
दिग्रस (तालुका प्रतिनिधी) – अंगणवाडीचे बांधकाम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी फेट्री ग्रामपंचायतच्या सदस्याला दहा हजार रुपये लाच स्विकारली. येथील मानोरा चौकातील बाजोरीया हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कार्यवाही केली.
रामकृष्ण भुंजगा धनगर (५५)असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. फेट्रा ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाबाबत तक्रारी न करणे, केलेली तक्रार मागे घेणे व बांधकाम सुरळीत चालु ठेवण्याकरीता धनगर यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. त्यामुळे बांधकामाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून आज पथकाने येथील मानोरा चौकातील बाजोरीया हॉटलमध्ये सापळा रचला. यावेळी ग्रामपंचायत सदस्याने दहा हजार रुपये स्विकारून पॅन्टच्या खिशात टाकले. यावेळी तक्रारकर्त्याने इशारा करताच सदर पथकाने सदस्याला अटक केली. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हेकर, नंदकुमार जामकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजकुमार, विशाल धलवार, अमोल महल्ले, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, नरेंद्र इंगोले यांनी केली.
Archive for November 7th, 2014
0
ग्रामपंचाय सदस्य एसीबीच्या जाळ््यात
0
शेतकºयांनी ठोकले वीज वितरणला कुलुप

घाटंजी -(तालुका प्रतिनिधी)
निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच शेतकरी संकटात असून भारनियमनामुळ े कृषी पंपाना विजपुरवठा नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके वाळत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शेतकºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज कंपनीचे अभियंता गैरहजर असल्याने संतप्त शेतकºयांनी कर्मचाºयांना बाहेर हाकलुन कार्यालयाला कुलुप ठोकले.
ग्रामीण भागातील गावामध्ये येथील वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. मात्र वीज वितरण कंपनीच्या तुघलकी कारभार सुरू असून भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तसेच शेतकºयांना कृषी पंपाना सुरळीत विज पुरवठा केल्या जात नाही. त्यामुळे शेतकºयांना पिकाला रात्रीच्यावेळी जाऊन पाणी द्यावे लागते. गत काही महीन्यापासून भारनियमना व्यक्तीरीक्तही वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिके सुकत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. दरम्यान आज तालुक्यातील शेतकºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज अभियंता गैरहजर असल्याने समस्या सांगायची कुणाला असा प्रश्न उपस्थित करून सदर अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. यावेळी अधिकाºयाने मी माझ्या पदाचा राजीनामा दिला, तुम्हाला जे करायचे ते करा असे उध्दट उत्तर दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयातील कर्मचाºयांना बाहेर हकलुन कुलुप ठोकले व पोलीस ठाण्यात चाब्या जमा केल्या. यावेळी गुणवंत नाखले, सुरेश ठाकरे, सुदाम इंगोले, श्रीकांत कस्तुरे, गजानन पेंचलवार, रामधन चव्हाण, परिश्रीत विरंदडे, राजू मानकर उपस्थित होते.
0
अखेर त्या विवाहीतेचा मृत्यू
दिग्रस (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यतील हरसूल येथील जळालेल्या नवविवाहीतेचा आज यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी सदर महीलेच्या पतीसह सासूला जवकरच अटक करणार असल्याची माहीती पोलिसांनी दिली.
निकीता गिरीष दुधे असे विवाहित महिलेचे नाव आहे. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान निकिताला जळालेल्या अवस्थ दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र ती ७७ टक्के जळाली असल्याने तीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पवन तायडे याने दिलेल्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी आरोपी पती गिरीष दुधे, सासू सुरेखा दुधे याच्याविरूद्घ भादंवि कलम ४९८ (अ), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज ७ नोव्हेंबर रोजी निकीताचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरूद्घ पुन्हा ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
लाचखोर दंततंत्रज्ञास अटक

यवतमाळ (स्थानिक प्रतिनिधी) – कृत्रिम दात बसऊन देण्यासाठी एक हजार रुपये लाच स्विकारताना येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दंततंत्रज्ञास रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने आज सकाळी रुग्णालयात ही कार्यवाही केली आहे.
संजय बापूराव फेदुजवार (४४) असे लाचखोर कर्मचाºयांचे नाव असून ते दंततंत्रज्ञ पदावर कार्यरत होते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आलेल्या एका रुग्णास कृत्रिम दात तयार करून बसवुन देतो असे म्हणून एक हजाराची लाच मागीतली. या प्रकरणाची तक्रारही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून आज पथकाने रुग्णालयातील दंत विभागात सापळा रचला होता. यावेळी फेदुजवार याना एक हजार रुपयाची तक्रारदाराकडून लाच स्विकारताच रंगेहात पकडले. या घटनेने रुग्णालयातील कर्मचाºयामध्ये खळबळ उडाली आहे.
0
केंद्रीय मंत्रिमंडळात सहा नवे चेहरे

