पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April, 2015

आगीत आठ दुकाने खाक, २० लाखाचे नुकसान 0

आगीत आठ दुकाने खाक, २० लाखाचे नुकसान

Digras 2
दिग्रस,दि. २० – शहरातील सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये आग लागल्याने आठ दुकान जळुन खाक झाले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यामध्ये २० लाखाचे नुकसान झाले आहे.
येथील सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये टिनाचे दुकाने आहेत. काल रविवारी रात्री दिग्रस पोलीस ठाण्यातील जमादार नारायण लोढे, पोेकॉ गणेश मसरे, साहेबराव चव्हाण हे गस्त ाालत होते. अशातच त्यांना या दुकानातून धुर निघतांना दिसला. त्यांनी लगेच दुकानाच्या फलकावरील लिहुन असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून या बाबत कळविले. नगर परिषद मुख्याधिकाºयांनाही माहीती देऊन अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले. तसेच यवतमाळ व दारव्हा नगर परिषदच्या अग्निशमन दलही तेथे पाहेचले होते. या आगीमध्ये आठ दुकाने जळुन खाक झाली असून २० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये विष्णु जाधव यांची कॅन्टींग व हॉटेलमधील एक लाखाचे साहित्य जळून खाक झाले. विजय दारव्हेकर यांच्या दुकानातील फर्निचर, आलमाºया, टीव्ही संच, खुर्च्या, डायनिंग टेबल, कुलर असा एकुण १ लाख ५० हजाराचा माल जळाला. अशोक चव्हाण याच्या गोडाऊनमधून केबल बंडल, खुर्च्या, कुलर, मोटारी, ड्रेसिंग टेबल जळाले असून ४ लाख ६५ हजाराचे नुकसान झाले. तनवीर शमी पुतलाखान यांचे ५ लाख ६० हजार, म. हारुण खलीफा यांचे ४ लाख रुपये, अरुण डफडे यांचे २ लाख ८० हजार असे एकुण १९ लाख ५६ हजार रुपयाचे नुकसान झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.पी. राऊत, एस.एल. राठोड यांनी बंदोबस्त ठेवला होता.

 

April 20, 2015 in मुख्य पान
विद्यार्थ्यांना दिला चुकीचा पेपर 0

विद्यार्थ्यांना दिला चुकीचा पेपर

download (1)
अमरावती – नियोजित प्रश्नपत्रिका न देता ऐनवेळी विद्यार्थ्यांना दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे बीएड परीक्षार्थींचा गोंधळ उडाला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्या शाखेची बीएड परीक्षा सध्या सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ‘उदन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाचा पेपर सकाळी ९ वाजता होणार होता. पश्चिम विदर्भातील सुमारे ३२ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. परंतु या विषयाची प्रश्नपत्रिका न देता गुरुवारी नियोजित ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आली. विद्यापीठाच्या सर्वच केंद्रांवर सारखीच प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याची माहितीही आता समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील में. ए. सो. कला व वाणिज्य महाविद्यालयावरही हाच प्रकर समोर आला. याविषयीची तक्रार केंद्रप्रमुखांकडे करण्यात आली. वितरण विभागाच्या चुकीने हे घडल्याचे सांगण्यात येत आहे.बीएड अभ्यासक्रमाचा पेपर तयार करताना किंवा छपाई करताना चूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत समितीकडून चौकशी केली जाणार आहे, असे प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांनी स्पष्ट केले.

 

April 20, 2015 in मुख्य पान
दारूबंदीविरोधात याचिका 0

दारूबंदीविरोधात याचिका

download
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनसह अन्य दोन संघटनांनी दारूबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनचे सल्लागार दीपक जायस्वाल यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. त्याला स्थगिती देऊन दारू व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय येथेच पूर्ववत करू देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशन, देशी-दारू संघटनेचे सचिव राजीव मारकवार व राजेंद्र दीक्षित यांनी ही याचिका दाखल केली आहे. वर्धा, गडचिरोलीप्रमाणेच चंद्रपुरात अवैध दारूविक्री केली जात असल्याचा आरोप करीत सरकारचा महसूल बुडत असल्याचेही जायस्वाल यांनी म्हटले आहे

 

