पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 22nd, 2015

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घातला कोट्यावधींचा गंडा 0

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घातला कोट्यावधींचा गंडा

40982-shilpa-shetty.jpg
कोलकाता, दि. २२ – कोलकाता येथील कंपनीस दहा पट पैशांचे आमीष दाखवत नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लावणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्या इसेंशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने कोलकाता येथील एम के मिडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीला दोन वर्षात १० पट परतावा मिळेल असे आमीष दाखवत त्यांना नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला सांगितले. यानुसार एम के मिडीयाने शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीत गुंतवणूकही केली. या व्यवहारानंतर शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीने इएसपीएलचे ३० लाख रुपयांचे इक्विटी शेअर्सही दिले होते. मात्र काही महिन्यांनी हा सर्व प्रकार बोगस असून इक्विटी शेअर्सही बोगस असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. याप्रकरणी एम के मिडीयाचे प्रतिनिधी देबाशीष गुहा यांनी कोलकाता येथील हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आर्थिक फसवणूक, कट रचणे अशा विविध कलमांखाली शिल्पा शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोदींच्या परदेश दौ-यावर ३१७ कोटींचा खर्च 0

मोदींच्या परदेश दौ-यावर ३१७ कोटींचा खर्च

images

दिल्ली, दि. २२ – नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान होऊन १० महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच या कालावधीत मोदी सरकारच्या परदेश दौ-यावर सरकारी तिजोरीतून तब्बल ३१७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे युपीए २ मधील मंत्रिमंडळाच्या परदेश दौ-यांपेक्षा मोदी सरकारच्या परदेश दौ-यावरील खर्चात ५८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यंच्या मंत्रिमंडळातील ६५ मंत्री यांच्या वेतन व अन्य भत्त्यांसाठी १४ कोटी रुपये खर्च झाले असून युपीएच्या ७५ सदस्यीय जंबो मंत्रिमंडळावरील खर्च व मोदी सरकारच्या मंत्रिमंडळावरील खर्च समान आहे. मोदी सरकारच्या कालावधीत मंत्री व अन्य अति महत्व्वाच्या व्यक्तींच्या ट्रॅव्हल खर्चही वाढल्याच समोर येते. यामध्ये केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्य मंत्री, माजी पंतप्रधानांच्या परदेश वारीसोबतच विद्यमान प्रधानमंत्री, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या दौ-यासाठी वापरलेल्या विमानांच्या देखभालीच्या खर्चाचा समावेश आहे. गेल्या वर्ष भऱात मोदी सरकारच्या परदेश दौ-यांवर ३१७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे मोदी सरकार या खर्चांना कात्री लावण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. २०१५ -१६ या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात मोदी सरकारने २६९ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. एकीकडे सरकारी खर्चांना कात्री लावण्याची घोषणा नरेंद्र मोदी करत असले तरी दुसरीकडे परदेश दौ-यांवरील खर्च वाढत असल्याचे दिसत आहे.

 

March 22, 2015 in मुख्य पान
संसद परिसरातील आग 0

संसद परिसरातील आग

fire-broke-out-at-parliment-copy
नवी दिल्ली – नवी दिल्लीतील संसद परिसरात रविवारी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.
एसी पॉवर युनिटमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसत आहे. सुमारे दोनच्या सुमारास संसद परिसरात आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर लगेचच घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात आल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोळ बाहेर पडत होते.

 

March 22, 2015 in मुख्य पान
बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या 0

बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या

2014-06-23~suicide11_ns
बीड- थकित वेतनासाठी धरणे आंदोलन करणा-या हिरामन साहेबराव भंडाने (३२) या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
संतापलेल्या आंदोलनकर्त्या शिक्षकांनी भंडाने यांचा मृतदेह जिल्हा परिषदेच्या दारात एक तास ठेवला होता. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शिक्षण विभागाची तत्काळ बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर भंडाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
हिरामन भंडाने हे चौसाळा केंद्रातील कोकणे वस्ती शाळेवर कार्यरत होते. शिक्षण विभागात मंजूर पदांपेक्षा शिक्षकांची संख्या अधिक झाल्याने अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांना ११ महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. यात हिरामण यांचाही समावेश आहे. प्रश्‍न न सुटल्याने या शिक्षकांनी १६ मार्चपासुन बीडमध्ये जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरु केले. याआंदोलनादरम्यान, गुरुवारी हिरामन भंडाने यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांनी गळफास लावुन आत्महत्या केली.
शिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर मागिल ११ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणी दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

March 22, 2015 in मुख्य पान
मोदींनी मन की बात नव्हे विश्वासघात केला - खासदार अशोक चव्हाण 0

