पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 21st, 2015

भाजप आमदाराचा मुलगा शिपाई होणार 0

भाजप आमदाराचा मुलगा शिपाई होणार

career
जयपूर -सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा मुलगा शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज करतोय हे ऐकल्यावर भारतात कोणालाही धक्काच बसेल. पण ही सत्यघटना आहे. राजस्थानमध्ये भाजप आमदार हिरालाल वर्मा यांचा मुलगा हंसराज याने राजकारणात प्रवेश करण्याऐवजी चक्क अजमेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चतुर्थ श्रेणीत शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला आहे.
आठवी पास हंसराज याला स्वतःच्या राजकीय सामर्थ्याचा गैरवापर करुन मोठे करण्याऐवजी कुवतीनुसार योग्य ती नोकरी करण्याची सूचना हिरालाल वर्मा यांनी केली होती. या सूचनेनुसार हंसराजने सरकारी नोकरीसाठी नियमानुसार अर्ज केला आहे. सलग दोनवेळा टोंक जिल्ह्यातून आमदार झालेल्या हिरालाल वर्मा यांनी मुलगा पात्रतेच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन शिपाई झाल्यास आनंद वाटेल असे सांगितले.
प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे काम करावे असा विचार करणा-या हिरालाल वर्मा यांनी मुलाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. सध्या हंसराज निवाई येथे एका खासगी दवाखान्यात दरमहा पाच हजार रुपये पगाराची नोकरी करत आहे. सरकारी नोकरी मिळाल्यास त्याच्या वैयक्तिक आर्थिक सुरक्षेत वाढ होईल. महत्त्वाचे म्हणजे ही प्रगती हंसराज स्वतःच्या प्रयत्नांनी करेल त्यामुळे मुलाच्या अर्जाचे पुढे काय होते याकडे वडील या नात्याने मी उत्सुकतेने बघत असल्याचे हिरालाल वर्मा म्हणाले.

 

पंचांमुळे भारत जिंकला – बांगलादेश पंतप्रधान 0

पंचांमुळे भारत जिंकला – बांगलादेश पंतप्रधान

Sheikh_Hasina-e1389675700905
नवी दिल्ली – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत भारताने बांगलादेशचा थोडयाथोडक्या नव्हे तर, तब्बल १०९ धावांनी दारुण पराभव केला. मात्र आपला पराभव टीम इंडियाने नव्हे तर, पंचांनी केला अशी बांगलादेशमध्ये अनेकांची भावना आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचीच ‘री’ ओढत पराभवासाठी पंचांना जबाबदार धरले आहे. पंचांनी चूक केली नसती तर, भारताला बांगलादेशला हरवता आले नसते.
पंचांच्या चूकीमुळे भारताला उपांत्यफेरी गाठता आली असे शेख हसीना यांनी म्हटले आहे. शुक्रवारी आयसीसीचे बांगलादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता.
त्यांनी खराब पंचगिरीवरुन आयसीसीचे अध्यक्षपद सोडण्याचीही धमकी दिली आहे. पंचांचे निर्णय आधीपासूनच फिक्स वाटत होते. आयसीसीचा अध्यक्ष म्हणून मला जे काही सांगायचे आहे ते मी पुढच्या बैठकीत बोलणारच आहे असे कमाल यांनी सांगितले.
रोहित शर्मा (९०) धावांवर असताना रुबेल हसनच्या कमरेच्या थोडयावर आलेल्या फुलटॉस चेंडूवर झेलबाद झाला. मात्र पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरवला. रोहितने या जीवदानाचा फायदा उचलत आणखी ४७ धावांची भर घातली त्यामुळे भारताला तीनशेचा टप्पा ओलांडता आला. पंचांनी संशयाचा फायदा फलंदाजाला दिला तर, त्यासाठी पंचांना सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही तसेच भारतानेही सरस कामगिरी केली मात्र बांगलादेशला अजून हे सत्य पचवता आलेले नाही.

 

हाशीमपूर हत्याकांड, यूपीच्या १६ पोलिसांची सुटका 0

हाशीमपूर हत्याकांड, यूपीच्या १६ पोलिसांची सुटका

Gujarat-riots
नवी दिल्ली – देशाचे राजकारण हलवून सोडणा-या हाशीमपूर हत्याकांड प्रकरणात २८ वर्षानंतर निकाल आला असून, दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने शनिवारी सबळ पुराव्याअभावी १६ आरोपींची सुटका केली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय जिंदाल यांनी उत्तर प्रदेश पोलिस दलातील पीएसीच्या १६ जवानांची हत्येच्या आरोपातून सुटका केली. हाशीमपूर हत्याकांडात ४० हून अधिक मुस्लिमांची हत्या झाली होती.
१९८७ साली मेरठ शहरात दंगल उसळलेली असताना शोध मोहिमे दरम्यान पीएसीच्या जवानांनी हाशीमपूरयेथून मुस्लिमांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी १९९६ साली गाझियाबादच्या मुख्य न्याय दंडाधिका-यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
हत्याकांडात बळी पडलेल्यांचा कुटुंबियांनी निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर २००२ मध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी दिल्ली तीस हजारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. १९ आरोपींपैकी तिघांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला.