April 20, 2015 in मुख्य पान
 डॉ. आंबेडकरांमुळेच मी या ठिकाणी - पंतप्रधान मोदी 0

डॉ. आंबेडकरांमुळेच मी या ठिकाणी – पंतप्रधान मोदी

download (2)
नवी दिल्ली, दि. २० – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते तर ते समस्त मानवजातीचे कैवारी होते असे सांगतानाच कृपया बाबासाहेबांना एका जातीमध्ये अडकवून ठेवू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे असे सांगत डॉ. आंबेडकरांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोदगार काढले. दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी लढा दिला असून महिलांना योग्य न्याय मिळावा यासाठी कायदे केले, महिलांना मतदानांचा अधिकार बहाल केला, बाबासाहेबांनी कामगारांसाठी लढा दिला, कामगारांना १२ तासांऐवजी ८ तास काम करता यावे यासाठी कायद्यात तरतूद केली. महत्वाचा शिक्षणाचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून ज्या दिवशी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळेल तो दिवस ख-या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजलीचा दिवस ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते त्यामुळे त्यांना एका जातीत अडकवू नका. निवडणुकांचे महत्व लक्षात घेवून बाबासाहेबांनी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करण्याची संकल्पना मांडली. तसेच स्वतंत्र वित्त आयोग स्थापन करण्याची संकल्पना मांडली असे मोदी म्हणाले.

 

April 20, 2015 in मुख्य पान
शिवरायांची आठ पत्रे सापडली 0

शिवरायांची आठ पत्रे सापडली

images
कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून राजगडावर येण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला. याशिवाय आग्र्याला पोहोचण्यापूर्वी ते मथुरेला गेले होते, या मतप्रवाहला बळकटी देणारी छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रे उपलब्ध झाली आहे. सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने शनिवारी शिवाजी महाराजांची अन्य अप्रकाशित सात पत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. ही पत्रे नक्कल आणि तालिकांच्या स्वरुपात आहेत, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शनिवारी दिली.
सावंत म्हणाले, ‘येथील पुराभिलेखागारातून ही पत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यावर गेली सहा वर्षे संशोधन सुरू होते. ‌१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. त्यानंतर ते २५ दिवसांत राजगडावर पोहचल्याचा मतप्रवाह आहे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार ते चार महिन्यांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी स्वराज्यात पोहोचले. शिवाजी महाराजांच्या ३ ऑक्टोबर १६६६ रोजीच्या पत्रात त्यांनी ‌मथुरेतील जयकृष्ण चोबे याला वर्षासन दिल्याची नोंद आहे. म्हणजे महाराज ३ ऑक्टोबर १६६६ पर्यंत मथुरेतच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आग्र्याहून सुटका झाल्यानंतर ते किमान ४७ दिवस मथुरेतच थांबल्याचे दिसते. सहाजिकच शिवाजी महाराज नोव्हेंबर महिन्यात राजगडावर पोहोचले या प्रवाहाला पत्रातून बळकटी मिळते.’
‘जयकृष्ण आणि जयराम चोबे यांनी वर्षासन आणि संकल्पित दिल्याची सनदही मिळाली आहे’ असे सांगून सावंत म्हणाले, ‘शिवाजी महाराज सप्टेंबर महिन्यात राजगडावर पोहचले अशी खबर औरंगजेबला देणारी मिर्झाराजे जयसिंग यांची पत्रे आहेत. महाराजांनी स्वतः राजगडावर पोहोचलो अशी अफवा पसरवली असावी किंवा दुसऱ्या कोणाला तरी शिवाजी बनवून पाठविले असावे असा एक तर्क करता येतो. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयामागे शहाजी महाराजांचे एक सरदार रघुनाथ पंडित अमात्य हनुमंते यांचे मोठे सहकार्य होते. संशोधकांना सापडलेल्या ३ सप्टेंबर १६७७ रोजीच्या पत्रात हनुमंते यांची ‘वार्षिक नेमणूक करून कर्नाटक देश तुम्हा स्वाधीन केला’ अशी नोंद आहे. त्यांना एक लाख पाच हजार होन ठरवून दिले असेही पत्रात नमूद आहे. याशिवाय विशाळगडाच्या संदर्भातील पत्रात (१६ मार्च १६७१) हवालदार दुधाजी आहीरराऊ यांच्या नावाची नोंद असून १४ एप्रिल १६७१ रोजीचे हे पत्र विशाळगडावरील कदिम तैनातीचे आहे. २६ सप्टेंबर १६७७ रोजीच्या पत्रात त्रिंबकजी काकास कर्नाटकातील वलदाऊर मामले चंदी हे गाव वतन दिल्याचे म्हटले आहे.’ पत्रकार परिषदेला पुराभिलेखागाराचे अभिलेखापाल गणेश खोडके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रा. देविका पाटील, अमित अडसुळे आदी उपस्थित होते.
१६६९ सालातील एक प‌त्र मिळाले असून त्यात मिरासदार, कारकूनांची नावे आहेत. या पत्रात दोघा तृतीयपंथ्यांनी शिवाजी महाराजांकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना उदरनिर्वाह करण्याची परवानगी देण्यात आली होती.- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

