Archive for November 25th, 2014
0
राज्यात 3 हजार हवामान केंद्र उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्व ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हवामान केंद्र
यवतमाळ : पारंपारिक पध्दतीने दरवर्षी ठराविक वेळी शेतकरी पेरणी करतात. निसर्गाने साथ न दिल्यास दुबार, तिबार पेरणी करावी लागते. यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. हवामानाचा अचूक अंदाज असल्यास हे नुकसान टाळता येवू शकते. त्यामुळेच हवामानाच्या अचूक अंदाजासाठी राज्यात 3 हजार छोटी हवामान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
स्वातंत्र्य सेनानी तथा राज्याच्या मंत्रिमंडळात विविध विभागाचे मंत्री पद भूषविलेले स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित स्मृती समारोह प्रसंगी ‘व्हिजन महाराष्ट्र’ या विषयावर विचार व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी खा.विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली. सुरुवातीस जवाहरलालजी दर्डा यांच्याशी फडणवीस कुटुंबियांच्या असलेल्या कौटुंबिक संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. बाबुजींच्या आठवणी आणि त्यांचे कार्य आम्हासाठी प्रेरणादायी आहे़, असे ते महाराष्ट्र राज्यास परिवर्तनासाठी फार मोठी संधी आहे. चांगले धोरण आणि जनतेच्या विश्वासाने राज्याला पुढे न्यायचे आहे. तरुणांचा देश म्हणून आपली ओळख आहे. या तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देवून रोजगारक्षम मानव संसाधन बनविणे आवश्यक आहे. राज्यातील मानव संसाधन विकसित केल्यास राज्य विकासाच्या गाथेत देशात अव्वलस्थानी राहिल. व्यवसाय, कला तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवित असतांना युवाशक्ती श्रमशक्ती तसेच राष्ट्रशक्तीत कशी परिवर्तीत होईल, यावर आपला भर राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग विकसित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण होवू शकणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई तसेच सुरक्षा दिली पाहिजे. सिंचनाच्या सोई उपलब्ध झाल्यानंतर विज पुरवठा मुबलक नसल्यास शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होईल. भविष्यात विज वितरणाचे चांगले नियोजन करून राज्याला विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. राज्यातील ऊर्जाप्रकल्प त्यांच्या पूर्ण क्षमतेने सुरु राहिल्यास टंचाई भासणार नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांना गती दिली जात आहे. पुर्वी राज्यातील विज प्रकल्पांना लांबून कोळश्याचा पुरवठा व्हायचा. केंद्र शासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राज्याला आजूबाजूंच्या खाणींमधून कोळसा उपलब्ध होणार असल्याने विज उत्पादन वाढीसह विजेचे दर कमी करण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या एका विजपंपासाठी दिड लाखापर्यंत खर्च येतो. हा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर असे सौरपंप दिल्यास शाश्वत विजेसोबतच हे पंप त्यांना उत्पादन वाढीसाठी मोलाचे ठरेल. त्यामुळे असे पंप शेतकऱ्यांना द्यावयाचे नियोजन आहे. कापसाच्या भावाबाबत दरवर्षी अडचण होते. राज्यात सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरु केले आहे. पणन महासंघही सीसीआयच्यावतीने कापूस खरेदी करत आहे. मुळात जोपर्यंत कापसावर प्रक्रीया करणारे उद्योग येथे सुरु होणार नाही, तोपर्यंत चांगला भाव मिळणार नाही. त्यामुळे प्रक्रीया उद्योग सुरु करण्यावर भर राहिल, असे ते म्हणाले. