पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 26th, 2015

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नागेश गोरख तर सचिवपदी नीलेश फाळके 0

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नागेश गोरख तर सचिवपदी नीलेश फाळके

228599_1548490250792_5698164_n190457_505158376218491_1828646982_n
यवतमाळ, दि. २७ – यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दै. हिंदुस्थानचे आवृत्ती प्रमुख नागेश गोरख यांची तर सचिवपदी दै. सकाळचे उपसंपादक नीलेश फाळके यांची अविरोध निवड झाली.
जिल्हाध्यक्ष नितिन पखाले, सचिव राजकुमार भितकर यांचा कार्यकाळ संपली. त्यामुळे आज २७ मार्च रोजी अध्यक्ष व सचिवपदाच्या निवडीसाठी पत्रकार भवनमध्ये सभेचे आयोजन केले होते.यावेळी गोरख व फाळके यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ पत्रकार गणेश बयास तर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिरुद्घ पांडे, रघुविरसिंह चौहाण यांनी काम पाहीले. यावेळी मावळते अध्यक्ष नितिन पखाले यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते.

 

March 26, 2015 in महाराष्ट्र
योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा राजीनामा 0

योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा राजीनामा

yogendra-yadav
नवी दिल्ली- ‘आप’मधील केजरीवाल समर्थक व विरोधकांमधील मतभेद अधिक तीव्र होत आहेत. आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा गुरुवारी राजीनामा दिला.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित केली होती. त्यात पक्षात समेट घडवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
भूषण आणि यादव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकण्याच्या निर्णयावर केजरीवाल ठाम होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रशांत भूषण यांनी पक्षाविरोधात काम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

March 26, 2015 in मुख्य पान
शालीमार एक्स्प्रेसमध्ये टीसीवर हल्ला 0

शालीमार एक्स्प्रेसमध्ये टीसीवर हल्ला

2015-03-27~tc_ns
नाशिक, दि. २७ – तिकीट मागितले म्हणून प्रवाशांनी टीसीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शालीमार एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेले तिकीट निरीक्षक चुनीलाल गुप्ता यांना उपचारांसाठी तातडीने इगतपुरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भूसावळ येथे ड्युटीवर असलेले गुप्ता बुधवारी रात्री तिकीट तपासण्यासाठी हावडा ते लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेसच्या डब्यात चढले. नाशिकरोडहून रात्री साडेबाराच्या सुमारास गाडी सुटल्यानंतर त्यांनी दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना दार लावून घेण्यास सांगत तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र त्या प्रवाशांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तिकीट दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर गुप्तांनी त्यांना जनरल बोगीत जाण्यास सांगितले असता त्या प्रवाशांना राग आणि एकाने गुप्तांच्या चेहे-यावर वस्त-याने वार केले. त्यामुळे गुप्ता जबर जखमी झाले आणि जबर गोंधळ उडाला. गाडी देवळाली स्टेशनजवळ पोहोचताचे ते दोघे आरोपी उडी मारून फरार झाले. इतर प्रवाशांनी गुप्तांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

March 26, 2015 in मुख्य पान
राष्ट्रीय बंजारा टायगर्स तीव्र आंदोलन छेडणार 0

राष्ट्रीय बंजारा टायगर्स तीव्र आंदोलन छेडणार

IMG_20150326_094944
ठाणे, (सतिष राठोड)
बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी राष्ट्रीय सामाजिक संघटना, राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचा ५ वा वर्धापन दिन सोहळा २५ मार्च रोजी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात आला असून त्याचबरोबर १८ मार्च रोजी गोर बंजारा संविधानिक हक्क महासमितीच्या वतीने झालेल्या मोर्चाचे सरकारने उत्तर न दिल्यामुळे राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून बंजारा समाजाच्या अनेक मागण्यांचा समावेश निवेदनात केले आहे, जर सरकारने बंजारा समाजाच्या मागण्यांचा विचार येत्या १५ दिवसात केला नाही तर राष्ट्रीय बंजारा टायगर्स
या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर रास्ता रोको,तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आत्मारामजी जाधव यांनी केले आहे.अशी माहिती राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे, कल्याण तालुका अध्यक्ष सतिष राठोड यांनी डाॅ. अश्विनी जोशी,जिल्हाधिकारी ठाणे,यांना निवेदनाद्वारे दिली असुन बंजारा समाजाच्या मागण्यांविषयी १५ दिवसात विचार केला नाही तर तीव्र आंदोलन रा.बंजारा टायगर्सच्या वतीने छेडण्यात येईल. निवेदन देतांना डाॅ.अरविंद पवार,डाॅ.बी.आर.राठोड,कृष्णा चव्हाण,विनोद राठोड, बालाजी चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 

