
पांढरवकडा, दि. २४ – निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी राहत आहे. बोरगाव येथील शेतकºयाने कृषी केंद्रातून किटकनाशक औषध विकत घेऊन रस्तयाने पायी चालत असताना विष प्राशन केले. रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज मंगळवारी २४ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली.
तानबा वाघू तोडसाम (४०) रा. बोरगाव (कडू) असे शेतकºयाचे नाव आहे. यावर्षी गारपिट व अतिवृष्टीने हाती आलेले पिक मातीमोल झाले. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. तीन महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असून त्यासाठी पैसे कुठून आणायचे, सावकार व बँकेचे कर्ज कसे परत करायचे, कुटूंबाचा गाडा कसा हाकायचा यासह विविध प्रश्न त्याच्या समोर उभे ठाकले आहे. नैराश्याच्या गर्तत सापडलेल्या या शेतकºयाने पांढरकवडा गाठले. शहरातील लोहार लाईनमधील एका कृषी केंद्रातून किटकनाशक औषध विकत घेतले. तेथून रस्त्याने पायी जात असतानाच किटकनाशक प्राशन केले. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच सदर शेतकºयाला उपजिल्हा रुग्णालयात नेत होते. अशातच वाटेतच शेतकºयाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Archive for March 24th, 2015
0
शेतकºयाने घेतला विषाचा घोट, वाटेत मृत्यू
0
वणी तालुक्यात वाघाची दहशत, दोन कालवडी ठार

वणी, दि़२४ – तालुक्यामध्ये वाघाने गत काही महिन्यापासून चांगलीच दहशत निर्माण केली आहे़ यामुळे शेतकरी शेतमजूरासह नागरिकात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ दि़२३ मार्चला मध्यरात्री शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन कालवडीचा वाघाने फडशा पाडला़
वणी, झरी व मारेगांव या तीन्ही तालुक्यामध्ये जंगलव्याप्त परिसर मोठा आहे़ गत एक वर्षापासून सातत्याने होत असलेले वाघ्रदर्शन तसेच मानवप्राण्यावर होणारे हल्ले नियमित झाले आहे़ झरी जामणी तालुक्यामधील दुभाटी पोड येथील महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली़ वाघाने अनेक पशुधनाचा फडशा पाडला़ यामुळे शेतकरी शेतमजूर वर्गात कमालीची दहशत निर्माण झाली आहे़ जंगलालगत असलेल्या शेतामध्ये शेतीकामाकरीता जाण्यास मजूरवर्ग धजावत नाही़ तालुक्यात आठ-दहा दिवसाच्या अंतराने पशूधनावर वाघाचे हल्ले सुरूच आहेत़ दहेगांव येथील भाऊराव बापूराव गोहोकार व दिलीप मारोती महाकुलकार या शेतकºयांची जणावरे शेतातील गोठ्यात बांधण्यात येतात़ मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला करुन दोन कालवडीचा फडशा पाडला़ ही बाब सकाळी संबंधीत शेतकºयांना माहित होताच त्यांनी ग्रामस्थांना सांगीतले़ तसेच वनविभागाला सुचित करण्यात आले़ परंतू तीन्ही तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदने देवून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली होती़ मात्र ठोस उपाययोजना वनविभागाकडून होतांना दिसत नाही़ यामुळे परिसरातील, नागरिक, शेतमजूर व शेतकरी प्रचंड दहशतीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़
0
नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई- कोण आला रे कोण आला .. काँग्रेसचा वाघ आला. काँग्रेस पक्षाचा विजय, नारायण राणे आगे बढो .. हम तुम्हारे साथ है.. अशा गगनभेदी घोषणांनी वांद्रे पूर्व परिसर दणाणून गेला. सर्व जातीधर्मातील लोकांच्या उपस्थितीत, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रत्येकाच्या मनात जिंकण्याचा निर्धार, अशा उत्साही वातावरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (गवई) गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पहिल्या मिरवणुकीतच वांद्रे पूर्वचे वातावरण पूर्णपणे काँग्रेसमय होऊन गेले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती मिळताच या भागातील सर्व जाती, धर्म आणि वेगवेगळ्या प्रांतातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले. खेरवाडी नाक्यावरून मिरवणुकीने नारायण राणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले तेव्हा काँग्रेसच्या झेंड्यांनी वातावरण फुलून गेले होते. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या मिरवणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार नसीम खान, माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार वर्षा गायकवाड, आमदार जनार्दन चांदूरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे राजेंद्र गवई, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय दिना पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (गवई गट)चे हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक जसजशी पुढे सरकत होती, तसे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक नारायण राणे यांना शुभेच्छा देत होते. अनेकांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन राणे यांना शुभेच्छा दिल्या. निवडणूक कार्यालयाजवळ मिरवणूक पोहचली तेव्हा खेरवाडी, भारत नगर, बेहराम पाडा, एमआयजी कॉलनी, शासकीय वसाहतीतील हजारो लोक जमा झाले होते. सर्वांना अभिवादन करून नारायण राणे यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
0
आरक्षण न दिल्यास मंत्र्यांच्या गाड्या फोडू!