April 20, 2015 in मुख्य पान
अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार 0

अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार

accident
सिवान – बिहारमधील सिवान जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात सहा विद्यार्थी ठार झाले तर दोन जण जखमी झाले.
कोचिंग क्लासला घेऊन जाणा-या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला मिनीबसची धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार झाले तर जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना नजीकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तेथे कोणतेही डॉक्टर उपस्थित नव्हते असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी रुग्णालयाजवळील रुग्णवाहिका जाळल्या.तसेच रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शनेही केली. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

 

April 20, 2015 in मुख्य पान
पती ‘गे’ असल्याने डॉक्टरने केली आत्महत्या 0

पती ‘गे’ असल्याने डॉक्टरने केली आत्महत्या

priya-vedi-aiims-doctor
नवी दिल्ली – आपला पती समलैंगिक असल्याचे समजल्यानंतर दिल्लीतील पहारगंज येथील एम्सच्या ३० वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या डॉक्टरने फेसबुकवर तसेच चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवले होते.
प्रिया वेदी असे या आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ती अॅनेस्थेशिया विभागाची रेसिडेंट डॉक्टर होती. रविवारी आपल्या पतीशी भांडण झाल्यानतर रात्री साडेबाराच्या सुमारास ती हॉटेलमध्ये आली. त्यानंतर सकाळी हॉटेलमधील कर्मचा-यांना तिचा मृतहेद खोलीत आढळला.
‘पाच वर्षांपूर्वी मी डॉ. कमल वेदी यांच्यासोबत विवाह केला. माझा पती समलैंगिक असल्याने आमचे वैवाहिक जीवन चांगले नव्हते. गेल्या पाच वर्षांपासून पती आणि त्यांचे कुटुंबीय माझा मानसिक छळ करत होते’. असे तिने आपल्या पोस्टवर म्हटले आहे. याप्रकरणी मृत डॉक्टरचा पती कमल वेदी याला पोलिसांनी अटक केली असून याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.

April 20, 2015 in मुख्य पान
क्रिकेटर अंकित केसरी  चा मृत्यू 0

क्रिकेटर अंकित केसरी चा मृत्यू

The-tragic-events-of-cricket-Kolkata-cricketers-face-death-Kesari
कोलकाता – क्रिकेट सामन्यादरम्यान गंभीर जखमी झालेल्या ईस्ट बंगाल क्लब क्रिकेटच्या अंकित केसरी या क्रिकेटपटूचे सोमवारी निधन झाले.
तीन दिवसांपूर्वीच भवानीपूर क्लबच्या संघाविरुद्ध खेळत असताना क्षेत्ररक्षणादरम्यान झेल घेण्याच्या नादात अंकितची आपला सहकारी खेळाडू सौरव मंडलशी जोरदार टक्कर झाली. यामध्ये अंकित गंभीर जखमी झाला.अंकितवर गेल्या तीन दिवसांपासून कोलकाताच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी अंकितला हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
२० वर्षीय अंकितने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ४७ सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत बंगाल अंडर १९, ईस्ट झोन अंडर १९ आणि बंगाल अंडर २३ या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले.काही महिन्यांपूर्वीच सिडनीच्या क्रिकेट मैदानावर बाऊंसर डोक्यावर आदळल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे निधन झाले होते. २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे निधन झाले होते.