March 21, 2015 in देश-विदेश
शेतक-यांना नुकसान भरपाई द्या – सोनिया गांधी 0

शेतक-यांना नुकसान भरपाई द्या – सोनिया गांधी

Sonia in Rewari
भिवानी – बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे संकटात सापडलेल्या शेतक-याला मदत करण्याची जबाबदारी केंद्रात आणि हरयाणात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारची आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमध्ये पीकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. आज आपला अन्नदाता संकटात सापडला आहे.
शेतक-यांची सध्याची अवस्था पाहता त्याला मदत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधींनी शनिवारी हरयाणाचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थिती समजून घेतली. काँग्रेसने सध्या शेतक-यांच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकालाही काँग्रेसने जोरदार विरोध केला असून, संसदीय मार्गाने आणि रस्त्यावर या विधेयकाविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे. या विधेयकाविरोधात सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत.

 

माहुर येथे पाचव्या धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन 0

माहुर येथे पाचव्या धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन

IMG-20150321-WA0053
माहुर (नांदेड) दि. २१ – जे वकळ एकाते त्यावर विश्वास ठेऊ नका. जे केवळ धर्मग्रंथात लिहीले आहे. म्हणून त्यावर विश्वार ठेऊ नका जे बुध्दीला पटते त्यावर विश्वास ठेवा. बुध्दीप्रमाणे वाद हीच बुद्घधम्माची शिकवण आहे असे प्रतिपादन समता परिषदेचे अध्यक्ष अप्पाराव मैंद यांनी केले.
बौद्घभूमि परिसर माहुर येथे आज शनिवारी २१ मार्च रोजी आयोजीत पाचव्या धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सकाळी भदंत बी. अश्वजीत यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मफेरी काढण्यात आली. पंचशिल धम्मध्वारोहनानंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुरूवातीला वामनदादा कर्डक संगीत अकादमी किनवट द्वारा प्रा. सुरेश पाटील यांनी अभिवादन गित सादर केले. उद्घाटन समारंभाच्या प्रास्तविकातून गोकुलदार वंजारे यांनी धम्माचे आचरण साधे मानव जिवन जगण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तर जेतवनचे सदस्य प्राचार्य के.व्ही. मुनेश्वर यांनी बौद्घ धम्म दु:ख निवारण्याचा मार्ग असल्याचे सागितले. माहुरचे माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे यांनी बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी वाचण संस्कृतीवर भर देऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमात उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर , कॉ. गोविंद पानसरे, शाहीर साबळे यांना आदरांजलीचा ठराव पारीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन उत्तम कानिंदे यांनी तर आभार श्रीरंग जगताप यांनी मानले. सयोजन व्ही.के. सिरसाट यांनी केले होते. यावेळी जयवंत पाटील, नगर परिषद सभापती राज गंधेवाड, धम्म परिषदेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, निमंत्रक गोविंद मगरे, स्वागताध्यक्ष मनोज किर्तने, मिलींद सर्पे उपस्थित होते. यावेळी भदंत प्रा. सुमेथबोधी महाथेरो, भदंत विपशी स्थवीर, भदंत धम्मवश थेरो, भदंत अश्वजीत, भदंत राहुल आचार्य यांनी धम्मदेसना दिली. संचालन सुरेश पाटील यांनी तर आभार प्रल्हाद भवरे यांनी मानले.

 

March 21, 2015 in महाराष्ट्र
शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा पकडला 0

शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा पकडला

WP_20150321_16_48_47_Pro
यवतमाळ, दि. २१ – काळ््याबाजारात जात असलेला शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा पांढरकवडा – कळंब बायपासवरील व्हेअरहाऊसमध्ये आज शनिवारी पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एसडीपीओच्या पथकाने ही कारवाई केली असून, सोनू बेग (२८) रा. कळंब चौक याला ताब्यात घेण्यात आले आहे.
शालेय पोषण आहार योजनेत प्रचंड गैरप्रकार होत असल्याची आरोड नेहमीच होते. जिल्’ातील शाळांना दरमहा धान्याचा पुरवठा करण्यासाठी येथील पांढरकवडा – कळंब बायपासवरील व्हेअरहाऊसमध्ये धान्याचे पोते ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या गोदामात धान्याची दरमहा अफरातफर केली जात होती. धान्य पांढºया पोत्यात भरून त्याची काळ््याबाजारात खुलेआम विक्री केल्या जात होती. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने व्हेअरहाऊसवर धाड टाकली. यावेळी धान्याची अफरातफर करताना पथकाने रंगेहात पकडले. एक हजार कट्टे जप्त करण्यात आले असून, सोनू बेग याला ताब्यात घेण्यात आले आहे. धान्याचा विषय जिल्हा पुरवठा विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पथकाने जप्त केलेला माल जिल्हा पुरवठा विभागाच्या स्वाधिन केला आहे.

