पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December, 2014

शौर्य, ध्येय, कर्तव्य – भीमा – कोरेगावची अनिर्णीत लढाई 0

शौर्य, ध्येय, कर्तव्य – भीमा – कोरेगावची अनिर्णीत लढाई

bhima koregaon thambha

1

 

पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी दुसरा बाजीराव पेशवा याच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेची आणि ब्रिटीश सैन्याची लढाई घडून आली. या लढाईविषयी उपलब्ध मराठी संदर्भ ग्रंथांमधून जी काही माहिती मला मिळाली, त्या माहितीच्या आधारे या लढाईचे विश्लेषण करण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न करण्यात आला आहे.
भीमा – कोरेगाव
पार्श्वभूमी :दुसरा बाजीराव पेशवा याने स. 1817 च्या उत्तरार्धात इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले. यावेळी खडकी आणि येरवडा येथे ब्रिटीश आणि मराठी फौजांचा सामना घडून आला व पेशवा पुणे सोडून गेला. बाजीरावाने पुणे सोडल्यामुळे इंग्रजांनी पुणे शहर आपल्या ताब्यात घेतले व शनिवारवाड्यावर आपले निशाण फडकावले. इंग्रजी फौजांशी निर्णायक झुंज न घेता बाजीराव आपल्या सैन्यासह पुण्याच्या सभोवती घिरट्या घालत असताना भीमा नदी जवळ कोरेगाव येथे त्याची व इंग्रजी फौजांची एक लढाई घडून आली. इतिहास ती कोरेगावची किंवा भीमा – कोरेगावची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.
बाजीराव नासिककडे न जातां ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. 30 डिसेंबर रोजीं चाकण येथें येऊन पोंचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. त्याचे पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गांठावें किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावें असा बाजीरावाचा बेत असल्याचें स्मिथ यास दिसून आलें, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. का बर पुण्याचे बंदोबस्तास होता. त्यानें आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, 31 डिसेंबर 1817 रोजीं रात्रीं 8 वाजतां शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशीं सकाळी 10 वाजतां कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली.
घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतांनीं आज्ञा केली, कीं आज लढाई करून आम्हास पुढें जाण्यास मार्ग करून द्यावा. गांवास लहानशी तटबंदी होती तींत इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यांजवर दुसऱ्या बाजूनें मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500 लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. 2 जानेवारी रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला.
दुसरे दिवशी पेशव्यांनीं तेथोन कुच करून मुळा नदीस मुकामास आले. आणि पुढें न जातां परत ब्राम्हणवाड्यास आले. आणि जुनरास जाऊन फुलगावावर मुकाम झाला. तेथोन कुच करून पुन्हा सालप्याच्या घाटानें करनाटकांत जाण्याचा विचार ठरविला. कुच करून राजवाडीस मुकामास जावें असा विचार होता, तों प्रथम प्रहर दिवसाचे आंत नगराहून पुण्यास जाण्याकरितां इंग्रजाची फौज एक पलटण व दोनशें स्वार व दोन तोफा घेऊन कोरेगावास मुकामास आले. तेथून फुलगावीं एक कोसावरच पेशव्याचा मुकाम आहे हें त्यांस माहित नव्हते. व पेशव्यांकडील फौजेनें इंग्रजांकडील फौज कोरेगावावर आलेली पाहून त्यांजवर धावा केला. इतक्यांत त्या पलटणींतील साहेबांनी जलदी करून कोरेगावांतील दोनतीन वाड्यांत शिरून तोफ चालू करून पलटणी लोक फेरा मारू लागले. तेणेंकरून पेशवे याजकडील लोक अजमासे दीडशे व इंग्रजाकडीलही सुमारे चारशांवर मेले व जखमी झाले असतील. याप्रसंगी बापूसाहेबानीं बहूत शूरत्व केले. इंग्रजी फौज ही धैर्य धरून अस्तमानपर्यंत लढत होती, रात्र झाल्यावर पेशवे यांजकडील फौजेनें इंग्रजी फौजेला सोडून राजेवाडीस मुकामास गेले.
ब्राम्हणवाड्याहून पेशवा पुन्हा पुण्याच्याच रोखाने निघाला तो ता. 30 डिसेंबर 1817 रोजी चाकण येथे आला. मात्र तेथून बापूच्या सूचनेमुळे असो किंवा स्वतःच्याच लहरीप्रमाणे असो पुण्याकडे न जाता जवळपासच पण दुसऱ्याच कोणत्यातरी स्थळाकडे चालू लागला. बाजीराव पुण्यास जाणार, त्याचेबरोबर चांगला फौजफाटा असणार, तिथे कदाचित त्याला आणखी लोक सामील होणार आणि आपला पुण्यावरचा ताबा सुटणार अशी भीती वाटून इंग्रजांची एक फौज शिरूरहून कॅ. Staunton ह्याचे नेतृत्वाखाली पुण्याकडे निघाली. पुण्यास कर्नल बर होता, पण त्याच्याकडे सैन्यही फारसे नव्हते आणि युद्धसामग्रीही बेताचीच होती. कॅप्टन Staunton ची फौज ता. 1-1-1818 रोजी कोरेगावास पोचली तेव्हा पेशव्यांच्या फौजेचा तळ तेथे आधीच पडलेला होता. तिचे आधिपत्य अर्थात बापूकडेच होते. बापूने पेशव्यास साताऱ्याकडच्या मार्गाला लावले आणि स्वतः कोरगावी इंग्रजांविरुद्ध मोर्चेबांधणी सुरु केली. बापूने प्रथम तोफांचा मारा करण्याचे योजिले, परंतु इंग्रजांनी आडोशाच्या सुरक्षित जागा शोधल्यामुळे ते गोळ्यांच्या टप्प्यात येत नाहीत हे लक्षात येताच त्याला युद्धतंत्र बदलावे लागले. बंदुका आणि तलवारी हाती घेऊन मराठे पुढे धावले. इंग्रजांनी चांगला प्रतिकार केला ह्यात शंका नाही. तथापि ह्या ठिकाणी इंग्रजांना काय किंवा मराठ्यांना काय मोठे निकाली युद्ध कोणालाच करायचे नव्हते. इंग्रजांना हे मार्गातील संकट पार करून पुढे पुण्याकडे जावयाचे होते, तर बापूला त्यांना अडवून धरून पेशव्यास दूर जाण्यास अवसर द्यावयाचा होता. दोघांचेही हेतू सिद्धीस गेले. ता. 4 जानेवारी 1818 च्या एका बातमीपत्राप्रमाणे त्या तारखेपर्यंत बाजीराव फुलगावला मुक्कामाला आलेला होता.
