पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April, 2015

बारबालांसोबत पोलिसांचा थयथयाट 0

बारबालांसोबत पोलिसांचा थयथयाट

_police-involve-in-Dance-bar_TOPVPF
ठाणे – कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या एका कुख्यात डान्स बारवर १२ मार्च रोजी धाड पडली तेव्हा या बारमध्ये चक्क दोन पोलीस तेथील बार बालांबरोबर अश्लील चाळे करताना आढळून आले.
या अश्लील चाळयांची व्हिडीओ क्लिप ठाण्यापर्यंत पोहोचली आणि गुरुवारी सकाळ पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या क्लिपमध्ये बारबालांशी अश्लील चाळे करताना आढळून आलेल्या त्या दोन्ही पोलिसांवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी निलंबनाची कारवाई केल्याने मानपाडा पोलीस अडचणीत सापडले आहेत. कल्याण-शिळ रोडला सोनारपाडा गावाजवळ इंद्रप्रस्थ नामक लेडीज सर्व्हीसच्या नावाखाली पहाटे उशिरापर्यंत चालणारा बार आहे. या बारमध्ये कानठळया बसविणाऱ्या डीजेच्या आवाजावर अर्धनग्नावस्थेत थिरकणाऱ्या बारबालामुळे सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी या बारवर रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकली. या वेळी अश्लील गाण्यांच्या तालावर सर्व बारबाला बीभत्स हाव-भाव करत बारमधील उपस्थित ग्राहकांच्या भावना भडकावताना आढळून आल्या. तत्पूर्वी कुणीतरी याच बारमध्ये व्हिडीओ शूटींग करुन ते पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचविले होते. धाडीच्या वेळी पोलिसांनी सुधाकर मनगोर (वय ३२), रजत शेट्टी (३०), संतोष अंधारीकर (३६), रवि दुबे (२४), सुरेंद्र शेट्टी (३४), उमेश शेट्टी (५७) आणि प्रदीप काळे (२४) या बार चालक, कॅशियर, म्युझिक ऑपरेटर्ससह १७ बारबालांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या बारमधून डिजेसह इतर सामान ताब्यात घेतले आहे. मात्र या बारमध्ये मानपाडा पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँचचे संजय बाबर आणि रशीद मुलानी हे दोघे बारमधील बारबालांशी अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ क्लिपमध्ये चौकशी दरम्यान आढळून आले. या क्लिपची पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चार दिवसांनंतर गंभीर दखल घेतली. गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी काढलेल्या फतव्यामुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या दोन्ही वादग्रस्त पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, या कारवाईमुळे मानपाडा पोलीस अडचणीत सापडले आहेत.

 

April 17, 2015 in मुख्य पान
 स्पर्धा परीक्षेचा थेट संबंध वाचनाशी – राजेश खवले 0

स्पर्धा परीक्षेचा थेट संबंध वाचनाशी – राजेश खवले

20150416_190556
यवतमाळ – यश ही सहज मिळणारी बाब नसून त्यासाठी कठोर परीश्रम, चिकाटी, इच्छाशक्ती, आत्म्‍विश्वास आदी गोष्टींची गरज असण्यासोबतच चौफेर वाचनही अत्यंत महत्वाचे आहे.‍ स्पर्धा परीक्षेच्या तंत्रात बरेच बदल झाले असून घोकमपट्टीऐवजी विश्लेषणावर भर दिला जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा थेट संबंध अवांतर वाचनाशी आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधीकारी राजेश खवले यांनी केले.
येथील यवतमाळ करिअर ॲकेडमीच्या वतीने अयोजित मनोविकास ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानिमित्य्‍ आयोजित ‘स्पर्धा परीक्षेत अवांतर वाचनाचे महत्व्‍’ याविषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. स्थानिक स्नेहनगर मधील वायसीएच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राजेश खवले यांनी स्पर्धा परीक्षेत वाचन किती महत्वाचे आहे, हा विषय उदारहणांसह सोपा करून सांगितला. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे सन, वार, महिने, ‍विविध आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी ब्राह्मी पद्धतीचा उपयोग कसा होतो, याबाबतही खवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनाच्या मर्यादा असेल तर, यशाने तुमच्यापर्यंत का यावे, असा परखड प्रश्‍न करून विद्यार्थ्यांनी वाचनाला मर्यादा घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले.‍ सिलॅबसच्या बाहेरचे वाचनही आता स्पर्धा परीक्षेत उपयोगी पडते. आयुष्यात ग्रंथरूपी बारूद भरली नाही तर आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. वयानुरूप वाचनाची आवड,‍ निवड बदलू शकते परंतु, वाचाल तरच वाचाल, हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले.
व्यक्तीमत्व विकासासंदर्भात मनोविकास प्रकाशनचा हातखंडा आहे. मेंदूला चालना आणी माणसाला ‍दिशा देणारी पुस्तके मनोविकास सातत्याने वाचकांना उपलब्ध करून देते. ही पुस्तके स्पर्धा परीक्षेसोबतच दररोजच्या आयुष्यातही अत्यंत मोलाची आहे, हा अनुभव आपण घेतला असल्याचेही राजेश खवले यांनी यावेळी सांगितले. यवतमाळात प्रथमच एक महिना म्हणजे 17 मे पर्यंत चालणारा मनोविकास ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आल्याने यवतमाळकर ख-या अर्थाने वाचन समृद्ध होतील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी यवतमाळ करिअर ॲकेडमीचे संचालक संभाजी राणे, रमेश पखाले यांनी राजेश खवले यांचे रोपटे व ग्रंथभेट देऊन स्वागत केले. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील असंख्य विद्यार्थी, पालक व वाचकांनी गर्दी केली होती.

