
मुझ्झफरनगर- मुझ्झफरनगर मधील नावला गावात एका सात वर्षाच्या चिमुरडीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी अमित कुमार याला अटक करण्यात आली आहे.
अमित कुमार हा शेतात नोकर म्हणून काम करत होता. मानसुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावला गावातून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आधिकारी डी. के. मित्तल यांनी दिली.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीने आपल्या मुलीला घरातून पळवून शेजारच्या जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या वडिलांनी केली.
पिडीत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Archive for March 28th, 2015
0
नोकराकडून मुलीवर बलात्कार
0
भिंत कोसळून दोन ठार

दहिसर – दहिसरमधील शांतीनगर भागात पहाटेच्या सुमारास बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीची एका इमारतीची संरक्षण भिंत चाळीवर कोसळली. या दुर्घटनेत एका कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला.
शांतीनगरमध्ये बांधकाम सुरु असणा-या इमारतीसाठी काल सायंकाळी रेतीचे ट्रक खाली करण्यात आली. चाळीला लागून असणा-या भिंतीजवळच हे ट्रक खाली करण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास रेतीच्या भारामुळे चाळ आणि बांधकमाच्या साइटच्या दरम्यान बांधण्यात आलेली भिंत कोसळली. भिंत कोसळ्याने चाळीतील सर्व घरे रेतीखाली गाडली गेली. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे चाळीतील काही रहिवाशी ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढिगा-याखालून दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
0
काँग्रेसचे 20 माजी आमदार भाजपच्या वाटेवर – रावसाहेब दानवे

मुंबई – राज्यातील पाच अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असून येत्या आठवड्याभरात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास 25 माजी आमदार पक्ष प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
भाजप-शिवसेना युतीचं सरकार मजबूत असल्याचा दावा करत मित्र पक्ष असलेला पक्षामध्ये सुरंग लावायचा नाही अथवा त्यांची माणसे फोडायची नाहीत असं आम्ही ठरविले आहे. त्यामुळे इतर पक्षांतून भाजपला पोषक असणारी, संघटनेला बळ देणारी माणसं जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. वाशिम मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्यासह पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि सभापती यांच्यासह पदाधिकार्यांनी काल (शनिवारी) दानवे यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या युती होणार, हे मी आधीच स्पष्ट केलं होतं. पण वरच्या पातळीवर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर युती करावयाची की नाही याचे अधिकार स्थानिक पदाधिकार्यांकडे आहेत. युतीमध्ये स्थानिक पातळीवर योग्य जागावाटप होतं काय, यावरही या युतीचे भवितव्य अवलंबून राहील, असं दानवे म्हणाले.
0
केबल चॅनलच्या ऑफीसला आग

सोलापूर – शहरात सात रस्ता भागात मिलियन स्केअर या बहुमजली इमारतीतील सोलापूर इन केबल न्यूज या स्थानिक न्यूज चॅनलच्या ऑफिसला आज पहाटे अचानक आग लागली. यात भीमा रिद्धी डिजिटल या केबल नेटवर्कची कंट्रोल रूम जळून खाक झालं आहे. या आगीत सुमारे पाच कोटींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी 7 नंतर महापालिका अग्निशमन दलाचे दहा गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
0
तिघींचा खून; अाराेपी पाेलिसांच्या ताब्यात

चिखली- विभक्त राहणारी पत्नी, मुलीसह सासूचा खून करणारा अाराेपी संताेष भाडाईतला अटक करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. त्याने २४ मार्चच्या मध्यरात्री अापल्या सासूरवाडीत येऊन चॅनलवर माेठ्या अावाजात गाणे लावून या तिघींचा खून केल्याची कबूली दिली अाहे.
चिखली तालुक्यातील सवणा येथे विमलबाई गाढवे, गीता संतोष भाडाईत आणि आरती भाडाईत या तिघींचा निर्घृण खून झाला हाेता. गीताचा नवरा व विमलबाईचा जावई संताेष यानेच हे खून केल्याचा पाेलिसांना संशय हाेता. दरम्यान, संताेष गावात आल्याचे समजताच पोलिसांनी शुक्रवारी दुपारी इसोली येथे त्याला अटक केली. दारूच्या आहारी गेलेल्या संतोषचे सासू विमलबाई यांच्याशी नेहमी खटके उडत होते. त्यातून त्याने घरातील लोखंडी फावड्याच्या दांड्याने सासू, पत्नी, मुलगी या तिघींनाही संपवून मुंबई गाठली होती. पत्नी व सासूला ठार मारल्यानंतर आपली मुलगी जोरजोराने रडत होती. त्यामुळे नाइलाजाने तिलाही ठार मारावे लागले. मात्र, मुलीला मारल्याचा आता पश्चाताप होतोय, असे संतोषने कबूली जबाबात सांगितले.
0
मेधा पाटकरांचा आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा

नवी दिल्ली – आम आदमी पक्षामध्ये सुरु असलेल्या केजरीवालशाहीला कंटाळून आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना ज्या पध्दतीने पक्षातून काढण्यात आले त्याचा मेधा पाटकर यांनी निषेध केला असून, त्यांना अन्यायी वागणूक देण्यात आली असे पाटकर यांनी म्हटले आहे. पाटकर यांनी मागच्यावर्षी आपच्या तिकीटावर मुंबईतून लोकसभेची निवडणूकही लढवली होती.आपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या शनिवारच्या बैठकीमध्ये गृहयुध्दाने टोक गाठले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांची बाजू ऐकून न घेता बहुमताच्या जोरावर त्यांची राष्ट्रीय कार्यकारीणीतून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये लोकशाहीची हत्या झाली असे बैठकीतून बाहेर आलेल्या योगेंद्र यादव यांनी सांगितले. बैठकीपूर्वी यादव-भूषण यांचे नेतृत्व मानणा-या कार्यकारीणीच्या सदस्यांना आतमध्ये न सोडल्यामुळे योगेंद्र यादव बैठकस्थळीच धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी बैठक स्थळी योगेंद्र यादव यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होती.
0
जागतिक क्रमवारीत सायना नंबर १

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने भारतासाठी चमकदार कामगिरी करणारी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने शनिवारी नवा इतिहास रचला.
सायना जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा इंडियन ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यफेरीत पराभव झाल्याने सायनाला कारकीर्दीत प्रथमच अव्वल स्थान मिळाले आहे.त्याचबरोबर सायनाने उपांत्यफेरीच्या सामन्यात जापानच्या यूई हाशीमोटोचा २१-१५,२१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव करुन इंडियन ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी गाठली.
अशी कामगिरी करणारी सायना पहिली भारतीय महिला असली तरी, अव्वल स्थानावर पोहोचणारी ती दुसरी भारतीय आहे. याआधी प्रकाश पदुकोण यांनी पुरुष बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत पहिले स्थान भूषवले आहे.लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेत्या सायनाने कारकीर्दीत १४ आंतरराष्ट्रीय जेतेपदे मिळवली आहेत. प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.
0
पोहरादेवी येथील रामनवमी उत्सवास ना. संजय राठोड यांची भेट
यवतमाळ, दि. २८ – बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे आयोजित रामनवमी उत्सवास आज शनिवारी राज्याचे महसूल राज्यमंत्री, यवतमाळचे पालकमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन श्री संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
देशभरातील लाखो भाविक या उत्सवात सहभागी झाले होते. ना. संजय राठोड यांनी यावेळी उत्सवात सहभागी भाविकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर ना. राठोड यांनी संत रामराव
महाराज यांचे आशीर्वाद घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार, दिग्रस तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, जि.प.सदस्य दिवाकर राठोड, उप तालुका प्रमुख सुभाष जाधव, डी.पी.चव्हाण, नामदेव राठोड, घनश्याम राठोड, मोहन नंदूरकर, कोदेलाल राठोड, राजू देशमुख आदी उपस्थित होते. पोहरादेवी येथे देशभरातून येणार्या भाविकांसाठी ना.संजय राठोड यांच्या वतीने टेन्ट उभारण्यात आले होते. या ठिकाणी पाणी, स्वच्छतागृह, रूग्णवाहिका आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येथेही ना. संजय राठोड यांनी भेट देऊन भाविकांशी चर्चा केली.