भीमा – कोरेगाव येथे पेशव्याची आणि ब्रिटीश फौजेची लढाई घडण्यापूर्वीच्या घटनांचा परत एकदा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे. खडकी आणि येरवडा येथील लढाया झाल्यानंतर बाजीराव पुणे शहर सोडून निघून गेला. त्याच्या पाठीवर जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजेची एक तुकडी होतीच. स्मिथच्या फौजेला पाठीवर घेऊन बाजीराव पुण्याच्या आसपासच्या दीड – दोनशे किलोमीटर्सच्या परिघात पळत होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ब्रिटीश सैन्याचा एखाद्या ठिकाणी ठासून उभा राहून पराभव करण्याची त्याची इच्छा होती कि नव्हती या वादात या ठिकाणी तरी शिरण्याचे काही प्रयोजन नाही परंतु, इंग्रजांच्या सैन्याशी मोठी लढाई देण्याचे तो टाळत होता हे एक उघड गुपित आहे. कोरेगावची लढाई घडून येण्यापूर्वी बाजीराव जुन्नरच्या आसपास ब्राम्हणवाडा येथे मुक्कामास होता. तेथून तो पुण्याच्या दिशेने निघाला असला तरी पुण्याला जाण्याची त्याची इच्छा कितपत होती याविषयी शंकाच आहे. जनरल स्मिथ हा पेशव्याच्या पाठलागावर होताच. त्याला रोखून धरण्याची कामगिरी बहुतेक त्रिंबकजी डेंगळेवर सोपवण्यात आलेली होती असे दिसून येते. अर्थात, हे कार्य दुसऱ्या कोणत्यातरी सरदारावर देखील सोपवले असावे. असो, ब्राम्हणवाडा येथून बाजीराव पुण्याचं दिशेने निघाला. त्याच्या हेतूंची / बेताची इंग्रजाना अजिबात कल्पना नव्हती असेच म्हणावे लागते. मुंबईची इंग्रज फौज पुण्याच्या दिशेने येत होती तिला अडवण्याचा पेशव्याचा बेत असावा किंवा पुणे शहर परत एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा त्याचा हेतू असावा असा इंग्रजांचा समज झाला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाजीरावाचे मनसुबे उधळून लावण्याचे त्यांनी ठरवले. पुण्यामध्ये इंग्रजांची फारशी मोठी फौज नव्हती. पुण्यातील इंग्रजांना त्वरीत कुमक करेल असे एक ठाणे जवळच होते व ते म्हणजे शिरूर हे होय ! या ठिकाणी असलेल्या इंग्रज फौजेस तातडीने पुण्यास जाण्याचा आदेश देण्यात आला. इकडे जनरल स्मिथ मराठी सैन्याचा प्रतिकार मोडून काढत बाजीरावास पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. बाजीराव पेशवा ब्राम्हणवाडा येथून चाकणच्या पुढे फुलगावी मुक्कामास आला. शिरूर येथील ब्रिटीश सैन्यावर हल्ला करण्याची त्याची योजना नव्हती त्याचप्रमाणे पुण्यात जाण्याची देखील त्याची इच्छा नव्हती. नाहीतर चाकण येथून तो फुलगावी न जाता तडक पुण्याला जाऊ शकत होता. यावेळी पुण्यात इंग्रजांची फौज अगदीच अत्यल्प अशी होती. जर बाजीराव पुण्यावर चालून गेला असता तर पुणे शहराचे रक्षण त्यांच्या हातून झालेच असते असे म्हणता येत नाही. परंतु बाजीराव अथवा त्याचे सरदार अधिक व्यवहारी होते. जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली बडी इंग्रज फौज आपल्या पाठलागावर आहे याची त्यांना कल्पना होती. तसेच शिरूर येथे इंग्रजांची एक तुकडी मुक्कामाला असल्याची माहिती त्यांना होतीच. पुणे ताब्यात घेतल्यावर शिरूर येथील ब्रिटीश तुकडीचा बंदोबस्त त्यांना करावा लागला असता आणि तोपर्यंत ज. स्मिथ पुण्याजवळ येऊन ठेपला असता. किंवा असेही म्हणता येते कि एकाच वेळेस त्यांना ज. स्मिथच्या आणि शिरूर येथील ब्रिटीश सैन्याचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागला असता. हे सर्व लक्षात घेता पुणे ताब्यात घेण्याचं भरीस न पडता स्मिथ पासून शक्य तितके लांब जाण्याचाच निर्णय मराठी सरदारांनी किंवा पेशव्याने घेतला असे म्हणता येते.
पुणे उजव्या बाजूला टाकून फुलगावी येथे मराठी सैन्याचा तळ पडला. आधी सांगितल्यानुसार ब्रिटिशांना मराठी मुत्सद्यांच्या बेताची अजिबात कल्पना नसल्याने त्यांनी पेशवा कदाचित पुण्यावर चालून जाईल हि शक्यता गृहीत धरून शिरूर येथील ब्रिटीश तुकडीला पुण्याला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिरूर येथील इंग्रज फौज कॅप्टन च्या नेतृत्वाखाली पुण्याच्या दिशेने रवाना झाली. शिरूर येथील ब्रिटीश फौज आपल्यावर चालून येईल अथवा त्या फौजेचा पुण्याला जाण्याचा बेत असावा अशी कल्पना मराठी सरदारांना होती कि नाही याविषयी ठामपणे सांगणे शक्य नाही. कारण, त्यांना जर तशी काही कल्पना असती तर भीमा – कोरेगाव नजीक त्यांनी नदीउतार रोखून धरण्याचा किंवा नदी पाठीशी घालून भीमा – कोरेगाव हे स्थळ काही काल आपल्या ताब्यात ठेऊन शिरूरच्या फौजेचा मार्ग रोखून धरण्याचा बंदोबस्त केला असता. परंतु त्यांनी असे काहीच केल्याचे दिसून येत नाही. यावरून शिरूर येथील इंग्रजी फौजेच्या बेताची त्यांना फारशी माहिती असल्याचे दिसून येत नाही. इकडे शिरूरच्या इंग्रज पथकाला पेशवा फुलगावी मुक्कामाला असल्याची बातमी मिळाली नव्हती असे दिसून येते. उपलब्ध माहितीवरून शिरूर येथील ब्रिटीश सैन्य 31 डिसेंबर 1817 रोजी सायंकाळी किंवा रात्रीच पुण्याच्या दिशेने रवाना झाला होते. साधारण 35 – 40 किमी. अंतर कापून हि फौज जेव्हा कोरेगाव जवळ येऊन पोहोचली त्यावेळी शत्रू सैन्याला समोर उभे असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. परंतु, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रसंग ओळखून कोरेगाव ताब्यात घेण्याची चलाखी केली. मराठी फौजांनी जर यापूर्वीच कोरेगावचा ताबा घेतला असता तर इंग्रजांना या वेळी आपला बचाव करणे अतिशय अवघड गेले असते पण मराठी सरदार याबाबतीत फारच गाफील राहिले असे म्हणावे लागते. इकडे ब्रिटीश लष्कराची निशाणे दृष्टीस पडताच मराठी मुत्सद्द्यांत चलबिचल झाली असावी. कारण उपलब्ध माहितीवरून त्या दिवशी फुलगाव येथील मुक्काम उठवून साताऱ्याच्या दिशेने जाण्याचे त्यांचे आधीच ठरले होते व त्यानुसार बरीचशी मराठी पथके पुढे रवाना झाली होती. खुद्द बाजीराव पेशवा आणि बापू गोखले व इतर काही सरदार मागे राहिले होते. सातारचा छत्रपती प्रतापसिंह यावेळी बाजीरावासोबत होता कि मराठी सैन्यासह तो आधीच पुढे गेला होता याची चर्चा या ठिकाणी तशी अप्रयोजक आहे. कारण छत्रपती लढाईच्या ठिकाणी हजर असला काय आणि नसला काय दोन्ही सारखेच होते. असो, रात्रभर प्रवास करून दमलेली ब्रिटीश पथके कोरेगावात पोहोचली त्यावेळी सकाळचे 9 – 10 वाजून गेले होते. तरीही या ठिकाणी मराठी सैन्याशी लढाई दिल्याखेरीज आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले. माघार घेण्याचा किंवा पुढे पुण्याला जाण्याचा आता प्रश्नच नव्हता. कारण, मराठ्यांची सेना पुढे जय्यत तयारीनिशी सज्ज असल्याने पुणे तर दूरच पण सुरक्षितपणे माघार घेणे देखील शक्य नव्हते. असो, इकडे बाजीरावाने आपल्या सरदारांना ब्रिटीश फौजांशी लढण्याची आज्ञा दिली किंवा असेही म्हणता येईल कि मराठी सरदारांनी इंग्रजांना लढाईमध्ये गुंतवण्याचे ठरवून बाजीरावाला सातारा जवळ करण्याचा सल्ला दिला. दोनपैकी काय खरे असेल ते असेल, पण हे निश्चित कि कसलीही पूर्वकल्पना नसताना किंवा आगाऊ डावपेच आखलेले नसताना मराठी व इंग्रजी सैन्याला कोरेगाव येथे एकमेकांशी झुंजणे भाग पडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी सरदारांच्यापेक्षा इंग्रज अधिकारी संधी व भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यात जास्त कुशल असल्याचे या लढाईत दिसून येते. रात्रभर प्रवास केलेला असूनही कोरेगाव हे स्थळ ताब्यात घेण्यात त्यांनी कमालीची तडफ दाखवली. यावेळी ब्रिटीश पथकांच्या सोबत तोफा असल्याने त्यांनी माऱ्याच्या जागा पाहून आपल्या तोफा पेरल्या. मराठी सैन्याचा तोफखाना आधीच पुढे गेल्याने त्यांना आपल्या तोफखान्याचे पाठबळ लाभू शकले नाही किंवा त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा पुढे पाठवल्यामुळे मागे राहिलेल्या लहान तोफांचा या प्रसंगी मराठी फौजेला फारसा फायदा झाला नाही असे लढाईच्या उपलब्ध वर्णनावरून लक्षात येते. असो, कोरेगावात घुसलेल्या इंग्रजी फौजांचा समाचार घेण्याची किंवा त्यांना लढण्यात गुंतवण्याची जबाबदारी बापू गोखलेवर येऊन पडली होती. इंग्रजांनी गावाचा आश्रय घेतलेला असल्याने बापूला आपल्या तोफांनी इंग्रज पथकांना सडकून काढता आले नसावे. त्याउलट मराठी फौजा मोकळ्या मैदानावर असल्याने आणि ब्रिटीशांनी मोक्याच्या जागी तोफांचे मोर्चे उभारले असल्यामुळे त्यांच्या तोफा मराठी सैन्यावर आगीचा वर्षाव करत होत्या. इंग्रजांचा तोफखाना बंद पडला नाही तर आपल्या फौजेची बरीच हानी होईल हे ओळखून बापूने लष्कराला कोरेगावावर चालून जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार मराठी पथके कोरेगावावर चालून गेली. परंतु, इंग्रज सैनिकांनी गावातील घरांचा आश्रय घेतलेला असल्याने त्यांच्यावर थेट चाल करणे किंवा हातघाईच्या लढाईत त्यांचा समाचार घेणे त्यांना शक्य झाले नाही.
कोरेगावात इंग्रज आणि मराठी सैनिकांची हातघाईची लढाई झाली कि नाही किंवा झाली असल्यास ती कधी झाली ? तसेच बापू गोखल्याने कोरेगाव ताब्यात घेण्यासाठी किती हल्ले चढवले व इंग्रजांनी ते कसे परतवून लावले याविषयी सध्या तरी लिहिणे मला शक्य नाही. कारण तितकी माहिती याक्षणी माझ्याकडे नाही. पुढेमागे याविषयी अधिक माहिती मिळाल्यास मी या लढाईचे तपशीलवार वर्णन जरूर देईन. या ठिकाणी लढाईनंतर नेमके काय घडून आले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे व माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून असे अनुमान बांधता येते कि सदाशिव आठवले लिहीतात त्यानुसार हि लढाई अनिर्णीत राहिली. भीमा – कोरेगाव येथील लढाईमध्ये ना मराठी सैन्य जिंकले ना इंग्रज ! याचे कारण म्हणजे, युद्ध संपल्यावर सामान्यतः विजयी पक्ष रणांगणाचा ताबा घेतो ते या ठिकाणी घडून आले नाही. अर्थात काही अपवादात्मक प्रसंगी विजयी पक्षाला रणभूमी ताब्यात घेण्यात यश मिळत नाही किंवा काही कारणास्तव युद्धभूमी ताब्यात न घेता विजयी पक्षाला त्या ठिकाणाहून निघून जावे लागते हे गृहीत धरून देखील कोरेगाव येथे मराठी किंवा इंग्रजी फौजेचा विजय झाला असे ठामपणे म्हणता येत नाही. समजा, मराठी सैन्य जिंकले असे म्हणावे तर मुठभर इंग्रज फौजेची त्यांनी कत्तल वा लूट का केली नाही हा प्रश्न उद्भवतो. इंग्रजांच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल. कदाचित ब्रिटीश पक्षाच्या वतीने असेही समर्थन करता येईल कि, पूर्ण रात्र प्रवास केल्याने आणि दिवसभर युद्धाचा ताण पडल्यामुळे पराभूत मराठी सैन्याचा पाठलाग करणे त्यांना शक्य झाले नसावे. परंतु, हा मुद्दा देखील तितकासा पटण्यासारखा नाही. किंबहुना काहीकाळ हा मुद्दा जर मान्य केला तर पुढचा प्रश्न उद्भवतो कि, प्रतिहल्ल्यात किंवा माघार घेणाऱ्या मराठी सैन्याची त्यांनी कितपत हानी केली ? लढाईची उपलब्ध वर्णने लक्षात घेतली असता भीमा नदी पाठीशी घेण्यात दोन्ही पक्षांना अपयश आल्याचे दिसून येते. किंबहुना दोघांनाही नदी पाठीशी घेणे त्यावेळी जमले नाही. हे ध्यानात घेता कोरेगावातून माघार घेणाऱ्या व नदीपार करून पळून जाणाऱ्या मराठी सैन्याचा पाठलाग करून त्यांची कत्तल उडवण्याची संधी इंग्रजांनी का दवडली याची उकल होत नाही. म्हणूनच इंग्रज किंवा मराठी फौजा कोरेगाव येथे निर्णायक विजय मिळवू शकल्या नाहीत असे म्हणावे लागते.
महार रेजिमेंट
सूर्यास्तापर्यंत लढाई देऊन बापू गोखलेने जेजुरीच्या मार्गाने साताऱ्याच्या दिशेने कूच केले. लढाई चालू असताना बाजीराव पेशवा त्याच मार्गाने पुढे साताऱ्याच्या रोखाने गेला असल्याने त्याची पिछाडी सांभाळत त्याच मार्गाने जाणे बापूला भाग होते. कोरेगाव येथील लढाईमध्ये सहभागी घेतलेल्या मराठी सैन्याने जेजुरीच्या अलीकडे असलेल्या राजेवाडी या ठिकाणी आपला तळ ठोकला. हे ठिकाण कोरेगावपासून सुमारे 30 – 35 किलोमीटर्स अंतरावर आहे. कोरेगावच्या लढाईने बाजीराव पेशव्याच्या फौजेच्या अनेक उणीवा मात्र परत एकदा प्रकर्षाने जगासमोर म्हणा किंवा शत्रूसमोर आल्या असेच म्हणावे लागते. जरी या संघर्षात मराठ्यांची सर्व फौज सहभागी झाली नसली तरी इंग्रजांच्या एका पथकाचा निःपात करण्यात त्यांना आलेले अपयश ठळकपणे लक्षात येते. पाठीवर असलेल्या जनरल स्मिथच्या प्रचंड फौजेला रोखून धरण्याची जबाबदारी यावेळी मराठी सैन्याने किंवा काही इतिहासकार सांगतात त्यानुसार त्रिंबकजी डेंगळेने पार पाडली नसती तर कोरेगाव येथे बापू गोखलेच साफ निकाल लागला असता असेच म्हणावे लागते. असो, कोरेगावची लढाई झाल्यावर शिरूरहून पुण्याला निघालेली ब्रिटीश फौज, लढाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी शिरूरच्या दिशेने मागे वळली. जर कोरेगावची लढाई त्यांनी जिंकली असती तर विजयी पथके जल्लोष करत थेट पुण्याला गेली असती आणि त्या शहरात आपल्या विजयाचा मोठा उत्सव त्यांनी केला असता. यामुळे पुण्यातील पेशव्याच्या व पेशवाईच्या समर्थकांना मोठीच दहशत बसली असती. परंतु कोरेगावात इंग्रजांचा विजय झाला नसल्याने त्यांनी पुण्याकडे जाण्याचे एकप्रकारे टाळले असेच म्हणावे लागते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उद्भवतो कि, जरी इंग्रजांचा कोरेगाव येथे पराभव झाला नसला तरी त्यांनी तसेच पुढे पुण्यात जाण्याचे का टाळले असावे ? माझ्या मते, जनरल स्मिथ 2 जानेवारी 1818 रोजी चाकण जवळ आल्याची बातमी मिळाल्यामुळे आणि कोरेगावच्या झुंजात ब्रिटीश सैन्याची बरीच हानी झाल्यामुळे तसेच नजीकच्या काळात तरी पुण्यावर बाजीरावाची स्वारी येण्याची शक्यता नसल्याने शिरूरहून आलेली ब्रिटीश पथके परत मागे फिरली असावीत.
कोरेगाव येथे इंग्रजांनी जो काही स्तंभ अथवा स्मारक उभारले आहे ते ब्रिटीशांच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हणणे धाडसाचे आहे. शत्रूच्या तुलनेने त्यांची फौज अल्प असताना देखील मोठ्या शौर्याने आणि शिकस्तीने सामना करून त्यांनी आपला बचाव केला त्याबद्दल इंग्रजांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी एक स्मारक उभारले असल्यास नवल नाही.