April 17, 2015 in विदर्भ
हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न 0

हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न

1429090710
पुणे – माहेरहून पाच लाख रुपये आणावे तसेच वडिलांच्या नावावर असलेली जमीन पतीच्या नावावर करण्यासाठी विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुण्यातील सांगवी येथे सदर घटना घडली असून, पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्‍विनी बडे (वय ३१, रा. नवी सांगवी) असे फिर्यादी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवेकानंद विष्णू बडे (वय ३४, रा. समर्थनगर, नवी सांगवी), संदीप विष्णू बडे (वय ३४, रा. समर्थनगर, नवी सांगवी), स्नेहा गौतम वाघचौरे (वय ३०) व इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्‍विनी हीचा विवेकानंद याच्याशी ११ एप्रिल २००८ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी झाल्याने तसेच विवाहात मानपानावरून सासरकडचे तिला त्रास देऊ लागले. अश्‍विनी यांच्या वडिलांच्या नावावर असणारी जमीन आपल्या नावावर करावी व माहेराहून पाच लाख रुपये आणावे यासाठी विवेकानंद याने तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. तसेच मुलीलाही उपाशी ठेवत वारंवार मारहाण करत असे. चहा पावडर व साखरेमध्ये विषारी पावडर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सर्व त्रास असह्य झाल्याने अश्‍विनी यांनी काल सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक डी. जे. जाधव याबाबत अधिक तपास करत आहेत.

April 16, 2015 in मुख्य पान
सानियाच्या घरी हलणार पाळणा 0

सानियाच्या घरी हलणार पाळणा

images
पुणे- टेनिस सुंदरी सानिया मिर्झाच्या घरी पाळणा हलणार आहे. तिचा पती शोएब मलिकनेच ही बातमी दिली आहे. ट्विटरवर शोएबने एका प्रश्नाच्या उत्तरात त्याच्या फॅनला लवकरच तुम्ही काका बनणार असे ट्विट केल्याने याबाबतच्या बातम्यांना उधाण आले आहे. इंटरनेटवर तर या बातमीबाबत चर्चा आणि चर्चित चर्वण सुरू झाले आहे.
सानिया मिर्झाने शोएबशी लग्न केल्यानंतर ती पाकिस्तानची सून झाली मात्र तिने भारतीयत्व सोडले नाही. लग्नानंतर आजपर्यंत झालेल्या सर्वच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सानियाने भारताचेच प्रतिनिधीत्व केले आहे आणि करत आहे. टेनिस सुंदरी म्हणून तिची ख्याती आहे. आता सानिया आई होणार म्हटल्यावर ‘नेटकर मामांचे आणि काकांचे’ त्यावरुन हास्य-विनोद सुरू झाले आहेत.