मोदींनी मन की बात नव्हे विश्वासघात केला – खासदार अशोक चव्हाण

images (1)
नवी दिल्ली/मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात केली नसून शेतक-यांचा विश्वासघात केला आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. त्यामध्ये शेतक-यांना मदत आणि भूसंपादन विधेयकाबाबत देशभर गैरसमज पसरविले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
एकीकडे शेतक-यांचे हीत जोपासल्याची भूमिका बोलताय, शेतक-यांना मदत करु अशा घोषणा करताय आणि दुसरीकडे प्रत्यक्षात कोणतीही मदत केल्याचे दिसत नाही. गारपीट, अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. राज्यात ११०० पेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. असे असताना सत्ताधारी मात्र आम्ही अभ्यास करत आहोत, आमचे लोक जाऊन तेथे बघतील, परिस्थितीचा आढावा घेतील असे बोलतात. हा अभ्यास किती दिवस चालणार. शेतक-यांना आज तातडीने मदतीची खरी गरज आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे शेतक-यांचे कर्ज माफ केले नाही तर तो कसा परतफेड करेल, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
ज्यांना शेतक-यांबद्दल काही माहित नाही. शेतीबद्दल माहिती नाही. शेतकरी कशावर अवलंबून आहे, ते माहित नाही. अशा चिंताजनक परिस्थितीत तातडीने मदत करण्याऐवजी सरकारच्या पोकळ घोषणांचा काय उपयोग, अशी टिकाही चव्हाण यांनी केली आहे.
त्याबरोबर, भूसंपादन विधेयकाबाबत सरकार शेतक-यांची फसवणूक करत आहे. सरकारने जमीन संपादन करायला आमचा विरोध नाही, परंतू या कायद्यात अनेक जाचक अटी आहेत. शेतक-याला न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशा अनेक अटी त्यात आहेत. यामुळे काँग्रेससह त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा या कायद्याला विरोध केला आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्या ४० टक्क्यांनी वाढत असताना पंतप्रधान मन की बात करत आहे, शेतक-यांना ज्ञान नको कृती हवी, अशी टिका आप नेते आशुतोष यांनी केली आहे.
आजही देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत, सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि भाजपा सरकार फक्त मन की बात नावाच्या पोकळ घोषणा करत आहे, असे काँग्रेसचे सचिव अहमद पटेल यांनी सांगितले. मोदी यांनी वर्षभरापूर्वी लोकसभा प्रचारादरम्यान हझिराबाग येथे लाल बहाद्दुर शास्त्री यांची जय जवान, जय किसान अशी दिलेली घोषणा आज मर जवान, मर किसान म्हणत बदलून टाकल्याचा आरोपही पटेल यांनी केला आहे. केवळ मते मिळवण्यासाठी मोदी यांनी खोटी आश्‍वासने दिली. प्रचारादरम्यान शेतक-यांना किमान आधारभूत किंमतीत पन्नास टक्के वाढ करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र संसदेतील एका प्रश्‍नाच्या उत्तरात किमान आधारभूत किंमतीचा प्रस्ताव सरकारने नाकारल्याचेही पटेल यांनी पुढे बोलताना सांगितले.

 

March 22, 2015 in मुख्य पान
भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच - नरेंद्र मोदी 0

भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच – नरेंद्र मोदी

modi-radio_295x200_61414907744
नवी दिल्ली, दि. २२ – भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच असून या विधेयकाविरोधात काँग्रेस शेतक-यांमध्ये गैरसमज पसरवत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीने ग्रासलेल्या शेतक-यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही मोदींनी दिले आहे.
रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. या संपूर्ण कार्यक्रमात मोदींचा भर भूसंपादन विधेयकावर होता. भूसंपादन कायदा १२० वर्ष जून असून जी लोकं आता शेतक-यांचे हितचिंतक म्हणून बोलत आहेत त्या लोकांनीही याच कायद्यानुसार राज्य केले असे सांगत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला. भूसंपादनासोबतच भारतात १३ असे कायदे आहेत ज्यात भूमी अधिग्रहण करता येते, यात रेल्वे, खाण व राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे असे मोदींनी निदर्शनास आणून दिले. भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करुन शेतक-यांचे हित साधण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मोदींंनी स्पष्ट केले.
नवीन विधेयकात भूसंपादनात शेतक-यांना चार पट नुकसान भरपाई मिळेल, याशिवाय तिथे औद्योगिक कॉरिडोर झाल्यास गावातील तरुणांना रोजगारही मिळू शकेल, प्रकल्पासाठी जागा देणा-यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळेल असे आश्वासन मोदींनी दिले आहे.