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. नजर आणेवारी नुकतीच आली. आणेवारीनंतर वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. अशा पंचनाम्यातून सुट मिळावी म्हणून आम्ही केंद्र शासनास विनंती केली. केंद्राने पहिल्यांदाच वैयक्तिक पंचनाम्याच्या सुटची मागणी मान्य केली. केंद्राचे पथक राज्यात येवून दुष्काळाची पाहणी करतील. त्यानंतर या दुष्काळी स्थितीवर निर्णय होणार आहे. काही गावे वारंवार दुष्काळात जातात. या गावांना दुष्काळातून कायमस्वरूपी काढण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने काम हाती घेण्यात येणार आहे. दुबार, तिबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्यासाठीच 3 हजार छोटी हवामान केंद्र सुरु करण्यात येत असून पुढे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशी केंद्रे उभी करण्यात येतील. राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग यावे यासाठी उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यासोबतच त्यांना कमीतकमी वेळात परवानग्या देण्यासाठी नवीन विंडो सिस्टम लवकरच अंमलात येईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो. त्यासाठी चांगले धोरण आणि त्याच्या मलबजावणीची तसेच जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. राज्याला विकासाच्याबाबतीत अग्रेसर करण्यासाठी आम्ही काम सुरु केले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सुरुवातीस खा.विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी विदर्भाच्या विकासाच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे मार्गाला गती देण्यासोबतच यवतमाळसारख्या ठिकाणी ऑटोहब सारखे प्रकल्प कसे येतील यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. स्व.जवाहरलालजी दर्डा यांनी विविध खात्याचे मंत्री असतांना विदर्भावर विशेष लक्ष दिले होते, असे सांगुन बाबुजींच्या आठवणींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमास आ.राजू तोडसाम, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, हरिष मानधना, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, स्वातंत्र सैनिक प्राणजीवन जानी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, विशेष पोलीस महानिरिक्षक सी.एस.उगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, जेष्ठ संपादक मधुकर भावे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
वनविभागाच्या कॅमेºयात वाघिण कैद

झरी जामणी तालुक्यात हैदोस, शेतकरी व मजुरात दहशत
फोटो आहे……
यवतमाळ – जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून नोंद असलेल्या झरी जामणी तालुक्यात वाघिणने हैदोस घातला आहे. वनविभागाने बसविलेल्या कॅमेºयात सदर वाघिण कैद झाली असून शेतकºयांसह नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
झरी तालुक्यातील मार्की, पांढरकवडा (ल.), मुच्छी, शेकापूर व खरबडा शिवारात मागील १५ दिवसापासून वाघिणीने आपल्या दोन बछड्यांसह ठाण मांडल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वाघिणीच्या दहशतीमुळे त्रस्त शेतकºयांनी यांची तक्रार वनविभागाकडे केली. पांढरकवडाचे उपवनसंरक्षक ए.पी.गिºहीपुंजे, टिपेश्वर अभयारण्य चे प्रमुख चंद्रशेखर बाला, वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.बी.नागुलवार, वाईल्ड लाईफ सोसाएटी नागपूरचे मिलिंद पारीवाकम आणि वनकर्मचारी मार्की येथील हरी भोंगडे यांच्या शेतावर पोहोचले. येथील शेतकरी वासुदेव विधाते, अनिल विधाते, तुकाराम जुमनाके, प्रकाश विधाते, बंडु पारखी, देवनाथ भोंगडे आणि अन्य शेतकºयांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची, वाघाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाळीव प्राण्यांचा मोबदला आणि शेतमालाच्या नुकसानीचा मोबदला देण्याची मागणी केली. शेतशिवारात फिरत असलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी बेहोश करण्याºया ट्रॅँक्युलायझर बंदूकीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपवनसंरक्षक गिºहीपुंजे यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडून याची परवाणगी मागीतली. प्रत्यक्षदर्शी शेतकºयानुसार ही वाघीण कधी एकटी, कधी आपल्या दोन बछड्यांसोबत तर कधी फक्त एकाच बछड्यासोबत वावरताना दिसते. मार्की ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.