राहुल गांधी परतले 0

राहुल गांधी परतले

images (1)
नवी दिल्ली, दि. १६ – अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुट्टीवर गेलेले राहुल गांधी गुरुवारी दुपारी दिल्लीत परतले आहे. राहुल गांधी गेेले ५६ दिवस अज्ञातवासात होते. आज दुपारी थाई एअरवेजच्या विमानाने ते दिल्लीत परतले आहेत.
२३ फेब्रुवारीरोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. सुट्टी घेऊन राहुल गांधी नेमके कुठे गेले याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.तसेच सुट्टीचे कारणही उघड झालेले नाही. राहुल गांधींचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होते व यावरुन काही नेत्यांचे राहुल गांधींसोबत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. अशा स्थितीत राहुल गांधी विचारमंथनासाठी सुट्टीवर गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानेच दांडी मारल्याने विरोधकांनी काँग्रेसवर टीका केली होती. तब्बल ५६ दिवस अज्ञातवासात काढल्यावर राहुल गांधी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास दिल्ली विमानतळावर आले. थाई एअरवेजच्या बँकॉक – दिल्ली विमानाने त्यांनी दिल्ली गाठले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राहुल गांधी तुघलक रोड येथील निवासस्थानी पोहोचले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व प्रियंका गांधी या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या. राहुल गांधी परतल्याचे वृत्त समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत फटाके फोडून जल्लोष केला. आज संध्याकाळी काँग्रेसचे काही नेते राहुल गांधींची भेट घेतील अशी शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी दिल्लीत रामलीला मैदानात भूसंपादन कायद्याविरोधात आयोजित मोर्चात राहुल गांधी शेतक-यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे विचारमंथन करुन आल्यावर राहुल गांधी लगेचच राजकारणा सक्रीय होतील असे दिसते.

 

April 16, 2015 in मुख्य पान
आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांना धमकीचा ई-मेल 0

आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांना धमकीचा ई-मेल

RBI Governor Raghuram Rajan announcement of RBI monetary policy
नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांना त्यांच्या खाजगी ई-मेल आयडीवर धमकीचा ईमेल मिळाला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला राजन यांच्या ई-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल मिळाला. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार isis583847@gmail.com. या ई-मेल आयडीवरुन हा मेल पाठवण्यात आला आहे.
‘मला तुम्हाला जीवे मारण्यासाठी पैसे देण्यात आले आहे. जर तुम्ही मला त्याहूनही अधिक रक्कम द्याल तर याबाबत आपण निर्णय घेऊ शकतो असे या मेलमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हो हे खरे आहे. राजन यांना धमकीचा ई-मेल आल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. मेलमध्ये इसिसचे नावही आहे त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे. हे प्रकरण सायबर विभागाडे सोपवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबर गुन्हे तपास विभाग या प्रकरणाचा तपास करत असून सायबर विभागाने अमेरिकास्थित गुगलकडून मदत मागितली आहे.

April 16, 2015 in मुख्य पान
विश्वसुंदरी रोलीन स्टॉस, मिस इंग्लड कॅरिना भारतीय संकृतीच्या प्रेमात 0

विश्वसुंदरी रोलीन स्टॉस, मिस इंग्लड कॅरिना भारतीय संकृतीच्या प्रेमात

201504161200260331_Miss-world-fall-in-love-with-Satpuda_SECVPF
धुळे – जगाला आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणारी २०१४ ची विश्वसुंदरी रोलीन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरिना टायरेल या भारतीय संकृती आणि शिरपूर पॅटर्नच्या प्रेमात पडल्या आहेत.
रोलीन आणि कॅरना यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सातपुड्यातील आदिवासी संकृती आणि जलसंधारणाचा शिरपूर जलसंधारण प्रकल्पाची पाहणी केली. शिरपूरकरांच्या आदरतिथ्याने भारावलेल्या या विश्वसुंदरी भारताच्या आणि विशेष करून शिरपूरच्या प्रेमात पडल्या. या जलसंधारणाच्या कामामुळे स्थानिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाले असल्याचे स्ट्रॉस हिने मान्य केले. टायरेलने तर आपल्या पहिल्या भारतभेटीच्या आठवणी ताज्या करत भारतीय लोकांच्या प्रेमळ स्वभावाचे आणि वैश्विक संकृतीचे तोंड भरून स्तुती केले. यावेळी त्यांना साडी परिधान करण्याचा मोह आवरता आला नाही.

 

April 16, 2015 in मनोरंजन
   रंगरलीया करणाºया नायब तहसीलदाराला चोप 0

रंगरलीया करणाºया नायब तहसीलदाराला चोप

download (1)
यवतमाळ, दि. १३  – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत आपल्या अधिनस्त महिला लिपीका सोबत रंगरलीया करणाºया नायब तहसीलदाराला बेदम चोप दिला. आज सोमवारी सायकांळी ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मंडळ अधिकाºयास नुकतीच नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सदर नायब तहसीलदार महसूल विभागात कार्यरत आहे. त्याच कार्यालयातील महिला लिपीकासोबत तो रंगरलीया करीत होता. म्हणतात ना ‘हवा आली की झाडाचे पान हालते’ या उक्तीप्रमाणे नायब तहसीलदार व महिला लिपीकांच्या कारणाम्याची चर्चा परिसरात रंगू लागली. याबाबतची कुणकुणही महिला लिपीकाच्या पतीला लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीराजाने जिल्हाधिकारी कार्यालयातील पोहचून कानोसा घेतला. त्यावेळी नायब तहसीलदार व महिला लिपीक एकमेकांच्या खर्चीला खुर्ली लावून बसले होते. त्यामुळे संताप अनावर झाल्याने लिपीकाच्या पतीने नायब तहसीलदाराला बेदम चोप दिला. कार्यालयातील सर्व कर्मचाºयासमक्ष हा प्रकार झाला. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती.