December 31, 2014 in मुख्य पान
वसतिगृहात विद्यार्थीनीने दिला मुलीला जन्म 0

वसतिगृहात विद्यार्थीनीने दिला मुलीला जन्म

mu0218
अमरावती – शहरातील कंवरनगर भागातील एका आदिवासी वसतिगृहात सप्टेंबर महिन्यात दाखल झालेल्या एका युवतीने मुलीला जन्म दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी समोर आला. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
धारणी तालुक्यातील ही युवती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कंवरनगर परिसरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये सप्टेंबर महिन्यात आली. नजीकच्या एका कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. सोमवारी दुपारच्या सुमारास वसतिगृहामध्ये असताना तिला अचानक भोवळ आली. वसतिगृह अधीक्षकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विचारपूस केली असताना ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणी करण्यात आली. ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. सोमवारी सायंकाळी सिझरीन करीत प्रसूती करण्यात आली. मुलगी झाली. अवघे १२०० ग्रॅम वजनाचे बाळ असल्याने त्याला विशेष कक्षात ठेवण्यात आले. सदर मुलगी बेशुद्ध असल्याने या प्रकरणातील रहस्य अद्याप कायम आहे. हा प्रकार समोर येताच नगरसेवक राजू मसराम, राजेश्वर इवनाते, रामेश्वर उईके, डॉ. प्राची आतराम यांनी वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरले. सप्टेंबरमध्ये दाखल झालेल्या या मुलीचे गर्भारपण अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेतून कसे सुटले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र वसतिगृह प्रशासनाने टोलवाटोलवी करीत वेळ मारून नेली. यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करण्यात न आल्याची माहिती फ्रेजपुरा पोलिसांनी दिली.

