
नैरोबी- केनियातील गॅरिसा विद्यापीठातील कॅम्पस परिसरात गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एकूण १४७ जण ठार झाले. तर ८० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांनी विद्यापीठ परिसरात प्रवेश करत अंधाधुंद गोळीबार केला.
केनिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे जवान आणि अतिरेकी यांच्यात तब्बल १६ तास धुमश्चक्री चालू होती. संरक्षण दलाची मोहीम आता संपली आहे. चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तसेच गॅरिसा शहरात आणि जवळपासच्या परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अमेरिकेनेही केनियाला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. अल शबाबचा नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.केनियामध्ये १९९८ मध्ये अमेरिकी दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतरचा हा देशातील दुसरा सर्वात मोठा हल्ला आहे.
Archive for April, 2015
0
केनिया दहशतवादी हल्ला- १४७ ठार
0
क्वालीस- टँकर अपघातात नऊ ठार

चेन्नई- तामिळनाडूतील दिंडीगल जिल्ह्यात पहाटे साडेतीन वाजता क्वालीसने टँकरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.क्वालीस आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. कोडाई कॅनल येथील एका रिसॉर्टमधून परत येत असताना हा अपघात झाला. या गाडीत १० जण होते. त्यापैकी नऊ जण ठार झाले असून जबर जखमी झालेल्या एकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
0
साता-यात केमिकल कंपनीत भीषण आग

सातारा- पुणे- सातारा रोडवर शिरवळ एम. आय. डी. सी. मधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली.आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या शर्थीचे प्रयत्न करीत असून अद्यापही आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलेले नाही.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कंपनीमधील केमिकलचा पिंप फुटल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
0
महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मुंबई- चेंबूरमधील वाशी नाका परिसरात एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही महिला या मुलावर लैंगिक अत्याचार करत होती. आरोपी महिला ही एकटीच राहते. तिने या पूर्वी याच पोलीस ठाण्यात आपल्या पती विरुध्द बलात्काराची तक्रार दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा १५ वर्षाचा असून तो या विकृत महिलेच्या मुलाचा मित्र आहे. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी ओळख होती. एक दिवस हा मुलगा मित्राच्या घरी गेला असता मित्राच्या आईने त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि त्याच्या सोबत अश्लील चाळे केले. हे सर्व तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन त्याची ‘व्हिडिओ क्लीप’ तयार केली.हा मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याला मोबाईलमधील ‘व्हिडिओ क्लीप’ दाखविली आणि कोणाला सांगितले तर मी पोलिसात तक्रार देईन, अशी धमकी दिली. यानंतर हा प्रकार गेले दोन ते तीन महिने सुरू होता. अखेर सदर प्रकार घाबरत घाबरत या मुलाने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी बाल अत्याचार कायद्याखाली सदर महिलेस अटक केली आहे. बाल लैंगिक अत्याचार कायदा अस्तित्वात आल्यानंतरचा हा पहिलाच गुन्हा आहे. विशेष म्हणजे यात चक्क महिला आरोपी आहे.
0
धावत्या रेल्वेतून फेकले

ठाणे / जळगाव- ठाणे आणि जळगाव अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धावत्या रेल्वेतून फेकल्यामुळे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
ठाण्यातील कोपरी पूल ते ठाणे रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलमधून गौरव पुंजवानी या तरुणाला फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गौरवने पाकीट चोरीला विरोध केला. त्यामुळे चोरट्यांनी त्याला धावत्या गाडीतून धक्का मारत बाहेर फेकून दिले. जखमी गौरवला स्थानिकांनी जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.
तर दुसरीकडे, सहप्रवासी तरुणांनी १८ वर्षीय विद्यार्थ्याला धावत्या गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसमधून बाहेर फेकल्याचा प्रकार जळगावमध्ये घडला आहे. ही घटना गुरुवारी पाळधीजवळ धरणगाव- चावलखेडा स्थानकादरम्यान घडली. भूषण संजय भदाणे (१८) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेत त्याला गंभीर इजा झाली असून, त्याला उपचारासाठी जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
0
मुस्लिमांची लोकसंख्या वाढतेय, सुस्साट