April 13, 2015 in मुख्य पान
आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण सर्वोच्च न्यायालयात 0

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण सर्वोच्च न्यायालयात

546c800a3f00b
नवी दिल्ली – आदर्श गृहनिर्माण सोसाय़टी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आदर्श घोटाळयातील आरोपींच्या यादीतून नाव वगळण्याची त्यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राज्यापालांनी अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाईला परवानगी नाकारल्यानंतर आदर्शमध्ये दाखल झालेल्या आरोपपत्रातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.
त्यानंतर खुद्द अशोक चव्हाण यांनी डिसेंबरमध्ये या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांचीही याचिका फेटाळून लावली.
अशोक चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २४ एप्रिलला सुनावणी होणार आहे. देशाच्या राजकारणात गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळयामुळे अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

April 13, 2015 in मुख्य पान
३७ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या 0

३७ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

download
मुंबई – गृह खात्याने एकाचवेळी राज्यातील ३७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करत धक्का दिला आहे. हिमांशू राय यांची ATS प्रमुख पदावरून उचलबांगडी करत विवेक फणसाळकर यांची नियुक्ती केली आहे. तर नागपूरच्या आयुक्तपदी एस.पी. यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये झालेली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरेंची हत्या, सिंचन घोटाळ्याची रखडलेली चौकशी, नागपूर तुरुंगातून फरार झालेले सराईत गुन्हेगार आणि इतर शहरांमधल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे गृह खात्याचे मंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले होते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गृह खात्याच्या कारभावर विरोधकांनी बोट ठेवत हल्ला सरकारवर चढवला होता. त्यामुळे जर्मनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी मंत्र्यामंत्र्यांनी राज्यातील ३७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पण ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर निवडणुकीच्या कामांची जबाबदारी आहे, त्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना लगेचच सूत्र हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयपीएस अधिकारी- सध्याची जबाबदारी – मिळालेली नवी नियुक्ती
१. सतीश चंद्र माथूर (पोलीस आयुक्त पुणे)- महासंचालक, कायदे आणि तंत्रज्ञान, मुंबई (पदोन्नती)
२. एस. पी. यादव (अति. महासंचालक, सीआयडी)- पोलीस आयुक्त, नागपूर
३. के. के. पाठक (पोलीस आयुक्त, नागपूर)- पोलीस आयुक्त, पुणे
४. व्ही. डी. मिश्रा (अति. महासंचालक)- अति. महासंचालक (आस्थापना)
५. डी. कणकरत्नम (अति. महासंचालक, आस्थापना)- अति. महासंचालक (रेल्वे)
६. संजय बर्वे (अति. महासंचालक (रेल्वे)- अति. महासंचालक (लाचलुचपत विभाग)
७. संदीप बिश्नोई (मुख्य दक्षता अधिकारी, एसटी)- अति. महासंचालक, एसआरपीएफ (पदोन्नती)
८. विनित अग्रवाल (विशेष गृहसचिव)- मुख्य दक्षता अधिकारी, एसटी
९. विवेक फणसळकर (सहआयुक्त, प्रशासन)- एटीएस प्रमुख
१०. हिमांशू रॉय (एटीएस प्रमुख)- अति. महासंचालक, पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण
११. बी. के. उपाध्याय (सहआयुक्त, वाहतूक)- विशेष प्रधान गृहसचिव (पदोन्नती)
१२. संजय कुमार (सहआयुक्त, पुणे)- अति. महासंचालक, सीआयडी (पदोन्नती)
१३. राजेंद्र सिंह (पोलीस आयुक्त, औरंगाबाद)- अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय (पदोन्नती)
१४. हेमंत नागराळे (अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय)- अति. महासंचालक, म्हाडा
१५. प्रज्ञा सरवदे (विशेष पो. महानिरीक्षक, दक्षता अधिकारी, सिडको)- अति. महासंचालक, सिडको (पदोन्नती)
१६. विठ्ठल जाधव (प्रशासकीय संचालक)- तुरुंग महानिरीक्षक, नागपूर
१७. शशिकांत शिंदे (तुरुंग महानिरीक्षक, नागपूर)- संचालक, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ
१८. मधूकर पांडे (विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण)- पोलीस आयुक्त, रेल्वे
१९. रविंद्र सिंघल (पोलीस आयुक्त, रेल्वे)- विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण
२०. कुलवंतकुमार सरंगल (नियुक्तीच्या प्रतिक्षेत)- विशेष महानिरीक्षक
२१. प्रभातकुमार (विशेष महानिरीक्षक)- विशेष महानिरीक्षक, कायदा-व्यवस्था
२२. देवेन भारती (विशेष महानिरीक्षक, कायदा आणि सुव्यवस्था)- सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई
२३. धनंजय कमलाकर (सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई)- सहआयुक्त, आर्थिक गुन्हे
२४. राजवर्धन (अति. पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे)- सहआयुक्त, नागपूर (पदोन्नती)
२५. मिलिंद भारंबे (अति. पोलीस आयुक्त)- वाहतूक सहआयुक्त, मुंबई
२६. विश्वास नांगरे-पाटील (उपमहानिरीक्षक, लाचलुचपत)- विशेष महानिरीक्षक (पदोन्नती)
२७. सुरेश मेखला (पोलीस आयुक्त, अमरावती)- विशेष महानिरीक्षक, एसआरपीएफ (पदोन्नती)
२८. अनुपकुमार सिंह (सहआयुक्त, नागपूर)- सहआयुक्त, प्रशासन, मुंबई
२९. सुनील रामानंद (विशेष महानिरीक्षक, एसआरपीएफ)- सहआयुक्त, पुणे
३०. रितेश कुमार (विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर)- विशेष महानिरीक्षक, सीआयडी, पुणे
३१. संजय वर्मा (नियुक्तीच्या प्रतिक्षेत)- विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर
३२. जयजित सिंह (विशेष महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा)- विशेष महानिरीक्षक, नाशिक
३३. प्रवीण साळुंखे (विशेष महानिरीक्षक, नाशिक)- विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
३४. प्रशांत बुरुडे (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा)- विशेष महानिरीक्षक, कोकण
३५. अमिताभ गुप्ता (विशेष महानिरीक्षक, कोकण)- विशेष महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा
३६. बिपीनकुमार सिंह (विशेष महानिरीक्षक, तुरुंग)- विशेष महानिरीक्षक, नांदेड
३७. दीपक पांडे (अति. आयुक्त नागपूर, गुन्हे)- विशेष महानिरीक्षक, मानवाधिकार आयोग