 

March 21, 2015 in विदर्भ
यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेची निवडणूक 27 ला 0

यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेची निवडणूक 27 ला

pss
यवतमाळ. यवतमाळ शहरातील सर्व पत्रकारांना सूचित करण्यात येत आहे कि, यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेची निवडणूक येत्या 27 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता येथील पत्रकार भवनात होईल. त्यामुळे ज्या पत्रकारांनी सदस्यता शुल्क 150 रुपये देऊन सदस्यत्व घेतले नाही, त्यांनी 27 मार्चच्या दुपारी 12 वाजे पर्यंत सदस्यत्व घेवुन पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेत भाग घ्यावा. 27 च्या 12 वाजेनंतर सदस्यत्व घेता येणार नाही याची नोंद वी. कारण या वेळेच्या अर्धा तासानंतर निवडणूक होणार आहे. त्यामुळे खालील ठिकाणी सदस्यत्व शुल्क भरून आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी ही नम्र विनंती.
बीरेंद्र चौबे मो.नं. 9890417177 (नवभारत कार्यालय, तिरंगा चौक यवतमाळ)
नागेश गोरख मो. नं. 9423131710 (हिन्दूस्थान कार्यालय, चिंतामणी
कॉम्प्लेक्स, दारव्हा रोड, यवतमाळ)

March 21, 2015 in विदर्भ
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला 0

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

Encounter in Jammu
जम्मू- कथुआ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर शनिवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी सांबा जिल्ह्यातील लष्करी तळाजवळ जोरदार गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.
सकाळी पाच वाजून ५० मिनिटांच्या सुमारास दहशतवाद्यांनी सांबामधील लष्करी तळाजवळील गोळीबार केला. यामध्ये एक नागरिक जखमी झाला. पपू यादव असे या नागरिकाचे नाव असून त्याला उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सुरक्षा अधिका-यांनी सांगितले.
गेल्या २४ तांसात दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. या दहशतवाद्याने मेशावर भागातील बुचारी येथील लष्कर ६६३ युनिटजवळही ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला केला. संपूर्ण परिसराला सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला असून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. जम्मू-पठाणकोट महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
शुक्रवारीच फियादीनच्या दहशतवाद्यांनी कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यामध्ये तीन सुरक्षा रक्षक, दोन नागरिक ठार झाले तर ११ जण जखमी झाले. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले.

March 21, 2015 in मुख्य पान
 राज्यभरात नववर्षाचा उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा 0

राज्यभरात नववर्षाचा उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Gudi-Padwa12
मुंबई – चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू नववर्षातील पहिला दिवस. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण जल्लोषात, मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये नववर्षानिमित्त शोभायात्रा उत्साहात पार पडत आहेत.
हिंदू नववर्षाआरंभी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष भरभराटीचे, आरोग्यदायी आणि आनंदी जावो असे पंतप्रधानांनी ट्विटवर म्हटले आहे.
गुढीपाडव्यासोबतत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी उगडी, चेती चंद, नवरेहच्याही नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

पालकमंत्री संजय राठोड यांनी उभारली जनतेच्या समृद्धीची गुढी 0

पालकमंत्री संजय राठोड यांनी उभारली जनतेच्या समृद्धीची गुढी

unnamed (1)
यवतमाळ, दि. २१ – मांगल्याचं प्रतीक असलेला गुढीपाडवा जनतेच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंदासह आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज शनिवारी चैत्र प्रतिप्रदेनिमित्त कुटुंबासमवेत येथील टिळकवाडीस्थित आपल्या घरी गुढी उभारली. हे नवीन वर्ष तमाम जनतेला अधिक सुखकारक ठरून, सध्या निसर्गाच्या लहरीपणाने संकटात असलेल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यातही सुखाची पेरणी करेल, असा आशावाद यावेळी ना. संजय राठोड यांनी व्यक्त केला.चैत्र महिना हा मराठी महिन्यातला पहिला दिवस असून अनेक चांगल्या कामांची सुरूवात, नवीन संकल्प हे आजच्या दिवसापासून केले जातात. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि येथील शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेच्या कल्याणाची कामे आपल्या हातून सदैव घडावी यासाठी ईश्वराने आपल्याला काम करण्याची अधिक ऊर्जा द्यावी आणि जनतेचे प्रेम व सहकार्य असेच मिळत राहावे, अशी प्रार्थना याप्रसंगी ना. संजय राठोड यांनी केली. यावेळी ना. संजय राठोड यांच्या सहचारिणी सौ. शीतल, मुलगी दामिनी, मुलगा सोहम यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य, शिवसेनेनचे पदाधिकारी, शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

March 21, 2015 in विदर्भ