पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November 1st, 2014

आ. राठोड यांच्या वाहनाला अपघात, १ गंभीर, ४ जखमी 0

आ. राठोड यांच्या वाहनाला अपघात, १ गंभीर, ४ जखमी

DSCN0158

नेर –  यवतमाळवरून शिर्डी येथे जाणाºया आ. संजय राठोड यांच्या वाहनाला समोरून येणाºया गॅस टँकरने जबर धडक दिल्याची घटना आज दुपारी ३ वाजता फुटका माथा जवळ घडली. सुदैवाने या वाहनात आ. राठोड नव्हते. यात एक जण गंभीर असून, ४ जण जखमी आहे. जखमींना यवतमाळ रुग्णालयात हलविण्यात आले.
आ. संजय राठोड यांचा परिवार व नातेवाईक टोयटो फारर्चुनर वाहनाने शिर्डी येथे दर्शनाकरिता जात होते. यातील मागील वाहन क्र. एमएच २९ एक्स १११ या वाहनाला समोरून येणाºया गॅस टँकर क्र जीजे १२- २३४८ ने जबर धडक दिली. यात उमेश हांडा (४०) रा. यवतमाळ हा गंभीर जखमी असून, चालक शंकर मानकर (५५), देविदास जाधव (४१), प्रवीण चव्हाण (२४), अशोक राठोड (४०) सर्व रा. यवतमाळ जखमी झाले. जखमींवर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बाबू पाटील जैत, स्रेहल भाकरे, भारत मसराम, भाऊराव ढवळे, प्रमोद राणे यासह शेकडोंनी घटनास्थळी धाव घेतली अपघात झाल्यानंतर आमदाराच्या परिवारातील व नातेवाईकांना शिर्डी दौरा रद्द करून यवतमाळ येथे परत गेले. अपघातानंतर लगेच टँकर चालक हिरालाल यादव (गांधीधाम) गुजरात याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

November 01, 2014 in मुख्य पान
राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे 0

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे

images.jpeg1111111
नवी दिल्ली- लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे असे मत महासचिव दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.
राहुल यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून सूत्रे स्वीकारावीत असे सिंह म्हणाले. सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला वाटते की राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. विशेष म्हणजे याआधी सिंह यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे तर सोनिया गांधी यांनी ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’चे नेतृत्व करावे असेही ते म्हणाले.

November 01, 2014 in मुख्य पान
विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस सांगणार दावा 0

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस सांगणार दावा

images.jpeg000000000
मुंबई- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास कोणतीही अडचण नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विशेष अधिवेशनापूर्वी होईल. त्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गांधीभवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारला येत्या पंधरा दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे काँग्रेसकडून अभिनंदन करण्यात आले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनाही सत्तेत सहभागी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरतो. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे ठाकरे म्हणाले.
यापूर्वीही काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे एक सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राज्यातील जनतेसाठी विधानसभेत काम करणार आहे. विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांकरता काँग्रेस निश्चितच सरकारला पाठिंबा देईल. मात्र सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येणा-या गोष्टी सरकारकडून होणार असतील, तर त्याला सभागृहाबरोबरच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरूनही विरोध केला जाईल. काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना, सर्व समाजघटकांना दिलेली आरक्षणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसकडून विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेनंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास आपोआप हे पद काँग्रेसला मिळण्यात काही अडचण येणार नाही. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. काँग्रेसमध्ये अनेक सक्षम नेते या पदासाठी दावेदार आहेत. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, त्यानुसार नेत्याची निवड होईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारने आता राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे प्रश्न बाजूला राहू नयेत. सध्या कापूस केंद्रांची आवश्यकता आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे. सध्या व्यापारी कापूस उत्पादक शेतक-यांची लूट करत आहेत, याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे झालेले नुकसान, कोकणातील भातशेतीचे झालेले नुकसान, डेंग्यूवर नियंत्रण आदींबाबत लवकर निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षाही या वेळी ठाकरे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे भाजपशी साटेलोटे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे साटेलोटे असल्याचे आता जनतेसमोर आले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने युती तोडल्यानंतर राष्ट्रवादीनेही तातडीने आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचे बोलले जात होते. मात्र निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंब्यावरून त्यांचे साटेलोटे असल्याचे शिक्कामोर्तब झाले, अशी टीकाही या वेळी ठाकरे यांनी केली.

November 01, 2014 in मुख्य पान
हृतिक रोशन-सुझान खानचा अखेर घटस्फोट 0

हृतिक रोशन-सुझान खानचा अखेर घटस्फोट

54188-hri
मुंबई  – अभिनेता हृतिक रोशन व त्याची पत्नी सुझान खान या दोघांच्या घटस्फोटाला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने अखेर आज मान्यता दिली. दरम्यान या दोघांच्या दोन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा तसेच पोटगीबाबत सुनावणी सुरू असून अद्याप निर्णय बाकी आहे.
हृतिक व सुझान यांच्यात काही काळापासून बेबनाव सुरू होता. काही महिन्यापूर्वी हृतिकने आपण व सुझान वेगळं होत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हे दोघे पुन्हा एकत्र यावेत, त्यांच्यातील तणाव निवळावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केला, मात्र ते असफल ठरले. अखेर आज वांद्रे न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली असून ते दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.

November 01, 2014 in मुख्य पान
सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे - उद्धव 0

सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे – उद्धव

Uddhav-saheb-new-photo
मुंबई – नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहे, जनतेस गृहीत धरून राज्य करता येणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून नव्या भाजपा सरकारला समजुतीच्या चार गोष्टी सांगतानाच राज्य अखंड ठेवावे व जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करावी, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या कालच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सोहळ्याचे भरभरून कौतुक केले, मात्र त्यावेळी सरकारला त्यांच्या जबाबादारी आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत. नवे सरकार हे नव्या नवरीसारखे असते. सासूची मर्जी सांभाळण्यासाठी प्रथम नववधू जबाबदारीने वागते, मात्र काळ पुढे सरकल्यावर सून सासूबाईंना वरचढ होते. महाराष्ट्राची जनता ‘खाष्ट’ नसली तकी उत्तमु सासू असल्याचे सांगत सासूबाईंना खुश करावेच लागेल. सासूपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न झालाच तर नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहेच, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवरायांनी जसे हिंदवी स्वराज्य खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य बनविण्याचा प्रयत्न केला तसाच राज्यकारभार नवे मुख्यमंत्री करतील अशी आशा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

November 01, 2014 in मुख्य पान
हत्याकांडाच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - राज 0

हत्याकांडाच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – राज

03_09_2012-03rajthakaremns
अहमदनगर – जवखेड येथे झालेले हत्याकांड अतिशय भीषण असून यातील गुन्हेगारांच्या शोधासाठी व तपासासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुराव करणार आहे, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. जवखेडा येथे ११ दिवसांपूर्वी झालेल्या दलित हत्याकांडातील पीडित जाधव कुटुंबियांची राज ठाकरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.  त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सदर प्रकार अतिशय दुर्दैवी असून त्या गुन्हेगारांचा शोध लावून त्याना कठोर शासन व्हावे यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचा तसेच या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नवे मुख्यमंत्री फडणवीस हे चांगले नेते असून ते चांगला कारभार करतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. नव्या सरकारपर्यंत आधीच शुभेच्छा पोचवल्याचे सांगत शपथविधीला अनुपस्थित राहिलो याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असेही ते म्हणाले. दरम्यान या हत्याकाडांतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. संतप्त आदोलकांनी रस्त्यावरील गाड्या व दुकानांच्या काचा फोडत निषेध व्यक्त केल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे.

November 01, 2014 in मुख्य पान