December 31, 2014 in मुख्य पान
पोलिस करणार तरुणांत जनजागृती 0

पोलिस करणार तरुणांत जनजागृती

big-show
औरंगाबाद – नव्या वर्षात नेटवर्क वाढविण्यासाठी तरुणांत जनजागृती करणे, बिट सिस्टीम सुधारणे, गुन्हेगारांची कार्यपद्धती विभाग अपडेट करण्याचा निर्धार पोलिस खात्याने नव्या वर्षात केला आहे.
पोलिस खात्यात आरोपींची माहिती काढण्यासाठी खबऱ्यांचा मोठा वापर करण्यात येतो. बहुतांश वेळा हे खबरी गुन्हेगारच असतात. पोलिसांना केलेल्या मदतीचा अनेक वेळा त्यांच्याकडून गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे खबरी म्हणून गुन्हेगार पोसण्यापेक्षा शहरवासियांमध्ये गुन्हेगारी रोखण्याबाबात जनजागृती करण्यावर नव्या वर्षात भर दिला जाणार आहे. या प्रवाहात प्रामुख्याने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांना सामाविष्ट करून घेण्यात येणार आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत बिट वाटून दिले आहेत. पोलिस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बिटचे प्रमुख त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यात पोलिस कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बिट सिस्टीम प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे. याचा फायदा पोलिस ठाण्यांना होणार असून त्यांचावरील भार हलका होण्यास मदत होणार आहे.
नव्या वर्षात प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पीएसआय व तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले सायबर पथक निर्माण करण्यात येणार आहे. छोट्या स्वरुपाच्या तक्रारी हे सायबर पथक सोडवणार असून मोठ्या तक्रारी आयुक्तालयातील सायबरसेल सांभाळणार आहे. पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची कार्यपध्दती ( मोडस ऑपरेंडी ब्युरो ) हा विभाग कार्यरत आहे. या विभागाचे संगणकीकरण करून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन या विभागाला आधुनिक करण्याचा संकल्प आहे.

December 31, 2014 in मुख्य पान
 लाच घेताना लिपिक पकडला 0

लाच घेताना लिपिक पकडला

download
नगर – पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिकाला १५ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. महादेव भागाजी बनकर असे या लिपिकाचे नाव असून, मेडिकल बिलातील त्रुटींची पूर्तता करून मेडिकल बिल नाशिक येथे पाठविण्यासाठी खात्यातील कर्मचाऱ्याला लाच मागितली होती.
पाटबंधारे विभागातील एका कर्मचाऱ्याने मेडिकल बिल बनकर याच्याकडे जमा केले होते. परंतु, या बिलातील त्रुटींटची पूर्तता करण्यासाठी व नाशिक येथे पाठवून देण्यासाठी बनकरने १५ हजार रुपयांची मागणी केली. ही तक्रार नगरच्या अँटी करप्शन ब्युरोकडे केल्यानंतर बुधवारी दुपारी नगर-औरंगाबाद रोडवरील सिंचन भवनसमोरील टी सेंटरसमोर सापळा रचण्यात आला. या ठिकाणी तक्रारदाराकडून पैसै स्वीकारताना पंचासमक्ष बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय मुतडक, सुनील पवार, प्रमोद जरे, नितीन दराडे, श्रीपादसिंग ठाकून, एकनाथ आव्हाड, कल्हाण गाडे, राजेंद्र सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

December 31, 2014 in मुख्य पान
विमानाचे अवशेष समुद्राच्या तळाशी, सात प्रवाशांचे मृतदेह सापडले 0

विमानाचे अवशेष समुद्राच्या तळाशी, सात प्रवाशांचे मृतदेह सापडले

aerial

जकार्ता – इंडोनेशियाच्या जावा समुद्रात जलसमाधी मिळालेल्या एअर एशियाच्या विमानाचे आणखी काही अवशेष समुद्राच्या तळाशी आढळले आहेत. सोनार उपकरणाच्या सहाय्याने या विमानाचा समुद्रात शोध घेतला जात आहे. या उपकरणाला बुधवारी समुद्राच्या तळाशी या विमानाचे काही अवशेष आढळल्याची माहिती इंडोनेशियाच्या शोधपथकाच्या अधिका-यांनी दिली. तसेच या भागातून आणखी काही मृतहेदही ताब्यात घेण्यात आले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून एअर एशियाच्या ‘क्यू झेड ८५०१’ या विमानाचा शोध सुरु होता. अथक शोधमोहिमेनंतर मंगळवारी अखेर जावा समुद्रात शोधपथकाला विमानाचे काही अवशेष आढळले तसेच तीन मृतदेहही आढळले. सध्या मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरु आहे मात्र खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. वादळी वारे आणि पावसामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
‘आम्ही सध्या हवामान साफ होण्याची वाट पाहत आहोत. मोठ्या लाटा आणि धुंवाधार पावसामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. आतापर्यंत सात मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मंगळवारी विमानातील तीन प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते तर आज सकाळपासून चार मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
१६२ प्रवाशांना घेऊन एअर एशियाचे क्यू झेड ८५०१ (एअर बस ए-३२०-२००) हे विमान रविवारी सकाळी सुराबया विमानतळावरुन सिंगापूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. मात्र उड्डाणानंतर काही काळातच हे विमान रडावरुन बेपत्ता झाले. गेल्या तीन दिवसांपासून या विमानाचा शोध सुरु होता. अखेर मंगळवारी या विमानाचे अवशेष तसेच काही मृतदेह समुद्रात तरंगताना आढळल्याने या विमानाला जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट झाले.
या विमानात एक ब्रिटीश, मलेशियन, सिंगापूरचा प्रत्येकी एक नागरिक, तीन दक्षिण कोरियाचे, १४९ इंडोनेशियाचे नागरिक होते तर सात क्रू मेंबर होते. प्रवाशांमध्ये सतरा मुलांचा समावेश हा. यामध्ये एकही भारतीय नागरिक नव्हता.

आता पूनम पांडेला वाद नकोत 0

आता पूनम पांडेला वाद नकोत

Poonam Pandey
मुंबई – मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणा-या पूनम पांडेचे नाव कोणी उच्चारले किंवा वाचनात आले तर, समोर येते तिची वादग्रस्त इमेज. पूनम पांडे आणि वाद हे ठरलेले समीकरण.
तोकडया कपडयांमध्ये अंगप्रदर्शन आणि बोल्ड विधानांनी पूनमने नेहमीच स्वत:ला प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत ठेवले. पण आता पूनमला या वादांचा कंटाळा आला आहे. एकवेळ अशी होती की, मला वाद हवे होते. पण आता भरपूर काम मिळाल्यामुळे मला काहीही वादग्रस्त करण्याची आवश्यकता उरलेली नाही.
मला जे हवे होते ते मी वादांमधून मिळवले. त्यामुळे मला आता वादग्रस्त इमेजची गरज नाही असे पूनमने सांगितले. बॉलिवूडनंतर पूनम आता टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
एका तेलगु चित्रपटाच्या पत्रकारपरिषदेदरम्यान पूनमने आता आपल्याला वादग्रस्त इमेजमधून बाहेर पडायचे असल्याचे सांगितले. मालिनी अँण्ड कंपनी असे पूनमच्या तेलगू चित्रपटाचे नाव आहे. याआधी नशा चित्रपटाव्दारे पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