April 20, 2015 in मुख्य पान
मुख्यमंत्र्यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट 0

मुख्यमंत्र्यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट

201504201142124950_cm-meet-in-nagpur-jail_SECVPF
नागपूर – कैद्यांकडे मोबाईल फोन अढळून आल्याने चर्चेत आलेल्या नागपूर मध्यवर्ती कारगृहाला आज सकाळी ७.३० वाजात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भेट दिली. या भेटीमुळे कारागृहातील अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
सकाळी ७.३० सुमारास मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे कारागृह प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. ३१ मार्चला नागपूर मधून पाच कैदी पळून गेले होते. त्यानंतर जेलमध्ये कैद्यांकडून शंभरपेक्षा अधिक मोबाईल, तसेच पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले. त्यामुळे नागपूर कारगृहातील भ्रष्ट काराभारच चव्हाट्यावर आला.
मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर कारागृहाला भेट दिली. सुमारे ४० मिनिटांच्या भेटीनंतर मुख्ममंत्र्यांनी जेलच्या सुरक्षे व्यवस्थेतेबाबत अजून सुधारणा करण्याची आवश्यक्ता असल्याचे म्हटले. तसेच कारागृह प्रशासनाच्या संपूर्ण कार्यशैलीतही बदल आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीची माध्यमांसह कोणालाही थांगपत्ता नसल्याने प्रशासनाबरोबर कर्मचाऱ्यांचीही भंबेरी उडाली. नागपूर कारागृह प्रकरणानंतर आतापर्यंत एकूण ११ तुरुंग प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

April 20, 2015 in मुख्य पान

टेम्पोच्या धडकेत युवक ठार

यवतमाळ दि. १९  – जनरेटर घेऊन जाणाºया टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना दारव्हा रोडवर आज रविवारी दुपारी २.३० वाजता घडली.
तरुण भारत शहा (२०) रा. महादेव मंदिरजवळ यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. वसीम पठाण यांच्या एम.एच. २९ / वाय १७८६ क्रमांकाच्या दुचाकीने तरुण हा लोहाºयाकडे जात होता. अशातच कोल्हे ले आऊटमधून जेनरेटर घेऊन जाणारा टेम्पोने (एम.एच. ३१ डब्ल्यु ६०८९) दारव्हा रोडवरील झुलेलाल प्राईड जवळ जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणला येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सूरज प्रकाश तैलान (२४) रा. महादेव मंदिर यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक रियाझ खान अय्युब खा पठाण (३०) रा. पांढरकवडा रोड रचना ले आऊट यवतमाळ याच्याविरूद्घ शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला.

April 19, 2015 in रोजगार
किसान रॅली 0

किसान रॅली

Congress Farmers rally in Ramlila Maidan
नवी दिल्लीतील रामलीला मैदानातील किसान रॅलीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

April 19, 2015 in मुख्य पान
तीन महिन्यात राज्यातील तब्बल ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या 0

तीन महिन्यात राज्यातील तब्बल ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या

Indian_farmer
मुंबई – अवकाळी पाऊस, गारपिट आणि दुष्काळाच्या तडाख्यात यंदा राज्यातील बळीराजा होरपळत आहे. नापिकी आणि डोक्यावरचे कर्ज यामुळे शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे.
यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तब्बल ६०१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. हे प्रमाण पाहता प्रत्येक दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतात असल्याचे राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
२०१४ मध्ये शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण एक हजार ९८१ होते. यावर्षी केवळ तीन महिन्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचले आहे. आधीच दुष्काळ आणि त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतक-यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान विदर्भातील ३१९ शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकाल. तर त्यापाठोपाठ क्रमांक लागतो तो मराठवाड्याचा. गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील २१५ शेतक-यांना स्वत;हून आपले जीवन संपवले.

April 19, 2015 in मुख्य पान
तब्बल चाळीस वर्षांनंतर ‘शोले’ पाकिस्तानात प्रदर्शित 0

तब्बल चाळीस वर्षांनंतर ‘शोले’ पाकिस्तानात प्रदर्शित

sholay1
इस्लामाबाद – भारतीय चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय ठरलेला बॉलीवूडचा हिट चित्रपट शोले तब्बल ४० वर्षांनंतर शुक्रवारी अखेर पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटातील अनेक संवादही चाहत्यांच्या तोंडी आहेत. अजूनही टिव्हीवर हा चित्रपट लागल्यास प्रेक्षक तितक्याच उत्साहाने या चित्रपटाची मजा घेतात. मंद्विदवाला एन्टरटेनमेंटचे मालक नदीम मंद्विदवाला यांनी शुक्रवारी हा चित्रपट संपूर्ण पाकिस्तानात प्रदर्शित केला. कराची मध्ये या चित्रपटाचा ग्रॅँड प्रिमियरही ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक कलाकार मंडळीही उपस्थित होती.१९७५ मध्ये रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम गाठले.