मुंबई : ‘अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत तर दिसेल तिथे मंत्र्यांच्या गाड्या फोडू’, असा इशारा माजी आमदार प्रकाश (अण्णा) शेंडगे यांनी दिला आहे. सोमवारी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाला उद्देशून शेंडगे बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर हजेरी लावली.
विधान परिषदेत खडाजंगी… धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून
आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी करीत विराधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. सभागृह कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. राज्य सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून धनगर आरक्षणावर चर्चा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.
0
फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळले, १४८ जणांचा मृत्यू

पॅरिस, दि. २४ – स्पेनहून जर्मनीला जाणारे एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळले असून विमानात १४२ प्रवासी व ६ कर्मचारी असे एकूण १४८ जण होते. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता फ्रान्सच्या पंतप्रधानांनी वर्तवली आहे.
स्पेनमधील बार्सिलोना येथील १४२ प्रवाशांना घेऊन एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील डूसलडॉर्फच्या दिशेने निघाले होते. विमानात एकूण सहा कर्मचारी होते. फ्रान्सच्या हवाई क्षेत्रातून जात असताना आल्स पर्वताजवळ विमानाचा रडार यंत्रणेची संपर्क तुटला. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास वैमानिकांशी संपर्क झाला होता. यानंतर काही वेळाने विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता.हे विमान आल्स पर्वत रांगाच्या परिसरात कोसळले असून विमानाचे अवशेष आढळल्याची माहिती फ्रान्स सरकारने दिली आहे. विमान ज्या भागात कोसळले तू भाग दुर्गम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विमानातील १४८ प्रवासी जीवंत असण्याची शक्यता फार कमी आहे अशी माहिती फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्यूअल वॉल्स यांनी केले आहे. अपघाताचे नेमके कार अद्याप समजू शकलेले नाही.
एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील जर्मन विंग्स या कंपनीचे होते. जर्मन विंग्स ही जर्मनीतील सर्वात स्वस्त सेवा देणारी एअरलाइन्स कंपनी आहे. अपघातातील जीवितहानी विषयी कंपनीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही या अपघाताची माहिती घेत आहोत असे ट्विट कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
0
शेतक-यांसाठी केंद्राकडून २ हजार कोटींची मदत

नवी दिल्ली, दि. २४ – अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे हवालदील झालेल्या राज्यातील शेतक-यांना अखेर केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांना अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपले होते. या नैसर्गिक आपत्तीने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले होते. नुकसानामुळे कर्जबाजारी झालेल्या काही शेतक-यांनी आत्महत्यादेखील केली होती. अखेर केंद्रासातील मोदी सरकारने शेतक-यांच्या मन की बात ओळखून राज्यासाठी मदत जाहीर केली. दिल्लीत दुष्काळ व अवकाळी पावसने झोडपलेल्या राज्यांसाठी बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधामोहन सिंह आदी उच्चस्तरीय नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.









