पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January 5th, 2015

पोलिसांनी एकमेकांवर झाडल्या गोळ्या 0

पोलिसांनी एकमेकांवर झाडल्या गोळ्या

2015-01-05~gun-firing_ns
भोपाळ, दि. ५ – दोन पोलीस अधिका-यांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे. यापैकी एका अधिका-याने पहिले दुस-या अधिका-यावर गोळी झाडली व नंतर स्वतःवर गोळी झाडल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेने मध्यप्रदेशातील पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली. टीकमगढ येथील पृथ्वीपूर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकारी के.एस. मलीक यांनी आपले कनिष्ठ अधिकारी प्रमोद चतुर्वेदी यांना चर्चेकरता आपल्या केबीनमध्ये बोलवले होते.
प्रमोद चतुर्वेदी चर्चेकरता गेले असता या दोघांमधील चर्चेने वादाचे रुप धारण केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये मोठमोठ्याने वाद होत होते. त्यानंतर आलेल्या गोळ्यांच्या आवाजाने पोलीस कर्मचा-यांनी मलीक यांच्या केबीनमध्ये डोकावून पाहिले असता दोघांचेही मृतदेह त्यांना रक्ताच्याथारोळ्यात पडलेले अढळले.
ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली असल्याचे पोलीस कर्मचा-यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच टीकमढचे पोलीस अधिक्षक अनुराग शर्मा आणि पोलीस महानिरीक्षक पंकज श्रीवास्तव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मलीक यांची केबीन पुर्णतः सील केली आहे.

January 05, 2015 in मुख्य पान
पद्मभूषण पुरस्कारासाठी सायना नेहवालच्या नावाची शिफारस 0

पद्मभूषण पुरस्कारासाठी सायना नेहवालच्या नावाची शिफारस

Saina Nehwal at Taj Mahal
नवी दिल्ली – केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पद्मभूषण पुरस्कारासाठी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.
पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्याची वेळ निघून गेली आहे. मात्र सायनाची उत्तुंग कामगिरी ध्यानात घेऊन विशेष बाब म्हणून सायनाची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे असे क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
पद्म पुरस्कारासाठी वेळेत शिफारस केल्याचा सायनाचा दावा केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांनी फेटाळून लावला. शनिवारी सायनाने पद्य भूषण पुरस्कार न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. भारतीय बॅडमिंटन संघटनेने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पद्म पुरस्कासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती मात्र नियमांचा हवाला देऊन क्रीडा मंत्रालयाने अर्ज फेटाळून लावला होता असे सायनाने म्हटले होते.
त्यावर क्रीडा मंत्र्यांनी सायनाचा दावा फेटाळून लावला. तीन जानेवारीला पद्म पुरस्कारासाठी सायनाच्या नावाची शिफारस करणार अर्ज मिळाल्याने क्रीडा मंत्र्यांनी सांगितले.

 

January 05, 2015 in मुख्य पान
निती’ आयोगाच्या टीमची घोषणा 0

निती’ आयोगाच्या टीमची घोषणा

NITI-Aayog1-300x254
नवी दिल्ली- गेल्या ६४वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढून त्याजागी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘निती’ आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक व नामवंत अर्थतज्ज्ञ अरविंद पानगरिया यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या आयोगामध्ये अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय आणि माजी संरक्षण सचिव डॉ.व्ही.के.सारस्वत यांची पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू आणि राधा मोहनसिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत हे आयोगातील अन्य सदस्य असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ६४ वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढण्याची घोषणा केली होती. ही व्यवस्था कालबाह्य झाली असून त्याऐवजी सध्याच्या गरजांसाठी लवकरच नवीन संस्था त्याची जागा घेईल, असे त्यांनी सांगितले होते.
सात डिसेंबरला पंतप्रधान मोदींनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही जणांनी नियोजन आयोगाच्या ऐवजी दुसरी नवीन यंत्रणा तयार करण्याचा निर्णयाला सहमती दर्शवली तर काही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी यास विरोध केला होता.
तसेच यापूर्वी नियोजन आयोगाच्या जागी उभारण्यात येणा-या नव्या संस्थेबाबत पंतप्रधानांनी लोकांना नव्या कल्पना सुचविण्यास पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. नव्या संस्थेबाबत नवीनवीन संकल्पना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात’, असे मोदींनी ट्विटरद्वारे सांगितले होते. तसेच यासाठीची लिंकही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती.

 

January 05, 2015 in मुख्य पान
 आंदोलकांवरील खटले मागे 0

आंदोलकांवरील खटले मागे

BJP protest demanding the arrest of Shabir Khan
मुंबई – राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अनेक कार्यकर्त्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २००५ ऐवजी २०१४ पर्यंतचे अशा प्रकारचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.
राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये १ मे २००५ पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले खटले ७ जुलै २०१० च्या शासन निर्णयान्वये मागे घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. हे खटले मागे घेण्याची तारीख आता १ मे २००५ ऐवजी १ नोव्हेंबर २०१४ पर्यंत वाढविण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

January 05, 2015 in मुख्य पान