पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November 18th, 2014

शिवसेनेमधला अंतर्गत गोंधळ कायम 0

शिवसेनेमधला अंतर्गत गोंधळ कायम

index.jpeg00
मुंबई – राज्य सरकारमध्ये सहभागी होण्यावरुन विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत तळयात-मळयात करणा-या शिवसेनेमधील अंतर्गत गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
मंगळवारी सकाळी अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहाण्याची सूचना केली. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगेचच शिवसेना राज्यातील सरकार अस्थिर होऊ देणार नाही. आम्ही सरकारला पाठिंबा देऊ. सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती आहेत अशी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांच्या विधानावरुन पुन्हा शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर दुपार होता होता शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आम्ही विरोधी पक्षातच बसू असे सांगितले.
राज्य सरकार आयसीयूमध्ये असून, सध्या आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही असे उध्दव यांनी सांगितले. शिवसेना पक्ष नेतृत्वाने संजय राऊत यांच्या मताच्या एकदम उलट भूमिका जाहीर केल्याने पुन्हा एकदा शिवसेनेमधला अंतर्गत गोंधळ समोर आला आहे.
हे असे पहिल्यांदा झालेले नाही विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत सत्तेत सहभागी होण्यावरुन शिवसेनेचा घोळ सुरु होता. सोमवारीच शिवसेनेने भाजपला फटकारले होते. महाराष्ट्रावर ज्यांनी आत्मक्लेषाची वेळ आणली त्यांनी यापुढे शिवसेनेकडे आशेने पाहू नये असे भाजपला सुनावले होते. त्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजपमधला दुरावा तात्पुरता असल्याचा मत व्यक्त केले होते. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय हा प्रश्न निर्माण होतो.

November 18, 2014 in मुख्य पान
रामपाल विरोधात पोलिसांची कठोर कारवाई, भक्त झाले हिंसक 0

रामपाल विरोधात पोलिसांची कठोर कारवाई, भक्त झाले हिंसक

Violent clashes at Satlok Ashram
चंदीगड- हरियाणामधील स्वयंघोषित संत रामपाल बाबाला अटक करण्यासाठी पोलिसांनी कोठर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांच्या या कारवाई विरोधात बाबाच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच एका जेसीबीला आग लावली आहे. मंगळवार सकाळपासून पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाईमुळे हिसारमधील सतलोक आश्रम परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
रामपालला अटक करण्यासाठी गेलेले पोलिस आणि बाबाचे समर्थक यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी जोरदार हाणामारी झाली. यावेळी समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला तसेच लाठीमारही केला. बाबांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात २००हून अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये १०० पोलिसांसह रामपालचे भक्त आणि काही पत्रकारांचा देखील समावेश आहे. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी भक्तांना आश्रम परिसर रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भक्तांनी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली.
दरम्यान, हरियाणाचे पोलिस महासंचालक एस.एन.वशिष्ठ यांनी जोपर्यंत रामपालला अटक केली जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरुच राहिल असे स्पष्ट केले. पोलिसांच्या या कारवाईत महिला आणि मुलांना कमीत कमी इजा होईल याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कारवाई करु नये म्हणून रामपाल याने आश्रमाच्या बाहेर महिला आणि मुलांना उभे केले आहे.
इतक नव्हे तर पोलिसांनी पेट्रोल बॉम्ब आणि अॅसीडच्या बाटल्या आश्रम परिसरातून जप्त केल्याचे वशिष्ठ यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी रामपाल याच्याविरोधान नव्याने एफआयआर दाखल केला आहे
दरम्यान आश्रमाचे प्रवक्त्याने रामपाल यांची प्रकृती ठीक नसल्याने ते अज्ञात ठिकाणी उपचार घेत असल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिस महासंचालकांनी रामपाल आश्रमातच असल्याचे म्हटले आहे.  दुसरीकडे रामपालच्या भक्तांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात पोलिसाच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरु केले आहे.
पोलिसाच्या या कारवाई दरम्यान काही पत्रकार जखमी झाले आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने हरियाणा पोलिसांना नोटिस बजावली आहे. आयोगाने पोलिस महासंचालकांना याप्रकरणी दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

