यालयावर बॉम्बहल्ला
0
विमा विधेयकास राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली – गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विमा विधेयक २०१५ला गुरुवारी अखेर राज्यसभेत मंजुरी मिळाली. या विधेयकास राज्यसभेतही मंजुरी मिळाल्याने विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीची मर्यादा २६ टक्क्यांवरुन ४९ टक्के होणार आहे.
सभागृहात अडीच तास या विधेयकावर वादविवाद सुरु होता. अखेर आवाजी मतदानाने विमा विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी जोरदार विरोध दर्शवला. तृणमूल, द्रमुक, सपा, बसपा आणि जदयू(संयुक्त)च्या सदस्यांनी सभात्याग केला.
याआधी चार मार्च रोजी विधेयकाला लोकसभेत सहजरित्या मंजुरी मिळाली होती. मात्र राज्यसभेत या भाजपाकडे सत्ताधारी आणि मित्रपक्षांकडे बहुमत नसल्याने या विधेयकाचा मार्ग सोपा नव्हता. अखेर अनेक वादविवादानंतर या विधेयकास मंजुरी मिळाली.
0
द.आफ्रिकेचा १४६ धावांनी विजय

वेलिंग्टन -कर्णधार एबी डेविलियर्सच्या (९९), बेहरादीनच्या (६४) आणि मिलरच्या (४९) धावांच्या शानदार खेळीने दक्षिण आफ्रिकेला पुन्हा विजयपथावर आणले. वेलिंग्टनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूएईवर १४६ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी ठेवलेले ३४२ धावांचे लक्ष्य गाठताना यूएईचा संघ १९५ धावांत गारद झाला.
भारताकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर द. आफ्रिकेने वेस्ट इंडिज आणि आर्यंलडचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत द.आफ्रिकेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत द.आफ्रिकेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर साजेशी कामगिरी करत यूएईविरुद्ध विजय साकारला.
सामन्यात नाणेफेक जिंकून यूएईने द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. द. आफ्रिकेनेही प्रथम फलंदाजीचा फायदा उचलत ५० षटकात ३४१ धावा केल्या.
बेहरादीनच्या तुफान फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला डोंगराऐवढे लक्ष्य उभारता आले. बेहरादीन आणि फिललँण्डरने शेवटच्या तीन षटकात ४९ धावा कुटल्या. बेहरादिनने अवघ्या ३१ चेंडूत नाबाद (६४) धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार ए.बी.डेविलियर्सचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. (९९) धावांवर खेळत असताना कामरान शेहझादच्या गोलंदाजीवर डेविलियर्सने अमजद जावेदकडे झेल दिला.
आजच्या सामन्यात १७ धावांवर हाशिम आमलाच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिला हादरा बसला. मोहोम्मद नावेदने त्याला अमजद अलीकरवी झेलबाद केले. त्यानंतर सलामीवीर क्विंटन डिकॉकने रोसाऊच्या साथीने डाव सावरला. डिकॉकने (२६), रोसाऊने (४३) धावा केल्या. त्यानंतर डेविलियर्स आणि मिलरमध्ये चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी झाली. मिलर अर्धशतकापासून एक धाव दूर असताना बाद झाला.
द. आफ्रिकेने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करणा-या यूएईच्या संघाला १९५ वर रोखण्यात आफ्रिकन गोलंदाजांना यश आले. यूएईच्या स्वप्नील पाटीलने ५७ धावांची झुंजार खेळी केली. तर शायमन अन्वरने ३९ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक ६३ धावांची भागीदारी रचली. या दोघा खेळांडूंव्यतिरिक्त बाकीचे फलंदाज साफ अपयशी ठरल्याने यूएईला पराभवाची नामुष्की टाळता आली नाही.
0
चिमुकलीला दुसर्या मजल्यावरुन फेकलं

डोंबिवली-पाच दिवसांच्या चिमुकलीला रुग्णालयाच्या दुसर्या माळ्यावरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत आज सकाळी 8 वाजता च्या सुमरास घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील शुभदा नर्सिंग होममध्ये ही घटना घडली आहे.
सुजाता गायकवाड यांनी 5 दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलीची आई सकाळी बाथरूम अज्ञाताने मुलीला पाळण्यातून उचललं आणि इमारतीच्या दुसर्या मजल्यावरुन फेकून दिले.या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही.
0
मनमोहनसिंग यांच्या समर्थनात काँग्रेसची पदयात्रा

नवी दिल्ली – कोळसा घोटाळा (कोलगेट) प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव आल्याने, आज (गुरुवारी) त्यांच्या समर्थनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी पदयात्रा काढली.
सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी 24, अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयापासून मनमोहनसिंग यांच्या घरापर्यंत ही पदयात्रा काढली. या पदयात्रेपूर्वी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी समितीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे खासदार आणि सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. मनमोहनसिंग यांच्या बाजूने लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला मनमोहनसिंग उपस्थित नव्हते.
काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पूर्णपणे मनमोहनसिंग यांच्यासोबत असल्याचं यावेळी पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या. ‘मनमोहनसिंग यांच्या प्रामाणिकपणावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. या प्रकरणाचा आम्ही कायदेशीररित्या लढाई लढणार आहोत. मला विश्वास आहे, की ते नक्की निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर, अम्हाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे.
कोलगेट प्रकरणी बुधवारी विशेष न्यायालयाने मनमोहनसिंग यांच्या विरोधात समन्स जारी केले. सिंग यांच्या बरोबर उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, कोळसा मंत्रालयाचे तत्कालिन सचिव पी. सी. परख आणि हिंदाल्को समूहाच्या अन्य तीन अधिकार्यांविरोधातही समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून 8 एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.