March 26, 2015 in महाराष्ट्र
गोहत्येप्रकरणी पहिला गुन्हा 0

गोहत्येप्रकरणी पहिला गुन्हा

images
नाशिक – महाराष्ट्र सरकारनं गोकायदा वंशहत्या बंदीचा लागू केल्यानंतर या कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात या गुन्ह्याची नोंद झाली असून दोन गायींच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपींच्या दुकानातून १५० किलो मांसही जप्त करण्यात आलं आहे.

मालेगावातील एका दुकानात गायीच्या मांसाची बेकायदा विक्री सुरू असल्याची तक्रार बुधवारी संध्याकाळी आझाद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे आली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक संबंधित दुकानावर पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच दुकानवाले पळून गेले. स्थानिकांच्या चौकशीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी आहे. गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा असून त्यासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद आहे.

March 26, 2015 in मुख्य पान
खुनातील आठ आरोपींना जन्मठेप 0

खुनातील आठ आरोपींना जन्मठेप

images4
यवतमाळ, दि. २६ – ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावर येथील एका युवकाचा शारदार शस्त्राने वार करून खुन केल्याप्रकरणी आठही आरोपींना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश डि.व्ही. ठाकरे यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला. राजू दुर्गाप्रसाद गुप्ता (४०), गेंदलाल दुर्गाप्रसाद गुप्ता (४६), जावेद शहा बशीर शहा (३२), शेख हमीद शेख अफजल (३३), अब्दुल राशीद शेख अफजल (३३), मुस्ताक शहा मदार शहा (३८), फरहान शहा मुक्कदर शहा (२८), शेख लालु शेख अप्पु कुरेश (२८) सर्व रा. सावर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.
१० नोव्हेंबर २०११ रोजी मृतक अजय उर्फ केटू स्वरुपसिंग चव्हाण रा सावर याच्यासोबत आरोपी राजू याने माझ्या घरा समोर शिवीगाळ का केली या कारणावरून वाद केला. त्यानंतर राजूने आपल्या जवळील धारदार शस्त्राने अजयच्या गळ््यावर वार केले. तर उर्वरीत सातही आरोपींनी धारदार कुºहाड, चाकु, लोखंडी पाईप यासह अन्य शस्त्रांनी वार केल्याने अजय जागीच ठार झाला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी मृतकचा भाऊ विजय चव्हाण याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपींनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार शस्त्राने खुन केल्याचे नमुद केले होते. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम १४३, १४७,१४८, १४९, ३०२, ३४१, १२० (ब), ४/२५ आर्म अ‍ॅक्ट, १३५ मुंबई पोलीस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी आरोपींना अटक करून त्याच्याकडील शस्त्र जप्त केले व तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश डि.व्ही. ठाकरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुणावनी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने प्रत्यक्षदर्शी फिर्यादी विजय चव्हाण, साक्षीदार राजू व्यास, वैद्यकीय अधिकारी त्रिशुल पडोळे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळू गायगोले याच्यासह एकुण १२ जणांची साक्ष तपासण्यात आली. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आठही आरोपींना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने पि.व्ही. गाडबैले यांनी काम पाहीले.

March 26, 2015 in मुख्य पान
व्हिएतनाममध्ये औद्योगिक दुर्घटना, १४ ठार 0

व्हिएतनाममध्ये औद्योगिक दुर्घटना, १४ ठार

Industry
हानोय – मध्य व्हिएतनामच्या औद्योगिक परिसरात लोखंडी गजाचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौदा मजूर ठार झाले असून, ३० मजूर जखमी झाले आहेत.
हा तिन्ह प्रांतातील वंग अंग आर्थिक क्षेत्रात बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. काही मजल्यांचे हे लोखंडी गजाचे बांधकाम होते. दुर्घटनास्थळी बचाव मोहिम सुरु असून, व्हिएतनामचे सैन्य पथक आणि पोलिस या बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत.
अजूनही काही मजूर ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. बांधकाम स्थळी हजारो कामगार काम करत आहेत.