April 13, 2015 in मुख्य पान
'लिव्ह-इन'मधील जोडपे पती-पत्नीच! 0

‘लिव्ह-इन’मधील जोडपे पती-पत्नीच!

2015_4$thumbimg113_Apr_2015_140138293
दिल्ली- ‘विवाहाशिवाय दीर्घ काळ एकत्र राहणाऱ्या स्त्री-पुरुषाला यापुढं कायद्यानं नवरा-बायकोच समजण्यात येईल. तसेच पुरुष जोडीदाराचा मृत्यू झाल्यास महिला जोडीदाराला त्याच्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा अधिकार असेल,’ असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयामुळं ‘लिव्ह-इन-रिशेनशिप’च्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराला व फसवणुकीच्या प्रकारांना चाप बसणार आहे.
एका संपत्तीच्या वादात न्यायमूर्ती एम. वाय. इक्बाल आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. सरीता कावा (बदललेले नाव) ही महिला गेल्या २० वर्षांपासून नृसिंह खन्ना (बदललेले नाव) यांच्यासोबत राहत होती. औपचारिकरित्या त्यांचा विवाह झाला नव्हता. काही दिवसांपूर्वी अचानक खन्ना यांचा मृत्यू झाला. खन्ना यांच्या मृत्यूनंतर सरीतानं त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगितला होता. मात्र, या महिलेने आमच्या आजोबांसोबत विवाह केला नव्हता. आजोबांनी तिला केवळ ठेवून घेतले होते. त्यामुळं तिला संपत्तीत वाटा मागण्याचा हक्क नाही,’ असा युक्तिवाद खन्ना यांच्या नातवंडांकडून करण्यात आला होता.खन्ना यांच्याशी आपला कायदेशीर विवाह झाल्याचे सरीताला सिद्ध करता आले नाही. मात्र, सरीता ही नृसिंह खन्ना यांच्यासोबत एकाच घरात २० वर्षे राहत होती हे खन्नांच्या नातवंडांनी मान्य केले. याचाच आधार घेत न्यायालयानं सरीता कावा हिला कायदेशीर पत्नीचा दर्जा देत तिच्या बाजूनं निकाल दिला.