November 18, 2014 in देश-विदेश
‘इबोला’चा भारतात प्रवेश, देशातील पहिला रुग्ण दिल्लीत 0

‘इबोला’चा भारतात प्रवेश, देशातील पहिला रुग्ण दिल्लीत

APTOPIX Spain Ebola

नवी दिल्ली- इबोलाचा देशातील पहिला रुग्ण राजधानी दिल्लीत आढळला आहे. पश्चिम आफ्रिकेतील लायबेरिया देशातून आलेल्या या व्यक्तीला दिल्ली विमानतळावर सुरु करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती.

आरोग्य मंत्रालयातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी लायबेरियातून भारतात दाखल झालेल्या या व्यक्तीच्या इबोलाची चाचणी करण्यात आली होती. या व्यक्तीवर लायबेरिया देशात उपचार सुरु होते. त्यावेळी त्याच्या इबोलाचे कोणतेही लक्षण आढळले नव्हते. मात्र दिल्ली विमानतळावर झालेल्या तपासणीनंतर त्याच्या वीर्य चाचणीत त्याला इबोला झाल्याचे आढळले. या रुग्णावर सध्या उपचार सुरु असून त्याला अन्य रुग्णांपेक्षा वेगळे ठेवण्यात आले आहे.

आफिकी देशामध्ये इबोला या आजाराने थैमान घातले आहे. मात्र भारतात आढळलेला हा पहिलाच रुग्ण आहे.

या रुग्णावर दिल्ली विमानतळावरील आरोग्य विभागात उपचार सुरु आहेत. जोपर्यंत या रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही. तोपर्यंत त्याला रुग्णालयातून सोडण्यात येणार नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.

दरम्यान, परिस्थीती नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यासंदर्भात सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार या आजाराने आतापर्यंत चार हजार ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही या आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. इबोलाविरोधात अद्याप प्रभावी लस शोधण्यात आली नसल्यामुळे त्याच्याविरोधातील लढा अधिक कठीण झाला आहे.

 आर्णीतील १२ घरफोड्यांचा छडा 0

आर्णीतील १२ घरफोड्यांचा छडा

IMG-20141118-WA0010

दोन आरोपीकडून सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ – आर्णी तालुक्यात चोºया करून पोलिसांची झोप उडविणाºया दोन अट्टल घरफोड्यास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून ५ लाख ७७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेख अक्तर शेख मुक्तार (२४) रा. वसंतनगर, पुसद, जब्बार खान उर्फ काल्या मजित खान (२६) रा.मधुकरनगर पुसद असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहे.
मागील काही महिन्यात आर्णी तालुक्यात घरफोडीच्या घटनात कमालितची वाढ झाली होती. चोरीच्या वाढत्या   घटनामुळे आर्णी पोलिसांची झोप अक्षरश: उडली होती. तर चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीसाना यश येत नसल्याबद्दल रोष व्यक्त होत होता. आर्णी तालुक्यात चोरी करणाºया चोरट्यांबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर आदिलाबाद येथील तुरुंगातून दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. आरोपींना अटक केल्यानंतर खाकीचा हिसका दाखविताच १२ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून १८४ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी असा एकूण ५ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुन्हा चोरीच्या काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे, सहाय्यक  फौजदार भीमराव सिरसाट, मिलिंद गोफने, नितीन सलाम, भोजराज करपते, रेवन जागृत, प्रदीप तांबेकर यांनी केली.