‘पीके’ची चौकशी होणार नाही – मुख्यमंत्री 0

‘पीके’ची चौकशी होणार नाही – मुख्यमंत्री

pk
मुंबई – आमिरच्या खानच्या वादग्रस्त पीके चित्रपटाची चौकशी होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. देशभरात ‘पीके’विरोधात होत असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची चौकशी होईल असे गृहमंत्री राम शिंदे यांनी विधान केले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी हे विधान फेटाळून लावले.
‘पीके’बाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही. तसेच राज्यात सर्वत्र पीकेचे शो सुरु राहतील.तसेच याचित्रपटाचे शो सुरळीत सुरु रहावेत यासाठी आवश्यक संरक्षणही पुरवले जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, ‘पीके’विरोधात सुरु असलेल्या निदर्शनावरुन दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘पीके’ चित्रपटात कोणत्याही धर्माचा अवमान करण्यात आलेला नाही असे हिरानी यांना सांगितले होते.

December 31, 2014 in मुख्य पान
नववर्षाचे स्वागत उत्साहात 0

नववर्षाचे स्वागत उत्साहात

 

 

 

New year celebrations in AhmedabadStudents welcome new year

जगभरात नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात येत आहे. नववर्ष सर्वांना सुख-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा देण्यासाठी, सहर्ष स्वागताची तयारी सुरु असताना नववर्षाच्या मजा आणि मस्तीची काही क्षणचित्रे…

December 31, 2014 in मुख्य पान
‘न्यायिक नियुक्ती आयोग’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी 0

‘न्यायिक नियुक्ती आयोग’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

supreme-court
नवी दिल्ली – सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसंदर्भातील ‘न्यायिक नियुक्ती आयोग विधेयका’ला बुधवारी राष्ट्रपतीं प्रणव मुखर्जीनी मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे यापूर्वीची कॉलेजियम पद्धत रद्द झाली आहे.
यंदाच्या ऑगस्टमध्ये संसदेने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक मंजूर केले. त्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
या विधेयकामुळे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या न्यायिक आयोग करेल. या आयोगात सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील दोन ज्येष्ठ न्यायमूर्ती, कायदामंत्री आणि दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असणार आहे.

December 31, 2014 in मुख्य पान
थर्टीफर्स्टवर पोलिसांचा ‘वॉच’ 0

थर्टीफर्स्टवर पोलिसांचा ‘वॉच’

images
यवतमाळ , दि. ३० – नवर्षाला काही तास शिल्लक राहीले असून थर्टीफस्टच्या पार्श्वभूमिवर तरुणाईसह सर्वच जण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागत करताना कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस दलाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहे. थर्टीफर्स्टच्या पार्टीवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवनवर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपी चालकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवल्या जाणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री महामार्गासह शहरात व तालुक्यात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राहणार आहे. मद्यपी चालकांच्या तपासणीसाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली. मद्यपान करून कुणीही सुसाट वेगात वाहने चालवणार नाही. ट्रिपल सीट जाणार नाही, यावरही पोलीस लक्ष ठेवणार आहेत.
जिल्हाभरात अडीच हजार पोलीस कर्मचाºयांसह उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तैनात राहणार आहे. पोलिसांनी हॉटेल, वाईनबार मालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.

December 30, 2014 in विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पहिला बळी 0

यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पहिला बळी

4837138604525446090_Mid
यवतमाळ , दि. ३० – जिल्ह्यासह तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीच्या प्रकोपाने शेतात जागलीसाठी गेलेल्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. प्रल्हाद सिताराम महल्ले (७०) रा. दगड धानोरा असे मृतकाचे नाव आहे.
वातावरणात बदल झाला असून पारा खाली उतरला असून तालुक्यात थंडीने हुडहुडी भरली आहे. थंडीच्या लाटेमुळे दिवसाची सुरुवात सकाळी उशिराने होऊ लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज १४ अंश सेल्सियेस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. प्रल्हाद महल्ले हे दगड धानोरा येथील गजेंद्र टापरे याच्या शेतात पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून सोमवारी रात्री जागलीसाठी गेले होते. दरम्यान रात्रीच्यावेळी थंडीची हुडहुडी भरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी शेतकरी टापरे हे शेतात गेले असता हा प्रकार उजेडात आला. यावेळी गावकºयांनी शेतात एकाच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच नेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

December 30, 2014 in मुख्य पान
जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 0

जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक

Untitled
यवतमाळ , दि. ३० – जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत टोल फ्रि क्रमांकाची सुविधा करण्यात आली. तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन, रमाई व राजीव गांधी आवास योजना अंतर्गत वैयक्तिक शौचायलाबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३६३२ हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. वैयक्तिक तक्रार असल्यास या क्रमांक्रावर संपर्क साधता येणार असून ही सुविधा सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या विभागासंबंधी तक्रार आहे, त्यांच्याशी संपर्क साधून समस्यांचे निवारण करण्यात येईल. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जि.प.अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

December 30, 2014 in विदर्भ
४० प्रवाशांचे मृतदेह सापडले 0

४० प्रवाशांचे मृतदेह सापडले

air-asia-plane
जाकार्ता – इंडोनेशियाच्या हवाई हद्दीतून रविवारी बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानातील ४० प्रवाशांचे मृतदेह आढळले आहेत. इंडोनेशियातून उड्डाण केल्यानंतर ज्या ठिकाणी हे विमान अखेरचे दिसले, तेथील समुद्रातच हे मृतदेह तरंगताना आढळल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता विमानाचा शोध घेणारे इंडोनेशियाचे तपास पथक मंगळवारी हेलिकॉप्टरने बोर्नियो बेटावर उतरले. तिथे त्यांना काही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. फुगलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहांची ओळख पटविता येणे मात्र शक्य आहे. हे मृतदेह इंडोनेशियन नौदलाच्या एका जहाजावर आणल्याचे राष्ट्रीय शोध व बचाव पथकाचे संचालक एस. बी. सुप्रियादी यांनी सांगितले. मृतदेहांवर कोणत्याही प्रकारचे लाइफ जॅकेट नव्हते, अशी माहिती सुप्रियादी यांनी स्थानिक पत्रकारांना दिली. नौदलाचे प्रवक्ते मनहन सिमोरंकीर यांनीही मृतदेह मिळाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