April 19, 2015 in मुख्य पान
महिला खासदाराचा डान्स ,३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले 0

महिला खासदाराचा डान्स ,३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले

2015-04-19-25_ns
अहमदाबाद : हजार रुपयांच्या नोटांचा पाऊस आणि त्यासोबत चक्क महिला खासदाराचा डान्स. हा प्रकार आहे, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातला. या वेळी केवळ ३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळले गेले. टीव्हीवर संपूर्ण देशातील जनतेने नोटांचा पाऊस आणि त्यानंतर साचलेला नोटांचा ढीग पाहिला. गुजरातमध्ये वेरावळ इथल्या एका भागवतकथा कार्यक्रमात हा प्रकार सुरू होता.
पैशांचा असा पाऊस यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवतेय का, नाही ना? पण ते येथे सत्यात उतरले होते. गुजरातमध्ये पैसे उधळले जाताहेत व या नोटांच्या पावसात बेभान होऊन नाचत आहेत, चक्क भाजपाच्या खासदारबाई. शेकडो लोकांसमोर थिरकणाऱ्या या पूनमबेन गुजरातमधल्या जामनगरच्या खासदार आहेत. अहीर समाजाच्या कार्यक्रमाला जणू रंगरसिया ज्वर चढला. चाळिशीतल्या खा. पूनमबेन बेधुंद नाचत होत्या. त्यांच्या तालावर एका बुजुर्ग स्थानिक नेत्यानेही ठुमका धरला व शेकडो लोकांनी नोटा उधळल्या. लोकही एवढे बेधुंद होऊन नाचत होते की काही तर एकमेकांच्या खांद्यावर बसून नोटांचा वर्षाव करीत होते.
देणगीदाखल पैसे उधळले
सौराष्ट्रची ही शंभर वर्षांची परंपरा (लोक दायरो) आहे. देणगीत मिळालेल्या पैशांचा विनियोग सामाजिक कार्यासाठी केला जातो. या कार्यक्रमात मी यापूर्वीही सहभागी होत आले आहे. या पैशाचा उपयोग मुलींसाठी वसतिगृह आणि गोशाळा बांधण्यासाठी केला जाईल. भाजपची खासदार म्हणून नव्हे, तर समाजकन्या म्हणून मी यात सहभागी झाले. भाविकांवर देणगीदाखल नोटांची ही उधळण करण्यात आली, अशी सारवासारव खा. पूनमबेन यांनी केली.

April 19, 2015 in मुख्य पान
मृत महिलेच्या जमिनीची परस्पर विक्री 0

मृत महिलेच्या जमिनीची परस्पर विक्री

crime
नागपूर : मृत महिलेच्या नावावर असलेली कोट्यवधीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्यात आली. यासाठी आरोपींनी जमीनमालक मृत महिलेच्या नावाखाली भलत्याच महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात हजर केले. १४ मे २०१० ते २० आॅगस्ट २०१० या कालावधीतील घडलेला गैरप्रकार आता उघड झाल्यानंतर सदर पोलिसांनी चंद्रपूरच्या एका टोळीविरुद्ध गुन्हे दाखल केले.
विवेक पांडुरंग पडगेलवार (वय ४४, रा़ वडगाव, लक्ष्मीनगर, चंद्रपूर), राहुल राजाराम कांबळे (वय ४५, रा़ उंटखाना, चंद्रपूर), सुनील भाऊराव खोब्रागडे (वय २९, रा. नागसेननगर, भद्रावती), पंकज मेनिनाथ नागदेवते (वय ४०, रा़ बापटनगर, चंद्रपूर) आणि एक महिला प्रमिला नामदेवराव रंगारी यांच्या नावाने अधिकाऱ्यांसमोर हजर झाली) अशी आरोपींची नावे आहेत.
विहीरगाव चंद्रपूर येथील प्रमिला नामदेवराव रंगारी यांची मौजा डोंगरगाव येथे जमीन होती. त्यांचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश रंगारी (वय ५५) जगन्नाथ बाबानगर चंद्रपूर येथे राहतात. या जमिनीकडे अविनाश यांचे दुर्लक्ष झाले. आरोपींनी त्याचा लाभ उठवत कोट्यवधींच्या या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ती विकण्यासाठी आरोपींनी ग्राहकही शोधला. त्यानंतर प्रमिला रंगारी यांच्या नावाखाली भलत्याच महिलेला निबंधक कार्यालयात हजर करून ही जमीन विकली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर अविनाश यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या.