November 18, 2014 in विदर्भ
वाटमारी करणारे तिघे गजाआड 0

वाटमारी करणारे तिघे गजाआड

images.jpeg1000
यवतमाळ – चाकूच्या धाकावर वाटमारी करणाºया तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सचिन शामराव राऊत (२८) रा. भोसा, संजय चुन्नीलाल चौधरी (२६) रा. भोसा, रवींद्र महादेव कटरे (३१) रा. नारींगेनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
या चोरट्यांनी महिलेसह एका व्यापाºयाला काही महिन्यापूर्वी लुटले होते. संजय चौधरी हा पाच सहा वर्षापूर्वी भोसारोडवरील व्यापारी आनंद केलाणी यांच्याकडे नोकर होता. त्याला मालकाचा नित्यक्रम माहित होता. आनंद केलाणी यांच्याबद्दल इत्यंभूत माहिती मित्र सचिन राऊत व रवींद्र चौधरी यांना दिली. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान केलाणी यांना भोसा बायपासवर अडवून चाकूने जखमी करून सोन्याची चैन हिसकावून नेली होती. तसेच पाच महिन्यापूर्वी समर्थवाडी परीसरातून पायदळ जाणाºया राजुरकर नामक वृद्ध महिलेच्या गळ््यातील सोन्याची पोत लांबविली होती. या गुन्ह्याची कबुली तिघांनी दिली आहे. त्यांच्याकडून पुन्हा काही चोरीच्या घटनांची माहिती येण्याची शक्यता असल्याने वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडके, सचिन हुमने, योगेश डगवार,आशीष चौबे, सय्यद साजिद यांनी केली.

November 18, 2014 in विदर्भ
पारदर्शक प्रशासनासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची - गंधे 0

पारदर्शक प्रशासनासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची – गंधे

जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन

National Press Day
यवतमाळ – अलीकडे शासनाच्यावतीने पारदर्शक प्रशासनाला फार महत्व दिले जात आहे. शासनाच्या पारदर्शक कारभारासाठी माध्यमांची भूमिका अतिशय मोलाची आणि त्यासाठी हातभार लावणारी आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार दिनेश गंधे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकारी संघटनांच्या सहकायार्ने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे, माहिती खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी तथा पत्रकार रणजीत चंदेल आदी उपस्थित होते.
प्रेस कॉन्सील आॅफ इंडियाची स्थापना १९६६ साली झाली असून याचवर्षी १६ नोव्हेंबर रोजी या संस्थेने आपल्या कामकाजास प्रारंभ केला होता. त्यामुळे हा दिवस संपुर्ण भारतभर राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणजीतसिंह चंदेल यांनी अध्यक्षीय भाषणात माध्यमे व प्रशासन यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. पारदर्शक प्रशासनात माध्यमांची भूमिका या विषयावर गंधे यांच्यासोबतच अनीरुध्द पांडे, नितीन पखाले यांनी आपले विचार व्यक्त केले. सुरुवातीस मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमा मागची भूमिका प्र. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचलन श्रीकांत राऊत यांनी केले तर आभार नागेश गोरख यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार मेहमुद नाथानी, गणेश राऊत, विरेंद्र चौबे, प्रविण देशमुख, संदिप खडेकर, दिपक शास्त्री, कैलाश भगत, किरण कोरडे आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते.

November 18, 2014 in विदर्भ
सहाय्यक फौजदार ‘एसीबी’च्या जाळ््यात 0

सहाय्यक फौजदार ‘एसीबी’च्या जाळ््यात

images.jpeg00
यवतमाळ – वणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारणाºया सहाय्यक फौजदारास लाचलुचपत  प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीस दलात कार्यरत कर्मचाºया खळबळ उडाली आहे. सय्यद जहिरोद्दीन बहाउद्दीन उर्फ बाबर असे अटक करण्यात आलेल्या सहाय्यक फौजादाराचे नाव आहे. आदीलाबाद येथील डी.पी. चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या स्वाधीन करीत नाही. तसेच आदिलाबादमध्ये दाखल गुन्ह्यात क्लिनचिट मिळवून देतो असे म्हणून सहाय्यक फौजदाराने ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. संबंधित व्यक्तीने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून एसीबीच्या पथकाने तक्रारीची सहानिशा करून सापळा रचला. तक्रारकर्त्याने पैसे स्वीकारण्यासाठी सहाय्यक फौजदारास आपल्या राहत्या घरी बोलावले. ३० हजार रुपयाची लाच स्वीकारताच पथकाने लगेच रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लोन्हरकर, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, अमोल महल्ले, नीलेश पखाले, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजकुमार, सुधाकर मेश्राम, प्रकाश शेंडे, विशाल धलवार यांनी केली. या कारवाईमुळे पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