December 30, 2014 in मुख्य पान
 धोनीचा कसोटी क्रिकेटला रामराम 0

धोनीचा कसोटी क्रिकेटला रामराम

images (2)
मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीच्या या ‘बॉम्ब’ने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, धोनीच्या राजीनाम्यामुळे ६ जानेवारीला सुरू होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या सिडनी कसोटीचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. ‘बीसीसीआय’ने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली देशात आणि विदेशातही भारतीय संघाने मोठे यश मिळवले. कसोटीत मागे पडलेल्या भारतीय संघाला धोनीनेच पहिल्या स्थानीही नेऊन ठेवण्याचा पराक्रम केला. धोनीच्या कल्पक नेतृत्वामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिकेसारख्या कसोटीतील बलाढ्य संघांनाही भारताने तगडे आव्हान उभे केले. आज मात्र ऑस्ट्रेलियाकडून २-० असा मालिका पराभव पदरात पडल्याने धोनीने निवृत्तीचा टोकाचा निर्णय घेतला. वनडे आणि टी-२० कडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे धोनीने सांगितले.
धोनीने आपल्या यशस्वी कारकीर्दीत ९० कसोटी सामन्यांमधून ४ हजार ८७६ धावा तडकावल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतकं, ३१ अर्धशतकांची नोंद आहे. २२४ ही त्याची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नईत त्याने ही खेळी केली होती.

महिलेचा नवरा मांजर 0

महिलेचा नवरा मांजर

cat
चेन्नई – अहो जरा बाहेर येता का? अशी साद एखाद्या महिलेने घातली आणि समोरून ‘म्याऊsss’ असा प्रतिसाद आला तर? ऐकून नवलच वाटेल पण चेन्नईतील एका महिलेने असा दावाच केला आहे की, तिच्या घरातील मांजर म्हणजे तिचा नवरा आहे.
१२ डिसेंबर रोजी जेव्हा सुपरस्टार रजनीकांतच्या वाढदिवसामुळे चेन्नईत प्रचंड उत्साह असतो अशा वेळी बी. इंद्राणी नावाची एक महिला मात्र आपले मांजर हरवले म्हणून नाराज होती. हे मांजर म्हणजे आपला नवरा आहे, असा या महिलाचा विश्वास आहे आणि म्हणूनच ते मांजर दिसत नाही तोपर्यंत तिला जेवणही नीट जात नव्हते. अखेर दोन आठवड्यांनी २६ डिसेंबर रोजी ते मांजर सापडले आणि तिचा जीव भांड्यात पडला.
१२ डिसेंबर २०१११ बी. इंद्राणी यांच्यासाठी अतिशय दु:खाचा दिवस होता. कारण याच दिवशी पोलीस विभागात कार्यरत असलेल्या त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर बरोबर दहाव्या दिवशी एक मांजर त्यांच्या घरात आले. इंद्राणी यांनी त्या मांजराला दत्तक घेतलं आणि त्या मांजराचं नाव वेल्लची ठेवलं. जेव्हा इंद्राणी यांना त्यांच्या नवऱ्याची आठवण यायची तेव्हा वेल्लची त्यांचं मन त्या दु:खातून बाहेर काढत असे. हळूहळू त्यांच्यात एक अतूट नातं निर्माण झालं. म्हणूनच हे मांजर म्हणजे माझा नवरा आहे, असा दावा इंद्राणी यांनी केला आहे. हे मांजर इंद्राणी यांच्या गल्लीत देखील प्रसिद्ध आहे. इंद्राणी यांच्या परवानगीशिवाय हे मांजर कुणाकडे काहीही खात नाही. १२ डिसेंबर रोजी पशू पक्षी खाणाऱ्या जमातीतील काही लोक या मांजराच्या मागे लागले आणि त्यामुळेच हे मांजर हरवले. २६ डिसेंबर रोजी जेव्हा हे मांजर घरी परतले तेव्हा गल्लीतील लोकांनी प्रचंड जल्लोष केला. घराघरात मिठाई वाटली. सगळे लोक आनंद साजरा करण्यासाठी इंद्राणी यांच्या घरासमोर जमले होते. इंद्राणी यांचा मुलगा एन.बी.सेतुरामन याने देखील मांजर पुन्हा सापडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या मांजराबद्दलच्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या.

 

December 30, 2014 in मुख्य पान
भाजीपाला पिकापासून वार्षिक 2 लाखाचे उत्पन्न 0

भाजीपाला पिकापासून वार्षिक 2 लाखाचे उत्पन्न

Atma-Dhepe
यवतमाळ, दि. ३० : कमी धारणक्षेत्रामध्ये किफायतशीर शेती होऊ शकत नाही, या संकल्पनेला बाभूळगाव तालुक्यातील उमरी (स्मारक) येथील महादेव छत्रपती ढेपे या शेतकऱ्याने खोटे ठरविले आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत भाजीपाला पिकांपासून वार्षीक 2 लाखाचे उत्पन्न मिळविणाऱ्या या शेतकऱ्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ढेपे यांच्याकडे वडीलोपार्जीत 3.50 एकर इतकी शेतजमीन आहे. या शेतीवर दरवर्षी परंपरेने सोयाबीन, कापसाचे पिक घेतले जायचे. या पिकांना खर्च अधिक आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असल्याने त्यांनी भाजापाला पिकाकडे लक्ष दिले. 1997-98 मध्ये कृषी विभागाच्या मदतीने शेतात विहीर व मोटर बसवून सिंचनाची सुविधा उपलब्ध केली. ओलिताची सोय उपलब्ध झाल्याने त्यांनी पहिल्या वर्षी अर्धा एकर क्षेत्रावर भाजिपाला पिके घेण्यास सुरूवात केली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला. ढेपे यांना आत्मा योजनेची माहिती झाल्यानंतर त्यांनी या योजनेंतर्गत भाजीपाला पिकाचे प्रशिक्षण, अभ्यास दौरे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताला भेटी दिल्यानंतर त्यांचा भाजीपाला पिकांबाबत आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी या पिकाखालील क्षेत्रात वाढ केली. आजमितीस ते दरवर्षी 2.50 एकर क्षेत्रावर टोमॅटो, सांभार, भेंडी, चवळी सारख्या भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. उर्वरीत एक एकर क्षेत्रावर कापुस अथवा सोयाबीनचे पिक घेतात.आत्मा योजनेंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान, पिकांची लागवड, खर्चात बचत, पिकांचे संगोपण आदी बाबी त्यांनी आत्मसात केल्याने गेल्या तिन वर्षात त्यांच्या भाजीपाला उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. सन 2011-12 मध्ये त्यांना भाजीपाल्यापासून 1 लाख 30 हजाराचे उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या वर्षी 2012- 13 मध्ये 1 लाख 55 हजार तर गेल्यावर्षी 2 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले. सदर भाजीपाला पिकं स्थानिक बाजारासह बाभूळगाव व यवतमाळ येथे विक्री करतात. शेतीसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी ते कुटुंबासह स्वत: शेतीची कामे करतात त्यामुळे उत्पादन खर्चातही बरीच कपात त्यांनी केली आहे. दैनंदिन स्वयंपाकासाठी बऱ्याच वस्तू लागत असतात. त्यातील बहुतांश वस्तू खरेदी कराव्या लागते. मात्र ढेपे यांनी स्वयंपाकासाठी दररोज लागणाऱ्या मोहरी, जीरे, सोप, ओवा, कांदा यासारख्या वस्तु स्वत: थोड्या क्षेत्रात लागवड करून उत्पादीत करतात त्यामुळे त्यांना या वस्तु बाहेरून पैसे देऊन विकत आणाव्या लागत नाही.