0
आठ कामगारांना विषबाधा

झरी – तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील मे.बी.एस.इस्पात लि. च्या खासगी कोळसा खाणीत काम करणाºया आठ कामगारांना दूषित पाणी पिल्याने विषबाधा झाली. विषबाधा झाल्यानंतर कामगारांना उलट्या होने सुरू होताच त्यांना मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने आता सर्वच कामगारांची प्रकृती चांगली असून त्यांना सुट्टी देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार कोळसा खाणीतील कामगार जिथे पाणी पितात त्या पाण्याच्या टाकीत पाल पडली होती. ते पाणी पिताच कामगारांना उलट्या सुरू झाल्या. विषबाधा झालेल्या कामगारांमध्ये प्रफुल चौधरी, मुकेश बोरकुटे, सुमित गोंडे, विनोद गोंडे, चंद्रकांत डवरे, प्रदीप खडसे, गणेश मडकाम, संतोष राजूरकर यांचा समावेश आहे. कामगारांना सामाजिक कार्यकर्ता अनिल पावडे, सुरेश चामाटे, दीपक चांदेकर, कोळसा खाणीचे व्यवस्थापक आकाशदीप, मोरेश्वर कस्तुरे यांनी मुकुटबनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टर जोगदंड यांनी कामगारांवर वेळेवर उपचार केल्याने मोठा अनर्थ टाळता आला.
0
अन्… ती महिला झाली जिवंत!

जिल्हा शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार, नातेवाईक संतप्त
यवतमाळ – येथील वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती करण्यात आलेल्या महिलेवर उपचार करणाºया डॉक्टरांना महिला जिवंत आहे की मृत्यू पावली, याचा अंदाज लावता आला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तिने श्वास सोडला म्हणून ‘डेथ सर्टीफीकेट’ बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र महिलेचे पल्स पुन्हा सुरू झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे.
आरोग्य विभागाकडून दरवर्षी जिल्हावासींयाच्या सदृढ आरोग्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्ची घातल्या जात आहे. मात्र आजही उपजिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार मिळत नाही. प्रसुतीसाठी सुविधा असतानाही रुग्णांना यवतमाळ रेफर केल्या जात असून, खासगी रुग्णालयात सिझर साठी ३० ते ४० हजार रूपये खर्च येते. त्यामुळे रुग्ण कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मोठ्या अपेक्षेने येत आहे. नेर येथील निखत परवीन महम्मद शफीक या महिलेला प्रसुतीसाठी २३ नोव्हेंबरला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. काल सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास तिची प्रसुती झाल्यानंतर जन्म झालेल्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती गंभिर झाल्याने तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली. प्रकृतीत कुठलिही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी तिला व्हेटेंलेटरवर ठेवले. दरम्यान काल सोमवार ते आज मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत चारदा तिच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. त्यापैकी तीनदा त्या महिलेचे ठोके सुरू झाले. आज सकाळी ठोके बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिचा श्वास सुरू झाला नाही. डॉक्टरांनी मात्र महिलेचा मृत्यू झाला अशी अधिकृत घोषणा करण्याऐवजी महिलेच्या नातेवाईकांकडून कोºया अर्जावर सह्या घेऊन हळूहळू आपली प्रोसेस सुरू केली. नातेवाईकही डॉक्टर काहीच सांगत नसल्यामुळे संभ्रमात होते. डॉक्टरांच्या चुप्पीमुळे नातेवाईकांना आपला रुग्ण मृत पावल्याची शंका आली. त्यांनी तिला घरी घेवून जाण्याची तयारी सुरू केली. दरम्यान महिलेला व्हेटेंलेटरवरून काढण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांना पल्स सुरू दिसले. क्षणभर तेही अचंबित झाले. त्यांनी लगेच तिच्यावर उपचार सुरू केला आणि डेथ सटीफिकेट बनविण्याची प्रक्रीया थांबविण्यात आली.
महिलेचा मृत्यू झाला म्हणून तब्बल दीड तास रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप नातेवाईक करीत असून,सध्या महिलेवर उपचार सुरू आहे. या प्रकरणाबद्दल माहिती सांगण्यास अधिकाºयांनी टाळाटाळ केली. महिला जिवंत असल्याचे लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेमुळे कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचा कारभार किती बेजबाबदारपणे सुरू आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.