November 18, 2014 in विदर्भ
डेंग्यु आजार व त्यावरील उपाय योजना 0

डेंग्यु आजार व त्यावरील उपाय योजना

images
यवतमाळ – ग्रामीण भागात गाव, वाडी, वस्तीत सध्या डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहे. डेंग्युचा फैलाव रोखण्यासाठी तसेच डेग्युची नेमकी कारणे काय व त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी या आजारापासून परावृत्त होण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डेंग्यु हा आजार (हाडमोडी ताप) विशिष्ट विषांणुमुळे होतो. डेंग्युचा प्रसार एडीस एजिप्टाय नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. यामध्ये प्रामुख्याने ईमारतीच्या, सिमेंटच्या टाक्यांमधील, रांजणामधील पाणी तसेच प्लॉस्टीकच्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स, कुलर आदींमध्ये साठविलेल्या पाण्यांवर या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे अशा कोणत्याही ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
डेंग्युचा डास हा सहज ओळखता येतो. हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ सेंटीमीटर असते, या डासांची मादी डेंग्यु रुग्णाला चावल्यानंतर ती पुन्हा निरोगी व्यक्तीला चावते व निरोगी व्यक्तीला डेंग्यु होतो. या प्रकारे या रोगाचा प्रसार होतो. साधारपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावते.
जास्त दिवस पाणी साठवले असल्यास त्यात हे डास (स्वच्छ पाण्यात) अंडी घालतात. एक डास एका वेळी दिडशे ते दोनशे अंडी घालतो. त्यातून एडिस एजिप्टायचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. डेंग्युचे डास तयारच होऊ नये म्हणून कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. कोरडा दिवस म्हणजे आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे रिकामे करावेत. उदा. रांजण, माठ, हौद, टाकी व इतर पाण्याचे साठे घासून पुसुन कोरडे करून तीन-चार तासानंतर पाणी भरावे त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही.
डेंग्युची लक्षणे पुढीलप्रमाणे आढळून येतात. एडिस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्युची लागण होते. डेंग्यु ताप आणि डेंग्यु रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यु रक्तस्त्रात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखने, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येवू शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज एकदम जोराचा ताप चढने, डोक्याचा पुढचा भाग दुखणे, चव आणि भुख नष्ट होणे मळमळणे आणि उलट्या आदी लक्षणेही जाणवतात.
डेंग्युची लक्षणे जाणवण्यास पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे फायदेशीर ठरते. ताप असेपर्यंत आराम करा, ताप कमी होण्यासाठी ह्यपेरासिटेमॉल गोळ्या घ्या, ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरिन अथवा आयब्रुप्रोफेन गोळ्या घेऊ नये, निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी), रक्तस्त्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णांला ताबडतोब रुग्णालयात भर्ती करावे, अंग पुर्णपणे झाकणारी कपडे घालावे, मच्छरदाणीचा वापर करावा, साठवलेले किंवा साठलेल पाणी बदलवावे तसेच तुंबलेली गटारे वाहती करावी तसेच खाली न करता येणाºया पाणी साठ्यात उदा. टाकी, हौद यामध्ये गप्पी मासे सोडावे, आपल्या घरी डेंग्यु ताप सर्वेक्षणासाठी येणाºया आरोग्य कर्मचाºयांना सहकार्य करा व आपण   अथवा इतर कोणीही आजारी असल्यास त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश तरोडेकर यांनी कळविले आहे.