December 30, 2014 in विदर्भ
 हनुमान मंदिरात पुजाºयाचा खून 0

हनुमान मंदिरात पुजाºयाचा खून

Photo0257
यवतमाळ, दि. २९ – दारव्हा – यवतमाळ मार्गावरील कामठवडा येथील गोकी नदीकाठावरील हनुमान मंदिरात पुजाराचा खून केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. सदाशिव डहाके (६०) रा.काठोडा ता. आर्णी असे मृतक पुजाºयाचे नाव आहे.
विज वितरण कंपनीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर कौटुंबीक कलहामुळे ते घर सोडून गेले होते. डहाके यांनी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच १० एकर शेती विकत घेतली होती. गत तीन चार वर्षापसून ते कामठवाडा येथील गोकी नदीकाठावरील जागृत हनुमान मंदिरात पुजारी म्हणून सेवा करीत होते. तर त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली हे दिग्रस येथे वास्तव्यास आहे. दरम्यान आज सोमवारी गावातील नागरिक हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले असता रक्ताच्या थारोळ््यात पुजाºयाचा मृतदेह आढळून आला. गावकºयांनी ही बाब उपसरपंच श्रावण धुमाजी राठोड यानी लाडखेड पोलीसाना माहिती दिली. यावेळी पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेची माहिती मिळताच दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यानीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच यवतमाळ येथील श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र श्वान पथकाही काही अंतरावरच गुरफटल्याने मारेकºयाचा शोध लागला नाही. यावेळी अंगुली मुद्रा तज्ञाला पाचारण करून घटनास्थळी आढळून आलेल्या लाकडी दांड्यावरील मारेकºयाच्या बोटाचे ठसे घेतले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून पुजाºयाचा खून कोणी व का केला हे कळू शकले नाही. चाणी कामठवाडा येथील पोलीस पाटील संतोष रामेकर यानी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

December 29, 2014 in मुख्य पान
महिला शेतकºयाची आत्महत्या 0

महिला शेतकºयाची आत्महत्या

download (6)
यवतमाळ, दि. २९ – महिला शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील बोराटी येथे घडली. सुनिता पवार (३०) असे मृतक महिलेचे नाव आहे. महिला शेतकºयाकडे पाच एकर शेती होती. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने नापिकीचा सामना करावा लागला. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फे डायचे या चिंतेत महिलेने आत्महत्या केली असून, महिलेवर ५० हजार रूपयांचे कर्ज आहे.

December 29, 2014 in विदर्भ
एअर एशियाच्या बेपत्ता विमानाला जलसमाधी? 0

एअर एशियाच्या बेपत्ता विमानाला जलसमाधी?

AP12_28_2014_000009Aair-asia-plane
जाकार्ता – इंडोनेशियातील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर रविवारी सकाळी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानाचा अद्याप नेमका ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र, हे विमान समुद्रात कोसळल्याचा अंदाज इंडोनेशियाने व्यक्त केला असून त्यादृष्टीनं शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
मलेशियन विमान कंपनी असलेल्या ‘एअर एशिया’चे क्यूझेड ८५०१ हे विमान रविवारी पहाटे ५.२० वाजता सिंगापूरसाठी रवाना झाले होते. सिंगापूरच्या चंगी विमानतळावर ते सकाळी ८.३० वाजता उतरणार होते. मात्र, उड्डाणानंतर ४२ मिनिटांतच ते बेपत्ता झाले. खराब हवामानामुळे पायलटने विमानाचा नियोजित मार्ग बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर विमानाचा रडारशी संपर्कच तुटला होता. तब्बल ३० तास उलटल्यानंतरही विमानाच्या ठावठिकाण्याबद्दल केवळ शंकाकुशंकाच व्यक्त होत आहेत. इंडोनेशिया सरकारने कालपासूनच विमानाच्या शोधाचं काम सुरू केलं आहे.
गेल्या २४ तासांतील शोधानंतर आणि विविध ठिकाणांहून माहिती घेतल्यानंतर इंडोनेशियन शोधपथक विमान समुद्रात बुडाल्याच्या निष्कर्षाप्रत आलं आहे. ‘हे विमान समुद्राच्या तळाशी असावं अशी आमची प्राथमिक माहिती आहे. आम्ही बेलीतुंग बेटाच्या पूर्व आणि उत्तरेकडील जलभागावर लक्ष केंद्रित केलं आहे,’ असं शोधपथकाचे प्रमुख सोलिस्तो यांनी सांगितलं.
वायुसेनेची विमानं, पाणबुड्या, तसेच इंडोनेशियासह मलेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया हे देश विमानाच्या शोधमोहिमेत गुंतले आहेत. अन्य देशांनीही सहकार्याची तयारी दाखवली आहे.

December 29, 2014 in मुख्य पान
काश्मीरमध्ये तापमान गोठण बिंदूच्या खाली 0

काश्मीरमध्ये तापमान गोठण बिंदूच्या खाली

snowfall in Dharamshala
श्रीनगर – संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडीची लाट कायम असून, सोमवारी रात्री काश्मीर खो-यात तापमान गोठण बिंदूच्या खाली घसरले होते. श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ४.१ डिग्री सेल्सिअस आहे.
गुलमर्गमध्ये उणे ३.४, पहलगाममध्ये उणे सात तापमानाची नोंद झाली आहे. लडाख भागातील लेहमध्ये उणे १५.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जम्मूमध्ये त्यामनाने स्थिती थोडी चांगली आहे.
जम्मूमध्ये ४.३ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. बुधवारपर्यंत वातावरण असेच राहील असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे.
सध्या जम्मू-काश्मीरमध्ये चिलाई कलानचा काळ सुरु आहे. वर्षातील चाळीस दिवस कडाक्याची थंडी असते त्याला चिलाई कलान म्हटले जाते.

December 29, 2014 in मुख्य पान