
मुंबई- मानखुर्दमध्ये निर्दयी आईनेच आपल्या आठ वर्षीय मुलीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आईला अटक केली असून प्रियकर मात्र फरार झाला आहे.
उषा भोले (२८) ही महिला दोन वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त रहाते. मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरात ती मुलगी तनिषा (८) आणि १२ वर्षांच्या मुलासह राहत होती. दरम्यान तीचे अविनाश फुलपगारे याच्याशी अनैतिक संबंध होते. तिच्याच घरी तो राहत होता. रविवारी रात्री दारुच्या नशेत घरी आलेल्या अविनाशने तनिषाला घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र, ती घराबाहेर गेली नाही, त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यात ती बेशुद्ध झाली. नंतर कोणाला संशय येवू नये म्हणून तिला जवळच्या शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यानंतर त्या मुलीच्या वडीलांना कळवण्यात आले. वडीलांनी पोलिसांजवळ हत्येचा संशय व्यक्त केला. त्यावरून शताब्दी रुग्णालयामधून या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यातील अहवालानुसार, तनिषाला मारहाण करुन तिची हत्या केल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी उषा भोले हिला अटक केली असून तिचा प्रियकर अविनाश हा फरार झाला आहे. त्याच्या पोलीस कसून शोध घेत आहेत.
Archive for March 30th, 2015
0
आईनेच केला प्रियकराच्या मदतीने मुलीचा खून
0
नागपूर कारागृहातून ५ आरोपी फरार

नागपूर, दि. ३१ – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच आरोपी पळून गेले असून तीन आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहे. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास हे पाचही आरोपी गज कापून फरार झाल्याचे समोर येत आहे. बिशनसिंग धुमाळ, मोहम्मद साहिब सलमी खान, सत्येंद्र उर्फ राहुल गुप्ता, प्रेम उर्फ नेपाळी शालीग्राम आणि आकाश उर्फ गोलू ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत.या पाचही आरोपींवर १५ ते २० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तिघांवर तर मोक्का लावण्यात आला आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या कारागृहातून हे आरोपी फरार झाल्याने पोलिस प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी जेलचे अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
0
मोबाइलचा स्फोट, मुलाचा मृत्यू

पुरुलिया : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील चिरुडीह गावात चार्जवर ठेवण्यात आलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन त्यात एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबातील एका सदस्याने आपला मोबाइल चार्जिंगसाठी ठेवला होता. इयत्ता पहिलीत शिकणारा हा मुलगा या फोनजवळ आला आणि काही क्षणांतच फोनचा स्फोट झाला. या स्फोटामुळे निघालेल्या आगीत मुलाचे शरीर भाजले. त्यात त्याचा मृत्यू झाला. स्फोट झालेला मोबाइल फोन चिनी बनावटीचा असल्याचे तपासात आढळले आहे.
0
बाबरी मशीदप्रकरणी आडवाणींना सुप्रीम कोर्टाची नोटीस

वी दिल्ली, दि. ३१ – बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह २० जणांना मंगळवारी नोटीस पाठवली. तसेच न्यायालयाने या प्रकरणात क्लीन चीट देणा-या केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) नोटीस पाठवत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी अलाहबाद उच्च न्यायालयाने २०१० साली लालकृष्ण आडवाणींसह मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, कल्याण सिंह आणि विहिंपचे काही नेत अशा २० जणांना आरोपातून मुक्त केले होते. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात फैजाबाद येथील रहिवासी हाजी मोहम्मद अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘सीबीआय आडवाणींसह भाजपच्या इतर नेत्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे’ असे त्या याचिकेत म्हटले होते. त्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आडवाणींसह इतर २० नेते व सीबीआयला नोटीस पाठवून चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. बाबरी मशीद ज्यावेळी पाडण्यात आली त्यावेळी हाजी मोहम्मद यांचे घर उध्वस्त करण्यात आसले होते. त्यांनी न्यायालयात आपल्याला एक पीडित म्हणून बाजू मांडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
0
युवतीचा मृतदेह आढळला, खुनाचा संशय

पाटणबोरी (यवतमाळ), दि. ३० – येथील मुख्यरस्त्याच्या कडेला इंदिरानगरातील २२ वर्षीय युवती योगीता नागोराव सिडाम हीचा मृतदेह घरापासून ५०० मीटर अंतरावर खुनी नदीच्या पात्रात आढळला. ३० एप्रिल रोजी या युवतीचे लग्न ठरले होते. त्यापूर्वीच तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे ३.३० पासून घरातून प्रात: विधीसाठी गेली होती. मात्र सकाळी शोधाशोध घेतली असता तिचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळला. घरापासून मुख्यरस्ता पार केल्यानंतर नाल्याच्या काठावर टेंभा, युवतीचे कपडे जळालेल्या अवस्थेत दिसले. नाल्याच्या पात्रात दगडावर रक्त सांडलेले आढळून येत आहे. नाल्याच्या पात्रातून नदीकडे जाणाºया रस्त्यावर रक्ताचे थेंब व रक्त सांडलेले दिसत आहे. यावरून युवतीचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. युवतीला जाळल्यानंतर वरून नाल्यात दगडावर फेकले असावे नंतर दूरवर खुनी नदीच्या पात्रात मृतदेह फेकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पांढरकवडा उपविभागीय पो. अ. भालचंद्र महाजन व पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून, सर्व बाजुने बारीक सारीक बारकावे तपासून पाहिल्या जात आहे.
0
विनापरवाना अन्न विक्री संस्थांकडून 60 लाखाचा दंड वसूल