 

March 26, 2015 in देश-विदेश
पंतप्रधानांशी खुल्या चर्चेस आम्ही तयार – अण्णा हजारे 0

पंतप्रधानांशी खुल्या चर्चेस आम्ही तयार – अण्णा हजारे

images (3)
पुणे – भू संपादन कायद्याविरोधात भाजपा सरकारविरोधात निर्दशने करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कायद्याताली वादग्रस्त कलमांसंबंधी खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
भू संपादन कायद्याविरोधात गडकरींनी विरोधी पक्षांना चर्चेचे निमंत्रण दिल्याप्रकरणी अण्णांना विचारले असता ते म्हणाले, गडकरी यांचा गृहपाठ कच्चा आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसह या कलमांवर खुली चर्चा करण्यास तयार आहोत.
‘लोकांनाही ही खुली चर्चा पाहू द्या आणि या कायद्यातील मुद्दे समजून घेऊ दे’, असे अण्णा यांनी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना भू संपादन कायद्याबाबत खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले होते.

 

March 26, 2015 in मुख्य पान
भारताचा दारुण पराभव, विश्वचषकातील आव्हान संपुष्टात 0

भारताचा दारुण पराभव, विश्वचषकातील आव्हान संपुष्टात

AP3_26_2015_000078B
सिडनी- विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर भारताच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताचा दारुण पराभव झाला. यासोबतच भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.
विश्वचषकातील पहिल्या सामन्यापासून भारताने विजयी मालिका कायम ठेवली होती. मात्र उपांत्यफेरीच्या सामन्यात ही मालिका अखेर खंडित झाली. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत सातव्यांदा अंतिम फेरी गाठली.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३२९ धावांचे मोठे आव्हान गाठताना भारताला ४६.५ षटकात केवळ २३३ धावा करता आल्या. भारतीय फलंदाजांची पडझड सुरु असताना एका बाजूने मैदानात किल्ला लढवत महेंद्रसिंग धोनीने भारताच्या विजयाच्या आशा थोड्या पल्लवित केल्या होत्या. मात्र तो बाद झाला आणि विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. धोनीने ६५ चेंडूत ६५ धावा केल्या.
यापूर्वीच्या सात सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करणारे भारताचे फलंदाज आणि गोलंदाज ऑस्ट्रेलिया संघापुढे निष्प्रभ ठरले. सात सामन्यांमध्ये ७० बळी घेणा-या भारतीय गोलंदाजाची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र चांगली झाली नाही. वेगवान मारा कऱणा-या मोहम्मद शामीला या सामन्यात एकही गडी बाद करता आला नाही. उमेश यादवने चार गडी बाद केल्याने ऑस्ट्रेलियाला ३२८ धावांवर रोखण्यात भारताला यश मिळाले होते.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्ही़ड वॉर्नरला (१२) बाद करुन भारताला पहिले यश झटपट मिळाले. सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (१२) धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला कोहलीकरवी झेलबाद केले. मात्र स्मिथ आणि फिंचने दुस-या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक १८२ धावांची भागीदारी केली.
शानदार शतक साकारुन ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देणारा स्टीवन स्मिथ (१०५) धावांवर बाद झाला. स्मिथने ९३ चेंडूत (१०५) धावा केल्या. स्मिथच्या शतकी खेळीत अकरा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. उमेश यादवने स्मिथला रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
स्मिथ बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेल आणि फिंचने तिस-या विकेटसाठी झटपट ३५ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच अश्विनने त्याला (२३) धावांवर रहाणेकरवी झेलबाद केले. त्यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या फिंचला (८१) धावांवर उमेश यादवने शिखर धवनकरवी झेलबाद झाला.
स्टीवन स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला होता. मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच पाठोपाठ ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कही (१०) धावांवर बाद झाला. त्याला मोहितने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. मात्र फॉकनर (२१) आणि वॉटसनने (२८) फटकेबाजी करत धावगती कायम ठेवली. याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३२९ धावांचे अवघड लक्ष्य दिले होते.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२९ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र हेझलवूडच्या गोलंदाजीवर शिखर धवन ४५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली अवघी एक धाव काढून तंबूत परतला. जॉन्सनच्या उसळत्या चेंडूवर हूक मारण्याचा मोह कोहलीला आवरता आला नाही. तर हेझलवूडच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शिखर धवनने (४५) मॅक्सवेलकडे झेल दिला.
अजिंक्य रहाणेने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे ४४ धावा करुन तंबूत परतला. त्याने पाचव्या विकेटसाठी कर्णधार धोनीसह ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेला रविंद्र जाडेजाही अवघ्या १६ धावा करुन धावबाद झाला.
त्यानंतर सुरेश रैना (७) फॉकनरच्या चेंडूवर हॅडिनकडे झेल देत बाद झाला. भारतीय फलंदाजांची पडझड सुरु असताना एका बाजूने मैदानात भक्कम पाय रोवून उभा असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी (६५) धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने विजयाचा अर्धा गड जिंकला.
आर अश्विन पाच धावांवर त्रिफळाचीत बाद झाला. तर मोहित शर्मा आणि उमेश यादव भोपळा न फोडताच माघारी परतल्याने भारताचा डाव ४६.५ षटकात २३३ धावांमध्ये आटोपला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- सात बाद ३२८
भारत- ४६.५ षटक सर्वबाद २३३
सामनावीर- स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

