पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November 14th, 2014

दलित हत्याकांडविरोधात एनजीओंचे शनिवारी आंदोलन 0

दलित हत्याकांडविरोधात एनजीओंचे शनिवारी आंदोलन

119543-0311rktkweb
मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी दलित हत्याकाडांच्या निषेधार्थ शहरातील स्वयंसेवी संस्था शनिवारी आंदोलन करणार आहेत.
शिवाजी पार्क येथे होणा-या या आंदोलनात अभिनेते नाना पाटेकर, अमोल पालेकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपट निर्माते एन. चंद्रा आणि गायिका फैय्याज हे कलाकारदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस दलित लोकांवरील अन्याय वाढतच आहे. त्यामुळे आजही लोक भितीच्या छायेत वावरत आहेत. आजही दलित, महिला आणि आदिवासी हे सांविधानिक अधिकारापासून वंचित आहेत. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही या लोकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय समाज हा विविध सांस्कृतिक धाग्यांनी बनला आहे. त्यामुळे सर्व जातींना एकत्रित ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत असे स्वयंसेवी संस्था चालवणारे काँग्रेसचे खासदार हुसैन दलवाई यांनी सांगितले.तसेच या प्रकरणातील आरोपींविरोधात तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच यांसारख्या प्रकरणांसाठी विशेष तपास समिती नेमण्यात यावी अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

November 14, 2014 in मुख्य पान
खासदाराचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न 0

खासदाराचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

index

कोलकाता – शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी गुरुवारी रात्री अलिपूर तुरुंगात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहसुधार निरीक्षक, तुुरुंगातील डॉक्टर आणि या प्रकरणात हात असलेल्या तुरुंगातील कर्मचा-यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.कुणाल घोष यांनी आत्महत्या करण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेतल्या. काही वेळाने त्यांनी हे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर त्यांना ताबडतोब एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पश्चिम बंगाल गृहसुधार मंत्री एच.के.स्वाफी यांनी सांगितले. १० नोव्हेंबर रोजी घोष यांनी स्थानिक न्यायालयात हजर करण्यापूर्वी येत्या तीन दिवसांत जर सीबीआयने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींवर योग्य कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. या घोटाळ्यात सहभागी असलेले इतर आरोपी स्वतंत्रपणे फिरत आहे आणि मी मात्र येथे तुरुंगात आहे. मी तीन दिवसांची मुदत देतो, जर या तीन दिवसांत घोटाळ्यातील इतर सहभागी लोकांवर योग्य कारवाई झाली नाही तर मी आत्महत्या करेन असे घोष यांनी न्यायदंडाधिकारी अरविंद मिश्रा यांना सांगितले होते.कुणाल घोष हे शारदा ग्रुपचे माजी सीईओ आहेत. कोट्यावधीच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील ते आरोपी आहेत. गेल्या एक वर्षांपासून ते तुरुंगात आहेत.

November 14, 2014 in मुख्य पान
आयपीएल स्पॉट फिक्सिंग, सर्वोच्च न्यायालयाकडून नावे जाहीर 0

आयपीएल स्पॉट फिक्सिंग, सर्वोच्च न्यायालयाकडून नावे जाहीर

images
नवी दिल्ली – निवृत्त न्यायाधीश मुकूल मुदगल समितीने सादर केलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या चौकशी अहवालातील नावे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने उघड केली.
आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन, त्यांचा जावई गुरुनाथ मय्यपन, शिल्पा शेट्टीचा नवरा आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा, आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांची नावे या अहवालात आहेत.त्याशिवाय भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी, वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सॅम्युल बद्री, इंग्लंडचा माजी फलंदाज ओवेस शहा या क्रिकेटपटूंची नावेही या चौकशी अहवालात आहेत.ज्यांची नावे जाहीर झाली आहेत त्यांना आक्षेप असल्यास त्यांना चार दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात आक्षेप नोंदवावा लागणार आहे. हे सर्व मुद्दे निकालात निघत नाहीत तो पर्यंत निवडणूका घेऊ नका असे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला सांगितले. या अहवालातील अजूनही सहा नावे उघड झालेली नाहीत. यावर पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.

November 14, 2014 in मुख्य पान
बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण 0

बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण

1414595499devendra-fadnavis
मुंबई-
बदल्यांचे अधिकार केंद्रीत झाल्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने काही विभागातील बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात जलसंपदा आणि अन्न व औषध प्रशासन विभागातून केली आहे. Minimum Government, Maximum Governance या सूत्रानुसार शासनाचे काम पुढील काळात चालेल याची सुरुवात या निर्णयाने झाली आहे.
जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर अ आणि ब गटातील अधिकारी आहेत. त्यामधील कार्यकारी अभियंता यांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे होते ते आता जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे देण्यात आले आहेत. तर उप अभियंत्यांच्या बदल्यांचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांकडून मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-२ गट ब यांच्या बदल्या आता मुख्य अभियंता हे अधीक्षक अभियंता यांच्या सल्ल्याने करतील. हे अधिकार पूर्वी जलसंपदा राज्यमंत्र्यांकडे होते.
औषध निरीक्षकांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, वैज्ञानिक अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री यांच्याकडे होते. औषध निरीक्षकांची १६१ पदे असून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची २६५ पदे आहेत.
बदल्यांचे अधिकार मंत्रालय स्तरावरून क्षेत्रिय स्तरावर देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने एकूणच प्रशासनामध्ये विकेंद्रीकरण होऊन त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल. तसेच प्रशासनामध्ये पारदर्शकता व गतीमानता येईल. मुख्यमंत्र्यांनी शपथविधीनंतर आपले सरकार हे पारदर्शक व गतीमान असेल असे सांगितले होते, त्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे

November 14, 2014 in मुख्य पान
पवारांच्या हाती मोदींचा झाडू 0

पवारांच्या हाती मोदींचा झाडू

pawar1n
पुणे – भाजपचा हात हातात घेऊन महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची सगळी गणिते उलटीपालटी करणाऱ्या शरद पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील ‘झाडूच’ हाती घेतला आहे. मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात शरद पवारही सहभागी झाले असून त्यांनी आज पुण्यात सहकुटुंब साफसफाई केली. त्यामुळं पवारांच्या पुढच्या ‘चालीबद्दल’ तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बारामती येथे समस्त पवार कुटुंब आज स्वच्छता अभियानासाठी रस्त्यावर उतरले होते. पवारांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वच्छता केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार तसंच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर साफसफाई केली. शरद पवार यावरच थांबणार नाहीत. बारामतीच्या शेजारीच असलेल्या मूर्टी या गावात लवकरच पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी हे गाव दत्तक घेतलं आहे. त्यामुळं शरद पवार एनडीएची वाट चालू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

November 14, 2014 in मुख्य पान
मराठा, मुस्लिम आरक्षणाला स्थगिती 0

मराठा, मुस्लिम आरक्षणाला स्थगिती

high-court
मुंबई -‘व्होट बँके’च्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं विधानसभा निवडणुकीआधी मराठा समाज आणि मुस्लिम धर्मियांना दिलेल्या आरक्षणाला स्थगिती देऊन आज मुंबई हायकोर्टानं राजकारण्यांना मोठा झटका दिला आहे. आता या निर्णयाविरोधात नवं सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे.
राज्यघटनेतील तरतूद आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येणं शक्यच नाही. तसंच, गेली अनेक वर्षं राज्यातील सत्ताकारणात प्राबल्य असलेला मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्यानं त्यांना आरक्षणाची गरजच नसल्याचं स्पष्ट मत हायकोर्टानं नोंदवलंय. मराठा आरक्षणाची शिफारस करणाऱ्या नारायण राणे समितीसाठी ही चपराक मानली जातेय. दुसरीकडे, मुस्लिमांचं नोकरीतील आरक्षण कोर्टानं फेटाळलंय, पण सरकारी शैक्षणिक संस्थांमधील ५ टक्के आरक्षण कायम ठेवण्यास न्यायमूर्तींनी हिरवा कंदील दिलाय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेगमी करण्यासाठी मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १६ टक्के, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळानं २५ जूनला घेतला होता. राज्यातील सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं गेलं होतं. त्यामुळे राज्यातील आरक्षणाचं प्रमाण लोकसंख्येच्या ७३ टक्के झालं होतं. गेली अनेक वर्षं मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्यांनी या निर्णयाचं दणक्यात स्वागत केलं. मुस्लिम समाजही खुश झाला. परंतु, हे आरक्षण राजकीय हेतूनं प्रेरित असल्याची टीका करणारेही बरेच होते. त्यापैकी काहींनी कोर्टातच धाव घेतल्यानं, कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टिकणार का, याबद्दल शंकाच होती.
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जो मराठा समाज सत्ताकारणात प्रबळ आहे, त्यांना आरक्षणाची काय गरज?, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला होता. तसंच, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येत नाही, या राज्यघटनेतील कलमाकडेही त्यांनी लक्ष वेधलं होतं. धर्माच्या आधारावर आरक्षण देणं कितपत योग्य आहे?, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. या संदर्भातील तीन वेगवेगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात आज एकत्रित सुनावणी झाली. तेव्हा, या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे.
मराठा समाज आणि मुस्लिमांना आरक्षण दिल्यास राज्यातील ७३ टक्के लोकसंख्येला आरक्षणाचे कवच मिळेल. हे घटनेच्या विरोधात असून त्यानं सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल, असं न्यायमूर्तींनी नमूद केलं आणि मराठा आरक्षणाला पूर्णपणे स्थगिती दिली. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं त्यांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण सुरू ठेवा, पण नोकरीत त्यांनाही आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत.
राज्य सरकार कोर्टात जाणार!
दरम्यान, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला स्थगिती देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटेंनी व्यक्त केली आहे. त्यांनी या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचाही भाजप सरकारला आधार असल्यानं फडणवीस यांनी ही भूमिका घेतल्याचं बोललं जातंय. नागपूर अधिवेशनात मराठा-मुस्लिम आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

November 14, 2014 in मुख्य पान