पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November 10th, 2014

डॉ. प्रकाश आमटे यांना ‘मदर तेरेसा पुरस्कार’ जाहीर 0

डॉ. प्रकाश आमटे यांना ‘मदर तेरेसा पुरस्कार’ जाहीर

prakash-amte
मुंबई – बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे चालवणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे आणि नेपाळच्या सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कोईराला यांच्यासह १० जणांना हार्मोनी संस्थेचा सामाजिक न्यायासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
डॉ. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेलं कार्य सर्वश्रुत आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवणा-या डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्नी मंदाकिनी आमटे यांच्यासोबत हेमलकसा या दुर्गम ठिकाणी आदिवासींसाठी केलेल्या कार्यांची ओळख सर्वांनाच आहे. त्यांच्या या समाजकार्याचा गौरव म्हणून हार्मोनी संस्थेच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यासोबतच मानवी तस्करीच्या जाळ्यातून सुमारे १२ हजार महिलांची सुटका करणा-या अनुराधा कोईराला यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांपासून नेपाळ-भारत सीमेवर सुरु असलेल्या मानवी तस्करीविरोधात त्यांचा लढा सुरु आहे. ऐझवाल येथील डॉ. संगथनकिमा यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ईशान्य भारतात व्यसनमुक्तीसाठी त्या कार्यरत आहेत. तसेच लक्ष्मीधर मिश्रा, सुनिथा कृष्णन, वंदना शिवा, रिफत अब्दुल्ला यांचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

November 10, 2014 in मुख्य पान
जावखेड दलित हत्याकांड, संशयितांची नार्को टेस्ट 0

जावखेड दलित हत्याकांड, संशयितांची नार्को टेस्ट

images.jpeg00
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जावखेड गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील पाचही संशयितांची नार्को चाचणी करण्याची परवानगी सोमवारी पाथर्डी न्यायालयाने दिली.
२१ ऑक्टोबर रोजी जवखडे खालसा या गावातील एका दलित कुटुंबातील तिघांची ह्त्या झाल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. जाधव वस्तीत राहणा-या संजय जाधव, जयश्री जाधव व सुनील संजय जाधव यांची अत्यंत क्रूरपणे हत्या कऱण्यात आली होती.या घटनेनंतर समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणी विविध संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलनेही सुरु आहेत.

November 10, 2014 in मुख्य पान
अक्कू यादव हत्येप्रकरणी सर्व आरोपींची सुटका 0

अक्कू यादव हत्येप्रकरणी सर्व आरोपींची सुटका

2
नागपूर- तब्बल दहा वर्षानंतर कुख्यात गुंड अक्कू यादव खून खटल्याच्या निकाल सोमवारी जाहीर झाला. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी सर्व १८ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.
विशेष म्हणजे या खटल्यात १८ पैकी सात महिला आरोपी होत्या. न्यायालयातच एका गुंडाची हत्या केल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे होते. ज्या जमावाने यादवची हत्या केली होती. त्यात महिलांची संख्या मोठी होती. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली आदी गुन्हेगारी कृत्याने कस्तुरबानगर परिसराला वेठीस धरणा-या अक्कू यादव याला १३ ऑगस्ट २००४ रोजी जिल्हा न्यायालयात संतप्त जमावाने चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून ठार मारले होते. त्यानंतर जमावाने त्याचे घर देखील जाळून टाकले होते. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना अटक केली होती. त्यापैकी तिघांचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला.

November 10, 2014 in मुख्य पान
स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीचा पाठींबा- पवार 0

स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीचा पाठींबा- पवार

sharad-pawar-0144
मुंबई- राज्यात स्थिर सरकार असावे म्हणून आम्ही भाजपाला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. खुशाल चौकशी करा. भाजप सरकार अस्थिर होऊ नये, राज्यात पुन्हा निवडणुका परवडणा-या नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठींबा देण्याचे जाहीर केले. मात्र आम्ही पाठींब्याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही, सभागृहात मतदान करायचे की नाही, हे त्या दिवशी ठरवू, असे पवार म्हणाले. आम्ही कोणाला मतदान करावे आणि कोणाला पाठिंबा द्यायचा हा आमचा प्रश्न आहे, इतरांनी त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आणि यासाठी दुस-यांनी आम्हाला सल्ला देऊ नये, असे पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला. तसेच होय, ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द माझाच आहे, असेही पवार यांनी ठामपणे सांगितले.
भाजप सरकारला पाठिंबा दिला असला तरी एखाद्या विधेयकाला विरोध असला तर आम्ही विरोधातही मतदान करू, असेही ते म्हणाले.