March 26, 2015 in क्रीडा
रामनवमी शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी होणार 0

रामनवमी शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी होणार

download (1)
यवतमाळ ,दि. २६ – यवतमाळला सांस्कृतीक वैभवात थर घालणारी रामनवमी शोभायात्रा शनिवार २८ मार्च रोजी निघणार आहे. या शोभायात्रेच्या भव्य आयोजनासाठी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती सज्ज झाल्याची माहिती आयोजन समितीचे राम लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामनवमीला दु. २ वा. जयहिंद चौकातील राममंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ होईल तत्पूर्वी विश्वहिंदू परिषदेचे केंद्रीय विनायक देशपांडे आणि प्रांत कोषाध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रामरथावरील श्रीराम मुर्तीचे पुजन होईल. शोभायात्रेकरिता यावर्षी रबराचा नवीन आकर्षक रथ साकारण्यात आला आहे. यवतमाळातील तरुण, तरुणी उदयास आलेले ‘शिवसमर्थ ढोल – ताशा पथक’ यावर्षी शोभायात्रेत सहभागी होवून रोहर्षीक वादन करणार आहे. टाळ मृदुंगाचा गजर करीत भजनी मंडळ व लेझीम पथकासह, दिंड्या, रामयणकालीन प्रसंगावर आकर्षक झॉकी, सामाजिक प्रबोधनात्मक विविध चित्ररथ व कला क्रिडागुणांचे सादरीकरण करणारे आखाडे, भन्नाटी, लाठ्याकाठ्या, दांडपट्टा व वाद्यवृंदाचा समावेश या शोभायात्रेत करणार आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. संत सेना चौकात शोभायात्रा समारोपप्रसंगी ५१ विवाहीत जोडप्यांच्या हस्ते श्रीरामाची सामुहिक आरती होणार आहे. संपूर्ण शोभायात्रे दरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी ४०० बजरंग दलाचे कार्यकर्ते सज्ज राहणार आहेत. यवतमाळ करांनी या शोभायात्रेत सहकुटूंब सहभागी होवून शोभायात्रेची शोभा वृद्घींगत करावी असे आवाहन विजय सिंघानिया, राम लोखंडे, मनोज औदार्य, अनुप चमेडीया, अजय चव्हाण व शोभायात्र समितीने केले आहे.

March 26, 2015 in विदर्भ
स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ 0

स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ

download
यवमाळ दि. २६ – स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना आज दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामाजवळ सकाळी उघटकीस आली. अनैतिक संबधातून घडलेला हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे.
शहरातील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या शासकीय गोदामाजवळ मोकळी जागा आहे. या ठिकाणचा शौचालयासाठी वापर केला जातो. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास तेथून जात असताना, त्याला एका हिरव्या पनीत काहीतरी बांधून असल्याचे दिसून आले. त्याने जवळ जाऊन पाहल्यानंतर त्याला पनीत स्त्री जातीचे अर्भक आढळले. याची चर्चा सर्वत्र पसरातच बघ्यांची गर्दी झाली. शहारात तीन पोलीस स्टेशन असल्यामुळे पुन्हा हद्दीचा वाद झाला. शिवसनेचे पराग पिंगळे यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे जमादार घटनास्थळी आले. हिरवी पन्नी शासकीय रुग्णालयाची असल्यामुळे बाळाने कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन्म दिला असावा, असा तर्क काहीनी लावला. सोबतच पिवळी बॅग असल्यामुळे बॅगमध्ये बाळाला आणल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. स्त्री चा तिरस्कार आजही होत असून, तिची निर्घूनपणे हत्या करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत वडगावरोड पोलीस स्टश्ोनला तक्रार देण्यात आली आहे. अनैतिक संबधातून बाळ जन्मलेले असावे व पाप लपविण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

 

March 26, 2015 in विदर्भ