
यवतमाळ – विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी फेडरेशन द्वारा स्व. गोपाळरावजी राजुरकर स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा विदर्भ स्तरीय प्रथम पुरस्कार येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेटला मिळाला आहे. सलग तीन वेळा पुरस्कार जिंकणारी राजलक्ष्मी मल्टीस्टेट यवतमाळ ही एकमेव संस्था होय. हा पुरस्कार म्हणजे संस्थेप्रती विश्वास दाखविणार्या ठेवीधारकाचा, संस्थेच्या कर्तव्यदक्ष संचालक मंडळाचा, अधिकारी, कर्मचारीवृंदाचा, कर्ज घेऊन स्वत:चा विकास व पर्यायाने राष्ट्रीय कार्यात हातभार लावणार्या कर्जधारकांचा, मित्रमंडळींचा, हितचिंतकांचा सन्मान होय, सत्कार होय, गौरव होय, असे भाष्य अरविंद तायडे यांनी केले. सहकार क्षेत्रात अत्यंत भक्कमपणे उभी असलेल्या या संस्थेच्या अध्ययावत सुसज्ज वस्तुचा लोकार्पण सोहळा नजिकच्या काही दिवसात संपन्न होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गजानन बुरडकर सभागृह चंद्रपूर येथे हा पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप राजुरकर, माजी आमदार हरिश्चंद्र वरखेडे, फेडरेशनचे उपाध्यक्ष वामनराव झाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद तायडे, संचालिका संध्याताई तायडे, कार्यकारी संचालक क्षितीज तायडे, संचालक यु.डी. आगरे, बाबुसिंग कडेल, घनश्याम ढेंगळे, सल्लागार प्रताप पारसकर, ज्ञानेश्वर सुरजुसे, सुरेशसिंह जोई, उपसरव्यवस्थापक सुरेश अजमिरे, अधिकारी संजय इंगोले, नीलेश वाकोडे, संतोष गुल्हाणे, आनंद संगावार, मनोज येडे, वृषाली सुळे, पराग सुळे, रवी रहाणे, विजय मोडक, गीता शिंगोटे, संध्या इनामदार अमित ओक, आशिष तायडे, सलमानखान पठाण, संदीप महाजन, किशोर भागवत, स्वप्नील आठवले, दै. अभिकर्ता अनिल येरावार, विक्रम विठलानी, बिपीन मजेठीया, किशोर ठाकरे व कर्मचारी नितीन छपरवाल, विलास बन्सोड, भाग्यवान तेलंग, विलास सादे उपस्थित होते.
या पुरस्कारावर समारोपीय भाष्य करताना ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगण’! या ओळी प्रमाणे प्रबळ इच्छा शक्ती ही प्रगतीची जननी असून यशोशिखरावर नेणारा राजमार्ग आहे. संस्थेत असणारा तरूण वर्ग या पुरस्काराने प्रेरीत झाला असून जेष्ठांच्या मार्गदर्शनात नजिकच्या काळात असे अनेक मनाचे तुरे राजलक्ष्मीच्या मुकुटात पहायला मिळणार असा विश्वास या प्रसंगी संस्थेचे तरूण कार्यकारी संचालक क्षितीज तायडे यांनी व्यक्त केला.
Archive for November 27th, 2014
0
‘राजलक्ष्मी मल्टीस्टेट’ला विदर्भस्तरीय पुरस्कार
0
अघोरी प्रथांना पायबंद घालण्यासाठीच जादुटोणाविरोधी कायदा – प्रा.शाम मानव
यवतमाळ : महाराष्ट्र शासनाने आणलेला जादुटोणाविरोधी कायदा हा सर्वसमावेश आणि सर्वच प्रकारच्या अघोरी प्रथा तसेच जादुटोण्यांवर प्रतिबंध घालणारा आहे. इतका व्यापक आणि मोठा कायदा देशात अन्य कोणत्याही राज्यात नाही. हा कायदा देव धर्माच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासोबतच वाईट चालीरितींना प्रतिबंध घालेल, असे प्रतिपादन शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष तथा अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.शाम मानव यांनी केले. कायद्याच्या जनजागृतीसाठी प्रा.मानव यांचे आझाद मैदान येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.काशिनाथ लाहोरे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, सुरेश जुरमुरे आदी उपस्थित होते.
जादुटोणाविरोधी कायद्यात देव, धर्माला विरोध नाही तसेच कोणत्याही धार्मीक कृत्याच्या आड कायदा येणार नाही. परंतु देव, धर्माच्या नावावर कुणी दुकानदारी थाटल्यास मात्र कायद्याने तो दोषी ठरेल. या कायद्याबाबत सुरूवातीस फार गैरसमज पसरविण्यात आला. कायदा संमत होण्यासाठी पुर्वीच त्याची जनजागृती आम्ही केली. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरीकांना वाईट प्रथांपासून सुटका देणारा हा कायदा असल्याने हा कायदा येऊ शकला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या कायद्यातील तरतुदी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहीजे, असे सांगितले. कुणी जादुटोणा, वाईट प्रथा-परंपरांच्या नावाखाली फसवणूक करीत असल्यास यातील तरतूदीनुसार आपण त्याविरूध्द पोलिसांकडे तक्रार नोंदविली पाहिजे. आजच्या आधुनिक युगातही जादुटोण्याच्यानावाखाली फसवणूक करीत आहे, ही सामाजिक न्यायाच्या प्रक्रीयेतील फार मोठा अडसर असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी बाबा-बूवा हातचलाखीने तसेच धर्म, देवाच्या नावाखाली कसे फसवितात याची प्रात्यक्षिकेही करून दाखविली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उद्घाटनिय भाषण केले. प्रा.काशिनाथ लाहोरे, विजय साळवे, सुरेश जुरमुरे यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन विलास काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.कमल राठोड, देविदास शंभरकर, वरिष्ठ समाजकल्याण निरिक्षक जी.बी.धोटे, डी.एम.चव्हाण, गौरव गावंडे आदींनी सहकार्य केले.
0
लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ््यात