April 13, 2015 in मुख्य पान
 नक्षली हल्ला, ४ जवान शहीद 0

नक्षली हल्ला, ४ जवान शहीद

Encounter in Shopian
रायपूर – छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात चार सुरक्षारक्षक शहीद झाले असून आठ जण जखमी आहेत. गेल्या ७२ तासांत चौथ्या नक्षलवादी हल्ल्यानं राज्य हादरलं आहे.
दंडेवाडा जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर चोलनार इथं सुरक्षारक्षक गस्त घालत होते, तेव्हाच नक्षलींनी भीषण भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की त्यात भू-सुरुंगरोधक वाहनाचाही चक्काचूर झाला. या स्फोटात चार जवान जागीच मृत्युमुखी पडले, तर आठ जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक तातडीनं घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य वेगानं सुरू आहे.
या भू-सुरुंग स्फोटाआधी, आजच कंकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बीएसएफ पथकाला लक्ष्य केलं. त्यात एक जवान शहीद झाला. कालही कंकेर जिल्ह्यात खाणकाम करणारी १७ वाहनं त्यांनी पेटवून दिली होती. त्यात सुदैवानं कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. परंतु, शनिवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पोलमपल्ली जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत सात जवान शहीद झाले होते.

April 13, 2015 in मुख्य पान
तरुणाचा खून करून मृतदेह टाकला कालव्यात 0

तरुणाचा खून करून मृतदेह टाकला कालव्यात

images..
पुणे : तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने वार करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी सकाळी स्वारगेट कालव्यामध्ये हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.
संभाजी दादाराव ओहाळ (वय ३५ ते ४०, रा. लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहाळ हे मूळ लातूरचे रहिवासी आहेत. तीन ते चार आठवड्यांपूर्वी ते मुंबईमध्ये गेले होते. तेथून ते पुण्यात आले होते. दांडेकर पूल परिसरात त्यांचे नातेवाईक राहायला आहेत. त्यांच्याकडे ते जाऊन येऊन राहत असत.साधारणपणे दोन दिवसांपूर्वी ते गायब झाले होते. रविवारी सकाळी स्वारगेट जवळील कालव्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

April 13, 2015 in मुख्य पान
सहकार महर्षी विक्रमसिंह घाटगे यांचे निधन 0

सहकार महर्षी विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

2015-04-13~chairmansoprofile_ns
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची नवी वाट तयार करणारे कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक व लोकनेते राजे विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे (वय ६७ रा. नागाळा पार्क कोल्हापूर) यांचे सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने साखर कारखानदारीतील ‘दीपस्तंभ,’ उमदा नेता व दिलदार राजा हरपल्याची भावना व्यक्त झाली. या लाडक्या नेत्याच्या अशा अचानक निधनाने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो जनतेला अश्रू अनावर झाले. बऱ्याच लोकांचा सुरुवातीला या बातमीवर विश्र्वासच बसला नाही. येथील कसबा बावडयातील कागलवाडी परिसरातील राजघराण्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अलोट गर्दी उसळली होती. घाटगे यांच्या मागे पत्नी श्रीमती सुहासिनीदेवी, मुलगा व शाहू दूध संघाचे व्यवस्थापक संचालक समरजितसिंह, कन्या तेजस्विनी भोसले, बहिण बडोद्याच्या हर्षलाराजे गायकवाड, अमरावतीच्या रंजनाराजे देशमुख व जतच्या ज्योत्स्नाराजे डफळे, भाऊ व येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रविणसिंह असा मोठा परिवार आहे. घाटगे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. सहकारातील जाणते नेतृत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. कागल विधानसभा मतदार संघातून ते १९७८ व १९८० अशा दोन वेळा आमदार झाले. पुढे १९९८ ला त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली परंतू त्यात त्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी राजकारणापेक्षा साखर कारखानदारीत अधिक लक्ष केंद्रित केले. त्यांची ओळखही राजकारण्यांपेक्षा सहकाराच्या माध्यमातून रचनात्मक काम करणारा नेता अशीच अधिक ठळक झाली होती. गोरगरिब शेतकऱ्यांचे हित करायचे असेल तर सहकारी साखर कारखानदारीच टिकली पाहिजे असा त्यांचा आग्रह राहिला. व स्वत:चा शाहू साखर कारखाना तितक्याच उत्तमपध्दतीने त्यांनी चालवून दाखविला. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उत्तम चालविलेला कारखाना कोणता म्हणून विचारणा झाल्यावर पहिले नांव पुढे येते ते अर्थातच ‘शाहू’चे. हे सगळे श्रेय घाटगे यांच्या नेतृत्वाचे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी कागलच्या राजकारणात त्यांचा सुमारे पंचवीस वर्षे टोकाचा संघर्ष झाला. मंडलिक यांचे निधन नऊ मार्चला झाले. त्यावेळी ‘आता आमचा नंबर कधी..’ असे मिश्किलपणे म्हणणारे विक्रमसिंह यांचेही निधन लगेच महिन्याभरात व्हावे हा देखील एक दैवदुर्विलासच. घाटगे यांना मधुमेहाचा त्रास होता. कांही वर्षापूर्वी त्यांची अ‍ॅन्ज्युोप्लास्टीही झाली होती. प्रकृतीबाबत ते दक्ष होते. रोज सायंकाळी कृषी महाविद्यालयाच्या आवारात फिरायला जात. मांसाहारही पूर्ण बंद केला होता. दोन-तीन दिवसांत धाप लागल्यासारखे वाटू लागल्याने आज सोमवारी त्यांनी डॉ. दिलीप कुलकर्णी यांची वेळ घेतली होती. काल दिवसभरची दिनचर्याही नेहमीचीच राहिली. दुपारी घरीच कार्यकर्त्यांशी बोलले. सायंकाळी फिरून आले. पहाटे सहाच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी पत्नीस सांगितले. म्हणून तातडीने त्यांनी मुलगा समरजित यांना बोलवले. दोघांनी धरून जिन्यावरून खाली आणतानाच ते कोसळले व तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. लगेच त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून घाटगे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.