April 19, 2015 in मुख्य पान
भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती 0

भूमध्य सागरात बोट बुडाली, 700 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

2015-04-19-Immigrants-boat-jpg_ns
रोम, दि. 19 – भूमध्य सागरात लिबियाच्या हद्दीत बोट बुडाली असून या दुर्घटनेत बोटीतील सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेनंतर इटली व अन्य देशांचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भूमध्य सागरात इटलीच्या दक्षिणेकडील लम्पेदुसा बेटाजवळ लिबियाच्या हद्दीत प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बोट शनिवारी रात्री बुडाली. या जहाजातील फक्त 28 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले. तर सुमारे 700 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या एका अधिका-याने वर्तवली आहे. मृतांचा नेमका स्पष्ट झाल्यास हा दशकातील सर्वात मोठा अपघात ठरु शकतो असे जाणकारांनी सांगितले. या अपघाताविषयी इटलीच्या नौदलाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या आठवड्यातही भूमध्य सागरात लिबियातून येणारी बोट बुडून 400 जणांचा मृत्यू झाला होता.

April 19, 2015 in मुख्य पान
भूसंपादन विधेयक गरिबांसाठीच, अंबानींसाठी नव्हे - मोदी 0

भूसंपादन विधेयक गरिबांसाठीच, अंबानींसाठी नव्हे – मोदी

images
नवी दिल्ली, दि. 19 – भूसंपादनाविरोधात गैरसमज पसरवले जात असून हे विधेयक गोरगरिबांसाठीच आहेत. अंबानी किंवा पत्रकारांसाठी घर बांधण्यासाठी आम्ही जमीन घेत नाही हे लक्षात ठेवा असे आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांंवर निशाणा साधला आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांसाठी वर्कशॉप घेतला. यात मोदींनी सरकारच्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली. सरकारी योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे याकडे खासदारांनी लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार गोरगरिबांना समर्पित आहे, त्यांच्या विकासासाठीच आम्ही योजना राबवत आहोत, गरिबांना 24 तास वीज व हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे मोदींनी स्पष्ट केले.
काही लोकांना आमच्या सरकारचे कौतुक करणे आवडत नाही, त्यामुळे ते आता आमच्यासंदर्भात कधीही चागलं बोलत नाही, आम्ही केलेले चांगलं काम त्यांना दिसत नाही व चांगलं ऐकूनही घेत नाही असे सांगत मोदींनी विरोधकांवर निशााणा साधला. फ्रान्ससोबत झालेला नागरी अणू करार ही भारतासाठी सर्वात महत्त्वाची बाब असून मेक इन इंडियामोहिमेपेक्षाही हा करार महत्त्वाचा आहे असे मोदींनी सांगितले.

April 19, 2015 in मुख्य पान
उद्योजकांचे कर्ज फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक- राहुल गांधी 0

उद्योजकांचे कर्ज फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक- राहुल गांधी

rahul_gandhi
नवी दिल्ली, दि. 19 – मोदी सरकार देशाचा पाया असलेल्या शेतक-यांना कमकूवत करत असून लोकसभा निवडणुकीत उद्योजकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भूसंपादन विधेयक आणले जात आहे असा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींच्या धोरणामुळे शेतकरी व कामगार वर्ग घाबरला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, अध्यक्ष सोनिया गांधी व मनमोहन सिंग आदी नेत्यांनी संबोधित केले. सुमारे दोन महिने आत्मचिंतन करुन राहुल गांधी आज काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राहुल गांधी आक्रमक शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. देशाच्या विकासासाठी मेक इन इंडिया व उद्योग क्षेत्राच्या विस्ताराची आवश्यकता आहेच पण त्यासोबत शेतकरीही तितकाच आवश्यक आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतक-यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. मात्र मोदी हा पाया  कमकुवत करत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
केंद्र सरकार फक्त श्रीमंत व उद्योजकांसाठीच काम करत असल्याचे शेतक-यांना वाटत असून त्यांची जमीन कधीही हिसकावून घेतली जाईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले. मोदी शेतक-यांना त्यांची जमीन उद्योजकांना विकण्यासाठी भाग पाडत आहे. लोकसभा निवडणुकीत उद्योजकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठीच मोदी शेतक-यांची जमीन उद्योजकांना देत आहे. यासाठीच भूसंपादन विधेयक आणले गेले असे त्यांनी सांगितले. यूपीए सरकारचे भूसंपादन विधेयक शेतकरी हिताचे होते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तर मोदी सरकारने खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली असून गेल्या 11 महिन्यांत सरकारने नेमके काय केले असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.

