पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 2nd, 2015

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळ दौरा 0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळ दौरा

download
यवतमाळ, दि. २ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 3.45 वाजता स्व.जवाहरलाल दर्डा विमानतळ येथे आगमन व जिल्हा परिषदेकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता रातचांदणा ता.यवतमाळकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता रातचांदणा येथे आगमन. 6.40 वाजता रातचांदणा येथून घोडखिंडीकडे प्रयाण. सायंकाळी 6.55 वाजता घोडखिंडी येथे आगमन. सायंकाळी 7.20 वाजता घोडखिंडी येथून पिंपरी बु. कडे प्रयाण. सायंकाळी 7.40 वाजता पिंपरी बु. ता.यवतमाळ येथे आगमन.

March 02, 2015 in महाराष्ट्र
४३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा 0

४३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

ssc_0
यवतमाळ, दि. २ – महाराष्टÑ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. १४८ केंद्रावर ४३ हजार ६३८ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने उद्यापासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले आहे. ३९ हजार ९१० विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार असून, ३ हजार ७२८ विद्यार्थी रिपीटर आहे. १४८ केंद्रावर कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी १५६ बैठे पथक व सात भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. गणित, इंग्रजी, सायन्सच्या पेपरला केंद्रावर व्हीडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असून, त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. मात्र आजही अनेक केंद्रावर कॉपीचा वापर खुलेआम होत आहे. अशा उपद्रवी केंद्रावर बोर्डाची विशेष नजर राहणार असून, त्यासाठी बोर्डाने पथक कार्यान्वित केले आहे. उद्या मराठीचा पेपर असून, विद्यार्थ्यांना दहा मिनिट आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

March 02, 2015 in विदर्भ
प्लॉट विक्री व्यवहारात ४० लाखाने फसवणूक 0

प्लॉट विक्री व्यवहारात ४० लाखाने फसवणूक

download (1)
यवतमाळ, दि. २ – प्लॉट विक्रीचा खोटा करारनामा तयार करून ४० लाखाने इसमाची फसवणूक करण्यात आल्याची घटना अप्सरा टॉकीज, यवतमाळ येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रवीण मोरे (४२) व अन्य दोघे रा. चंद्रपूर अशी फसवणूक करणाºयांची नावे आहे.
शहरातील मनीष वाघेला (३९) यांना प्लॉट खरेदी करायचा होता. दरम्यान याच कालावधीत प्रवीण मोरे व त्याच्या दोन साथीदारांनी संगणमत करून वाघेला यांना प्लॉट विकायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्लॉटची पाहणी करून सौदा केला. यावेळी करारनामा करण्यात आल्यानंतर ४० लाख रुपयांची रक्कम वाघेला यांनी मोरे याला दिली. प्लॉटचा करारनामा त्यांनी घरी गेल्यानंतर तपासला असता, तो खोटा व बनावटी असल्याचे लक्षात आले. प्लॉट विक्रीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याबाबतची तक्रार त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

March 02, 2015 in विदर्भ
२९ हजार हेक्टरमधील पिकांना फटका 0

२९ हजार हेक्टरमधील पिकांना फटका

Digras 1
यवतमाळ, दि. २ – जिल्ह्यात दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकांना बसला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात २८ हजार ८३१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने प्राथमिक सर्वेक्षणातून वर्तविला आहे. तर ३९६ गावे बाधित झाली आहे. शनिवारी दुपारी अचानक वादळी वाºयाला सुरूवात झाली. बघता-बघता गारपीटीने झोडपून काढले. यामुळे गहू, हरबरा, संत्रा, आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले. ८७ हजार ६०० हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले. जानेवारीपर्यंत गहू, हरभरा पिकांची पेरणी सर्वात जास्त करण्यात आली. मात्र शनिवारी दुपारपासून कोसळलेल्या पावसामुळे १७ हजार ४४६ हेक्टर तर १ मार्च रोजीच्या पावसामुळे ११ हजार ३८५ हेक्टर असे एकूण २८ हजार ८३१ पिकांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहोर गळून पडल्याने शेतकºयांना हाही फटका सहन करावा लागणार आहे. सर्वात जास्त फटका यवतमाळ, दारव्हा, नेर, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव तालुक्याला बसला आहे.

 

March 02, 2015 in महाराष्ट्र
शॉक लागून बालकाचा मृत्यू, संतप्त जमावाची वीज वितरणवर धडक 0