April 13, 2015 in मुख्य पान
अभिनेत्री रिया सेनचे घर जळून खाक 0

अभिनेत्री रिया सेनचे घर जळून खाक

riya-home-1_1428811127
मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री रिया सेन हिचे जुहू येथील घर जळून खाक झाले आहे. रात्री उशिरा सेन परिवार झोपेची तयारी करत होते त्याच वेळी एसीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग लागली.
ही आग मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास लागली. आग लागली तेव्हा घरात रियासह तिची आई अभिनेत्री मुनमुन आणि वडिल भरत देव वर्माही उपस्थित होते.सूचना मिळताच अग्निशामक दलाचा जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, असे अग्नी दलाचे अधिकारी अभय काळे यांनी सांगितले. के म्हणाले की, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मत्रा मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे.

 

April 12, 2015 in मुख्य पान
आसाममध्ये बॉम्ब स्फोट, एक ठार 0

आसाममध्ये बॉम्ब स्फोट, एक ठार

Timeline-of-maj20369
गुवाहटी – आसाममध्ये एका गावात बॉम्बचा स्फोट झाल्याने एक जण ठार झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा स्फोट आज सकाळी साडे सहा वाजता झाला.
आसामच्या उदलगुरी जिल्ह्यातील बोरजहार या गावात हा स्फोट झाला त्यात रामचंद्र बर्मन या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.बर्मनचा भंगाराचा व्यावसाय आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे, तेथे काही धातू अढळून आले आहेत. ते सर्व धातू बर्मनने शनिवारी गोळा केले होते. तो बॉम्ब असल्याचे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे त्याने बॉम्बवर हातोडा मारला आणि मोठा स्फोट झाला. यात बर्मनचा जागावरच मृत्यू झाला. तीन जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

April 12, 2015 in मुख्य पान
खिचडीत शिजली पाल; ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा 0

खिचडीत शिजली पाल; ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा

vishbadha_1428793753
हिंगोली – मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे तालुक्यातील समगा येथील जिल्हा परिषद शाळेतील ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांना हिंगोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली असून ७५ जणांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
समगा येथील जिल्हा परिषद शाळेत ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी आणि वाटाणे देण्यात आले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थ्याने खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी उलट्या केल्याने ९५ विद्यार्थ्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब रोडगे, डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे आदी डॉक्टरांनी ताबडतोब विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. एक तासाच्या उपचारानंतर त्यातील २० विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जास्त बाधा झालेल्या ७५ विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होताच त्यांना सुटी देण्यात येणार आहे. डॉ. रोडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत. या प्रकरणी डॉक्टरांनी खिचडी आणि वाटाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.

