पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 8th, 2015

ना. राठोड यांच्या ‘बुलेट राईड’ने उत्साह 0

ना. राठोड यांच्या ‘बुलेट राईड’ने उत्साह

unnamed (1)
यवतमाळ, दि. 8 : शिवाजी चौक माळीपुरा येथून मोटारसायकल रॅलीने प्रभातफेरी काढण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने या रॅलीचे नेतृत्व तरूणींनी केले. या रॅलीत पालकमंत्री संजय राठोड यांची ‘बुलेट राईड’ विशेष आकर्षण ठरली. स्वत: पालकमंत्री रॅलीत बुलेट घेऊन सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला. यावेळी शेकडो शिवशैनिक आपल्या बाईक्सला भगवे झेंडे लावून या रॅलीत सहभागी झाले. यावेळी संपूर्ण शहर जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषांनी निनादून गेले. पाटीपुरा, कळंब चौक, आठवडी बाजार, अँग्लो हिंदी हायस्कूल, माईंदे चौक, दाते कॉलेज चौक, शिवाजी नगर, बसस्थानक चौक, हनुमान आखाडा चौक, स्टेट बँक चौक, वंजारी फैल, कॉटन मार्केट अशी मार्गस्थ होत या रॅलीचा माळीपुर्‍यात समारोप झाला. या मोटारसायकल रॅलीत पालकमंत्री संजय राठोड हे आपले चिरंजीव सोहम याला घेऊन पूर्णवेळ बुलेटने फिरले. पालकमंत्र्यांची ही बुलेट राईड शहरवासींयांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली. याप्रसंगी मार्गातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना, प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले. शिव छत्रपती दौड स्पर्धेसाठी संयोजक प्रा. अनंत पांडे, राजू जॉन, जितेंद्र सातपूते, मनोज येंडे यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील शारीरिक शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती.

 

March 08, 2015 in विदर्भ
 शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी - पालकमंत्री राठोड 0

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी – पालकमंत्री राठोड

unnamed
नाट्यगृह परिसरात अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन
यवतमाळ, दि. 8 : छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. संपुर्ण राज्यासह देशाला अभिमान वाटावा, असे महाराजांचे कार्य आहे. या कार्याची आठवण होण्यासोबतच त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. महाराजांचा भव्य पुतळा यवतमाळ शहरात असावा, अशी अनेक वर्षांपासून शहरवाशियांची इच्छा आहे. येत्या वर्षभरात भव्य अश्वारूढ पुतळा उभा राहणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
नाट्यगृह परिसरात पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष राय तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, माजी खासदार सदाशिव ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, नप उपाध्यक्ष मनिष तिवारी, मुख्याधिकारी रविंद्र पांढरे उपस्थित होते.
सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच अश्वारूढ पुतळा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवाजी महाराज सर्वांचे राजे होते. गोरगरीब जनता तथा अठरापगड जातीच्या कल्याणासाठी महाराजांनी काम केले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा महाराजांनी सुरू केली. त्यांच्या कार्याची आठवण या पुतळ्यातून होणार आहे, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीतून पुतळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच पुढील जयंतीदिनापर्यंत पुतळा पुर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातही भव्य स्मारक उभे राहात आहे. यासोबतच महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनाकडून होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मदन येरावार यांचेही यावेळी भाषण झाले. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समाजाला प्रेरणा देत राहील तसेच महाराजांच्या कार्याची आठवण करून देईल, असे ते म्हणाले. खा.गवळी यांनी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगितले. नगराध्यक्ष सुभाष राय यांचे अध्यक्षीय भाषण झाले. माजी खासदार सदाशिव ठाकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी रविंद्र पांढरे यांनी केले. यावर्षीच्या नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात पुतळ्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास नगरपरिषदेच्या सभापती प्रणिता खडसे, नंदा जिरापुरे, श्रीमती कोटेकर यांच्यासह नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तथा नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नगर परिषदेचे अभियंता रावसाहेब पालकर यांनी मानले.

March 08, 2015 in विदर्भ
महिलांच्या आयुष्यात सुधारणेसाठी कटिबद्ध - मोदी 0

महिलांच्या आयुष्यात सुधारणेसाठी कटिबद्ध – मोदी

images (2)
नवी दिल्ली – महिलांविरोधातील अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी “मोबाईल हेल्पलाईन‘ व विशेष केंद्राची स्थापना करण्याची घोषणा केली. जागतिक महिला दिनानिमित्त सरकारची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधानांनी महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्याचे ध्येय हे केंद्र सरकारच्या विकासात्मक धोरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले.
“महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना पाहिल्यानंतर मान लाजेने खाली जाते. महिलांविरोधील सर्व प्रकारचा अन्याय संपविण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करावयास हवा. आज आपल्या विकासाच्या प्रवासामध्ये महिलांना सामावून घेऊन, त्यांना समान स्थान देण्याच्या आमच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करावयास हवा. महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माझ्या सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. हिंसाचार वा इतर स्वरुपाच्या अत्याचाराचा सामना करावयास लागलेल्या महिलांना कायदेशीर सल्ला व मानसिक समुपदेशनाची सुविधा देण्यासाठी सरकार विशेष केंद्रे स्थापन करत आहे. याचबरोबर महिलांसाठी 181 या क्रमांकावर विशेष हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विविध योजनांच्या माध्यमामधून महिलांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याप्रति सरकार कटिबद्ध आहे,‘‘ असे मोदी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधान मंत्री जीवन बीमा योजना आणि अटल पेन्शन योजना या नुकत्याच संसदेत मांडलेया अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या योजनांमुळेही महिलांना मोठी मदत मिळणार असल्याचे निरीक्षण मोदी यांनी यावेळी नोंदविले.

