
दिग्रस, दि. २९ – झेरॉक्स सेंटरला लागलेल्या आगीत मशिनसह दस्तऐवज जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी ११ वाजता दरम्यान पंचायत समिती परिसरात घडली. यात तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पंचायत समिती बाजुला समृद्धी झेरॉक्स न्यू क्रांती बचत पुरूष गटाद्वारे चालविल्या जात होते. या ठिकाणी ४ झेरॉक्स मशीन, १ लॅमिनेशन मशीन व इतर कागदपत्रे आगीत जळून खाक झाली. या बाबतची तक्रार दिग्रस पो. स्टे. ला गजानन भोगराज राठोड यांनी दिली आहे.
आग लागल्याची घटना काही नागरिकांच्या लक्षात येताच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रफुल्ल व्यवहारे, नवलकुमार ठोंबे, अशोक जाधव, किशोर कांबळे, संजय पोटे, पकंज ढोले, सुर्वे, महल्ले, ठेकेदार, इम्रान पटेल, रावत इंजिनिअर, ग्रामसेवक मंगल अंबोरे आदींनी पुढाकार घेतला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून ही आग नेमकी कशी लागली हे कळू शकले नाही.
