April 12, 2015 in मुख्य पान
नागपुरात तीन कुख्यात गुंड भावांची निर्घृण हत्या 0

नागपुरात तीन कुख्यात गुंड भावांची निर्घृण हत्या

images..
नागपूर – जुगाराच्या पैशांवरून झालेल्या भांडणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीन भावांचा वस्तीतील मुलांनीच चाकू, तलवारीने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिडी पेठ भागात घडली. एकनाथ उगले, केशव उगले संजय उगले अशी मृतांची नावे आहेत.
एकनाथ हा अफजल अली नावाच्या गुंडासोबत भागीदारीमध्ये काम करत होता. त्याच्याविरुद्ध ‘मकोका’अंतर्गत गुन्हेही दाखल आहेत, तर केशव आणि संजय हे अण्णा राऊत नावाच्या गुंडासाठी बिडी पेठ वस्तीमध्ये जुगार अड्डे चालवायचे. या तिन्ही भावांची या वस्तीत मोठ्या प्रमाणावर दहशत होती. सामान्य नागरिक त्यांच्या जाचाला कंटाळले होते.
गुरुवारी हे तिघेही भाऊ वस्तीतील एका मित्राच्या मुंडण कार्यक्रमासाठी नागपूर-भंडारा मार्गावरील वागोळा या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना तिघाही भावांनी जुगाराचा डाव रचला. त्या वेळी पैशांवरून त्यांचा काही युवकांशी वाद झाला. या वादामुळे वस्तीतील युवक कार्यक्रम सोडून नागपुरात परतले.रात्री तिघेही भाऊ घराकडे येताना दिसताच एका चौकातील पान ठेल्यावर चाकू, तलवारींसह उभ्या असलेल्या युवकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात एकनाथ आणि केशव हे जागीच ठार झाले, तर संजयने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र युवकांनी त्यालाही संपविले. दरम्यान, सर्व आरोपी फरार आहेत.
गुंड संपवण्याचे सत्रच
गेल्याकाही वर्षात नागपुरात कुख्यात गुंडांची हत्या करण्याचे सत्रच सुरू झाले आहे. अक्कू यादव, पिंटू शर्के या गुंडांचा भर कोर्टात खून करण्यात आला होता. मार्च २०१३ रोजी कुख्यात गुंड इक्बाल याला विद्यापीठाच्या इमारतीसमोर महिलांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. तो झोपडपट्टीतील महिलांची छेड काढायचा.

April 12, 2015 in मुख्य पान
रिव्हॉल्व्हर धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार 0

रिव्हॉल्व्हर धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

mum rape
कर्जत – रिव्हॉल्व्हर आणि चॉपरचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी सिद्धांत डाळींबकर आणि त्याचा साथीदार पंकज मोरे या दोघांना अटक केली आहे. सिद्धांत डाळींबकर एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाचा सदस्य आहे असल्यामुळे संपूर्ण घटनेला वेगळेच महत्त्व आले आहे. ठोस धागेदोरे मिळाल्यामुळेच सिद्धांत डाळींबकर आणि पंकज मोरेला अटक केल्याचे कर्जतचे पोलिस इन्स्पेक्टर आर. आर. पाटील यांनी सांगितले.
सिद्धांतने २०१२ पासून अनेकदा पीडितेला धाक दाखवून आपल्या आय २० कारमध्ये बसवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. प्रत्येक वेळी पंकज मोरे गाडी चालवत होता तसेच पीडितेचे फोटो काढत होता. या प्रकरणात पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून आय २० कार जप्त केली आहे.
अल्पवयीन मुलीला पळवणे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे, अश्लील फोटो अथवा चित्रीकरण करणे, भारतीय शस्त्र कायदा तसेच बाल हक्क संरक्षण कायद्यातील कलमांतर्गत गंभीर आरोप ठेवून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढत असून हे प्रकार रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाय करण्याची गरज असल्याचे दिशा केंद्राचे समन्वयक अशोक जंगले यांनी सांगितले.

April 11, 2015 in मुख्य पान
छत्तीसगड नक्षलवादी हल्ला, सात पोलिस शहीद 0

छत्तीसगड नक्षलवादी हल्ला, सात पोलिस शहीद

naxal01
रायपूर – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पीडीमील-पोलामपाली भागात विशेष पोलिस पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात पोलिस शहीद झाले असून, दहा जण जखमी झाले आहेत.
डोरनापाल आणि चिंतागुफा परिसरात एसटीएफ पोलिस पथक आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यापूर्वी या भागात माओवाद्यांनी सुरक्षा पथकातील जवानांवर घात लावून केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक जवान शहीद झाले आहेत. जखमी जवानांना जगदालपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हवाईमार्गे जगदालपूरला आणण्य़ात आले. एसटीएफच्या मदतीसाठी घटनास्थळी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन तुकडया पाठवण्यात आल्या आहेत.शहीद झालेल्या पोलिस जवानांची ओळख पटली असून, कमांडर शंकर राव, रोहित सोधी, मनोज बाघेल, मोहन व्ही.के., राजकुमार मारकाम, किरण देशमुख आणि राजमान टेकाम अशी या जवानांची नावे आहेत.

April 11, 2015 in मुख्य पान