यवतमाळ दि. 30 : खाद्य पदार्थाची शुध्दता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने वर्षभर ठिकाणीकाणी धाडी टाकून पदार्थांच्या तपासण्या व नमुने घेतल्या जाते. गेल्या वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडी व कार्यवाहीत विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघ करणाऱ्या अन्न विक्री संस्थांकडून 60 लाख 31 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
खाद्य पदार्थांची शुध्दता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे. अनेकदा अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशान पदार्थांमध्ये भेसळ करून नागरीकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार अन्न निर्माते व विक्री संस्थांकडून होतो. यावर आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी पदार्थांच्या तपासण्या केल्या जातात. भेसळ असल्याची शंका असल्यास नमुने घेऊन तपासणी साठी पाठविले जाते. बरेचदा भेसळीसंदर्भात नागरीकांच्याही तक्रारी असतांना अशा तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने धाड घालून पदार्थांची शुध्दता तपासली जाते.
अनेकदा विक्री परवाना नसतांना विविध खाद्य पदार्थांचे दुकान लागवे जाते. या दुकानांवर नियमितपणे कार्यवाही करण्यात येते. ज्या दुकानांकडे परवाना नाही त्यांना दंड आकारला जातो. शिवाय त्यांना अभिलेखे संगणकीकृत करून अधिकृत परवाना घेण्याबाबत प्रवृत्त केले जाते. जिल्ह्यात अशा परवाना नसलेल्या आणि कायद्याचे उल्लंघन करीत असलेल्या संस्थांवर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे.
गेल्या वर्षात नोंदणी किंवा परवाना नसलेल्या आणि कायद्याचे उल्लंघ केल्याप्रकरणी जिल्ह्यात एकून 404 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. तर 163 ठिकाणी अन्नांचे नमुने घेण्यात आले. विविध 35 ठिकाणी धाडी व जप्तीची मोहिम राबविण्यात आली. या सर्व कार्यवाहीत एकून 60 लाख 31 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. विविध 34 प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून यातील 5 प्रकरणांची न्यायालयस्तरावर अंतीम टप्प्यात आहे. जिल्ह्यात अन्न निर्मितीच्या 71 तर विक्रीच्या 11324 संस्था कार्यरत आहे. गेल्यावर्षी 6173 विक्री संस्थांची नोंदणी करून त्यांना परवाने देण्यात आले आहे. या संस्थांकडून नोंदणी शुल्कापोटी 56 लाखाचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.
औषध विक्रीचे 81 परवाने रद्द
गेल्यावर्षात जिल्ह्यात अन्न व औषध विभागाच्यावतीने 358 औषधी आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी कायद्यातील तरतुदींची पुर्तता न करणाऱ्या 81 आस्थापनांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच 26 परवाने काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते. ठिकठिकाणी 22 औषधांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 5 अप्रमाणित आढळून आल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही व न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहे.
0
लहान मुलांच्या कार्यक्रमात मंत्र्याच्या कमरेला पिस्तुल