यवतमाळ – सुधारीत सातबारा देण्यासाठी ९ हजाराची लाच स्विकारणाºया कोसारा येथील तलाठ्यास रंगेहात अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यवतमाळच्या पथकाने आज दुपारी मुकुटबन येथे ही कार्यवाही केली.
राजू बलवंत मोरे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. झरी जामणी तहसील अंतर्गत येणाºया कोसारा येथे या तलाठ्याची नेमणूक आहे. त्याच गावातील शेतकºयाने वडीलोपार्जीत शेतीचे सातबाºयामधून इतर लोकांचे नाव कमी करून वडीलाचे नावे सुधारीत सातबाºयासाठी अर्ज केला होता. त्यासाठी तलाठ्याने ९ हजार रुपयाची लाच मागितली होती. शेतकºयाने याबाबतची तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून आज मुकुटबन येथील तलाठ्याने भाड्याने घेतलेल्या घराजवळ सापळा रचला होता. शेतकºयाकडून लाच स्विकारताच तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, अमोल महल्ले, निलेश पखाले, गजानन राठोड, शैलेश ढोणे , नरेंद्र इंगोले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, किरण खेडकर, विशाल धलवार यांनी केली.
0
मराठा आरक्षणासाठी विरुगीरी

यवतमाळ – मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर करा या मागणीसाठी मराठा समाज बांधवानी उमरखेड येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टावरवर चढून विरूगीरी केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
उमरखेड व महागाव येथील समाजबांधवाचा सहभाग असलेल्या मोर्चाचे उपविभागीय कार्यालयासमोर सभेचे रुपांतर झाले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सुर्यवंशी, संदिप घाडगे, राम कदम, धर्मराज अमृते, पवन कदम व अन्य कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयातील बिएसएनएलच्या टॉवरवर चढले. त्यांनी तेथून मराठा आरक्षण घेतल्या शिवाय सोडणार नाही अशा घोषणा दिल्या. त्यामुळे तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी चितांगराव कदम हे होते. यावेळी माजी आमदार अॅड. अनंत देवसरकर, प्रकाश पाटील देवसरकर, तातू देशमुख, राम देवसरकर, अॅड. माधव माने, जगदिश नरवाडे, सिताराम ठाकरे, विकास चव्हाण, भिमराव चंद्रवशी, श्विाजी माने, डॉ. वंदना मरसुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी सवनेकर, दत्तराव शिंदे, माजी आमदार विजय खडसे, संभाजी नरवाडे, वि.ना. कदम, ज्योती ठेंगे, शिला कदम, प्रा. नलीनी टकरेख् सरोज देशमुख, प्र.भा. काळे, अॅड. अनिल माने, संजय जाधव, रणजीत नलावडे, युवराज देवसरकर, विनायक कदम, अॅड. बीराम मुरकुळे, शाम सुरोशे, वसंत देशमुख, सुदर्शन कदम यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.
0
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर

यवतमाळ – एका तरूनाने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर अपलोड केल्याने महागाव तालुक्यातील काळी दौ येथे तणावाचे वातावरण निर्माण झााला. पुसद ग्रामीण पोलीससंनी आरोपीविस अटक करून न्यायालयात हजर केले.
सचीन ग्यानबा भोने (२१) रा. काळी दौ. असे आरोपीचे नावे आहे. या तरूणाने फेसबुकवर एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावन्याच्या हेतुने सदर मजकुर अपलोड केला होता. हा प्रकार उजेडात येताच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नागरिकांनी या आरोपीला अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. या बाबतची भनक लागताच आरोपीने गावातून काढता पाय घेतला होता. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल करून जेरबंद केले. गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0
आर्णी बालाजी जिनींग, कापूस खरेदीतील काट्यात घोळ

यवतमाळ – आर्णी येथील बालाजी जिनींगमध्ये कापसाची खाजगी खरेदी सुरू असून काट्यात घोळ असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संचालकाविरूद्घ फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे. हा प्रकार गंभीर असून शेतकºयामध्ये रोष व्यक्त होत आहे.
देऊरवाडी येथील शेतकरी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर डकरे यांनी एम.एच. २९ / ६३३७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये घरून कापूस भरला. त्यानी गायत्री काट्यावर वजन करून कापूस बालाजी जिनींगमध्ये विकण्यासाठी नेला. त्यावेळी ट्रॅक्टरसह ७०.३० क्विंट कापूस भरला. त्यामध्ये निव्वळ कापसाचे वजन ३५.७५ क्विटल भरले. गायत्री काट्यावर ट्रॉलीसह ७०.६५ व निव्वळ कापसाचे वजन ३५.९५ क्विंटल भरले. दोन्ही काट्यापैकी बालाजी जिनींगमध्ये २० किलो वजन कमी आढळून आले. यापूर्वीही याच शेतकºयाने सदर जिनींगमध्ये कापूस विक्री केली आहे. येथे वजनात घोळ असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र हा घोळ कुणीही पुढे आणत नव्हते. आज डकरे यानी हा प्रकार उजेडात आणला. यावेळी महादेव बुटले, रामचंद्र जाधव, पंजाब जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. शेतकरी अगोदरच आस्मानी संकटाला तोंड देत आहे. कापूस पिकला नाही, शेतकºयाच्या कापसाला भाव नाही, जो माल हाती आला त्यातही व्यापारी शेतकºयाची फसवणूक करीत आहे. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी बालाजी जिनींग अॅन्ड प्रेसींगचे संचालक दिलीप चिंतावार, बाळासाहेब निलावार यांचे याचे विरुद्घ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
0
शिवसेना-भाजप एकत्र येणार

मुंबई -शिवसेनेला सत्तेत सहभागी करून भाजपची मानसिकता असून हे दोन्ही पक्ष राज्यातील सरकारमध्ये लवकरच एकत्र दिसतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. मात्र, या मनोमीलनाआधी पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला असून त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपने स्वबळावर लढली. मात्र, कुणालाही बहुमत न मिळाल्याने दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येईल, अशी चर्चा होती. मात्र, निवडणुकीतील जागा वाटपाप्रमाणेच सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांची बोलणी फिसकटली आणि भाजपने शिवसेनेला विचारात न घेतला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. आवाजी मतदानाचा मार्ग स्वीकारून विश्वासमतही जिंकले. त्यामुळे शिवसेना सत्तेपासून दूरच राहणार असल्याचे दिसत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यावधीचे इशारे द्यायला सुरुवात केल्याने भाजपने पुन्हा शिवसेनेसाठी चर्चेची दारे किलकिली केली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या जुळवाजुळवीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘शिवसेना-भाजपनं पुन्हा एकत्र यावं असं साऱ्यांचंच मत आहे. भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी केली आहे. त्याबाबतची चर्चा उद्यापासून होईल. भाजपतर्फे चंद्रकांत पाटील व धर्मेंद्र प्रधान शिवसेनेशी चर्चा करतील. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना-भाजप एकत्र सरकार चालवेल, असा विश्वास आहे.
0
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई- शिवसेनेने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. अशा वेळी शेतक-यांना आधार देण्याची गरज होती. मात्र खडसे यांनी मोबाइल बिलाबाबतचे वादग्रस्त वक्तव्य करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यात खडसेंकडेच कृषिमंत्रीपदाची जबाबदारीही आहे. अशा वेळी शेतक-यांचा अपमान करणा-या खडसेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात शिवसेने म्हटले आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने याबाबत गुरुवारी राजनभवनात राज्यपालांची भेट घेतली.
मोबाइलचे बिल भरायला शेतक-यांकडे पैसे आहेत, पण वीजबिल भरायला पैसे नाहीत, असे वक्तव्य खडसे यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना आणि खडसे यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू झाले. यात खडसे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष करत त्यांना शेतीतले काय समजते, असा प्रश्न केला होता. खडसेंचे हे वक्तव्य शिवसेनेच्या जास्तच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे काहीकरून खडसे यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रमच शिवसेनेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसनेने खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मराठवाडयात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे तिथे तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. खरे तर शिष्टमंडळ दुष्काळाबाबत समस्या मांडण्यासाठी गेले होते. पण, त्यांनी त्यात खडसेंच्या राजीनाम्याची मागणीही पुढे रेटली. त्यामुळे ही भेट खडसेंच्या राजीनाम्यासाठी होती की दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नासाठी होती, याची चर्चा राजभवनावर होती. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेसाठी पुन्हा चुचकारले आहे. त्यानंतर शिवसेने घेतलेली ही भूमिका जास्त काही पदरात पाडून घेण्यासाठी केलेले दबावाचे राजकारण आहे, असे काही राजकीय तज्ज्ञ सांगतात.
0
जागतिक आरोग्य संघटनेच्या चार जणांची हत्या