0
ट्रकची दुचाकीला धडक; दोन युवक ठार

नेर – चांदूररेल्वे येथून नेर येथे येणाºया दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ४.३० वाजता खरबी या गावाजळ घडली. आकाश चंद्रशेखर वानखेडे (२५) रा. शिवाजी नगर नेर, शुभम धोटे (२३) रा. मडकोना ता. कळंब अशी मृतकाची नावे आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथून औषधी घेऊन ते दुचाकीने ( एम.एच. २७ / ३५५८) नेर येथे येत होते. अशातच औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील खरबी या गावाजवळ ट्रकने (ओ.डी. १५/ बि ५११४) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये आकाश हा जागीच ठार झाला. तर शुभमचा अमरावती येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक सुशांत बियाणी (२५) रा. ओडीसा याच्याविरोध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
२६/११ हाच पोलीस दिवस जाहिर करण्याची मागणी


२६/११ ह्या दिवसाचे स्मरण होताच हृदयचे ठोक वाढायला लागतात. त्या कर्तुत्वावार पोलीसांना माझा सलाम! महाराष्टÑ पोलीस भारतात नं. १ ची पोलीस आहे. त्या कर्तुत्ववार विरांगना अखंड स्मरणात ठेवता यावे हा दिवस अश्रु न ढाळत बसता पोलीसांना उत्साहीत करण्याकरिता हा माझा प्रयत्न सगळे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे होता. महाराष्ट्र पोलीस दिवस का होत नाही असा प्रश्नही पोलिस दलातील हवालदाराच्या मुलींनी उपस्थित केला आहे.
महाराष्टÑ पोलीसांचा रुबाब खरचं अविस्मरणीय आहे. उदा. पोलीस धिकारी दयानायक सारख्या धाकाने अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम ज्यांच्या पाठीशी विदेशी शक्ती असताना सुध्दा तो देश सोडून राहात आहे. तसेच २६/११ आतंकवादी हमल्याच्या वेळी आपल्या नजरेसमार आतंकवाद्यासोबत लढण्यासाठी प्रथम उतरणारे नागरे पाटील (आयपीएस) अधिकारी आपल्या अंगरक्षका सोबत फक्त ९ एमएम पिस्टलचा जोरावर हॉटेल ताज मध्ये आंतकवाद्यांसोबत झूंज देण्यासाठी प्रवेश केला आणि त्याच दिवशी जीवाची पर्वा न करता आतंकवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, विजय सावळकर, अशोक कामठे शहीद झाले. पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे सारख्यांनी फक्त लाठीच्या भरवश्यावर एके ४७ धारी पाक व्यप्त अजमल कसाब सारख्या आतकवाद्याला जेरबंद केली. स्वत:शहीद झाले. त्यामुळे उज्वल निकम सारख्या हूशार वकीलाने त्याला फासा पर्यंत पोचविण्यात यश मिळविले असे महाराष्टÑ पोलीसांच्या यशाच्या कतुत्वाचे अनेक उदाहरणे आहेत.
गडचिरोली सारख्या दर्गम भगाात नेहमी नक्षलवाद्यांसोबत चकमक होते. त्या अगणित पोलीस शहीद सुध्दा होतात. हे सारे संसाराचा गाडा चालावा म्हणूनच नव्हे तर आपल्या लोकांना सुरक्षीतता मिळावी या करीता सतत लढत असतात. आपल्या सारख्या सामान्यांना गगनात झोपावता यावे म्हणून ही वाटचाल पुढे चालली आहे. दिवाळी, दसरा अथवा कुठलेही कार्यप्रसंग असो पोलीसांना माय रक्षणांच्या बाजूत समाधान मानावे लागते. शासन दरबारी काही मागता येत देखील नाही. कारण त्यातही कायद्याच्या चौकशीत असते. ना सतत प्राणांची बाजी लाविणाºयासाठी ज्या दिवशी पोलीस खात्यांतील कर्तुत्ववान उच्चत्वाला नाठनारे पोलीस अधिकारी शहीद झाल आणि अजमल कसा सारख्या दृष्टास फासीला लअकविले म्हणजेच हा दिवस महाराष्टÑ पोलीसांसाठी विजय दिवस आहे.