मुंबई – भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कमरेला पिस्तुल लावून लहान मुलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारला चांगलच धारेवर धरल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा आणि विधानपरिषदेत हा मुद्दा लावून धरत महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गिरीश महाजन रविवारी जळगावमध्ये मूकबधीर मुलांच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कमरेला पिस्तुल लावल होत. कॅमे-याने महाजन यांचे हे पिस्तुल टिपले.
यावरुन विरोधकांनी सोमवारी सत्ताधा-यांची कोंडी केली. अशा प्रकारे महाजन यांच्या पिस्तुल लावण्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली.
या घटनेचा निषेध म्हणून विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासावरही बहिष्कार घातला. यावर गिरीश महाजन यांनी आपण स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाळगत असल्याचा दावा केला. ते पिस्तुल माझ्याकडे होते. मात्र त्याने मी कुठलाही हिंसाचार केलेला नाही. मी फक्त स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाळगतो असा खुलासा महाजन यांनी केला.
महाजन यांच्याकडे गेल्या दोन दशकापासून पिस्तुल बाळगण्याचा परवाना आहे. त्यांनी कायदा मोडलेला नाही. विरोधक या विषयावरुन निरर्थक वाद निर्माण करत आहेत असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांचा बचाव केला. गिरीश महाजन महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांना पोलिसांची विशेष सुरक्षा व्यवस्था आहे असे असताना त्यांना वेगळे पिस्तुल बाळगण्याची गरजच काय ? हा प्रश्न निर्माण होतो
Comments Off on जम्मू काश्मीरमध्ये पुराचा धोका, दरड कोसळून १० ठार
जम्मू काश्मीरमध्ये पुराचा धोका, दरड कोसळून १० ठार
श्रीनगर, दि. ३० – गेल्या वर्षी आलेल्या महाकाय पुरातून सावरत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराचे संकट निर्माण झाले आहे. झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील अनेक भागांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भूस्खलानाच्या घटनांनी महामार्गावरील वाहतूकही खोळंबली आहे. रविवारी दरड कोसळल्याने १८ घरांसह ४४ इमारतींचे नुकसान झाले. अद्याप या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली. दक्षिण काश्मीर व श्रीनगर येथे झेलम नदीने अनुक्रमे २२.४ फूट व १८.८ फूटांची पातळी गाठली आहे. नदीने २३ फूटांची पातळी ओलांडल्यास पुन्हा हाहाकार माजेल अशी भीती वर्तवली जात आहे. जम्मू काश्मीरमधील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या ९५ जवानांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवले आहे. पावसामुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळी बडगाम जिल्ह्यात चार घरांवर दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली आणखी २० जण अडकले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही जम्मू काश्मीरला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी जम्मू काश्मीरचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले व शेकडो लोकांना जीवही गमवावा लागला होता.
0
पं. मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान

नवी दिल्ली, दि. ३० – हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात मालवीय यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासोबत माजी पंतप्रधान अटलबिहापरी वाजपेयी यांनाही ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपतींनी नुकताच हा पुरस्कार वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.
आज सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात पद्म पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, प्रकाशसिंह बादल वस्वामी राम भद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर पत्रकार रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गीतकार प्रसून जोशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0
नेर तालुक्यातील ६ गावांना तंटामुक्त पुरस्कार
नेर ,दि. ३० – तालुक्यातील सहा गावाला १३ लाखाचे तंटामुक्त गाव निवडीचा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांचे उपस्थितीत देण्यात आला.
या वेळी मंचावर ठाणेदार गणेश भावसार, तंटामुक्त समितीचे सदस्य गजानन काळे, किशोर वंजारी इत्यादीची उपस्थित होते. याच सोहळ््यात तंटामुक्त पुरस्कार गावाकºयांना वेळोवेळी मदत करून पुरस्कारापर्यंत नेऊन ठेवणे गोपनिय विभागाचे पोलिस शिपाई गणेश इसळ यांचाही सत्कार करण्यात आला. बाणगाव, बाळेगाव, पांढरी, पाथ्रड (गोळे), लोणी व कोलुरा या गावांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला. तालुक्यात ७ वर्षात ३० गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला असून, यात वाई (ई), सातेफळ, धनज, शहापूर, माणिकवाडा, ब्राम्हणवाडा (पुर्व), मांगलादेवी, उमरणे, दगडधानोरा, चिकनी (डोमगा), पिप्री(कलगा), मोझर, सावरगाव (काळे), अडगाव, व्याहळी, कारखेडा, शिरसगाव, घारेफळ, चिचगाव या गावाचा समावेश आहे. तालुक्यातील १८ गावांनी परिश्रम घेवून पुरस्कार प्रवाहात सहभागी होण्याची गरज असल्याचे मत गटविकास अधिकारी गौतम भगत यांनी व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील ग्रामसेवक, सरपंच, ग्रा.प. सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य, अध्यक्ष इत्यादीची उपस्थिती होती. यावेळी गणेश इसळ, बाणगावचे सरपंच अनिल राठोड, राजेंद्र गोळे उपस्थित होते.
0
हर्षवर्धन तायडे यांची निवड
नेर , दि. ३० – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तालुका प्रतिनिधीपदी युवा नाट्य कलाकार प्रा. हर्षानंद तायडे यांची निवड करण्यात आली. ही नियुक्ती अभानापचे कार्यवाहक श्रीकांत भाडेयांनी केली आहे. आपल्या निवडीचे श्रेय जेष्ट नाट्य दिग्दर्शक दिलीप पुरी, बापूराव रंगारी, माणिकराव ढोरे, श्रीकांत भाडे यांना देत आहे. त्याच्या नियुक्तीबबद्दल गौतम बोरकर, अविनाश बनसोड, बासीद खान, फिरोज पठाण, नवनाथ दरोई, प्रा. एस.यु. ोके, सुनील आडे, राजा श्रीवास्तव, मिलींद चिरडे, अक्षर रंगारी, राहुल हळदे, संदिप मिसळे, राहुल तायडे, राजेश खोडके, सुषका कदम, निता ढोरे यांनी कौतुक केले.