वॉशिंग्टन- वर्ष २०५० पर्यंत ख्रिश्चन धर्म ३१ टक्के (२.९ अब्ज) लोकसंख्येसह जगातील सर्वात मोठा धर्म असेल, तर मुस्लिमांची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा फक्त एक टक्क्याने कमी, म्हणजेच २.८ अब्ज इतकी असेल, असा अंदाज या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. तर जगातील सर्वाधिक मुस्लिमांची संख्या ही भारतात असेल आणि हिंदूंची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या तिसर्या क्रमांकावर असेल असे पीयू रिसर्च सेंटरच्या संशोधनात म्हटले आहे.
जगभरातील प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, भारत इंडोनेशियाला मागे टाकत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.
जगभरात हिंदूची आकडेवारी ३४ टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. तर आगामी चार दशकात ख्रिश्चन धर्म हा पहिल्या स्थानावरच असेल. २०५० मध्ये जगात हिंदुंची लोकसंख्या १.४ अब्ज, मुसलमानांची लोकसंख्या २.८ अब्ज, ख्रिश्चनांची लोकसंख्या २.९ अब्ज असेल. बौद्ध धर्मीयांच्या लोकसंख्येत फारशी वाढ होणार नाही असे या अहवालात म्हटले आहे.
जगातील सर्वाधिक मुस्लिम आज इंडोनेशियात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार तिथे मुस्लिमांची संख्या २०२.९ दशलक्ष इतकी आहे. पाकिस्तानात २०१०च्या गणनेनुसार १७ कोटी ८० लाख ९७ हजार मुस्लिम लोकसंख्या आहे, तर भारतात सुमारे १७ कोटी ६० लाख मुस्लिम राहतात.
परंतु, देशात मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढील ३५ वर्षांत, इंडोनेशियापेक्षा जास्त मुस्लिम भारतात असतील, असे या संशोधनात म्हटले आहे. परंतु, २०५० मध्येही भारत हे हिंदूबहुल राष्ट्रच असेल, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
0
सात वर्षात २५९पोलिसांच्या आत्महत्या