March 22, 2015 in मुख्य पान
नवविवाहीतेची आत्महत्या, खून केल्याचा आरोप 0

नवविवाहीतेची आत्महत्या, खून केल्याचा आरोप

61335793378_suicide_295_200
नेर , दि. २२ – तालुक्यातील पांढरी येथील नवविवाहीतेन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता घडली. या विवाहीतेच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुना असून ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करून नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले.
संगिता योगेश ढबाले (२२) रा पांढरी असे मृतक विवाहीतेचे नाव आहे. दोन महिन्यापूर्वीच योगेश ढबाले सोबत तीचा विवाह झाला होता. अशातच आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास तीने राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. संगिताच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुना असुन तीला मारून टाकल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला असून पोलिस ठाण्यात धडक दिली. वृत्त लिहेपर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.

 

March 22, 2015 in विदर्भ
खून करून मृतदेह विहिरीत फेकला 0

खून करून मृतदेह विहिरीत फेकला

images..
दिग्रस, दि. २२ – इसमाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकल्याची घटना मोख येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्यापही पटली नसून, दिग्रस पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद करून अज्ञात मारेक्याचा शोध सुरू केला आहे.
तालुक्यातील मोख शिवारात असलेल्या विनोद नारायण चव्हाण यांच्या शेतातील विहिरीमध्ये पोत्यात मृतदेह बांधून असल्याचे ग्रामस्थांना आढळून आाले. त्यानंतर पोलीस पाटील प्रल्हाद चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिग्रस पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नसून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात मारेकºयाने मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकला असावा, असा तर्क पोलिसांनी लावला असून, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारेकºयाचा शोध घेण्यासाठी चौफेर तपास सुरू केला असून, या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान दिग्रस पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजंय जगदाळे करीत आहे.

March 22, 2015 in विदर्भ
वाघाने पाडला बैलाचा फडशा 0

वाघाने पाडला बैलाचा फडशा

vv01
आर्णी (यवतमाळ), दि. २२ – शेतात असलेल्या बैलावर झडप घालून फडशा पाडण्यात आल्याची घटना माळेगाव येथील गौरी नारायण चव्हाण यांच्या शेतात घडली.
वाघ बैलाचा फडशा पाडत असल्याचे दिसताच महिलेने आरडा ओरड केल्यानंतर वाघ पळून गेला. या घटनेची माहिती वनपाल अधिकारी चव्हाण मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यापूर्वी गावातील संतोष पोहरे, नाना चौधरी यांच्यावर शेतात जात असताना अस्वलाने हल्ला चढून गंभीर जखमी केले होते. मागील दोन महिन्यापूर्वी केळझरा, सावळी, नाईकनगर, भानसरा या परिसरात शेतकºयांना शेतात वाघाच्या पायाचे ठसे दिसले होते. वन विभागाच्या अधिकाºयांनी त्या ठशाचे निरीक्षण करून पट्टेदार वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वनविभागाने महिला शेतकºयाला नुकसान भरपाई देवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

March 22, 2015 in विदर्भ
आर्णीत अर्थसंकल्पाची होळी 0

आर्णीत अर्थसंकल्पाची होळी

images (2)

यवतमाळ,दि. २२ – केंद्र सरकारद्वारा अरूण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा बहुजन हिताय नसल्याचा आरोप करून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी केली.
काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षासह सत्ताधारी भाजप बहूजन समाज विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. सरकारने सबसीडी,जीडीपी दर २.१ काडून १.७ ठेवला आहे. त्यातही कपात केली असून कुटूंब नियोजन ५५१० कोटीची तरतुद गेल्यावर्षाच्या तुलनेत कमी केली. दारीद्रय निर्मुलन व गृहनिर्माण गरीब वस्ती ३९४ कोटी कपात केली. आदिवासी उत्थानाच्या रक्कमेतून ५०० कोटींची कपात केली. अनुसुचित जातीच्या योजना खर्चात १२,००० कोटीची कपात केली आहे. त्यामुळ हा अर्थसंकल्प बहुजन हिताय नसल्याचा आरोप करून आज आर्णी येथील शिवनेरी चौकात अर्थसंकल्पाची होळी केली. यावेळी गजानन गोडवे, उमेश घायवट, सैयद मुजफ्फर, कृष्णा सोळंके, फकीरा बेडके, उस्मान शेख, रूपेश राऊत, मधुकर हरकरे, अमोल खडसे, राहुल मुनेश्वर, आसीफ माकोडे, सुनील रसाळ, प्रकाश वरटकर, अमजद पठाण, सुरेश मडावी सहभागी झाले होते.

 

March 22, 2015 in महाराष्ट्र