April 19, 2015 in मुख्य पान
बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा ठार 0

बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा ठार

leapord-in-junner-200x125
पुणे – पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या खामुंडी गावामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबटयाने दोन चिमुरडयांवर हल्ला केला. यात पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून, एक तीन वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून बिबटयाने या भागामध्ये दहशत निर्माण केली आहे. पहाटे पाचच्या सुमारास बिबटयाने दोन्ही बालकांवर हल्ला केला. प्रवीण दुधवडे अस मृत मुलाच नाव असून, रेणुका वाघमारे जखमी मुलीचे नाव आहे.
दोन महिन्यांपूर्वी बिबटयाने या भागात एका महिलेवर हल्ला केला होता. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने पिंजरा लावला आहे.खामुंडी गावातील नागरीक दोन महिन्यांपासून बिबटयाच्या दहशतीखाली वावरत आहेत मात्र वनखात्याला अद्यापही बिबटयाला पकडता आलेल नाही. जखमी रेणुकाला पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

April 17, 2015 in मुख्य पान
विवाहितेने पतीपासून विभक्त होऊन अल्पवयीन प्रियकरासोबत थाटला संसार 0

विवाहितेने पतीपासून विभक्त होऊन अल्पवयीन प्रियकरासोबत थाटला संसार

andhara_SECVPF
भंडारा – जिल्ह्यातील आंधळगांव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या कांद्री परिसरातील एका गावातील संपन्न व सुशिक्षित कुटुंबातील ३७ वर्षीय विवाहित व दोन मुलांच्या आईने एका अल्पवयीन प्रियकरासोबत वेगळा संसार थाटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आतापर्यंत पुरुषांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या नित्य – नव्या घटना समोर येत असतात. परंतु हे प्रकरण थोडेसे वेगळे आहे. यामध्ये विवाहित महिलेने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेमजाळात ओढून त्याला आपल्यासोबत पळवून नेले आहे. या प्रकरणात प्रियकर अल्पवयीन असल्याने विवाहितेली तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
या विवाहितेने या अल्पवयीन मुलाला मागील एक वर्षापासून आपल्या प्रेमपाशात गुंतवून ठेवले आहे. आता आपल्या या छोट्या प्रियकराबरोबर स्वतंत्र राहण्याच्या उद्देशाने आरोपी महिलेने त्याला पळवून नेऊन घरोबा थाटला. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या घरच्यांच्या तक्रारीवरुन तिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलेचा पती सरकारी नोकरदार आहे. घरी सर्व सुखसुविधा असताना, स्वत: महिलाही सुशिक्षित आहे आणि तिला नऊ वर्षा मुलगा व सहा वर्षाची मुलगी अशी दोन अपत्ये असताना तिने हे पाऊल उचलले आहे. पती नोकरीला गेल्यानंतर घरी एकटीच असणार्‍या या महिलेने शेजारी राहणार्‍या एका १७ वर्षीय मुलाला आपल्या प्रेमजालात ओढले. मागील एक वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू आहेत. आता लपून- छपून भेटण्याऐवजी आपण आपला वेगळा संसार थाटू, असे ठरवून त्यांनी घरातून पळून जाण्याची योजना आखली. महिलेने या मुलाला त्याच्या मावशीकडे रामटेकजवळील नगरधन येथे जाण्यास सांगितले. व ठरल्याप्रमाणे ती दुसर्‍या दिवशी रामटेकला पोहोचली. दूरध्वनी करून तिने मुलाला बोलावून घेतले व ते सरळ मौदा येथे गेले. तेथे त्यांनी एक भाडयाने खोली घेऊन आपला संसार थाटला. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पतीने आंधळगांव पोलीस ठाण्यात दाखल केली तर तिकडे मुलाच्या मावशीने आपला भाचा बेपत्ता असल्याची तक्रार रामटेक पोलिसात नोंदवली. रामटेक व आंधळगांव पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांची लोकेशन प्राप्त केली असता तो मोबाईल क्रमांक मौदा येथे असल्याचे समजले. लगेच पोलीसांनी मौदा गाठून त्या महिलेसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३६३ व ३४२ भादंविसं कलम ४/१२ व बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

April 17, 2015 in मुख्य पान