मुंबई- मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या २००७ ते २०१४ या सात वर्षाच्या कालावधीत २५९ पोलिसांनी आत्महत्या केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
ज्या पोलिसांनी आत्महत्या केलेल्या आहेत, या आत्महत्या या पोलिसांनी विविध कार्यक्रम सण, उत्सव आदी कारणांमुळे आणि सतत वेळी-अवेळी बंदोबस्ताचे काम दिल्यामुळे झाल्या आहेत, असे म्हणता येणार नाही. सदर आत्महत्या होण्यामागे कौटुंबिक तसेच वेगवेगळी वैयक्तिक कारणे असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात केला आहे.
आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील पोलिसांना २४ तास काम करावे लागत आहे. यामुळे पोलिसांमध्ये दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तसेच कामाचा ताण वाढत असल्याने मागील वर्षात १४७हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाला.
हा प्रकार खरा आहे काय, असा सवाल विचारला होता. तसेच कायम बंदोबस्त, अपुरी झोप, वरिष्ठांकडून दिली जाणारी जाचक वागणूक या असह्य ताणामुळे २००७ ते २०१४ या कालावधीमध्ये २४७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे जानेवारी २०१५ मध्ये गृहविभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे काय, असाही सवाल आमदार राणे यांनी उपस्थित केला होता.
आमदार राणे यांच्या तारांकित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ज्या १४७ पोलिसांचे विविध आजारांनी निधन झाले आहे, त्यांचे निधन कामाच्या तणावामुळे झाल्याच्या नोंदी अभिलेखावर उपलब्ध नसल्याचा स्पष्ट दावा आपल्या उत्तरात केला. तर पोलिसांचे आरोग्य उत्तम राहावे, तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना राबविण्यात येत असून बीएमआय चाचणी करून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. तर पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्मचारी वृंद परिषदेचे आयोजन करण्यात येते. तसेच आज्ञांकित कक्ष व दरबारामध्ये त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले आहे. पोलीस, पोलीस अधिकारी यांच्यासाठी तणावमुक्त व निरोगी राहण्यासाठी आरोग्यविषयक तपासणी शिबिर कार्यशाळा, योगा, आरोग्यविषयक जागरूकता शिबिरांचे आयोजनही करण्यात येते.
0
वाघाच्या हल्ल्यात युवक ठार
वणी, दि़२ – वणी उपविभागातील फैदाबाद येथे वाघाने हल्ला चढवून युवकाला ठार केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगन तुकाराम गेडाम (३०) रा. फैदाबाद असे मृतक युवकाचे नाव आहे़
सैदाबाद येथील शेतमजूर जगन गेडाम हा सरपण गोळा करण्याकरीता जंगल परिसरातील शेतात दुपारच्या सुमारास गेला़ त्याने सरपण गोळा करुन बैलबंडीत भरले़ दरम्यान लगत पडलेले लाकूड घेण्याकरीता तो जंगलाकडे गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केला़ तसेच त्याला पाच किमी अंतरापर्यत फरफटत नेले़ रात्री तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली़ यावेळी त्याच्या चपला व कुºहाड लगतच आढळली़ तसेच रक्त सांडलेले दिसले़ गावातील ८० ते ९० इसमांनी संपूर्ण जंगलात शोधकार्य सुरु केले असता घटनास्थळावरुन पाच किमी अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला़ या बाबत वनविभागाला सुचित करण्यात आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी पंचनामा करुन मृृतदेह उत्तरीय तपासणीकरीता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले़ मृतकाला दोन मुली असून गर्भवती अपंग पत्नी आहे़ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनेकदा निवेदनातून करण्यात आली.
निळोण्याची मुख्य पाईपलाईन फुटली, शहराचा पाणी पूरवठा बंद
यवतमाळ, दि. २ – शहराला पाणीपूरवठा करणाºया निळोणा धरणावरून येणारी मुख्य पाईप लाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा उद्या ३ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.
बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गोधणी रोडवरील विधी महाविद्यालयासमोरील निळोण्याची मुख्यपाईप लाईन फुटली. वनविभागाचे त्याठिकाणी खोदकाम सुरू केले. खोदकाम करतेवेळी सदर पाईप लाईन फुटली. दोन वाजता अधिकाºयांना हा प्रकार माहित झाल्यानंतर पंपीग बंद करण्यात आली. या दोन तासात लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला असून, काल नळाच्या प्रतिक्षेत नागरिकांनी रात्र जागून काढली. मात्र नळच न आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करून अधिकाºयांना फोन लावला. यावेळी पाईप लाईन फुटल्याचे समोर आले. दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, पाईप लाईन जोडण्याकरिता कॉलरजाईन्डची गरज आहे. नागपूर व्यतिरीक्त जाईन्ड मिळत नसल्याचे सुत्राने सांगितले असून, आज दिवसभरातही काम पुर्ण न झाल्याने शहरात पाण्याचा ठणठणाट होता. दुरस्तीसाठी बराच अवधी लागणार असून, त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटंकती होणार आहे.
शहरातील व लगतच्या ग्राम पंचायतीमधिल गोधणी, पाटीपूरा, मेन मार्केट, अंबिकानगर, पेशवे प्लॉट, कळंब चौक, तायडेनगर, आठवडी बाजार, बेले ले-आऊट, चापनवाडी, सेवानगर, मेनलाईन, दत्त चौक, अमराई पुरा यासह अन्य काही नगरांचा काल बुधवारी व आज गुरुवारी नळाचा दिवस होता. पाईप लाईन दुरुस्तीनंतरच या भागांना पाणी पुरवठा करणे शक्य आहे. दर्डानगर व वाघापूर वासीयांना मात्र नो टेंशन असून, त्यांचा पाणी पुरवठा होणार आहे.
पिजंनालयाला आग, पाच लाखांचे नुकसान
यवतमाळ, दि. २ – पिजंनालयाला आग लागल्याची घटना आज गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास सुरजनगरात घडल्याने नगरवासींयाची पळापळ झाली. या आगीत पाच लाख रुपयांच्या रुई व कापसाचे नुकसान झाले असून, शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गोधणीरोडवर असलेल्या विदर्भ हाऊसिंग सोसायटीला लागूनच सुरजनगर आहे. या नगरात तरुण शर्मा यांचे पिजंनालय आहे. सकाळी पिजंनालयात व्यवस्थित काम सुरू झाले. दुपारी एक च्या सुमारास अचानक पिजंनालयासमोर असलेल्या रुई व कापसाच्या गंजीतून धुर निघण्यास सुरूवात झाली. त्यानंतर गंजीने पेट घेतल्यानंतर पळापळ सुरू झाली. आगीचे रुप पाहून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी एक बंब पाण्याचा मारा करण्यात आला. यामध्ये पाच क्विंटल रुई व कापूस असा दहा क्विंटल माल जळून खाक झाला आहे. त्याची किं मत साडेपाच लाख रुपयांच्या घरात असून, याबाबत वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. शॉटसर्कीट किंवा उन्हामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सतर्कतेमूळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
0
सागवानाचा ट्रक जप्त
यवतमाळ, दि. २ – वडगाव जंगल वनपरीक्षेत्रातील सागवान वृक्षांवर कुºहाड चालली असून बेवारस पाच घनमीटर माल जप्त करण्यात आला. यामध्ये वनपरीक्षेत्र अधिकाºयाचा हात असल्याचे बोलले जात आहे.
यवतमाळ वनवृत्तातील राखीव वनातून सागवान वृक्षांची कत्तल राजरोसपणे सुरू आहे. यवतमाळ, जोडमोहा, हिवरी वनपरीक्षेत्राला सागवान ठेकेदारांनी आपला अड्डाच बनविला आहे. जोडमोहामधिल गणेशवाडी व टपालहेटी येथील धाडीत डिएफओच्या हाती परीपक्व सागवानचे तीन तर अपरिपक्व सागवानचा एक ट्रक हाती लागला होता. मात्र अधिकारीच ठेकेदार निघाल्याने हा विषयच दडपण्यात आला. सागवान तस्करांच्या विरोधात डिएफओ प्रमोदचंद लाकरा यांनी मोहिम गेल्या काही दिवसापासून उघडली असून, यामध्ये वनपरीक्षेत्र अधिकाºयांचे पितळ उघडे पडत आहे. आज गुरूवारी सकाळी वडगाव धानोरा वनपरीक्षेत्रातील राखीव वनात बेवारस सागवान डिएफओला मिळून आले. शेतकºयाच्या शेतातील हे सागवान असल्याचे सांगितले जात असून, त्यावर हॅमर नसल्याने विनापरवान्याचा हा माल असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. सदोबासावळी येथे पकडण्यात आलेला जलतनचा माल देखील संशयाच्या भोवºयात असून, सागवान तस्करांच्या नावाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी व वनरक्षकच वृक्षांची कत्तल करीत असल्याचे बोलल्या जात आहे. डिएफओच्या मोहिमेमूळे अधिकाºयांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. यामध्ये अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.