इस्लामाबाद- जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमध्ये सुरु असलेली पोलीओ लसीकरण मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील पोलीओ मोहीमेतील चार सदस्यांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलीओ मोहीम सुरु होती. मोहीमेच्या अखेरच्या दिवशी क्वेट्टा येथे लसीकरण सुरु असताना काही दहशतवादी मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात चार जण ठार झाले.
या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील पोलीओ मोहीम बंद केली आहे. कार्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे संघटनेने म्हटले आहे. जोपर्यंत पाकिस्तान सरकारकडून कर्मचा-यांना सुरक्षा दिली जात नाही. तोपर्यंत ही मोहीम थांबवण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात पाकिस्तानमध्ये पोलीओ मोहीमेसाठी काम करणा-या ६० जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.
0
मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या

सोलापूर – पाचवी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी जिल्ह्यातील मंगळवेढयामध्ये घडली.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावामध्ये रहाणा-या बाजीराव वाघमारेने पाचवीही मुलगी झाली म्हणून पत्नीची विळयाने गळा चिरुन हत्या केली. बाजीरावला पहिल्या चार मुली आहेत पण वंशाला दिवा हवा हा त्याचा अट्टाहास कायम होता. पत्नी पाचव्यांदा गर्भवती राहिली तेव्हा त्याला मुलगा होईल अशी आशा होता. पण पत्नीने पाचव्यांदाही कन्यारत्नाला जन्म दिल्याने चिडलेल्या बाजीरावने पत्नीची विळयाने हत्या केली. बाजीराव हा मजुरीचे काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
0
हॉटस अॅपवर स्वत:ला श्रध्दांजली वाहून आत्महत्या

सांगली – इस्टंट मेसेंजिंगमधील सर्वाधिक लोकप्रिय अॅप असलेल्या व्हॉटस अॅपवर तरुणाई चेष्टा-मस्करी करण्याबरोबरच आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणा-या महत्वाच्या घटनांची माहिती देते. मात्र सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या व्हॉटस अॅपवरुन आपल्या मृत्यूची माहिती दिली. महादेव कुंभार असे या युवकाचे नाव आहे. महादेवने आधी व्हॉटस अॅपवर स्वत:चे छायाचित्र टाकून नावापुढे कैलासवासी असा मजकूर पोस्ट केला आणि नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महादेव २२ वर्षांचा होता. महादेवचे आई-वडिल शेतमजूर असून, वेगवेगळया गावांमध्ये शेतमजुरीची कामे मिळवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सध्या त्याचे कुटुंब सांगली जिल्ह्यातील वाळवा या गावी होते. स्वत: महादेव एका कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. त्याचबरोबर त्याचे महाविद्यालयीन शिक्षणही सुरु होते. रविवारी रात्री महादेवने आपल्या व्हॉटस अॅपवर स्वत:चे छायाचित्र टाकले आणि त्याच्यापुढे कै. महादेव कुंभार यांना भावपूर्ण श्रध्दांजली असा मजकुर पोस्ट केला. सोमवारी आई-वडिल कामाला गेल्यानंतर घरात एकटया असलेल्या महादेवने गळफास घेऊन आत्महत्या केली.