शॉक लागून बालकाचा मृत्यू, संतप्त जमावाची वीज वितरणवर धडक

IMG-20150302-WA0019
फुलसावंगी (यवतमाळ),दि. २ – विद्युत खांबाच्या तंगाव्याच्या ताराला स्पर्श होऊन बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रामुनाईक तांडा (नारळी)येथे आज सोमवारी सकाळी घडली. यावेळी संतप्त नागरिकांनी बालकाचा मृतदेह घेऊन महावितरण कार्यालयावर धडक देऊन बेजबाबदार कर्मचाºयांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.
भोला गजानन आडे (४) असे मृतक बालकाचे नाव आहे. तर कल्पना बाळू राठोड ही महिला जखमी झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे. सकाळी आजोबाच्या घराकडे जात असताना वाटेत असलेल्या विद्युत खांबाच्या तंगाव्याला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी येथे दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी सदर बालकाला मृत घोषित केले. यावेळी संतप्त जमावाने बालकाचा मृतदेह घेऊन थेट महावितरण कार्यालयात धडक देऊन सहाय्यक वीज तंत्रज्ञ जि. एच. पारसकर यांच्यावर विविध गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यांची मागणी केली. उघड्या सताड रोहित्र त्यामध्ये फिऊज नसने, ताराणा गार्डिग नसने ही बाब जागो जागी पहावयास मिळत आहे. याबाबतची तक्रार विजय आडे यांनी महावितरणकडे केली होती. मात्र या गंभीर बाबीकडे सदर कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच महागावचे उप. कार्यकारी अभियंता गजभीय हे येथे दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाला दोषी कर्मचाºयांवर येत्या तीन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

March 02, 2015 in विदर्भ
स्वाइन फ्लू उपचारांचा खर्च सरकार उचलणार - मुख्यमंत्री 0

स्वाइन फ्लू उपचारांचा खर्च सरकार उचलणार – मुख्यमंत्री

images0000
मुंबई – महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वेगाने वाढ होत असून बळींचा आकडाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात रविवारी स्वाइन फ्लूमुळे आणखी १२ जण दगावले. राज्यातील एकूण बळींचा कडा १४३ वर पोहोचला आहे. याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. पुढे ते म्हणाले, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांतील रुग्णांची संख्या घटत असून लातूर विभागात मात्र रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबईसह राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून हे वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढील १५ दिवस हे आमच्यासाठी आव्हानात्मक असतील. राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे वैयक्तिकपणे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, साथ रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यावर विरोधकांनी टीका करण्याऐवजी सरकारला साथ देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

March 02, 2015 in मुख्य पान
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्षपदी संजय निरूपम 0

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्षपदी संजय निरूपम

images (3)
मुंबई- महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मुंबई शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी उत्तर भारतीय नेते व माजी खासदार संजय निरूपम यांच्या नावाची घोषणा झाली. 2008 पासून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे भूषवत होते. तर, मुंबई शहर काँग्रेस अध्यक्षपदावरून अॅड. जनार्दन चांदूरकर यांची दोन वर्षातच तेथून हकालपट्टी केली आहे.
प्रमुख राज्यांत काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतही मोठे बदल होणार असून तरुण नेत्यांना सरचिटणीसपदी नियुक्ती केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. या बदलात उपाध्यक्ष राहुल गांधी यांची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे संकेत आहेत. काही राज्यांतील राहुल गांधी समर्थक नेत्यांची कार्यकारिणीवर वर्णी लागू शकते.काँग्रेस संघटनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसातून मिळत होते. त्याचीच ही झलक असल्याचे मानले जात आहे. दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती झाली आहे. राहुल गांधींकडे पक्षाध्यक्ष जाण्याची ही चाहूल मानली जात आहे.
गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी रविवारी भरतसिंह सोलंकी यांची निवड जाहीर झाली आहे. सोलंकी यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवले आहे तर 2006 ते 2008 या काळात प्रदेशाध्यक्षपदही भूषविले आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये लोकसभेला एकही जागा मिळाली नसल्याने अर्जून मोढवाडिया यांच्यावर पक्षनेतृत्त्व नाराज होते. भरतसिंह सोलंकी यांचे वडील गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुजरातमधील सर्व समाजाला काँग्रेससोबत जोडण्याचे काम सोलंकी यांनी केले होते. आता राहुल यांनी त्यांच्या मुलाला संधी दिली आहे.

March 02, 2015 in मुख्य पान
पोलिसांची महिलेला खुलेआम अमानुष मारहाण 0

पोलिसांची महिलेला खुलेआम अमानुष मारहाण

fssdf_1425272293
जळगाव – चाळीसगाव येथे बस स्टँडवर दागिने चोरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका महिलेला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या पोलिसावर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ही घटना 21 फेब्रुवारीची आहे. पण सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबतचे गांभीर्य लोकांना समजत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला सुमारे 35 वर्षांची असल्याचे दिसत आहे. चाळीसगावच्या बस स्टँडवर ही महिला आरोपी दुसऱ्या एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी लोकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलेच्या विरोधात कोणीही लेखी तक्रार केली नाही. पण लोकांनी तोंडी माहिती दिली. त्यावरूनच शशिकांत महाजन नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने तिला अमानुषपणे मारहाण केली. महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण कोणीही तिला मदत करायला समोर आले नाही. हा पोलिस कर्मचारी पीडित महिलेला केसांनी ओढून जवळपास 200 मीटर लांब अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेला. खुलेआम झालेल्या या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ एका प्रवाशाने चित्रित केला आणि तो सोशल मिडियावर अपलोड केला.

March 02, 2015 in मुख्य पान