November 10, 2014 in मुख्य पान
शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 0

शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

index.jpeg0
मुंबई – राज्यात भाजप सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत गोंधळात असलेल्या शिवसेनेने आज सोमवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला. शिवसेनेने विधानसभा सचिवांना अशा आशयाचे पत्रही पाठविले आहे. मात्र शिवसेनेची भाजपसोबत चर्चा अद्याप सुरु असून कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला म्हणून आम्ही दावा केल्याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेची सहनशीलता म्हणजे लाचारी समजू नका. राजकीय प्रादुर्भावाचा उपाय माझ्याकडे आहे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
दरम्यान ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीचे पत्र आम्ही विधानसभा सचिवांकडे पाठविले असून विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करण्यात यावं अशी मागणी केली आहे.’ अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. २८८ सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे ६३ आमदार असल्याने विधिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल कॉंग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४१ आमदार निवडून आले आहेत.

November 10, 2014 in मुख्य पान
चांगली पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाने विधी साक्षर होणे आवश्यक - न्या.सविता बारणे 0

चांगली पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाने विधी साक्षर होणे आवश्यक – न्या.सविता बारणे

unnamed
यवतमाळ (प्रतिनिधी) –  आजच्या काळात केवळ पुस्तकी शिक्षण घेऊन साक्षर होणेच महत्वाचे नाही तर प्रत्येकाने कायद्याच्याबाबतीत साक्षर होणेही तितकेच महत्वाचे आहे. पुढील पिढी सक्षम निर्माण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी व्यक्त केले.
जागतिक विधी साक्षरता दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विविध संघटना, शाळांच्या सहकार्याने विधी साक्षरता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रॅलीचा शुभारंभ करतांना त्या बोलत होत्या. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीस सचिन आगरकर, वकील संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण आदी उपस्थित होते.
कायद्याने प्रत्येक घटकाला संरक्षण दिले आहे. त्यामुळे आपणासही आपले कर्तव्य, अधिकार याची जाणीव असली पाहीजे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि दुसऱ्याचा आपल्यालाही होऊ नये, असे प्रत्येकाचे वर्तन असावे यासाठी कायदे असल्याचा उल्लेख पुढे बोलतांना श्रीमती बारणे यांनी केला.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांचेही भाषण झाले. विधी साक्षरता रॅलीमागची भूमिका प्राधिकरणाचे सचिव न्या.आगरकर यांनी विषद केली. त्यानंतर श्रीमती बारणे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. सदर रॅली पोष्ट आँफीस चौक, हनुमान आखाडा चौक, इंदीरा मार्केट, पोलिस स्टेशन, येरावार चौक, एलआयसी चौक अशी फिरत पुन्हा जिल्हा न्यायालयात विसर्जीत झाली. यात सहभागी विद्यार्थ्यांनी विधी साक्षरतेबाबत जनजागृती करणारे फलक घेऊन विधी साक्षरतेचा संदेश दिला.
या रॅलीत जयंत देशमुख, प्राचार्य अविनाश शिर्के यांच्यासह सर्व न्यायीक अधिकारी, वकील मंडळी, कर्मचारी तसेच शिवाजी विद्यालय, सावित्रिबाई समाजकार्य महाविद्यालय, नारायणराव माकडे शाळा, महात्मा फुले नगर परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

November 10, 2014 in विदर्भ
जवखेडे खालसा दलित हत्याकांड; हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा 0

जवखेडे खालसा दलित हत्याकांड; हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा

119543-0311rktkweb
वाशीम – अहमदनगर जिल्हयातील जवखेेडे खालसा येथे २२ ऑक्टोंबर रोजी जाधव कुटुंबातील तीन व्यक्तींची अमानुष हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळीमा ङ्गासणारी आहे. या घटनेच्या तपास कामात पोलिसांना अजूनही यश मिळाले नाही. या अमानवीय घटनेला १९ दिवस होवून गेले तरी महाराष्ट्राचे पोलीस अंधारातच आहेत. पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणार्‍या या राज्यासाठी ही घटना अतिशय लांछनास्पद आहे. या संदर्भात पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लॉगमार्चचे प्रणेते आ. प्रा. जोगेंद्र कवाडे सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. गोपाळराव आटोटे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर दलित अत्याचार धिक्कार विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संपूर्ण राज्यातून तमाम भिमसैनिकांनी लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांनी केले आहे.

November 10, 2014 in मुख्य पान