शहिदांच्या आठवणीचे नेहमीच स्मरण रहावे म्हणून २६/११ हा विजय दिवस महाराष्टÑ पोलीसांकरिता पोलीस दिवस म्हणून शासनाने घोषित करावा. तसेच या दिवसी पोलीस दलात उत्तम काम करणाºया पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाºयांना तसेच पोलीस पाटील अथवा गुन्हे उघडकीस करण्यास मदत करणाºयांचा सन्मान करावा. सामान्यास सन्मानित करून पोलीसांना मदतीचा हात वाढेल. पोलीस स्वत: करीता काही मागू शकत नाही. आपण त्यांच्या कार्याला उंची देऊया अन २६ नोव्हेंबर २०१४ पासून हा दिवस पोलीस दिवस पाळावा एवढीच अपेक्षा.
कु. विणा शेखर वांढरे
रा. पळसवाडी, पोलीस लाईन, यवतमाळ
0
रिपाइं (ए) जिल्हा बैठक संपन्न

यवतमाळ – रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) ची २४ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे जिल्हा कार्यकारीणीची सभा घेण्यात आली. राष्टÑीय अध्यक्ष मा. खा. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वात जवखेडा हत्याकांडाचा निषेध मोर्चाचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे केले आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जाण्या संबंधी नियोजन केले असून मोर्चात कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी केले. या बैठकीमध्ये स्व. शाहू चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला रामदास बनकर, अॅड. रवींद्र अलोणे, अॅड. धनंजय मानकर, नवनीत महाजन, धम्मपाल माने, सुरेश जाधव, महादेव घरडे, बन्सोड, वसुर्केत पाटील, कविता पाटील, सुलोचना भोयर, शुभांगी घरडे, राज ढवळे, गोविंद मेश्राम, विलास कांबळे, संभाजी लोणारे, निलकंठ मेश्राम, प्रफुल्ल इंगोले आदी उपस्थित होते.
0
फुले-आंबेडकर स्मृतीपर्व २८ नोव्हेंबर पासून

यवतमाळ – महात्मा ज्योतीबा फुले – डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्मृती पर्व – २०१४ चे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदान येथील क्रांतीज्योती सावित्रीआई फुले समता परिसर येथे होणाºया कार्यक्रमात विविध संस्था आणि संगटनांचा सहभाग राहणार आहे. नऊ दिवस चालणाºया स्मृतीपर्वात विविध समाज घटकातील विचारवंत विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्टÑ उभारणीसाठी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा पाया भक्कमपणे रचला. महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाज क्रांती करून बहुजन समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सर्वोच्च योगदान केले. या दोन्ही महामानवांचा स्मृतीदिन साजरा करीत असताना बहुजनांचे प्रबोधन व्हावे या हेतुने तमाम बहुजनांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. जमातवाद विकासाच्या मार्गातील धोंड, भारतीय समाजात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक परिवर्तनामध्ये मराठा सेवा संघाचे योगदान, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि इस्लाम, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी म.फुलेंची विचारधारा हाच एकमेव पर्याय, ओबीसी समाज व फुले-शाहु-आंबेडकर विचारधारा, तसेच सम्राट अशोकची शासन प्रणाली आणि भारतीय संविधान आदि विषय स्मृतीपर्वाच चर्चिले जाणार आहेत.
स्मृतीपर्वात आदिवासी मुक्तीदल व भटक्या विमुक्त जमाती, स्मृतीपर्व महिला समीती, मराठा सेवासंघ, ख्रिस्त भक्तमंडळी, जमात ए इस्लामी (हिंद), ओबीसी सेवासंघ, तेली समाज महासंघ, गुरु रविदास विचारमंच, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे स्मारक समीती तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाल यांचा सहभार राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानेश्वर गोबरे, विलास काळे, मंसूर एजाज जोश, देवानंद पवार, मनोज रणखाम, आनंद गायकवाड, डॉ.दिलीप महाले, प्रा.सुनंदा वालदे, कवडू नगराळे, राजेश मुके, संजय तरवरे, विनोद फुलमाळी, पी.पी.पवार, डॉ.सुभाष जमदाळे, कुंदा तोडकर, माधव सरकुंडे, सुनिता काळे, माया गोबरे, रियज सिद्दीकी, संजय बोरकर आदिंनी केले.