November 18, 2014 in विदर्भ
देशी कट्ट्यासह सहा युवकास अटक, दरोड्याचा डाव उधळला 0

देशी कट्ट्यासह सहा युवकास अटक, दरोड्याचा डाव उधळला

IMG-20141118-WA0035
यवतमाळ – दरोडा टाकण्याच्या उद्देशाने करळगाव घाटात लपून असलेल्या सहा जणांना देशी कट्ट्यासह अटक करण्यात आली. संदीपसिंग दीपकसिंह गुघानी (२२) रा. अंबानगर, विक्रम उर्फ बिल्ला गुलाब सोळंकी (२०) रा. अमराईपुरा, पंकज अनिल राजुरकर रा. वाघापूर (२२), अमित विनोद गवई रा. चांदोरेनगर यांच्यासह दोन युवक करळगावघाटात लपून असल्याची टीप उपविभागीय अधिकाºयांच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून सहाही चोरट्यास अटक केली. त्यांच्याजवळ देशी बनावटीचा कट्टा, तीन काडतूस, मिरची पावडर, २ लाठी असा एकूण २० हजार ३५० हजार रुपयाचा ऐवज मिळाला. दरोडा टाकण्याच्या उद्देश असल्याची कबुली पोलिसांना दिली. उपविभागीय कार्यालयाचे पोलीस राहुल मनवर यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी सहाही चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात राहुल मनवर, तुषार नेवारे, इकबाल शेख, प्रमोद मडावी, संतोष मडावी, अजय ढोले यांनी केली. आरोपीकडून घरफोडी, लुटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

November 18, 2014 in विदर्भ
भिंत कोसळली, दोन मुले दबले 0

भिंत कोसळली, दोन मुले दबले

69
दिग्रस (यवतमाळ)- तालुक्यातील ईसापूर येथे एका इसमाच्या घराची भिंत कोसळल्याने दाने मुले दबल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. शबा परवीन शेख वाजीद (४), शेख अफान शेख हारुण अशी जखमी मुलांची नावे आहे.
युनुस बेग सरदार बेग रा. ईसापूर यांच्या घराच्या प्रथमदर्शनी भागातील विट मातीचे बांधकाम असलेली भिंत अचानक कोसळली. यावेळी तेथे खेळत असलेले दोन्ही मुले भितीखाली दबले. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शबा परवीनचा पाय  तर शेख अफानचा हात फॅक्चर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी पि.ए. दुधे, ग्रामसेवक प्रिती देशमुख यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

November 18, 2014 in विदर्भ

पर्यावरणाचे धडे सक्तीचे, विद्यापीठे, कॉलेजांना यूजीसीचे फर्मान

मुंबई -देशातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या कॉलेजांमध्ये आता पर्यावरण हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांना परिपत्रकही जारी केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करायचा असून, जी विद्यापीठे अथवा कॉलेज हा अभ्यासक्रम राबवणार नाहीत, अशांवर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा यात देण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने सन १९९९मध्ये देशातील विद्यापीठे आणि शाळांमध्ये पर्यावरणाच्या अभ्यासक्रम राबवण्याबाबत आदेश दिले होते. शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू झाला. मात्र, विद्यापीठांनी याकडे सपशेल कानाडोळा केला होता. दरम्यान, सुप्रीम कोर्टात नुकतीच यासंदर्भात एक सुनावणी सुरू होती. त्यात यूजीसीला धारेवर धरत १९९९च्या निर्णयाची आठवण करून दिली. त्यानंतर हबकलेल्या यूजीसीच्या संचालकांनी देशभरातील सर्व विद्यापीठांना पर्यावरण अभ्यासाच्या सक्तीसाठी परिपत्रक जारी केले.
यूजीसीच्या सूचना
पदवीपूर्व अभ्यासक्रमात हा विषय सुरू करावा. यूजीसीच्या वेबसाइटवर अपलोड मसुद्यानुसारच अभ्यासक्रम सुरू करावा. या मसुद्यात देशातील किंवा राज्यातील ऊर्जा, खाद्य, जल, वन यासंदर्भातील योग्य ती माहिती, देशातील जैवविविधता, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यासंदर्भातील माहितीबरोबरच विद्यार्थी आणि पालकांसाठीच्या पर्यावरणीय नैतिकमूल्यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. वर्षाखेरीस १०० गुणांची एक परीक्षाही घ्यायची असून, ज्या कॉलेजांमध्ये क्रेडिट ग्रेडिंग पध्दत आहे तिथे चार क्रेडिटसाठी परीक्षा घेणे आवश्यक आहे. वर्षभरात या अभ्यासक्रमाची ५० लेक्चर होणेही आवश्यक.

November 18, 2014 in मुख्य पान