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार पक्का असतानाच सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री श्रीपाद यस्सो नाईक यांची खराब कामगिरी पाहता त्यांचे खाते बदलण्याची शक्यता आहे. रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात हे बदल अपेक्षित आहेत. एकंदर सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल असे दिसते. यात पर्रीकरांखेरीज यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत, मुख्तार अब्बास नक्वी, अनुराग ठाकूर आणि हंसराज अहिर या भाजपा नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. हरियाणा किंवा राजस्थानातून एखाद्या जाट नेत्याला मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
जलस्रोत आणि गंगा स्वच्छता विभागाचे प्रमुख आलोक रावत यांची प्रशासकीय सुधार आयोग या कमी महत्त्वाच्या विभागामध्ये बदली केली आहे. त्यांच्या जागी आता शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांच्याकडे नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदासोबतच गंगा योजनेचे प्रमुखपदही दिले जाण्याची शक्यता आहे. प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. परंतु पदोन्नतीत त्यांना संसदीय कामकाज किंवा अन्य खाते सोडावे लागू शकते. सीतारामन यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.
0
नौदलाचे जहाज बुडाले, एक ठार, चार बेपत्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारतीय नौदलाचे ‘टॉर्पिडो रिकव्हरी व्हेसल’ हे छोटे जहाज गुरुवारी विशाखापट्टणम बंदराजवळ समुद्रात बुडाले. या अपघातात जहाजावर तैनात असलेलला एक नाविक मृत्युमुखी पडला असून अन्य चार नाविक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. जहाजावर २८ कर्मचारी होते. त्यापैकी २३ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
युद्धनौका आणि पाणबुड्यांनी सरावादरम्यान डागलेले तोफगोळे शोधण्याचे काम या जहाजाकडे सोपविण्यात आले होते. नेहमीप्रमाणे हे जहाज तोफगोळे (टॉर्पिडो) शोधण्याच्या कामात असताना अचानक एका कक्षात पाणी घुसले आणि काही मिनिटातच जहाज समुद्रात बुडाले. हे जहाज डमी तोफगोळे गोळा करून परत येत असताना त्यात पाणी घुसले. विझाग पोस्टपासून अनदाजे १० ते १५ कि. मी. अंतरावर हे जहाज बुडाल्याचे कळते.
0
हलक्या बॅटने खेळण्याचा फायदा नाही – सचिन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – अडीच दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनला जेव्हा जेव्हा दुखापतींनी सतावले तेव्हा तेव्हा सचिनच्या दुखण्यामागे तो वापरत असलेली जड बॅट कारण असल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला.
सचिनला अनेक क्रिकेट तज्ञांनी हलक्या वजनाची बॅट वापरण्याच सल्ला दिला. मात्र सचिनला स्वत:ला हलक्या बॅटने खेळणे कधीही मानवले नाही. जेव्हा जेव्हा सचिनने बॅट बदलून खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या फटका खेळण्याचा (टाईमिंग) वेळेवर परिणाम झाला.
मला अनेकांनी हलकी बॅट वापरण्याचा सल्ला दिला पण मला त्याचा कधीही फायदा झाला नाही असे सचिनने त्याच्य ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात म्हटले आहे.
जेव्हा मी फटका खेळायचो तेव्हा त्या फटक्यामध्ये ताकत येण्यासाठी मला वजन लागायचे. यात टाईमिंग महत्वाचा होता असे सचिनने म्हटले आहे. सहजतेने फलंदाजी करता येणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. जो पर्यंत मला फलंदाजी करताना सहजता वाटते तो पर्यंत मी कुठे खेळतोय, कोणाविरुध्द खेळतोय हे महत्वाचे ठरत नाही असे सचिनने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
0
विमानाला म्हशीची धडक

सुरत (प्रतिनिधी) – सुरतहून दिल्लीकडे निघालेल्या विमानाचे टेकऑफ होत असताना सुरत विमानतळावर स्पाइसजेट कंपनीच्या प्रवासी विमानाला म्हशीने धडक दिली. यावेळी विमानात एकूण १४६ प्रवासी प्रवास करत होते. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली.
स्पाइसजेट कंपनीचे बोइंग ७३७- ८०० हे विमान उड्डाण क्रमांक एसजी- ६२२ द्वारे सुरतहून सायंकाळी सात वाजता दिल्लीला निघाले होते. यात १४० प्रवासी आणि सहा विमानातील कर्मचारी होते. विमान टेक ऑफ करत असताना धावपट्टीवर आलेली म्हैस विमानाच्या इंजिनाला धडकली. यात सर्व प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला असला तरी विमानाच्या इंजिनाचे मात्र मोठे नुकसान झाले. यानंतर हे विमान रद्द करुन रात्री अकरा वाजता पर्यायी विमानाने सर्व प्रवाशांना दिल्लीला रवाना करण्यात आले.
धावपट्टीवर पुरेसा प्रकाश होता. मात्र बाजूच्या मैदानातील अंधारातून अचानक एक म्हैस पुढे आली आणि तिची विमानाला धडक बसली. वैमानिकाच्या ते लक्षात आले परंतू विमानाच्या वेगामुळे ही धडक टाळणे अशक्य झाल्याचे स्पाइसजेट कंपनीने सांगितले.
यापूर्वी जुलै २००९ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सच्या विमानाला नागपूर विमानतळावर डुकराची धडक बसली होती. तर मार्च २०१० मध्ये मुंबईत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्यांवर आलेल्या कुत्र्यांमुळे सुमारे अर्धा तास विमानांचे उड्डाण थांबवावे लागले होते.
सुरतच्या या अपघातामुळे विमानतळाच्या धावपट्टी भागात म्हैस पोहोचली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी दिले आहेत.