March 08, 2015 in मुख्य पान
विनोद मेहता यांचं निधन 0

विनोद मेहता यांचं निधन

5550474315072878877_Org
नवी दिल्ली : ‘आऊटलूक’ ग्रुपचे संस्थापक, संपादक विनोद मेहता यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्समध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी वयाच्या 73 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत सुरुवात ‘सण्डे ऑब्जर्व्हर’, ‘द पायनिअर’ आणि ‘आऊटलूक’ यांसारख्या मासिकांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक पुस्तकही लिहिली आहेत. भारतीय पत्रकारिता क्षेत्रात विनोद मेहता यांचं नाव आदराने घेतलं जातं. देशातील वरिष्ठ पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. विनोद मेहता न्यूज चॅनलमध्ये पॅनलिस्ट म्हणूनही दिसायचे. त्यांनी पत्रकारांची संस्था ‘एडिटल गिल्ड’चं अध्यक्षपदही भूषवलं आहे. मेहता वयाच्या 73 वर्षीही पत्रकारितेत सक्रीय होते. विनोद मेहता त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक मतांसाठी ओळखले जात होते. विनोद मेहता हे पत्रकार तर होतेच पण त्यांची ओळख एक चांगला लेखक आणि विचारवंत अशीही होती. विनोद मेहता यांनी सोनिया गांधींवर पुस्तक लिहिलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुत्र्याचं नावही ‘एडिटर’ होतं.

March 08, 2015 in मुख्य पान
प्रणव मुखर्जींमुळे यूपीएचा पराभव - चिदंबरम 0

प्रणव मुखर्जींमुळे यूपीएचा पराभव – चिदंबरम

nepalmandal
नवी दिल्ली,दि. ८ – तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००८ – ०९ च्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या नादात महागाई गगनाला भिडली व परिणामी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत युपीएचा पराभव झाला असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडले आहे.
चेन्नईतील एका महाविद्यालयात अर्थसंकल्पसंदर्भात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पी. चिदंबरम यांनी यूपीएचा व वाढत्या महागाईचे कारण यावर भाष्य केले. चिदंबरम म्हणता, २००८ – ०९मध्ये यूपीएतील तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थव्यवस्थेला गति देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज दिले. पण यामुळे फिस्कल कन्सोलिडेशन नॉर्म्सचे उल्लंघन झाले. याचा फटका म्हणजे महागाई गगनाला भिडली, रुपयांचा भावही घसरला असे चिदंबरम यांनी नमूद केले. अखेरीस २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला नाकारले व यूपीएचा पराभव झाला असेही त्यांनी म्हटले आहे.

March 08, 2015 in मुख्य पान
अभिनेता आदित्य पंचोलीला अटक 0

अभिनेता आदित्य पंचोलीला अटक

Aditya-Pancholi
मुंबई – जूहू येथील एका नाईट क्लबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकऱणी बॉलीवूड अभिनेता आदित्य पंचोलीला अटक करण्यात आली आहे.
जूहू-तारा रोड नाईट क्लबमध्ये आदित्यचा काही कारणावरुन तेथील डिस्क जॉकीशी वाद झाला. यावेळी आदित्य पंचोली दारुच्या नशेत होता. यादरम्यान एका बाऊन्सरने यात हस्तक्षेप केला असता आदित्य पंचोलीने त्याला मारहाण केली. यामध्ये बाऊन्सर जखमी झाल्याचे सांताक्रुझ पोलिसांनी सांगितले.
याप्रकऱणी पोलिसांनी त्याला अटक केली असून सोमवारी आदित्यला न्यायालयात सादर केले जाणार आहे.

March 08, 2015 in मनोरंजन
बलात्का-याला चौकात फाशी, १८ जणांना अटक 0

बलात्का-याला चौकात फाशी, १८ जणांना अटक

jpg
दिमापूर – दिमापूरमध्ये बलात्का-याला तुरुंगातून बाहेर काढून भर चौकात फाशी दिल्याच्या घटनेप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. याआधी सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
या शहरात लागू करण्यात आलेली संचारबंदी तीन वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र मोबाईल, इंटरनेट आणि एसएमएस सेवा पुढील ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिमापूरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
नागालँडमधील दिमापूर शहरात शुक्रवारी एका बलात्का-याला भर चौकात फाशी देण्यात आल्याची घटना घडली. नागा समुदायाच्या मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या सय्यद फरीद खानला दिमापूरमधील नागरिकांनी खेचतच तुरुंगाबाहेर आणले. त्यानंतर त्याची शहरभर धिंड काढण्यात आली. तसेच त्याला मारहाणही केली. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी त्याला भर चौकात फाशी दिली. आरोपी सय्यद खानचे अंत्यविधी त्याच्या आसाममधील जन्मगावी करिमगंज येथे आज पार पडणार आहेत. आरोपीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.

March 08, 2015 in मुख्य पान
आजपासून तीन दिवस गारपीटीसह पावसाचा अंदाज 0

आजपासून तीन दिवस गारपीटीसह पावसाचा अंदाज

images
यवतमाळ, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये दिनांक 8 ते 10 मार्च दरम्यान गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण विदर्भासह संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी गारपीट सुरु असतांना बाहेर जाण्याचे टाळावे, यादरम्यान दुभती तसेच इतर जणावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, शक्य असल्यास ज्या धान्यांची कापणी झालेली आहे. ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. गारपीटीनंतर तापमाणामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. गारपीट सुरु असतांना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज तारांपासून दूर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

March 08, 2015 in विदर्भ